परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात रहातो, सद्ध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वर्षे तो परदेशात होता त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गपांचा विषय नोकरी, आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्यावेळी घरी येता येतं, शनिवार रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.
नोकरी कशी आहे असं विचारलं असता नाखूष दिसलेला तो म्हणाला की 'खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री रात्री पर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाईफ असं वाटतंच नाही काही. शनिवारी सुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.' मी न राहवून प्रश्न केला, 'तू फॉरेन मधेच राहतोस ना?' 'हो अर्थात!' तो म्हणाला. 'कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!' मी म्हणालो. 'एकेकाळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो किंवा परदेश, घरोघरी मातीच्या चुली'
'कमाल आहे!' असं म्हणत असतानाच मी भारतात रहाणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा त्यांचे किस्से आठवायला लागलो. 'आनेका टाईम फिक्स है जानेका नही' 'गद्दी चद्दर लेकेही ऑफिस जाते है' 'ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है' 'वर्क हार्ड पार्टी हार्डर' अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.
स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली, आणि एकेक माणूस दोघा तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने, आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलत काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अर्ध्याहून जास्त वेळ नोकरीस देऊ लागली आणि हळू हळू ही संस्कृती बनत गेली.
कुणीतरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की 'मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की 'हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करनेका है तेरेको?' असं विचारतो माझा बॉस.' मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको मुलं मित्र नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोकं हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या 'घर जा के क्या करनेका है' वाल्यांची.
हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वतःसाठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शन मधे होतं. कुठेतरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वांची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकावर आणि व्हॉट्सॅप्प वर 'गेले ते दिवस' आणि 'बेस्ट डेज ऑफ लाईफ' सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित रहायचं काही कारण नाही. 'दमलेला बाबा' आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा 'कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही' असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली नाईन टू फाईव्ह ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.
बेफि, सरकारी नोकर 'नियमानुसार
बेफि,
सरकारी नोकर 'नियमानुसार काम' आंदोलन करतात तेव्हा काय होतं ते ठाऊक आहे तुम्हाला.
माझ्या नशिबाने 'नियमानुसार' काम करणार्यांना नारळ देण्यास मी मुखत्यार आहे, अन त्यामुळे सुखी आहे.
चार पाहुणे आले तर धुणी भांडी जास्त निघतात. पाहुण्यांच्या खाण्याच्या प्लेट्स अन कपडे बाजूला काढून ठेवून वर्क काँट्रॅक्टमधेच असलेले काम करणारी बाई तुम्ही नोकरीवर कन्टीन्यू कराल की तिला नारळ द्याल?
अन तेच तिने न कुरकुरता काम केले, तर न मागता थोडे जास्त पैसे, अन वेळेवारी तिच्या मुलांकरता खाऊ म्हणून किलोभर आंबे द्याल?
टाळी दोन्ही हातांनी वाजते.
स्ट्रेस एम्प्लॉयर्सनाही असतो साहेब. त्याने क्लायंटकडून काम मिळवून आणलंच नाही तर तुमचं खुर्चीत बसून केलेलं कोडिंग कुठे जाईल??
दुनियामें कितना गम है ! मेरा
दुनियामें कितना गम है ! मेरा गम कितना कम है !
