चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजीव कुमारसारखे धाडसी कलाकार फार थोडे ! नासिरभाई पण तसा प्रयत्न आता करत नाहीत.

यात दिपिका, कमी मेकप मूळे कमालीची सुंदर दिसलीय, पण गोवन नाही दिसली. आणि भाषेतून तर नाहीच नाही.
मॅन वगैरे भाषा खास मुंबईची, तीसुद्धा मँगलोरी लोकांची जास्त. गोव्यात नाही वापरत ते शब्द !

याचे उत्तर देताच येणार नाही. कथा, विषय, आशय, दिग्दर्शकाचे म्हणणे, दिग्दर्शकाची हाताळणी, नट, नटाचे स्टारपण, नटाचे सरींडर, नट-दिग्दर्शक यांच्यातले अंडरस्टॅण्डिंग, डिझायनर, त्याची समज एवढ्या सगळ्या व्हेरिएबल्सवर हे अवलंबून असते ना.

हे स्टारपणच आडवे येते ना ? प्रेक्षकांना पण स्टारलाच बघायचे असते त्यामूळे नटांना धाडस करायचे नसते.

मला आठवतय, अग्निपथ मधे बच्चनने वेगळा आवाज लावला होता तर प्रेक्षकांनी स्वीकारला नाही, परत मूळ आवाजातच डबिंग करावे लागले होते. जिथे भुमिकेला साजेसा आवाजही प्रेक्षक स्वीकारत नाहीत, तिथे लूक्स काय स्वीकारणार ?

शाहरूख्चं स्वतःच्या इमेजच्या प्रेमात पडलेलं असणं अशोकाच्या वेळेला फार जाणवलं होतं. त्या अशोकावर वरदा आणि नीधपनं एकदा सविस्तर लिहायला हवंय!!!

चक दे मध्ये शाहरुख शाहरुख वाटत नाही तर त्याजागी कबीर दिसतो. >>>> स ह म त.......

मराठि :::: शहारुखचा मितवा पाहिला का कुणी ??????????

दीपिका मला आवडते पण तरीही परवाच टीव्हीवर तो कोणता तो नवा सिनेमा आला तो पाचेक मिनिटे पाहिला (हा.. हेपी न्यु इयर) त्यात गावठी भाषा बोलताना ऐकली ते तिला अजिबातच जमले नव्हते. बहुतेक तिची प्रसिद्धी इतकी आहे की तिला 'तु फक्त सिनेमात ये, वेगळ्या भुमिकेत फार जास्त शिरली नाहीस तरी चालेल' असे सांगत असतील व म्हणुन जास्त कष्ट घेत नसतील. Happy

हेमामालिनीने मागे एकदा सांगितले होते ( तिच्या उमेदीच्या काळात ) तिला सेटवर जाईपर्यंत आज कसला सीन आहे, कशा प्रकारचा रोल आहे याची अजिबात कल्पना नसायची. तिला फक्त छान छान दिसायचेच काम असणार असेच वाटायचे.

लोकहो, बदलापूर जबरी !! कालपासून मी खुश आहे एक मस्त स्टोरी, कास्टींग, कॅमेरा. एडिटींग आणि मुख्य म्हणजे अ‍ॅक्टींग असलेला सिनेमा पाहिला... सध्या धवन धवन लोकांवर फिदाई चे दिवस आहेत. शिखर धवन ची मिशी/टॅटू/बॅटींग, आणि इकडे वरून धवन... मस्त काम केलंय. टोटल इनटू द रोल. सगळ्या स्त्रीपात्रांची निवड आणि काम पण मस्त. विनय पाठक पण सहीच.. पण अर्थात शो स्टीलर इज नवाजुद्दीन सिद्दीकी.... काही शॉटस्मधे इतकं भारी काम केलंय , बॉडी लँग्वेज, एक्सप्रेशन्स मी आपसुकक 'वाह क्या बात ' असं म्ह्णून चक्क टाळ्या वाजवल्या मी...
पुण्याचं भारी शूटींग, रात्री ओरडणारी कुत्री वगैरे सकट....
ये रे घना ये रे घना हिं दी चित्रपटात उच्चारांचा कचरा न करता नीट वापर भरून मन सुखावून गेलं...

