दमलेल्या तुमची आमची कहाणी

Submitted by अपूर्व on 9 July, 2014 - 03:14

परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात रहातो, सद्ध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वर्षे तो परदेशात होता त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गपांचा विषय नोकरी, आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्यावेळी घरी येता येतं, शनिवार रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.

नोकरी कशी आहे असं विचारलं असता नाखूष दिसलेला तो म्हणाला की 'खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री रात्री पर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाईफ असं वाटतंच नाही काही. शनिवारी सुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.' मी न राहवून प्रश्न केला, 'तू फॉरेन मधेच राहतोस ना?' 'हो अर्थात!' तो म्हणाला. 'कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!' मी म्हणालो. 'एकेकाळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो किंवा परदेश, घरोघरी मातीच्या चुली'

'कमाल आहे!' असं म्हणत असतानाच मी भारतात रहाणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा त्यांचे किस्से आठवायला लागलो. 'आनेका टाईम फिक्स है जानेका नही' 'गद्दी चद्दर लेकेही ऑफिस जाते है' 'ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है' 'वर्क हार्ड पार्टी हार्डर' अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.

स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली, आणि एकेक माणूस दोघा तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने, आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलत काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अर्ध्याहून जास्त वेळ नोकरीस देऊ लागली आणि हळू हळू ही संस्कृती बनत गेली.

कुणीतरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की 'मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की 'हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करनेका है तेरेको?' असं विचारतो माझा बॉस.' मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको मुलं मित्र नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोकं हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या 'घर जा के क्या करनेका है' वाल्यांची.

हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वतःसाठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शन मधे होतं. कुठेतरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वांची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकावर आणि व्हॉट्सॅप्प वर 'गेले ते दिवस' आणि 'बेस्ट डेज ऑफ लाईफ' सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित रहायचं काही कारण नाही. 'दमलेला बाबा' आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा 'कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही' असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली नाईन टू फाईव्ह ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाळू सिमेंटच्या किंमती आयटीवाले वाढवत नाही>>>> हा हा हा Biggrin
मायबोलीच्या साराह पॅलीन हा खिताब तुम्हाला देण्यात येतोय....

टोचा, बॉण्ड आहे माझा ४ वर्षांचा Happy
तो संपायला किमान ८ महिने शिल्लक आहेत.
माझी साडे तीन वर्षांपुर्वीची अ‍ॅज अ फ्रेशर जॉईनी, सॅलरी १० हजार होती. आणि कामाचे तास ९ कंपलसरी वगैरे वगैरे!

कोणालाही १२ तास काम रोज करावं लागत नाही मान्य पण आठवड्यातुन ३ दिवस करावंच लागतं Happy
कंपनीत किमान ९.५ तास रोजचे कंपलसरी आहेत आणि ओडीसीमधे ८ तास कंपलसरी.
दिड तासात जेवण, दैनंदिन क्रिया, चहा वगैरे उरकायचं असतं Happy
ओडीसीमधे मोबाईल , मेमरीकार्ड असलेली कोणतीही गोष्ट, म्युझिक प्लेअर अलाऊड नाही Happy

टाईमपासला माबो एवढाच चान्स पण आता नविन रूल नुसार कोणतीही कामाशी संबंध नसलेली साईट वापरणे हा कंप्लायन्स इस्श्यु ठरणार आहे:) सो उरलेले दिवस बागडुन घेतेय Happy

सो कंपनीमधे उगाच टाईमपास करावं असं काही नाही त्यामुळे उगाच काम नसेल तर १२ तास थांबण्यात काहीही इंटरेस्ट नसतो Happy

म्हणूनजी मानसिक दमवणुक होते तीच्यावर सोल्युशन हवंय Happy

पण काम चालू असताना वर्कप्लेसमधे टाईमपासची गरज का भासावी? तुम्ही एकदा काम करता म्हणजे कामच केलं पाहिजे असं निदान मला वाटतं (मी पुराणमतवादी आहे बहुदा). पगार हा आपण तिथे जाऊन काम करण्यासाठी असतो ना? त्यात टीपी कसा काय इन्क्लूड करता येतो?