ह्या नियमावर बोट ठेवून काही
ह्या नियमावर बोट ठेवून काही कर्मचारी वेळच्यावेळी निघू शकत नाहीत कारण इतर थांबणारे कर्मचारी कंपनीचे वातावरण कलुषित करतात. >> बेफिकीर मला तुमची कार्य क्षेत्राबद्दलची पार्श्वभूमी माहित नाही पण तरी 'इतर थांबणारे कर्मचारी ह्याबद्दल काही सांगतो. आयटीमध्ये सगळी कामं टीमवर्क बेस्ड असतात. कोणी एक हाती एंड टू एंड प्रोजेक्ट सांभाळतोय असे फार क्वचित असते. तर तुमच्या टीममधले किंवा दुसर्या टीममधले असे कोणी ज्याच्या कामावर तुमचे काम अवलंबून असेल आणि तुमच्या कामाला डेडलाईन असेल तर....जर त्या दुसर्या टीममेंबरने दिवसभर ऑफिसअवर्समध्ये विनाकारण लंचब्रेक, कॉफीब्रेक, फोन कॉल्स, गप्पा टप्पा, नेट सर्फिंग, पर्सनल कामं करून ऑफिसची कामं लांबणीवर टाकत संध्याकाळी सहा सात नंतर तुमच्याशी संबंधित काम करायला घेतलं तर तुम्हाला झक्क मारत डेडलाईन सांभाळाण्यासाठी थांबणं आलं की नाही. तुम्ही काही त्याचे मॅनेजर नाही त्याला त्याच्या शेड्यूलचा जाब विचारायला. तुमच्या मॅनेजरकडे तुम्ही अश्या रडक्या तक्रारी घेऊन वारंवार जाऊ शकत नाहीत, तर तुम्ही काय करणार 'यू जस्ट हॅव टू लिव विथ ईट'. आणि ही अशी आळशी आणि कामचुकार कामाची 'सरकार दफ्तरी' असते तशी पद्धत ही बहुतांश भारतीय लोकांनी देशात आणि परदेशातही अंगिकारली आहे हे कटू पण सत्य आहे.
स्वतःच्या प्रगतीसाठी ज्यादा वेळ थांबून काम करणारे (करवून घेणारे नव्हे) हे तर आदरपात्र आहेत आणि ह्या चर्चेचा विषय नाहीत.
आयटीमध्ये सगळी कामं टीमवर्क
आयटीमध्ये सगळी कामं टीमवर्क बेस्ड असतात.<<<
चमन,
आय टी चा विषय कोणी काढला?
ज्याने कोणी काढला त्याला तुमचा प्रतिसाद वाचायला द्या!
बाजिंदा | 10 July, 2014 -
बाजिंदा | 10 July, 2014 - 22:01
दुनियामें कितना गम है ! मेरा गम कितना कम है !
<<<
+१
>>>स्ट्रेस एम्प्लॉयर्सनाही
>>>स्ट्रेस एम्प्लॉयर्सनाही असतो साहेब. त्याने क्लायंटकडून काम मिळवून आणलंच नाही तर तुमचं खुर्चीत बसून केलेलं कोडिंग कुठे जाईल??<<<
डॉक्टरसाहेबांना भरपूर रुग्ण मिळू लागणे हे डॉक्ट'रीण' बाईंसाठी मोलकरणींना चार आंबे जास्त देण्याचे कारण असू शकत नाही इब्लिस साहेब
अॅपल विथ ऑरेंजेस
अं.. नै समजलं एप्लॉयरला बराच
अं.. नै समजलं
एप्लॉयरला बराच नफा मिळणे हे पगारवाढ मागण्यासाठीचे कारण असू शकते. काम न करण्याचे? किंवा कमी करण्याचे कसे काय??
काँट्रॅक्टमधे असलेल्या स्पेसिफिकेशनपेक्षा जास्त काम करणार्या कर्मचार्याचे कौतुक होतेच? त्यात वाईट काय? अमुक माणूस/कलिग उगाच उशीरा थांबून खोटेनाटे काम जास्त केल्यागत दाखवत आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर you better be his superior officer and assess his work accordingly. Or fight it out through proper channels. What is the point in cribbing in social media?
४ आंबे हा बोनससाठी मेटॅफोर होता. अधिकचे काम केल्याबद्दल बोनस नियमापेक्षा जास्त दिला जाऊ शकतो, हे सुचवायचे होते. अचानक येणारे पाहुणे ही अधिकच्या अचानक उद्भवणार्या कामांबद्दल उपमा होती, जे माझ्या व्यवसायात कधीही अन कितीही होऊ शकते.
बेसिकली, मूळ नोकरी करण्यासाठी एम्प्लॉयरने त्याचा धंदा टिकवून ठेवणे हे गृहित आहे की नाही? त्याचं दुकानच दिवाळखोरीत गेले, तर नोकर नोकरी कुठे करतील? (त्या दुकानात करू शकत नाहीत हा अर्थ.)