थोडक्यात.. बदलापूर देखनेमे बहुत मजा आया !!!
(रिव्हू लिहित नाही, कारण स्पॉयलर्ची चिंता कोण करत बसणार लिहिताना !) Happy

हॅपी जर्नी काही खास वाटला नाही. प्रोमोज वरून उगाच अपेक्षा निर्माण होतात. स्लो आहे मूव्ही. आणि नंतर नंतर कंटाळवाणाही होतो. जमेच्या बाजू अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापट. अतुलमधे घडणारा बदल कितीही टिपायचा प्रयत्न केला असला तरीही काहीतरी निसटून गेलंय असं वाटतं पिक्चरमधे.

कशा प्रकारचा रोल आहे याची अजिबात कल्पना नसायची. तिला फक्त छान छान दिसायचेच काम असणार असेच वाटायचे. <<
कल्पना असती तरी काय फरक पडला असता? तिने काय अभिनयाची घमेली ओतली असती की काय?
तिला कधी अभिनय शिवला सुद्धा नाही. छान छान दिसायचे काम करण्यापलिकडे तिने काही केलेही नाही. Happy

हॅपी जर्नीचा बीबी आहे का शोधत होते. मला नाही सापडला, म्हणून इथेच चर्चा.
मलाही कुठेतरी कहीतरी निसटून गेलंय असं वाटलं... प्रिया बापट २-३ वेळा अतुल कुल्कर्णीवर ओरडते - की तुला प्रेमच व्यक्त करता येत नाही. प्रेमच करता येत नाही कोणावर. त्यातल्या एकदा तर सुभाष्ताईंवरच्या प्रेमाखातर तिच्या घरी जाऊन अपमान सहन करून आल्या आल्या लगेच.... !!!
बाकी सगळ्या सिनेमात आवडलेली पात्र म्हणजे पल्लवी सुभाषताईंचे आई -वडील... खल्ल्लस आहेत ते आणि त्यांचे डायलॉग्स !

rmd, +१ चित्रा पालेकर यांच्यासाठी! बाकी हॅपी जर्नी बराच गंडलेला वाटला. म्हणजे एक छोटसं कथाबीज आणि काही छान जागा (locations) यांच्यासाठी एक स्टोरी रचली आहे. fantasy आजिबात convincing वाटत नाही. गंध खूप आवडला होता पण ह्यात नालेसाठी घोडा असा प्रकार वाटला.

रार, रिव्ह्यु लिहीलास तरी हरकत नाही. हल्ली टीओआय मध्ये शुक्रवारी मध्यरात्री (भारत वेळ) सिनेमाची पूर्ण स्टोरी ऑन-लाईन एडिशन वर देतात. न्यू नॉर्म!

बदलापूर आवडला कारण केवळ कलाकार!!! स्टोरी तशी भरपूर लूपहोल्स असलेली पण वेगवान आहे त्यामुळे लूपहोल्स खटकत नाहीत. वरूण धवन आणि नवाजुद्दिन दोघे निश्चित फिल्मफेयर साठी नॉमिनेट होणार.

वरूण धवन आणि नवाजुद्दिन दोघे निश्चित फिल्मफेयर साठी नॉमिनेट होणार.>>>>+१००

नवाझुद्दिन काय काम करतो...सहीच काय क्यालीबर आहे त्याच्यात. अगदी एक फुटकळसा रोल केला होता त्या आमिरच्या तलाश मध्ये आणि बदलापूरमध्ये खतराच .....त्याला आणि त्या वरुनला खरच फिल्मफेयर मिळालाच हवा.

नवाझुद्दिन काय काम करतो>>>रच्याकने, मुन्नाभाई एमबीबीएस मधे ट्रेन मधे सुनील दत्तचं पाकिट मारणारा, त्यामुळे लोकांचा मार खाणारा आणि नंतर डॉक्टर म्हणून संजय दत्त ला पाहुन चमकणारा कलाकार नवाजुद्दिन आहे हे काल सिनेमा कुठल्याश्या चॅनल वर परत पाहताना जाणवलं.

