मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे मध्यंतरी एका प्लॅटीनमच्या दागिन्यांच्या जाहीरातीची चर्चा झाली होती. ऐश्वर्या नारकर आहे त्यात. त्या जाहिरातीचा फ्लॅशबॅक दाखवला होता एकदा त्यावरुन लक्षात आल की ऐश्वर्या नारकर त्या मुलीची आई आहे. लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करताना मुलीला त्या दुकानात तो नेकलेस आवडलेला असतो, हे ऐश्वर्याच्या लक्षात येत आणि रिसेप्शनच्या दिवशी ती मुलीला सर्प्राईज गिफ्ट म्हणुन तो देते, त्याचबरोबर आपल्या जावयासाठी पण एक सेट खरेदी करते आणि रिश्तो की डोरी मे एक धागा मेरा (मुलीचा नेकलेस) एक तुम्हारा (जावयच गळ्यातल) अस म्हणुन ते खास बंधन बांधते.. हुश्श्श्श... बाकी काही असो झैरात, त्यातली ऐश्वर्या नारकर आणि प्लॅटीनमचे दागिने झक्क्कास आहेत...

पॅराशुट हेअर ऑइलची झैरात.. एक डान्स क्लास स्टेप्स शिकवताना टिचरच लक्ष मुलीच्या खांद्याकडे, तिथे तिच्याच केसांचा एक पुंजका पडलाय.. तिला लक्षात आणुन दिल्यावर ती तो खांद्यावरुन काढुन तिथेच खाली टाकुन देते (ईई) परत दुसरीकडे केस विंचरायचा ब्रश पडलेला त्यावर असलेल्या केसांसकट... दोन्हीही सीन्स अचाट आहेत.

मुग्धटली,
मी पाहिली ती जाहिरात. ऐश्वर्या नारकर मुलाची आई असते. मुलीच्या आईला जेव्हा ती बोलावते तेव्हाचे त्या पालकांचे एक्स्प्रेशन बघ. ( आणि तरच त्या जाहिरातीला जास्त अर्थ येईल)

कार्टुनिस्टची जाहिरात पण छान आहे.

ती ९९ एकर्स ची जाहिरात आवडली .
कौनसा फ्लोअर
ईटालियन मार्बल .

पेपर फ्रायच्या सगळ्या जाहिराती मस्त.
ती बूकशेल्फ ची आहे त्यात पुस्तक पडणार कळल्यावर त्या मुलीचे एक्स्प्रेशन मस्त आहेत.

कौनसा फ्लोअर
ईटालियन मार्बल >>> मस्त आहे ती जाहिरात.. टायर कडे बघून "फ्लॅट !" असं त्या दोघी म्हणतात, तेव्हा तो ३ बीएचके म्हणतो Biggrin
तो अ‍ॅक्टर कोण आहे माहित नाही, पण असल्या छोट्या छोट्या जाहिरातीत एकदम सहज वावर असतो त्याचा..

डेरी मिल्कची 'बढती दोस्ती के लिये' ही अ‍ॅड बघितली का कोणी?? नसेल तर बघाच.

https://www.youtube.com/watch?v=yICX_ZQ86Mw धम्माल आहे. अजुनतरी झी मराठीवर रात्री ८.४५ लाच येतेय.

अर्र्र, मी बघितली पण मला खूप चीप वाटली ती.. आतापर्यंतच्या डेअरी मिल्क च्या अ‍ॅड्स खूप क्लासी आणि एलिगंट असायच्या, ही अगदीच खटकतेय Sad

अर्र्र, मी बघितली पण मला खूप चीप वाटली ती..>> कदाचित ते गाणं आणि नाचामुळे असेल .
त्यापेक्शा गणपती विसर्जनाची मिरवणूक घेतली असती तर आणि नुसता ढोल ताशा . ???

डेरी मिल्क ची खरंच धमाल जाहिरात आहे.
गणपती विसर्जनाची मिरवणूक घेतली असती तर >>> पहिल्यांदा ही जाहिरात पाहताना विसर्जन मिरवणूक आहे असंच वाटलं होतं ... कारण नुकतंच गणपती विसर्जन खरोखरच झालं होतं.
मुद्दाम लग्नाची वरात दाखवली असणार. कारण शेवटी तो नवरा मुलगा 'चला हवा येऊ द्या' असा मिश्किल लूक देतो, आणि त्या दोघी निघून जातात असं दाखवलं आहे. बहुतेक हे मिरवणूकीत कदाचित नीट दाखवता आलं नसतं.

https://www.youtube.com/watch?v=Gh6st_9LO_s
मर्ज़ी मेरी चलती तुझसे
राहें मेरी सजती तुझसे
तू है तो मैं हूँ
और मंज़िलों का घर आना

चलता रहे…
तेरा मेरा मीलों का याराना
चलता रहे…
तेरा मेरा मीलों का याराना

तू चले तो चले
मेरा आज मेरा कल
हर रहा पे दिल यह
गाए तराना

चलता रहे…
तेरा मेरा मीलों का याराना
चलता रहे…
तेरा मेरा मीलों का याराना

बच्चो के स्वाद के दुनिया है बडी अमेझिंग अशी गोवर्धन च्या कोणत्यातरी प्रॉडक्ट ची जाहीरात आहे.
(जरा "बच्चो के स्वाद की दुनिया" वगैरे अती वाटलं.नुसता शब्दांचा खेळ.ऐकायला बरे वाटते इतकेच.)