आणि दिवसातून दीडतास जेवणखाण, चहापाणी याला रग्गड झाला की. बहुतेकठिकाणी मॅक्स तासभरच देतात कामातून ब्रेक म्हणून

वरदा, दिवसातले किमान ८ तास (त्याचे सहज प्णे १० होतातच) अजिबातच टाईमपास न करता सलग काम खरच सोप्प आहे का? मला नाही बुवा जमत. डोकं आणि डोळे दुखायला लागतात स्क्रिनकडे बघुन आणि तत्याच त्या कोडचा तोच तोच विचार करून.
मला ब्रेक लागतो....

स्मिते, खरच की गं Happy

१२ तास काम करणारे बाकी बरेच लोक आहेत जसे पोलिस, रेल्वे, ST ड्रायव्हर. इतकेच कशाला बर्‍याच सरकारी ऑफिस मधे पण जास्तीचे थांबावे लागते. पण त्यांना त्याचा मोबदला फारसा मिळत नाही.
>>+१ आजच आरटिओ ऑफिसमध्ये गेलो होतो.. चारही बाजूला जुन्या जुन्या फाईल्स आणि वरुन पाणी पावसामुळे गळत होते...

बाप रे! कुठला मुद्दा कुठे नेता तुम्ही लोक!
लेट सिटिंगला reward करणं- actual performance न बघता- हे चुकीचं कल्चर आहे व ते कुठेही असू शकतं. उगाच आयटी-नॉन-आयटी वाद कशाला घालायचा?
मी स्वत: non-IT आहे. पण हे कल्चर मी सगळीकडे पाहिलंय.
आणि आवडीचं काम मी निवडलं- I love and enjoy my work- पण कामाचे तास खूप वाढल्यामुळे जर झोप,जेवणाच्या वेळा, रोज अर्धा तास जिममध्ये किंवा योगा क्लासला जायला वेळ न मिळणं, घरातली कामं- स्वयंपाक, घर आवरणं, इत्यादी करायला वेळ न मिळणं- मुख्य म्हणजे कुटुंबाला वेळ न देऊ शकणं- हे जर झालं तर कितीही आवडीचं काम असेल तरी वैताग येतोच.

मी गेली ८ वर्ष पूर्णवेळ डिझाईन/ डेवलपमेंट मध्ये काम करतोय. कामाचा ताण कधी असतो, कधी नसतो. कामाच्या वेळा खूपच लवचिक ठेवता येतात, दिवसात डॉक्टरच्या भेटी, मुलाला अचानक डे-केयर मधून घरी न्यायला लागणे, घरात काम करायला कोणी येणार असेल तर घरी थांबून काम करून घेणे इ. गोष्टी मला भारतात आणि 'फारेन'ला घरून काम करून बऱ्यापैकी सांभाळता आल्या. मी बाकी काहीही टाईम-पास न करता काम केलं तर ८ तासाची गरज पडत नाही, पण टिवल्या-बावल्या करत काम करायला आवडते. त्या न-करता डेड-लाईन असेल तर जमते सुद्धा Happy

प्रोब्लेम सोडवायला आवडते, त्यामुळे वेळी-अवेळी कधी काम करायला लागले, चांगले काम असेल तर उत्साहाने करतो, घोडागिरी असेल तर चिडचिड होते, पण तेवढ्या पुरती, वर वरदाने म्हटलं आहे तशीच. अती झालं तर थांबवून दुसरीकडे जाणं हातात आहेच. पैसे जास्त मिळतात हे अंशतः मान्य. भारतात मान्य 'फारिनला' अमान्य. आणि दुसऱ्याला जास्त पैसे मिळाले आणि मला हवे वाटले तर मी तिकडे काम करावे, त्याला का? मला पण पाहिजे असा हट्ट बालिश आहे. ते शक्य नसेल आणि पैसे हवे वाटत असतील तर माझं क्षेत्र चुकलं असं म्हणाव.