"डॉक्टरसाहेबांना भरपूर रुग्ण मिळू लागणे हे डॉक्ट'रीण' बाईंसाठी मोलकरणींना चार आंबे जास्त देण्याचे कारण असू शकत नाही इब्लिस साहेब स्मित"
या वाक्यातही, बिझिनेस छान चालला, तर डिव्हिडंड अन बोनस जास्त वाटला जातो, हे माझे म्हणणे चुकीचे आहे काय?
यात अॅपल्स अन ऑरेंजेस कुठे आलीत?
इब्लिस, चार पाहुणे घरी येणे
इब्लिस,
चार पाहुणे घरी येणे आणि एम्प्लॉयरला जास्त नफा मिळणे ह्याचा संबंध कृपया विशद करावात अशी विनंती
आय टी चा विषय कोणी
आय टी चा विषय कोणी काढला?
ज्याने कोणी काढला त्याला तुमचा प्रतिसाद वाचायला द्या! स्मित >> तुमच्या साठीच आहे तो प्रतिसाद. ज्यादा वेळ थांबून काम करणार्यांचा विषय तुम्हीच काढला होतात ना, त्याचीच दुसरी बाजू मी सांगितली मी.
बेफि, आपल्या दोघांतल्या
बेफि, आपल्या दोघांतल्या गप्पांचाच धागा होऊ नये म्हणुन वरचाच प्रतिसाद एडिटतो आहे. प्लीज वाचा.
तुमच्या साठीच आहे तो
तुमच्या साठीच आहे तो प्रतिसाद<<<
मेजर घोळ आहे काहीतरी!
ह्या धाग्यावर माझे असे म्हणणे आहे की वर्किंग अवर्सनंतर थांबण्याची मूळ लेखात दिलेली कारणे भाबडी असून त्यापलीकडेही कारणे असू शकतात.
>>>हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं.<<<
(मूळ धाग्यातील विधान)
असे असले तर चार काय पाच आंबे देऊनही तेच होईल ना?
हं... सकाळी बघू परत. इथे तरी
हं... सकाळी बघू परत. इथे तरी कुणीच मधे बोलेना.
इथे तरी कुणीच मधे
इथे तरी कुणीच मधे बोलेना.<<<
कुणीतरी मधे बोलावे ही गरज कोणाला असते माहीत आहे ना इब्लिस?
हं... सकाळी बघू
हं... सकाळी बघू परत<<<
दमलेल्या तुमची कहाणी का?
मेजर घोळ आहे काहीतरी! ह्या
मेजर घोळ आहे काहीतरी!
ह्या धाग्यावर माझे असे म्हणणे आहे की वर्किंग अवर्सनंतर थांबण्याची मूळ लेखात दिलेली कारणे भाबडी असून त्यापलीकडेही कारणे असू शकतात. >> मला नाही वाटत काही घोळ आहे. ऊशिरापर्यंत थांबण्याची कारणे कितीही चांगली आणि कश्याच्याही पलिकडे असली तरी 'ऊशिरा थांबणे म्हणजे दुसर्याच्या वेळेवर निघण्यावर कुरघोडी करण्याचा हक्क' असा होत नाही. असे करणे म्हणजे त्या माणसाचा अब्युज करणे, एवढेच म्हणायचे होते.
>>>ऊशिरा थांबणे म्हणजे
>>>ऊशिरा थांबणे म्हणजे दुसर्याच्या वेळेवर निघण्यावर कुरघोडी करण्याचा हक्क' असा होत नाही. असे करणे म्हणजे त्या माणसाचा अब्युज करणे, एवढेच म्हणायचे होते.<<<
आणखी एक मर्यादीत निरिक्षण! क्षमस्व!
चमन मस्त लिहितो आहेस मुद्दे.
चमन मस्त लिहितो आहेस मुद्दे.
>>>ऊशिरापर्यंत थांबण्याची
>>>ऊशिरापर्यंत थांबण्याची कारणे कितीही चांगली आणि कश्याच्याही पलिकडे असली तरी 'ऊशिरा थांबणे म्हणजे दुसर्याच्या वेळेवर निघण्यावर कुरघोडी करण्याचा हक्क' असा होत नाही. असे करणे म्हणजे त्या माणसाचा अब्युज करणे, एवढेच म्हणायचे होते<<<
हा मस्त मुद्दा?
