मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डाबर हनीची बायको बाहेर जात असताना नवरा मंगळसूत्र बाहेर काढतो ती अ‍ॅड डोक्यात जाणारी आहे. वर परत बाई म्हणते हजबंड जब जेलस होते है तब कितने क्युट लगते है! डोम्बल.

फ्लिपकार्टची नमित आणि अमोल पालेकरांची जाहिरात आवडली. पहिल्यांदा नीट समजलीच नाही. मुळात अमोल पालेकर आणि जाहिरातीत ! असं झालं. मुख्य पंच नमितच मारतो मात्र!

गस्टो लेना है गस्टो ले, गस्टो लेना है गस्टो ले!! ही एक प्रचंड पकाव जाहिरात आहे.जाहिरात बघून गाड़ी घेण्याच्या वाटेला जाउ नये अशी तीव्र इच्छा होते.

ओएलेक्स च गाणं आवडतं Happy . जाहिरात बघितली नाही पण जिन्गल नेहमी रेदिओ वर ऐकते .

ती फटॅक से फूर वाल्या जाहिरातितला मुलगा डोक्यात जातो .
ट्युशन्च्या सरांना किती उदधटपणे म्हणतो - फटॅकसे हो गया Sad
आणि आई ( उर्मिला कानेटकर ) कौतुकाने बघते.

एक जाहिरात पाहिली एका आगाऊ मुलाची आणि अत्यंत चुकीचा संदेश देणारी. म्युझियममध्ये डायनोसॉरचा सांगाडा बघायला मुलं जातात तिथे 'फोटो घेऊ नका' असं सांगितलं जातं. मग सो कॉल्ड हीरो मुलगा 'बघतोच तुला' असं म्हणत कसलीतरी कॅन्डी खातो आणि चक्क डायनोसॉरही नाचायला लागतो आणि म्युझियमचा माणूस घाबरतो! Uhoh

कंटेंट तर बंडल आहेच, पण म्युझियममध्ये गेल्यावर काही पथ्य पाळायची असतात. ती आपला आवडीनुसार नसतात. या ऐवजी 'आमची कॅन्डी खा आणि सर्व नियमांचं उल्लंघन करा' असं सांगायचं असावं. कसल्या जाहिराती या? Angry

युट्युब लिंक्स न देता जाहिरात कशी कळणार मग? >>>> प्रॉडक्टच नाव आणि जाहीरातीतला कंटेंट सांगा... घरी बघु यु ट्युबवर... तिथे आमी लय पावरबाज हायेत...

बोर्नविटा बदाम बूस्टर.
मुलांच्या मार्कांपेक्षा त्यांच्या शिकण्यावर भर द्या असं मुख्याध्यापिका वेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात.

प्रॉडक्टच नाव आणि जाहीरातीतला कंटेंट, या सकट युट्युबची लिंक देण्यास हरकत नसावी. >>>>> चालेल, पण नुसतच हि जाहिरात पहा अस म्हणुन तुनळी लिंक देउ नये कारण सगळ्यांनाच ऑफिसमध्ये युट्युब अ‍ॅक्सेस असतोच अस नाही. प्रॉडक्ट आणि जाहिरातीच कंटेंट दिल आणि जाहिरात बघितलेली असेल तर पुढे बोलता येत.. आणि धाग्याचा उद्देशही हाच आहे अस माझ मत.

पूनम +१. सध्या लहान मुलांसाठी म्हणुन ज्या जाहिराती येतात त्यात मुलांचा आगाउपणा जाणवत असतो, वर त्यांच्याबरोबर असलेले मोठे त्याच समर्थनही करताना दिसतात.

सध्या लहान मुलांसाठी म्हणुन ज्या जाहिराती येतात त्यात मुलांचा आगाउपणा जाणवत असतो, वर त्यांच्याबरोबर असलेले मोठे त्याच समर्थनही करताना दिसतात.>+१ तशीच ती जेली बेली ची अ‍ॅड.

अहो तुम्ही मित्रा म्हणताय पण वयात खूपच फरक आहे आपल्या. >>>> की फर्क पैंदा? मी माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या इथल्या अनेक लोकांना एकेरी हाक मारते.

कॅड्बरी डेरि मिल्क च्या The Real Taste of Life या होर्डीग खाली १९९४-१९९७ च्या वेळेच्या अ‍ॅड मला खुप आवड्तात. स्कुल डेज आठवतात..जुन्या अ‍ॅड आज पाहताना..!

कुछ खास है ह्म सभी मे ... अशी सुंदर कॅचलाईन आहे.. दोन्ही मॉडेल्स मस्त.. क्रिकेट च्या ग्राउंड्वर त्याची सेन्चुरी झाल्यावर ती मुलगी नाचत त्याच्याकडे जाते अश्या अर्थाची.. नक्कि पहा यु टुयब वर आहे!

Pages