मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वस्ति , ती शिमोना राशी आहे अर्विन टकर सोबत क्रिकेट वाली.
आणी ती राजलक्ष्मी खानविलकर समीर सोहनीची बायको त्याच्याच सोबत कॅड्बरिच्या च दुसर्या अ‍ॅड मध्ये होती.

त्या म्युजियमवाल्या अॅड साठी आणि एकूणच जाहिरातीतील लहान मुलांचा आगाऊ / उद्धटपणा यासाठी मम. Happy

महिंद्राच्या सगळ्या टुव्हिलर असलेली पहिली अॅड (सिच्युएशनला साजेशी वेगवेगळी गाणी) मला खुप जास्त आवडायची. Happy

अवांतर - भो.आ.क.फ. काय आहे ते एकदा सांगा.

आपके टॉयलेट मे टायफॉईड के कीटाणु ,,असल्या जाहीरातीबाबत Angry
नेमके जेवणाच्या वेळी ब्रेकमधे दाखवतात.

आपके टॉयलेट मे टायफॉईड के कीटाणु ,,असल्या जाहीरातीबाबत राग
नेमके जेवणाच्या वेळी ब्रेकमधे दाखवतात.>>>१११११

डब्बा है डब्बा , अंकल का टीव्ही डब्बा --
पहिली गोष्ट म्हणजे , धोनी असला म्हनून काय झालं , कोणाच्या घरात आल्यावर अस सोफ्यावर पाय ठेउन पसरून बसायचं ????

दूसरं म्हणजे , मुलांना हेच शिकवतो ?? कितना बडा डब्बा?? - ईतना बडा - असं म्हणून चिडवायच ????

रेड लेबलची Employee of the year ची जाहिरात जाम डोक्यात जाते. का तर त्या बाबाने एकही सिक लिव्ह नाही घेतली. त्या दिग्दद्र्शकाला सांगायला हव असल्या फालतू गोष्टीसाठी कुणी बक्षीस देत नसत...........ईथे मरमर वीकान्ताला काम करुन पण कोणी हाइक/appreciatio देत नाही...बक्षीस दूरची गोष्ट आहे

हो ना. तशीच एक स्टुडंट ऑफ द इअर ची जाहीरात होती, त्यावर मी म्हणालेले की ओके बाबा आजारी बिजारी पडला नाही चहा प्यायल्यामुळे, पण कुठे धडपडुन फ्रॅक्चर झाल असत तर कसा १००% अटेण्डन्स मेन्टेन करणार होता? उगाच आपल कैच्याकै दावे करायचे

एच डी घेतले नाहीत तर लगेच डब्बा? स्वतःच्या कमाईने एक मोठा टिव्ही घेऊन बघ म्हणावं प्रत्येक डब्बा है डब्बा गाणं म्हणणार्‍या मुलाला.
(आमच्याकडे खरंच 'डबा' ३डी आहे.चौकोनी खोके आणी सी आर टी असलेला सँमसंग टिव्ही.)

कसल्या तरी डॉटावाल्या मच्छर घालवणार्या धुराचि जाहिरात तशी, "झालऽ फट्ट्याक (फटक्यात?)" अशा अत्यंत उद्धट स्वरात बोललेले ते शब्द अगदि मस्तकात जातात..... अन मास्तरही विनाकारणच लाऊड दाखवितात... लोकांच्या "भावनांना हात घालायचे धन्दे" दुसरे काही नाही.

सगळ्यात फालतू आणी थर्डक्लास जाहिरात सध्या असेल तर ती डब्बा है डब्बा अंकल का टीव्ही डब्बा...
धोनीला तर काय पैसे कमी पडायला लागले का असल्या भिकार जाहिरातीत काम करतो ते...

अंकल का टिव्ही डब्बा ही खरोखरी डोक्यात जाणारी जाहिरात आहे. Angry
एच डी चॅनल्स नाही घेतली तर टिव्ही डब्बा? Uhoh
अशा जाहिराती प्रक्षेपित करून आपण समाजात नक्की काय अपेक्षेचं जिणं पसरवतो आहे याची कल्पना करवत नाही.

लहान्/तरुण मुलांमध्ये आपल्या परिस्थितीबद्दल/बाईक बद्दल उगीचच न्यूनगंड पसरवणार्‍या या जाहीरातींवर बॅन आणला पाहिजे.
तसंच उंची कमी असलेल्या मुलांना लटकूराम वगैरे म्हणणार्‍या/उंची या एकमेव गोष्टीवर अनावश्यक भर देणार्‍ञा जाहीरातींवर पण.कमी (किंवा खरंतर आनुवंशिक/नैसर्गिक क्रमाप्रमाणे हळूहळू वाढणार्‍या) उंचीची मुलं नकोत? मग कोणत्यातरी पावडरीतून भाराभार हार्मोन चे डोस दिलेले आणि बाकी तब्येतीवर परीणाम झालेले बिनडोक बांबू हवेत?

अनु + १०० .
म्हणून मला त्या "ये खाता क्या है" वाला अ‍ॅड्स आवडत नाहीत.
पीडीआ शुअर च्या पण आवडत नाही .
एक आहे ना , त्यात उन्ची कमी म्हणून त्या मुलाला राईड मध्ये बसायला मिळत नाही .
दूसर्यान्दा येतो , तेन्व्हा तो अगदीच अ‍ॅबनोर्मल वाटतो.