मी उशिरा थांबलो कारण मला वेळेवर निघणार्याला (चा) अॅब्यूज करायचा होता?
बाकी काहीही कारणे असू शकत नाहीत थांबण्याची?
>>>ऊशिरा थांबणे म्हणजे दुसर्याच्या वेळेवर निघण्यावर कुरघोडी करण्याचा हक्क' असा होत नाही<<<
इतकेच लिहून थांबणे शक्य नव्हते?
('इतकेच' तर कोणालाही मान्य आहेच की?)
अवाक!
चमन, अब्युज वाली पोस्ट भारी
चमन, अब्युज वाली पोस्ट भारी आहे!
ऊशिरापर्यंत थांबण्याची कारणे कितीही चांगली आणि कश्याच्याही पलिकडे असली तरी 'ऊशिरा थांबणे म्हणजे दुसर्याच्या वेळेवर निघण्यावर कुरघोडी करण्याचा हक्क' असा होत नाही. >>>>> +१!
चुकीची पोस्ट आहे ती
चुकीची पोस्ट आहे ती
संपादीत.
संपादीत.
बाप रे ईथल्या आयटी वाल्यांची
बाप रे ईथल्या आयटी वाल्यांची दु:खे वाचुन वाटले बरे झालं आयती (सॉरी) आयटी मधे गेलो नाही.
पण आयटी पेक्षा Oil & Gas वाल्यांची दुखणी कमी म्हणावी का असा प्रश्न पडला आहे.
मी माझ्या करियरची सुरुवात दहा वर्षापुर्वी हेवी ईंजीनीअरिंग कंपनी मधे शॉप फ्लोअर वर ईंजीनीअर म्हणून केली. सगळे प्रॉबलेम्स वर लिहिले आहेत तसेच्या तसे. एकदा कामावर गेलो कि घरी यायचा पत्ता नाही, पगार कमी, मॅनेजर लोकांची अरेरावी, अंतर्गत राजकारण, कामाचे प्रेशर, डेडलाईन्स वगैरे वगैरे.
मला त्याच वेळेस लक्षात आलं कि हे काही खरे नाही आपल्याकडुन हे काही आयुष्यभर होणार नाही. गपचुप नोकरी बदलली. आताच्या नोकरी मधे चार पैसे कमी मिळतात पण चांगली आहे. चार पैसे म्हणजे माझे जे मित्र तिथे टिकून आहेत त्यांना माझ्या दुप्पट पगार आहेत पण कामची स्थिती जैसे थे.
मला त्यांच्या सारखी लाईफस्टाईल ठेवता येत नाही( महागडे मोबाईल, गाड्या, घडाळे, कपडे, हॉटेलींग ). पण मला वाईट वाटत नाही, आणि नशीबाने बायकोला पण या गोष्टींचं अप्रुप नाही. शांतपणे ९ ते ५ काम करतो, घरी येऊन मुलाशी खेळतो, वाचन, मित्र, छंद जपतो.
आमच्या कंपनी मधे पण, जास्त तास काम करणारे, मोठा हुद्दा, पगार, शाबासकी मिळविणारे लोक आहेत. हे सगळे तुमचे तुम्हाला लखलाभ असे म्हणून पाच वाजता बॅग उचलून घरी येतो.
मूळात मला कळत नाही सगळे लोक का पळत आहेत ? नक्की काय मिळवाय्चे आहे या सर्वाना?
ज्या लाईफ स्टाईल , ऐषोआरामा साठी हे सर्व लोक पळत आहेत तो या लोकांना स्वताला हवा आहे कि दुसरे करत आहेत मग आपण पण जगाच्या सोबत चालण्यासाठी ते करायला हवे म्हणून करतात ?
आपण आपले यश, आपला आनंद दुसर्याच्या फुटपट्टीने मोजत आहोत का ?
