मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एअर टेल ४ जी हा प्रॉडक्ट च बोगस आहे. पुणे मुम्बई सारख्या शरातही त्याचा स्पीड तेवढा येत नाही. मात्र ती छोकरी भलतीच गोड आहे Wink

"दाग अछ्छे है" जाहिराती पणअगदी डोक्यात जातात.
मुलगा आजोबान्च्या बुटाला पॉलिश करतोय कि टीशर्ट्ला पॉलिश फासतोय ते कळत नाही. मुले निश्चित चुकीचा सन्देश घेणार. काहीही मूर्खपणा केला तरी आजी-आजोबा कोउतूकच करणार आणी आई आहेच आपली अचरट कर्म निस्तरायला !

पण आता नक्की बोलायला लागतील "डब्बा है डब्बा" >> परवाच एका नातवाने आज्जीला ऐकवलयं हे कारण स्मार्टफोन आहे पण त्याला वायफाय चालु नव्ह्तं .. टिव्ही आहे पण कार्टुन चॅनेल्सच पॅक घेतलं नाही (आजीआजोबा कशाला बघतील ते शिंचन, डोरोमॉन) Sad

दाग अछ्छे है" जाहिराती पणअगदी डोक्यात जातात.
मुलगा आजोबान्च्या बुटाला पॉलिश करतोय कि टीशर्ट्ला पॉलिश फासतोय ते कळत नाही.>> हो आणि अगदी आजोबा बाहेर पडण्यासाठी निघताना पाॅलीशचे उद्योग करतो. आणि सामान गाडीत ठेवताना तो मुलगा धुऊन वाळवून इस्त्री केलेले तेच टीशर्ट पँट घालून उभा असतो. Uhoh त्याचा एकच ड्रेस असतो का की तोच धुवुन लगेचच घालायला पण लागतो

फेसबूक वरून...
Dear Airtel girl if u r going to places where there's no 4G signal.... plz come to my house in mumbai... i dont get network in living room !!! smile emoticon

ती एक "मुझे तो राजमा चावल खाने है" (कुठल्यातरी cold drink च्या) अ‍ॅड मधली मुलगी आणि तिचा आवाज मला काजोल सारखा वाटतो.

व्होडाफोनच्या सुपर डॅड आणि सुपर सन जाहिराती फारच गोड आहेत.

सुपरडॅडमध्ये बापाने धोतर नेसवल्यावर बससाठी लुटुलुटु पळणारा तो गब्दुल मुलगा काय गोड वाटतो.
टीव्हीवर ही जाहिरात थोडक्यात दाखवतात.
https://www.youtube.com/watch?v=iFRMh5kv19k

सुपर सनच्या जाहिरातीतल्या आईचं आय नो येव्हरिथिंग ऐकण्यासाठी मी टीव्ही अनम्यूट करतो.
https://www.youtube.com/watch?v=vukxkPTuVNI

सुपर सनच्या जाहिरातीतल्या आईचं आय नो येव्हरिथिंग ऐकण्यासाठी मी टीव्ही अनम्यूट करतो. >>>> अगदी अगदी, फार क्युट म्हणते ती...

व्होडाफोनच्या सुपर डॅड आणि सुपर सन जाहिराती फारच गोड आहेत. >>> अगदीच. जहिराती लागल्यावर दोन काम करायला जायचं आणि तेव्हा म्युट करायचं हा रिवाझ वोडाफोन अ‍ॅड लागल्यावर मोडला जातो.

युट्युबवर पाहुन धोती नेसवणारा वडिल आणि त्याचा ढब्बु मुलगा दोघंही क्युट आहेत.

व्होडाफोनच्या सुपर डॅड आणि सुपर सन जाहिराती फारच गोड आहेत. >>> +१
मला ओला कॅबची छोट्या मुलाची अ‍ॅड पण आवडते .. पप्पाSS चे सगळे टोन भारी आहेत Proud

व्होडाफोनच्या सुपर डॅड आणि सुपर सन जाहिराती फारच गोड आहेत >>> + १००००

फक्त एकच प्रश्न पडतो , तो " can you please give fone to her" कसं काय म्हणतो ??
त्या काऊंटर मुलगीच असते का नेहमी Happy

व्हिडु कॉल ना? त्याने आईला सांगितलं असेल ना दाखवायला.