डेअरी मिल्क ची जाहीरातः चांगली आहे, पण डेअरी मिल्क च्या आतापर्यंत च्या स्टँडर्ड इतकी नाही. चुकून नेहमीपेक्षा वेगळ्या माणसाने डिझाईन केली असावी असे वाटते. आधीच्या जाहीरातींची पट्टी डोळ्यासमोर ठेवली नाही तर चांगली जाहीरात आहे.

आधीच्या जाहीरातींची पट्टी डोळ्यासमोर ठेवली नाही तर चांगली जाहीरात आहे.>> + १.

कोलगेट फ्लेक्सीची रैनाची अॅड काल पाहिली. तो डाॅक्टर रैनाला म्हणतो "क्रिकेट बॅटप्रमाणे टुथब्रश फ्लेक्सीबल नसते." Uhoh

हॅवल्सच्या दोन जाहिराती आवडल्या.
पहिली: बॉयफ्रेंड बरोबर (बहुतेक) मोबाईल वर बोलणारी मुलगी, त्या गॅलरीतून खाली अंधारात अभ्यास करणार्‍या मुलाला पाहून, आपल्या गॅलरीतला दिवा लावते जेणेकरुन त्याला नीट दिसेल.
दुसरी: एका दुकानाबाहेर... परत मोबाईल वर बोलणारी मुलगी, अंधार पडल्यामुळे लवकर ये असं सांगते (नवरा / बॉयफ्रेंड ला). तेच दुकान बंद करता करता तिच्यासाठी लाईट चालू ठेव असं सुरक्षारक्षकाला सुचवणारे काका.
छोट्याश्याच जाहिराती, कमी बडबड, पण संदेश व्यवस्थित पोचतो.

हॅवेल च्या जाहिराती चांगल्या असतात. ती इस्त्री...बीबी---रिस्पेक्ट वाली जाहिरात पण त्यांचीच आहे ना?
ती एक ओला...ओला शब्द असलेली बाईक ची जाहिरात त्याच्या जिंगल मुळे आवडते. (पण ओला कॅब ची जाहिरात वाटते Happy )
हल्ली जाहिराती आवडतात पण त्या ज्यांच्या आहेत ती प्रॉडक्टं आठवतच नाहीत. एखादा जाहिरातीय अभि भट्टाचार्य आता सांगेल 'तुम्हाला जाहिरात आवडली तर ती लक्षात ठेवताना ती कोणत्या उत्पादनाची आहे ते पण लक्षात ठेवत चला.'

ती ४जी वाली मुलगी क्युट आहे पण डोक्यात जाते .
आता नाईट युसेजवाली जाहिरात बकवास आहे .
आपण म्हणतो ईंटरनेट मुळे लोकांच्या झोपेचे खोबरे होतय
आणि ही बया मुद्दामुन झोपलेल्याना उठवते.

एका कुठल्या शा जाहिरातीत I am the Ball , I am the Ball असे म्हणतो तो बाबा ... त्याचा अर्थ काय ? कुठली जाहिरात नक्की? गुगल / युट्युब वर खूप शोधले, पण काहिच सापडले नाही

It is "eye on the ball" Happy
Ad for some toothpaste - babool if I remember correctly...
The football/similar sports trainer is telling the kids to concentrate on the ball.

स्वस्ति, माझ्याही घरात सगळ्यांना आवडते ती अ‍ॅड पण मला राग येतो तिचा Proud
क्युटेय तशी ती मुलगी (दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध नाही Wink )

रीया Happy

आणखी एक बकवास .
कुठल्यातरी वॉशिंग पावडर ची आहे .
तो माणूस येते आणि म्हणतो की आम्ही आमची पावडर टेस्ट करतो शेफ निखिल सोबत की असच काहितरी .
आणि मग लॅब कोट घालतो . तो शेफ येउन त्याच्या कोटवर वेगवेगळे पदार्थ फासतो .
माझा लेक फार मन लावून जाहिरात पहात होता.मग हळूच म्हणाला
" मम्मा , जेवण असं वेस्ट करायचं नसतं ना. बॅड पीपल"
मी मनातल्या मनात मूठी वळून " येस्स्स्स्स्स्स" असं ओरडले Happy .

ओएलेक्स ची , तू संडे को फ्री है क्या . ती जाहिरात आवडते.
पेपरफ्राय च्या दिवाळी अ‍ॅड मस्त , अर्बन लॅडरची फूकाची ईमोशनल.
ती गूड नाईट ची " गोलु मत कहना" पण आवडते.
ओरिओ ची 'ये कैसा है ? अच्छा है दीदी " पण मस्त आहे .

कोणत्या तरी बँकेची जाहिरात आहे आजी आणि नातवाची. आजी सायकल चालवते ती. मस्त आहे.
आणि एक तेलाची अ‍ॅड आहे, फॉर अ चेंज नवरा बायकोला चहा, व्यायामाचे बूट आणि कपडे देतो. बायकांनाही व्यायाम महत्त्वाचा आहे असा काहीतरी मेसेज आहे.

Pages