थोडक्यात न-कटकट करता आवडीने अनन्नेक लोक 'आयटी' मध्येपण काम करतात, हे सांगायचय.

>>आणि दुसऱ्याला जास्त पैसे मिळाले आणि मला हवे वाटले तर मी तिकडे काम काम करावे, त्याला का? मला पण पाहिजे असा हट्ट बालिश आहे. ते शक्य नसेल आणि पैसे हवे वाटत असतील तर माझं क्षेत्र चुकलं असं म्हणाव.

अमितव, बासच लाखमोलाची बात !!! Happy

माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मी देखील माझ्या आवडीच्या विषयाला माझे कार्यक्षेत्र बनविले आहे.
सविस्तर सांगत बसत नाही, पण मुळात माझा काही आयटीमधेच यायचे असा सबळ विचार नव्हता.
मी जी बाजू निवडली त्यामधे आयटी ही उपबाजू दिसली त्यावेळी आणि नंतर तीच मुख्य झाली.

खरेतर सहावा वेतनआयोग येईपर्यंत मला देखील खुप वाईट वाटायचे, की अरे आपल्याला इतर क्षेत्रांच्या मानाने जास्त पगार मिळतो, तर इतर लोकांचे कसे होत असेल. नंतर काही वर्षांनी सर्वत्रच थोड्याफार प्रमाणात बदल झाले.

तुम्ही एक विचार करून बघा, आयटीच्या लोकांच्या हातात पैसा आल्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवर झाला नाही का ? झाला अनेक इतर उद्योगांना पुर्वीपेक्षा जास्त पैसा मिळू लागला. उदा. लाँड्री, भाजीवाले, कामवाल्या, ड्रायव्हर्स, इ.
चांगले काय झाले ते पण बघा की राव.

>>>तुम्ही एक विचार करून बघा, आयटीच्या लोकांच्या हातात पैसा आल्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवर झाला नाही का ? झाला अनेक इतर उद्योगांना पुर्वीपेक्षा जास्त पैसा मिळू लागला. उदा. लाँड्री, भाजीवाले, कामवाल्या, ड्रायव्हर्स, इ.
चांगले काय झाले ते पण बघा की राव.<<<

हा ह्या धाग्याचा विषय नाही, पण हा प्रतिसाद आला आहे म्हणूनः

महेश,

१. अर्थचक्र गतीमान व्हावे ह्यासाठी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच असायला हवी होती असे नाही. (ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की ती नसायला हवी होती).

२. दिल्ली, जयपूर, भोपाळ, कोलकाता, नागपूर व इतर अनेक लहान लहान जिल्हे जेथे आय टी इंडस्ट्री नाही तेथील लाँड्र्या, भाजीवाले, कामवाल्या ह्यांची कामे कमी झाली असतील नाही का? Happy

इथे एसी ऑफिस दिसतं....पर्रदेश वारी दिसते......पण आम्च्या खुर्चिच्या खाली (खरी जागा नाही सान्गता येत नाहिये...कशाच्या खाली ते :)).....काय फटाके फुटतात ते काय सांगायचं तुम्हाला धीरज भौ!!

१२ तास रोज काम करणार्‍या व्यक्तीला ८ तासाचा पगार मिळतो स्मित
इट्स नॉट टू मच
<<
वेल, हाऊ मच इज इट एक्झॅक्ट्ली. अन ८ तासाचा किती पगार मिळायला हवा असं तुम्हाला वाटतं?
हे सहज कुतुहल म्हणून विचारतो आहे.

बेफि, माझा मुद्दा असा होता की आयटीवाले लोकांना जास्त पगार असल्याने या सेवा पुरविणार्‍या लोकांना आधीपेक्षा जरा जास्त पैसा मिळू लागला.

महेशभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है!

(थोडं इब्लिसामृत पाठवू का ईमेलने? जरा कडक खरं बोलता येईल मग Wink )

- (काडिबाज) इ-ब्लिस्स...