व्होडाफोनच्याच सुपरबडी अ‍ॅडला चिकार डिसलाइक्स आल्यात आणि मला ते पटतंय आणि नाहीही.
ती जाहिरात त्याच्याबद्दल नसून त्या मुलीला काय वाटतंय याबद्दल आहे. आणि तसं वाटूच नये अशी परिस्थिती नक्कीच नाही.

फक्त एकच प्रश्न पडतो , तो " can you please give fone to her" कसं काय म्हणतो ??
त्या काऊंटर मुलगीच असते का नेहमी
>>
अजुन एक प्रश्ण..तो मुलगा आईशी ईंग्रजी मध्ये का बोलत असतो.. जर आईला थोड मदत लागेल अशा टाईप चे दाखवायचेय तर तिला त्याच्याशी इतक्या सहजपणे ईंग्रजी मध्ये बोलताना दाखवायला नको

ती धोतर नेसणार्‍या मुलाची जाहीरात छान आहे.फक्त त्यात पोराला बर्म्युडा जितकी सैल घातलेली दाखवली आहे तितकी हा सर्व व्याप करणारा कोणताही पालक (आई/बाबा) घालणार नाही असे वाटले.असे व्याप जे करतात त्यातले बारकावे त्यांना माहिती असतात.
मुलगा दिसतो मात्र क्यूट.आणि बापाने धोतर नेसवलेले पण मस्त दाखवले आहे.

निविया क्रीम ची , आई आणि बहिर्या मुलीची जाहिरात मस्त वाटते.
फार काही ग्रेट नाही. पण बघायला एक्दम टची. !

मिल्कमेडची नवीन मॅंगो आईसक्रीम विरूद्ध हेअरकट वाली जाहीरात मस्त आहे.
तो छोटा (की छोटी ?) एकदम क्यूट आहे
https://youtu.be/KxcIWrFM3Vs

अजून एक आवडलेली जाहिरात. बजाज ॲवेंजर बाइकची रॅटरेस वाली.
https://youtu.be/FBU2giUxK5I

मध्य प्रदेश टुरिझम मधे काही चांगले जाहिरातदार बसले आहेत. पहिली हाताच्या सावल्यांची आणि आता ही चाविवाल्या खेळण्यांची...
https://www.youtube.com/watch?v=wFbUw2Ge-f4

नविन अ‍ॅक्ट - २ पॉपकॉर्न ची जाहिरात येते .
मेरे पापा का थिएटर अस काहितरी.
परवा नवर्याला म्हटलं , म्हणजे - मेरे बाप का थिएटर असं म्हणायच आहे का या लोकांना . Uhoh

कॅडबरी सिल्कची जाहिरात यक असायची. सिल्क बबलचं पोस्टर बसस्टॉप पाहिलं. ते यापेक्षाही यक वाटतंय.
याची टीव्ही अ‍ॅड असली तर माझ्या सुदैवाने अजून दिसलेली नाही.

नेसकॅफे ची ही जाहीरात खुप आवडली.>>> मलासुद्दा Happy मला तो आर. जे. झालेला आधी प्रतिक बब्बर वाटला होता.

कुठल्यातरी फोनच्या डेटापॅक ची अ‍ॅड आहे ना , ती मुलगी , एका मुलाला मेट्रो मध्ये बसायला जागा देते , आणि त्याच्या बाजूला उभी राहून त्याच्या फोनमध्ये डोकावत असते .
काय गोड मुलगी आहे ती . तिचे एक्स्प्रेशन्स पण मस्त.

अरे लिंक द्या की.... आमच्यासारख्या टिव्ही नसलेल्यांनी काय करायचं? Angry

अरे लिंक द्या की.... आमच्यासारख्या टिव्ही नसलेल्यांनी काय करायचं? >>> काय? तुमच्याकडे टिव्ही नाही? तुम्ही कादिप च्या मोजो च्या काळात राहतात का? Lol

मॅगी.. तू कार्टुनिस्ट म्हणून पण आरजेचीच लिंक दिली आहेस. असो. असेही कार्टुनिस्टची जाहिरात शंभरवेळा पाहिली आहे. इतर दोन्ही आज पहिल्यांदा पाहिल्या. भारी आहेत. केएफसीचीपण मस्त आहे.

अरे हो पियू, thanks. आता बरोबर कार्टूनिस्ट दिलाय..
मला कॉमेडिअन जास्त आवडतो, कसला गोड आहे!

Pages