मेहेंदी

Submitted by टीना on 27 October, 2014 - 12:11

खुप दिवस झाले हा धागा काढायचा विचार करत होती आता जाऊन वेळ मिळाला ..

जवळपास सर्वांना मेहेंदी काढायला आवडतं .. मलासुद्धा ..
पन हातभर काढण्यापेक्षा हितभर काढायला मला जास्त आवडत .. कारण दुनीयाभराचा कंटाळा आणि संयमाचा अभाव ... त्यातही वेळेवर डोक ब्लँक होण .. खुप मुड आला तर कुठ त्या मेहेंदीच्या कोनाला माझा हात सहन करावा लागतो Lol ..

यातलेच काही मुड असताना काढलेले हात ..

यातले डिजाईन्स नेट च्या कॄपेने हाती अवतरलेल्या .. तुम्हीसुद्धा तुमच्या मेहेंदी डिजाईन्स शेअर करा (आवडलेल्या समोरच्या व्यक्तीला ढापता येईल ही परमिशन मनोमन देऊन Wink )

१. ही दसर्‍याला काढलेली (हातावर जाऊ नका..)

DSC01219.JPG

२.

DSC01454.JPG

३.

DSC01457.JPG

४.

DSC01464.JPG

५.

DSC01474.JPG

६.

DSC01475.JPG

या दोन इन्स्टंट मेहेंदी कोन चा वापर करुन काढलेल्या आहेत .. लोक्स म्हणतात कि याचे साईड ईफेक्ट्स होतात .
मला अजुनतरी अनुभव नाही याचा सो चालु द्या सदरात मोडतो .. एवढ्या २ ४ वर्षात वापर केलेला नाही त्यांचा पन बघु काय होत ते ..

७.

DSC02590.JPG

८.

DSC02591.JPG

९.

DSC04869.JPG

तुम्हा सर्वांना तुमच्या मेहेंद्या इथे पोस्ट करायला आमंत्रण .. तुमच्यामूळे मलाही वेगवेगळ्या डिजाईन्स शिकायला मिळतील .. Proud

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत डिझाईन्स!
मेंहदी काढुन बरेच दिवस - इन फॅक्ट २-३ वर्ष झाली आहेत . .संयमाचा अभाव!

माबोकर डीजे पण कलाकार आहेत यात .. Happy

सुरेख काढली आहेस मेहेंदी !
बरे झाले धागा काढलास.मला पण काढायला आवडते पण अजून बराच स्कोप आहे शिकायला .
करवा चौथ ला जवळच्या मैत्रिणीनी काढून घेतल्या .
फोटो टाकणे हे अवघड काम आहे माझ्यासाठी ,पण टाकते थोड्या वेळात .

https://lh3.googleusercontent.com/-NVrOfB_FIsc/VE59lqShfzI/AAAAAAABeMQ/s..."

मला मेंदी खूप आवडते काढून घ्यायला. पण मला साधा कोन हातात धरता ही येत नाही,
तुम्ही कुणी काढून द्याल तर मी प्रयोगाला माझे हात द्यायला तयार आहे . अगदी दोन्ही... पुर्णच्या पूर्ण Proud

अतिशय सुंदर मेंदी .३ नं ची हातावर काढण्यात येईल . स्वराली मस्त ,फोटो एकदम क्लियर आलेत कुठल्या कॅमेरा वापरला आहे? .

धन्स सिनी
Canon EOS 50D ,डिझाईन मधल्या छोट्या चुका पण मोठ्या दिसतात Happy

टीना खूपच मस्त काढली आहे मेंदी. या दिवाळीत मी जवळपास ६-७ वर्षांनी हातावर मेंदी काढायचा प्रयत्न केला. खूप वेळ लागला अगदी छोटीच मेंदी काढायला पण मस्त वाटले

मला मेंदी खूप आवडते काढून घ्यायला. पण मला साधा कोन हातात धरता ही येत नाही,
तुम्ही कुणी काढून द्याल तर मी प्रयोगाला माझे हात द्यायला तयार आहे . अगदी दोन्ही... पुर्णच्या पूर्ण >>> सेम हीअर.. मेंदी काढुन घेण्यात आणि रांगोळी काढण्यात मला कधीही कंटाळा येत नाही..

टिना ___________ /\ _________
शब्दच नाहीयेत! धन्यवाद धागा काढल्या बद्द्ल! Happy

वॉव टीना..मस्तच.
मला मेहेंदी काढायला आणि काढून घ्यायला खूप आवडतं. पण स्वतःची अशी डिझाईन्स सुचत नाहीत. आता तुझी डिझाईन्स कॉपी करत जाईन....चालेल ना?

ताईच्या लग्नातली ( सर्वांना काढून द्यायाच्या नादात माझेच हात कोरे राहीले .. मग अशीच सुटी सुटी काढली Sad ) :

mehendi (3).JPG

दादाच्या लग्नात एकाच हातावर निभवाव लागल Sad :

mehendi (12).JPG

अश्याच एका प्रोग्राम मधे माझ्या आणि मैत्रीणीच्या हातावर इन्स्टंट कोनाने रंगवलेली :

mehendi (11).JPG

ही माझी स्पेशालीटी - प्रत्येकाला एखाद्या कामाचा कंटाळा आल्यावर तो त्यात पळवाट शोधतो .. मीपण शोधली Wink . मेहेंदी काढायची पण आहे , कंटाळा पण येतोय , रंगली पण पाहीजे , छान पण दिसली पाहीजे , उठावदार पण हवी वगैरे वगैरे requirment असताना मी या मेहेंदीने हात रंगवते Lol :

mehendi (8).JPGmehendi (20).JPG

माझा आजपर्यंतचा स्टॉक संपला .. उद्या एखादा हात रंगला तर टाकेलच मी फोटो Wink ..

कळावे लोभ असावा ..

आपलीच,
टीना Happy

इश्श >>> इश्श असे काय पुसता .. मी आधीच तर सांगीत्लेल आहे वर .. या सर्वच्या सर्व माझ्या स्वतःच्या नाहीत काही .. नेटची कॄपा आहे बरेच ठिकाणी ..

धन्यवाद दिनेशदा .

Pages