बेफि, माझा मुद्दा असा होता की आयटीवाले लोकांना जास्त पगार असल्याने या सेवा पुरविणार्‍या लोकांना आधीपेक्षा जरा जास्त पैसा मिळू लागला.<<<

एखाद्या घटकाला जास्त पगार असल्याने त्याच्याकडून अधिक पैशांची मागणी (कोणाही सेवा पुरविणार्‍याकडून) केली जाते हे गृहीतक बरोबर आहे. पण माझा पुन्हा आधीचाच मुद्दा! जेथून ह्या लोकांपैकी काही टक्के लोक आय टी कंपनीज असलेल्या विभागात स्थलांतरित झाले त्या मूळ प्रदेशात सेवा पुरविणार्‍यांचा नफा घटला असेल नाही का? मग तेथे 'काय वाईट झाले तेही बघा' की 'राव'!

विषयांतराबद्दल क्षमस्व! (हे मूळ धागाकर्त्याला उद्देशून आहे).

कामाच्या वेळा आणि कामाचा ताण, लाँग अवर्स, ओवरटाईम, आयटी आणि नॉन आयटी, कामसू आणि कामचुकार हे सगळे वरवरचे सुपरफिशिअल वर्गीकरण आहे. खरे वर्गीकरण फक्त दोनच गटात करता येते.

"अब्युज करणारे आणि अब्युज करवून घेणारे."

अब्युज करणारे

--नव्यानेच मॅनेजर होऊन ऑर्डरी सोडण्यात मजा वाटणारे लोक
--अनरिअ‍ॅलिस्टिक डेडलाईन्स अ‍ॅक्सेप्ट करून कामाचा बोजा टीम वर टाकणारे लोक
--भारंभार प्रोजेक्टस घेऊन टीमला रात्रंदिवस कामाला जुंपणारे लोक
--लोकांच्या फॅमिली लाईफला महत्त्व न देता त्यांच्या माणूस असण्याची तमा न बाळगणारे लोक
--येनकेन प्रकारे स्वतःचा कर्तेपणा सिद्ध करण्यासाठी हपापलेले लोक
--कॉस्ट सेविंग/ कटिंगच्या नावाखाली लहान टीमला मोठ्या आणि जास्तीच्या कामाला जुंपणारे लोक
--नॉन-पर्फॉमर, फेक रिस्युमे, वशीलेबाजी, राजकारण, चाटूगिरी, हेट्रेड, काम न आवडणारे, ऑनसाईट संधीसा/ प्रमोशन/ बोनस/रेटिंग यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे असल्या एक ना अनेक रोगांना बळी पडलेलेले टीम मेंबर्स.

अब्युज करवून घेणारे लोक

--टाईम मॅनेजमेंट चा ओ की ठो कळणारे
--दिवसभर ऑफिसअवर्समध्ये विनाकारण लंचब्रेक, कॉफीब्रेक, फोन कॉल्स, गप्पा टप्पा, नेट सर्फिंग, पर्सनल कामं करून लेट पर्यंत थांबणारे आणि आपल्यबरोबर टीममधल्यांचेही टाईमटेबलची वाट लावणारे टीम मेंबर्स
--अब्युसिव मॅनेजरला घाबरणारे आणि त्याच्या धाकात राहणारे लोक
--आपले मत, काम शेड्यूल, आपल्या प्रायोरिटीज ई, चा मॅनेजरपाशी व्यवस्थित ऊहापोह न करणारे लोक
--मॅनेजर सांगतोय म्ह्णून चार पेंडींग कामं असतांना पाचवं घेतांना नाही म्हणायला घाबरणारे लोक
--टीम वर्क आणि टीम कल्चर शी फारकत घेतलेले स्टबर्न लोक
-- लो सेल्फ एस्टीम, अनास्था, पर्सनल बाबींमुळे कामाकडे दुर्लक्ष्य झालेले असल्या एक ना अनेक रोगांना बळी पडलेलेले टीम मेंबर्स.