माझ्या मते पुण्यासारख्या ठिकाणी स्वताचे घर असेल तर २० ते २५ हजार आणि नसेल तर ४० ते ४५ हजार पगार ( लोन चा हप्ता भरण्यासाठी) दोघांचा मिळुन, प्रति महिना पुरेसा आहे. आमची सगळी हौस या पगारामधे पुर्ण होते. माझा पगार यापेक्षा जास्त असल्याने बाकिचा पगार बचत खात्यात राहतो.
"MAN IS THE ONE WHO IS MORE, NOT THE ONE WHO HAS MUCH" KARL MARX
चमन, आपला "अब्युज करणारे आणि
चमन, आपला "अब्युज करणारे आणि अब्युज करवून घेणारे." हा प्रतिसाद पूर्णपणे पटला आणि आवडलाही.
पण तो अपूर्ण वाटला. जे कर्मचारी स्वखुशीने आणि योग्य कारणाने उशीरापर्यंत कार्यालयात थांबतात त्यांचाही तिसरा गट आहेच की! (जसे बेफिकीर ने उदाहरण दिले आहे). माझा शक्यतो ज्यावेळेस तिसर्या गटात नसेल त्यावेळेस तुम्ही वर्गवारी केलेल्या दोन्हीही गटात न राहण्याचा प्रयत्न असतो आणि तो बहुतांशी यशस्वीच होतो. मी नेहमी माझ्या सबऑर्डिनेट्सनाही पहिल्या दोन गटांपासून दूर राहण्यास एन्करेज केलेले आहे.
शक्यतो तिसर्या गटात त्यावेळेस जाणे होते जेव्हा काही अनाहूत प्रॉब्लेम्स उभे राहतात आणि तेही अटीतटीच्या वेळी. अन्यथा अनाहूत प्रॉब्लेम्स साठी एस्टीमेट्स आणि शेड्यूल्स मध्ये तरतूद केलेलीच असते. मला जेव्हा नवीन काही शिकायचे असेल तर शक्यतो कार्यालयात जाण्या येण्याचा प्रवास, सुट्या आणि व्यक्तिगत वेळ आणि जागा यांचा वापर करण्यावर माझा भर असतो.
पूर्वीच्या एका वर्क्प्लेस मध्ये संध्याकाळी सहाला कार्यालयातून निघणे हे जगन्मान्य नव्हते, आणि तसे केल्याने एक पगारवाढ कमी मिळणे आणि एक बढती कमी मिळणे हे झाले, पण त्याचा विषाद न वाटता आपण आपल्या तत्वांनुसार आणि कुटुंबाच्या गरजेचा आणि स्वतःच्या आवडींचा विचार करून काम करणे शक्य झाले याचा आनंदच झाला.
इब्लिस,
आपला प्रतिसाद पटला नाही.
"You have already sold your effort for a specific sum. Please give that much effort in return. अन्यथा, दुसरे काम शोधण्यास अथवा स्वतःचा नवा बिझिनेस सुरू करण्यास आपण मुखत्यार आहात."
>>
तुम्ही तुमचे श्रम विकले आहेत, पण दिवसाच्या आठ तासांसाठी, तेही आठवड्याचे पाच दिवस. त्यात एक्सेप्शनल केस मध्ये जास्त काम करण्यास सर्वसाधारण पणे कुणाचाच नकार नसतो. तुमच्या मोलकरणीला तुम्ही जसे कामावर ठेवताना सांगितलेले असते की चार व्यक्तींचे काम आहे, पण आमच्या कडे महिन्यातून एकदा ४-५ पाहुणे येतात, तसेच आम्हालाही माहित असते की महिन्यातुन एखाद वेळेस उशीरापर्यंत थांबावे लागेल, आणि त्याबद्दल तक्रार शक्यतो नसतेच.
बेफिकीर
आपली शेवट्ची बरीच मते पटली.
"ह्या नियमावर बोट ठेवून काही कर्मचारी वेळच्यावेळी निघू शकत नाहीत कारण इतर थांबणारे कर्मचारी कंपनीचे वातावरण कलुषित करतात. आता तुम्हाला ठाम भूमिका घ्यायची असेल तर अवश्य घ्या">>>>>>>
स्वानुभवाने असे मत बनले आहे की अशी भूमिका घेणे शक्य आहे. चमन च्या प्रतिसादातील "अब्युज करवून घेणारे लोक" यांनी थोडे आत्मपरिक्षण केले आणी त्यावर उपाय केले तर अगदी सहज.
