मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडी, सिंडरेला, सायली, टिना, काळजीवाहू, धन्यवाद!
सिंडरेला, साधारण ९८ च्या दरम्याने केले होते मी आणि बहिणीने सिरॅमिक पॉट आणि पाईप.
ते प्लेट्वर केलेल डिजाईन जाऊ नये म्हणून काय करायच ? >>> त्यावर Mod Podge किंवा इतर फिक्सर वापरायचे.
निसर्गा, सुंदर!

खूप सुंदर डिझाईन्स सगळ्यांचीच.. किती छान मेहंदी काढता ग तुम्ही सगळ्या.. Happy
मलापण मेहंदी काढून घ्यायला आवडते, काढता मात्र येत नाही.. एक दोन वेळा प्रयत्नही केला पण माझी (चित्र)कला अगदीच यथातथा असल्याने फारसं काही जमलं नाही.. पण मला शक्य असतं तर मी अगडी दर महिन्याला मेहंदी काढून घेतली असती न चुकता.. पण कोणी काढून देणारी नाही ना.. Sad

खेड्यावर भाऊ आणि बहिणीचं लग्न होतं तेव्हा काढलेल्या काही Happy

-> माझ्या हातावर काढलेली .. आयुष्यात पहिल्यांदा फुरसतीनं रात्री अडीच वाजेपर्यंत जागुन स्वतःचा हात एवढा रंगवला असेल Lol म्हणुन हौसेन दोन चार फोटो जास्तच काढलेत Wink

रंगवलेली :

mendi (7).jpg

रंगलेली Happy

mendi (6).jpgmendi (1).jpg

तळहातावर काढायचा कंटाळा आला म्हणून हे ..

mendi (8).jpg

-> ताईच्या हातावर काढून दिलेली :

mendi (5).jpg

तिनं स्वतः काढलेली :

mendi (4).jpg

-> मयुच्या हातावर काढुन दिलेली :

mendi (2).jpg

-> माझा , मयुचा आणि माझ्या मामीचे हात

mendi (3).jpg

लालसर दिसतात त्या इन्स्टंट कोन ने काढलेल्या Happy
घाई घाई झाली सो ..

नवरी नवरदेवाच्या हाताचे फोटो घ्यायचेच राहून गेले Sad
ताई आणि तीन बहिणींच्या हातावरचे .. आईच्या , काकोबाईच्या हातावरचे पन राहीलेच काढायचे Sad

धन्यवाद टीना!!! तुझ्यापण मस्त
तळहातावर काढायचा कंटाळा आला म्हणून हे>>हा shortcut जास्त आवडला Happy

टीना, या फुलपाखरात वेगळा राणी रंग कुठून आला ? काय आहे ते ?
बाय द वे, उर्जिता जैन चा जो नवा कलप आहे त्यात मेंदी आणि नीळ आहे.

दिनेशदा ते ग्लिटर आहे.. असाच आपला एक शो ऑफ Wink

निसर्गा हि दाखवलेल्या पैकीच एक आहे ना.. मळहात नव्हतआ दाखवला तू .. छाने Happy

निसर्गा, तुम्ही टाकलेल्या फोटोंमधल्या मेंद्या फार सुंदर आहेत. आजच्या तर फार आवडल्या.

टीना, सॉलिड कलाकार आहात! भावा-बहिणीच्या लग्नातल्या मेंद्यांमधला पहिला फोटो तर तुफान आवडला.

Pages