ह्या असल्या दोन प्रकारच्या लोकांमुळे 'दमलेल्या तुमची आमची कहाणी' सारखे लेख लिहिले जातात.

खरे वर्गीकरण फक्त दोनच गटात करता येते.

"अब्युज करणारे आणि अब्युज करवून घेणारे."<<<

मला जास्त वेळ थांबून जे मी दिवसभरात करू शकलो नाही ते शिकून घ्यायचे आहे, स्वतःमध्ये प्रगती घडवून आणायची आहे अश्यासारखे प्रकार नसतात का चमन? Happy

तुम्ही उत्तमरीत्या एलॅबोरेट केलेल्या कार्यपद्धती दुर्दैवाने फक्त दोनच प्रकारांचे वर्णन करतात व फक्त दोनच प्रकार अस्तित्वात असतात हे तुमचे गृहीतक कदाचित मर्यादीत प्रकारच्या अनुभवातून आलेले असेल (हे म्हणण्याबद्दल क्षमस्व) असे मानायला वाव नाही आहे का? Happy

मी चमन आहे, चनस नाही Proud

मला जास्त वेळ थांबून जे मी दिवसभरात करू शकलो नाही ते शिकून घ्यायचे आहे, स्वतःमध्ये प्रगती घडवून आणायची आहे अश्यासारखे प्रकार नसतात का चनस? >> असतात ना, पण जे स्वतःच्या हितासाठी थांबले आहेत ते असले 'दमलो बिमलो' सारखे रडके लेख कश्याला लिहितील, तक्रार कश्याला करतील?

तुम्ही उत्तमरीत्या एलॅबोरेट केलेल्या कार्यपद्धती दुर्दैवाने फक्त दोनच प्रकारांचे वर्णन करतात व फक्त दोनच प्रकार अस्तित्वात असतात हे तुमचे गृहीतक कदाचित मर्यादीत प्रकारच्या अनुभवातून आलेले असेल (हे म्हणण्याबद्दल क्षमस्व) असे मानायला वाव नाही आहे का? स्मित >>> माना की, काहीही गृहीत धरा, माझे काही म्हणणे नाही.

असतात ना, पण जे स्वतःच्या हितासाठी थांबले आहेत ते असले 'दमलो बिमलो' सारखे रडके लेख कश्याला लिहितील, तक्रार कश्याला करतील?<<<

म्हणूनच मूळ धागाकर्त्याला मी त्यांचा लेख 'भाबडा वाटला' असे लिहिले आहे. Happy

माना की, काहीही गृहीत धरा, माझे काही म्हणणे नाही.<<< म्हणजे तुम्ही ह्या व्यासपीठावर येणार, तुम्हाला जे वाटले ते लिहिणार, त्यावर काही चर्चा होऊ लागली तर म्हणणार की हवे ते म्हणा? हे मस्त आहे.

'मायबोलीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात झालेले बदल' असा एक धागा काढावा असे वाटू लागले आहे. Proud

ह्या प्रतिसादावर तुमचे उत्तर (तुमच्या वतीने) आधीच नोंदवून ठेवतो, उगाच त्रास नको Happy

"काढा की, हवे ते धागे काढा, माझे काहीही म्हणणे नाही"

Proud

२-३ दिवस म्हणतोय लिहू म्हणून वेळ मिळत नव्हता नीटसा.
>>
हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत ज्या कठीण आहेत. जर व्यक्तीला आठ नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वतःसाठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शन मधे होतं. ...................................................
'दमलेला बाबा' आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा 'कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही' असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली नाईन टू फाईव्ह ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.
<<

या अख्ख्या परिच्छेदाशी संपूर्णतः सहमत.

किंबहुना मूळ लेखाशीच.

स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं.

असं जर तुमचं म्हणणं असेल, तर कृपया, नोकरीचा राजिनामा द्या, अन दुसरी कमी स्ट्रेसफुल नोकरी शोधा.