कोरा हो तिसरा गटही सगळीकडे
कोरा
हो तिसरा गटही सगळीकडे असतो आणि ह्याच गटातले 'कंपिटिटिव आणि मेहनती लोक पुढे जाऊन चांगली प्रगती करतात, म्हणून सगळ्यांनाचा त्यांछ्यासारखे कंपिटिटिव रहाणे, गरज नसतांना अंगावर जास्तीची जबाबदारी घेऊन ती पार पाडून दाखवेणे, लीडरशिप, सेल्फ मोटिवेशन असे अनेक कारणाने जमेलच असे नाही. काही लोक आपल्याला दिलेलं काम चोख पणे करून वेळेत निघून जात असतील तर त्यांच्यावर शेरेबाजी करण्याचा हक्क जास्तीची मेहनत घेऊन काम करणार्यांना मिळ्त नाही.
मी वरतीच लिहिले आहे की, जे बेफिकिरानीही सोयीस्कर रित्या वाचण्याचे टाळले आहेच,
स्वतःच्या प्रगतीसाठी ज्यादा वेळ थांबून काम करणारे (करवून घेणारे नव्हे) हे तर आदरपात्र आहेत आणि ह्या चर्चेचा विषय नाहीत."
माझ्या मते आयुष्यात मुळात
माझ्या मते आयुष्यात मुळात प्रश्न निर्माण होतात ते कोणाशी तरी स्पर्धा करायच्या हेतूने. ही स्पर्धा डोक्यातून काढून टाकली कि सगळी समिकरणे चुटकीसरशी जुळून येतात.
अगदी शाळेतल्या मार्कांपासून हि गोष्ट् सुरु होते आणि मेल्यावर पण संपत नाही. माझे मार्क या जगातल्या X मुलांपेक्षा जास्त, मी खेळात X लोकांना हरवून Y क्रमांक पटकावला. माझी छाती X , माझा दंड Y. माझ्या कडे X,Y,Z पदव्या, माझं X विभागात घर, मला XYZ कंपनीत नोकरी, माझ्या कडे Xकंपनी ची गाडी, माझा X बँक बॅलेन्स. माझा मुलगा XYZ शाळेत जातो.
मुख्य समस्या आहे ती ही. आपण आपल्या आयुष्यातले किती तरी अनमोल क्षण हे X,Y,Z मिळवण्यात वाय घालवतो. आता मुळ प्रश्न आहे कि आपण हे का करतो?
१. हे सर्व केल्याने आपल्याला आनंद मिळतो.
२. हे सर्व केल्याने आपण यशस्वी होतो (ईतरांच्या नजरेत, प्लीज नोट) बर्याचदा आपल्याला स्वताबद्दलचे ईतरांचे मत स्वताच्या मता पेक्षा महत्वाचे असते.
३. सगळे असेच करतात त्यामुळे मला पण करावे लागते, नाही केले तर मी मागे पडेन.
४. मला जिवंत रहायचे असेल तर हे सर्व करणे भाग आहे.
चवथ्या क्रमांका मधे बसणार्या गोष्टी किती असतील ?
Since 19th century Intelligence of man has developed & reasoning is deteriorated.
आपल्याला एखादी गोष्ट का करायची आहे? आपण जे काही करतो आहे त्याचा मूळ उद्देश काय हा आपण विचार किती वेळा करतो ?
हे सोने, हिरे, मोठ्या मोठ्या चार चाक्या, दोन तीन हजाराचे शर्ट, सहा सात हजाराचे बुट, चार पाच हजाराचे घड्याळ ........ हे सर्व कशासाठी ? ह्याची खरेच गरज आहे का?
आपल्याकडे जे जे काही आहे, किंवा जे जे काही आपल्याला विकत घ्यावयाचे आहे, त्याची Concrete Value (use value) किती आणि Abstract Value (exchange value) किती ?????
आत चर्चा मार्गी लागल्यासारखे
आत चर्चा मार्गी लागल्यासारखे वाटत आहे!
