मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

plooma , नाव काय गं तिच ? if you don't mind .. मजा म्हणून काय.. मला पन मज्जा वाटली आत्ता तो हात बघताना . लेकरांना मेहेंदी काढून देण म्हणजे एक कामच असत . सतत किती रंगली ते पाहत अस्तात Lol . भाचीचा अनुभव Wink

करुन करुन दमली ... Lol
अभ्यास करता करता कंटाळा आला म्हणून हा उपद्व्याप .. गाणी ऐकने, म्हणणे, नाचने तसेच दिसला कोन का मेंदी काढणे माझ्यासाठी बरेचदा स्ट्रेसबस्टर च काम करतं .. आत्ता त्याचमूळे केलेला हा आगाऊपणा .

tp mendi.jpg

कॄपया फक्त मेहेंदीवर लक्ष द्याव .. पाय कसा आहे, वॅक्स केल कि नै यावर चर्चा करु नये Proud

चलो . आता परत अभ्यासाला लागते Wink

.

.

नलिनी, मस्त डिझाइन्स आहेत. आयडिया पण भारी.

तुम्ही मेंदीवाल्या मुली सिरॅमिक वर्क करता का? ते पण फार भारी दिसतं पॉट्स, इ वर केलेलं.

वॉव नलिनी सुपर्ब .. च्यायला माझ्या डोस्क्यात आलच नै अस कै करता येईल म्हणून Lol ...

चा, सायली धन्यवाद Happy

सिंडरेला, इतरांच तर नै माहित पण मी करायची सिरॅमिक वर्क..
१ २ माठ, २ ३ पाईप्स, २ ४ फुलदाण्या आणि आणखीही चुटुकमुटुक बनवलय बरच कै पण सर्व ९वी १०वी त केलेल असल्यानं फोटो नै काढून ठेवले Sad ..

इथे माझ्या जुन्या काही...सध्या इस्राइल मधे असल्यामुले हौस नाही होत Sad ...

20131115_225127.jpg20140130_161502.jpg20140130_225022.jpg

Pages