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या चाहत्यांनी बदलापुर नक्की बघा.
ह्या माणसाच्या डोळ्यांतली ठिणगी पहिल्यांदा बघितली ती वासेपूरमध्ये. वासेपूरला रसहीन अणि तद्दन मूर्ख सिनेमा म्हणायची तेव्हा फॅशन होती. तुलना करायचं कुणाच्या मनातही नसताना मनोज वाजपेयीनंतर दुसर्‍या भागात नवाजुद्दीन आला, तेव्हाच त्याच्यामधला अ‍ॅक्टर भावला होता. वासेपूरला क्रिटिक्स आणि देशाबाहेरचे लोक नावाजू लागले तेव्हा आपण जागे झालो. मग नवाजुद्दीनकडेही लक्ष गेलं.
मग तलाश, कहानी, बाँबे टॉकीज, लंचबॉक्स अशा नंतरच्या त्याच्या सिनेमांतला कुठचाच चुकवावासा वाटला नाही. 'किक' मध्ये तो मुख्य खलनायक होता. आता बदलापुरमध्येही त्याने कमाल केली आहे.

बदलापुरचं कास्टही चांगलं आहे- विनय पाठक, दिव्या दत्ता, हुमा कुरेशी, वरूण धवन, नवाजुद्दीन.

नवाजुद्दीन सिद्दिकीसाठी बदलापूर एकदा बघायला हरकत नाही.. बाकी चित्रपट सुमार आहे.

पुण्यात किस्सा नावाचा पंजाबी चित्रपट रिलीज नाही झाला का? बरेच चांगले रिव्ह्यु आले आहेत त्याचे.

पाठक ला फारस काम नाही आहे. पिक्चरच्या सुरुवातीला मास्क लावून बँक लुटतात आणि नवाझुद्दिन लुटीचा माल त्याच्याकडे देवून त्याला गाडीतून उडी मारायला लावतात शेवटी इंटर्वल नंतर पाठक ची एन्ट्री आहे त्याच्या बायकोला वरून लिफ्ट देतो वैगरे.......पासून..... पण पिक्चर पूर्णपणे नवाझुद्दिन आणि वरूनचाच आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकी कायमच आवडलाय. आधी वाटायचं फक्त व्हिलन(च) म्हणून(च) हा(च) (कुठलाही 'च' योग्यच ) चांगला आहे पण आता तर तो कुठल्याही रोलसाठी परफेक्ट वाटू लागलाय मला.
कहानी मधे तर तो इतका आवडलेला की त्याच्याजागी मी आणखी कोणालाच इमॅजिन नाही करू शकत (कहानी मधलं कुठलंच पात्र खरं तर मला रिप्लेस नाही करता येणार.. पण तरीही)

अजून थोडं अवांतर, नवाजुद्दिन सारखाच सुरुवातीला किरकोळ भूमिका करणारा एक गुणी कलाकार होता अशरफुल हक. दुर्दैवानी काही दिवसांपूर्वी गेला. संधी मिळाली असती अजून तर नक्कीच चमकला असता. Sad

http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/death-of-an-unk...

नवाजुद्दीन बेस्ट किक सोडुन. त्यात तो प्रचंड इरीटेट करतो. >>> + १०००००००
मला सगळयात जास्त तो तलाश मध्ये आवडलेला .

नवाजुद्दीन आणि इर्फान, दोघेही मिळालेल्या प्रत्येक भुमिकेचं सोनं करत राहिले. दोघांनाही रुढार्थाने रुप नाही ( हिरो मटेरियल नाही ) तरीही मह्त्वाच्या भुमिका त्यांना मिळतात, ते निव्वळ त्यांच्या क्षमतेसाठी.

नासिरुद्दीन शहाने पण त्या दोघांचे कौतूक केले आहे.

Pages