चमन यांचा अबयुज वाला प्रतिसाद अगदी पटला.
दमले वाटत सगळे लिहून लिहून,
दमले वाटत सगळे लिहून लिहून, एकदम १४० च्या वेगाने धावणारा धागा ४० च्याही खाली आला.
अन्तरन्गी, इब्लिस यानी मस्त
अन्तरन्गी, इब्लिस यानी मस्त लिहीले आहे. आता लेखकाने वर आय टी वाल्या मित्राचे सान्गीतले की तो मित्र दुसर्या कुठल्या जॉब मध्ये आहे?
कामाचा ताण सगळीकडे दिसतो. पण आय टीतले काही ठरावीक लोक सोडले तर आय टीतलेच बाकी असा कन्ठशोष करताना दिसले नाहीत. मला एवढा पगार मिळतोय त्यामुळे मला कामाच्या तासाच्या आणी दडपणाच्या कसल्या ही तक्रारी करायच्या नाहीत. असा माझ्या घरच्या बाकी लोकान्चा पण सूर आहे, जे आय टी मध्येच आहेत.
पण सरसकट सगळ्याच आय टी वाल्याना दोषी धरुन, त्यान्च्यावर बीन बुडाचे आरोप करुन काटकर आणी बन्या बापु याना काय आनन्द मिळाला देव जाणे.
मात्र धीरज काटकर यान्चा एक मुद्दा मी जरुर विचारात घेईन किन्वा घेतलाय असेच म्हणेन.( घेऊन उपयोग काय? जे व्हायचे ते झालेच आहे) प्रचन्ड वेगाने महानगराकडे वाटचाल करणारे, सगळ्या सुखसोयी असणारे, हवा- पाणी व्यवस्थीत ( निदान या आधी पर्यन्त तरी होते) असणारे, विद्येचे माहेरघर म्हणून लौकीक असणारे पुणे सगळ्या बड्या आय टी वा इतर कम्पन्यान्च्या डोळ्यात भरले. आणी आय टी मुळे वेगाने होणारे स्थलान्तर लक्षात घेऊन बिल्डरान्चा बाजार भरला. असलेल्या शेतजमिनी वाटेल त्या भावात विकुन गुन्ठामन्त्री होणार्या लोकानी पण बिल्डराना अप्रत्यक्षरीत्या मदत केलीय. त्यामुळे घेताय न घर, मग आम्ही देऊ/ लाऊ त्या भावात घ्या. असे म्हणून वाटले तशी लुट केली.
नुसते आय टी याला जबाबदार नाही, पण नाममात्र का होईना ते ठरले. पुण्या बाहेर कात्रज बाजूला, मुम्बईकडे हिन्जेवडी, वाकड, पिम्पळे सौदागर, हडपसरकडे मगरपट्टा, निगडी कडे तळेवडे आणी फुरसुन्गी, कोन्ढ्वा इकडे वाटेल तसे रेट वाढत चालले आहेत.
याला जबाबदार नुसते आय टी वा या कम्पन्या नाहीत, पण बिल्डर-राजकारणी लॉबी, परप्रान्तातुन येणारे लोन्ढे ( उ. प्रदेश,बिहार कडे आणी तिथुन पुण्याला येणार्या गाड्या बघा, लोक बघा आणी मग बोला/ लिहा) यानी पण भाव वाढीला मदत केली आहे. तेव्हा धीरज भाऊ माझे हे पण मुद्दे लक्षात घ्या, आणी मग की बोर्ड दणादण बडवा. ( तुटला तर मी भरुन देणार नाही.:खोखो:)
अतरंगी - तुमचे विचार कळले..पण
अतरंगी - तुमचे विचार कळले..पण जास्त पैसे असल्याचे फायदेपण आहे, तेव्हा वेळ मिळाल्यास हे पुस्तक वाचावे - Happy Money: The Science of Happier Spending
मस्त पुस्तक आहे. इतरांनी सुद्धा वाचावे. पैसे कमविण्याचा आणि खर्च करण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो.
अरे बापरे एवढे प्रतिसाद ..
अरे बापरे एवढे प्रतिसाद ..

धागा आयटी वर गेलेला दिसतोय ..
Pages