सगळे गोड दुधात घालायच्या पावडर वाले हार्मोन्स वापरत असतील असं म्हणणं नाही पण 'इतनी जल्दी कैसे बढ गया' आणि 'बाकी व्हिटॅमिन पावडर से निम्मे टाईम मे डबल उंची' वाल्या जाहीराती पाहिल्या की घाबरायला होतं.

जाहिरातींमधुन जाड व्यक्ती अक्कलशून्य असते असे दाखवले जाते (अर्थात जाड व्यक्ती राम कपुर सारखी सेलेब्रिटी नसेल तर). उदा. हल्ली एक पंख्याची अ‍ॅड येते त्यात एक जाडा माणूस 'आ रही है' असे म्हणत मागे मागे जात असतो.
बर्‍याचदा जाड्या बायका भोचक आणि अक्कलशून्य असतात असेच दाखवतात. प्रॉडक्ट काहीही असो पण जाडी लोकं वेडी असतात.

Happy अ‍ॅड वर्ल्ड इज ऑल अबाऊट लुक्स.
यापेक्षा डोक्यात जातात त्या गोरेपणाच्या जाहीराती.
साबण म्हणू नका, पावडर म्हणू नका, क्रिम म्हणू नका,हेअर रिमूव्हर म्हणू नका,फेसवॉश म्हणू नका, प्रत्येकात रंग उजळवणारा घटक आहे हे ओरडून सांगितलंच पाहिजे.टाईल्स कशा ब्लिच ने घासून पांढर्‍याशुभ्र करतात तशी त्वचा ब्लिच लावून लावून खरवडा आणि उजळवा.सनस्क्रिन लावून त्वचा जपणे एक गोष्ट, पण नैसर्गिक शेड पट्ट्या लावून गोरेपण मोजून पांढरी करत राहणे हा मूर्खपणा.

मधे साधारण २०१०-२०११ च्या आसपास अंबुजा सिमेंट्ची जाहीरात यायची....... त्यात फक्त एक बाई पोह्ण्याच्या पोशा़खात यायची. आणि त्या सिमेंट ची भिंत दाखवायचे.......... शेवट्पर्यंत काय त्याना म्हणायच आहे तेच कळल नाही

उगीचच न्यूनगंड पसरवणार्‍या या जाहीरातींवर बॅन आणला पाहिजे <<<<<< अगदी अगदी.
वरच्या सगळ्या पोस्टाशी सहमत. Happy
आमच्यात असल्या जाहिराती सुरू झाल्या की लिंबीच्या तोंडाचा पट्टाही सुरु होतो, जाहिरात बनवणार्यांनी तो ऐकला ना तर सन्यास घेऊन हिमालयात जातिल.

गुगल ची क्रिकेट ची अ‍ॅड आवडली .
२ सफरचंद १२० ला . शेवटी ती बाई पण आपलं मत नोण्दवते ते पण मस्त वाटलं Happy

मधे साधारण २०१०-२०११ च्या आसपास अंबुजा सिमेंट्ची जाहीरात यायची....... त्यात फक्त एक बाई पोह्ण्याच्या पोशा़खात यायची. आणि त्या सिमेंट ची भिंत दाखवायचे.......... शेवट्पर्यंत काय त्याना म्हणायच आहे तेच कळल नाही

याचाच अर्थ असा की ती बाई पोहण्याच्या पोषाकात आली की भले भले चळतील पण आम्च्या सिमेंट्पासुन बनवलेली भिंत तसुभर ही चळणार्/ढळणार नाही.

अंकल का टिव्ही डब्बा ही खरोखरी डोक्यात जाणारी जाहिरात आहे. राग
एच डी चॅनल्स नाही घेतली तर टिव्ही डब्बा? अ ओ, आता काय करायचं>> आणि अशी कितीशी चॅनल्स HD आहेत? खरंच मुलं असं बोलतात का( मोठ्यांचा support असल्याशिवाय) ? त्यांना त्याचं काही देणं घेणं नसतं. पण आता नक्की बोलायला लागतील "डब्बा है डब्बा" Angry

एअरटेल-फोरजी च्या नवीन जाहिराती आवडल्या म्हणता येणार नाहीत, पण इतके दिवस आपण लोकांना इरिटेट केलं (पका दिया यार मैने सबको असं ती स्वतःच म्हणते!) या फॅक्टर लाच ज्या पद्धतीने एनकॅश केलंय ते आवडलं.

या उलट वोडाफोन-फोरजी च्या जाहिराती. आधी हच असताना आणि नंतर वोडाफोन झाल्यानंतरच्या झूझू च्या जाहिराती जितक्या क्लेवर होत्या तश्या या वाटत नाहीत. अजिबातच झेपल्या नाहीत.

एअरटेल-फोरजी च्या नवीन जाहिराती पैकी एक इगतपुरीची आहे. तो नक्की कुठला भाग आहे? एकदम मस्त. दोन उंच डोंगराच्या मधला चिंचोळा भाग.

Pages