लेखातून मला नोकरी करणार्‍यांची ही मनोवृत्ती दिसते:-

आहे त्याच हापिसात, आहे तितकाच पगार तर घेईन, सगळे पर्क्स, आहे त्या हुद्द्याचा मानमरातब घेईन, शक्य तिथे भ्रष्टाचार करून काळे पैसेही मिळवीन, तो शक्य नसेल तर किमान हापिसचा फोन, इंटरनेट, स्टेशनरी इ. पर्सनल कामांसाठी मुबलक प्रमाणात वापरीन, पण,

टायमापुरतंच काम करीन.

मला अमुक भत्ता मिळत नाहिये काय! मग खुन्नसवर तिसरंच काहीतरी करीन.

उदा. आपले सगळ्यांचे लाडके लिंबूभाऊ. यांना युनिफॉर्म अपकीपमेंट अलावन्स यांच्या पोस्टला अनुज्ञेय नसल्याने मिळत नाही. म्हणून हे साहेब मुद्दाम विनाइस्तरीचे कपडे व विनापॉलिशचे बूट घालून कामावर जातात.

माझा मुद्दा हा आहे, की भौ, इतकाच अलावन्स हवाय ना? मग नोकरी बदलून जिथे युनिफॉर्म अपकीपमेंट अलावन्स अनुज्ञेय आहे अशी नोकरी पहा! आपलं नाक कापून दुसर्‍याला अपशकून का??

स्वतःचा कोणताही व्यवसाय, ज्याला 'सेल्फ एंप्लॉयमेंट' म्हणतात, तो करताना प्र च ण्ड कष्ट करावे लागतात. गावातले सगळे दुकानदार/व्यावसायिक पहा. सकाळी उठून दुकानावर गेले की रात्री परत किती वाजता येतात ते. दूध, भाजीवाले किती वाजता उठतात, अन कामं सुरू करतात. या सगळ्यांना किती दिवस सुट्या असतात अन किती कामाचे तास फिक्स असतात?

यांच्याकडच्या नोकरांना मात्र फिक्स तास काम हवं असतं. पगारही फिक्स असल्याने एम्प्लॉयर ते मान्यही करतो. पण किमान जितकं अपेक्षित आहे तितकं काम करणं, बेजबाबदारपणे वागून चालत्या कामात खंड पडू न देणं. उदा. जिथे पुढचा ड्यूटीवाला रिलिव्हर येई पर्यंत थांबणे अपेक्षित आहे. मग ती असेंब्ली लाईन असो, की हॉस्पिटल. इ. गोष्टी अपेक्षित अन अध्यहृत असतातच.

ही जी फिक्स तासच करीन वगैरे लक्झरी ची कल्पना आहे, ती 'विकसित' देशांकडून आलेली आहे. पण मग तिथे रहायला गेले, की या लेव्हलच्या पगारावर असणारी माणसं गपगुमान स्वतःच्या घरची धुणीभांडी केरवारे करतात. दवाखान्याचा अकस्मात खर्च निघाला की घायकुतीला येतात. घराचं रंगकाम, दुरुस्ती, गाडीची दुरुस्ती इ. बाबी, अगदी प्लंबरला बोलावलं तरी बिल पाहून फेफरं येऊ शकतं. कारण या बाबींवरचे खर्चही त्याच प्रमाणात लागतात हे आपण लक्षात घेत नाही.

वर मी म्हटलो ना? डॉलरमधे पगार घेऊन रुपयांत खर्च केला, तर पगार भरपूरच वाटतो.

अन मग वाटायला लागतं, की मी जरा जास्तच काम करतो म्हणून मला भरपूर पगार मिळतो. मी जरा कामाचे तास लिमिटेड करतो, अन माझा स्ट्रेस कमी करतो!

अरे वा!!

आजूबाजूच्या टीपी करणार्‍या कामचोर सहकर्मींकडे पाहून काम किती करायला पाहिजे ते ठरवू नका, प्लीज.

जरा माझ्यासारख्या हातावर पोट असलेल्या लोकांना विचारा. प्रथितयश डॉक्टरचा जरी पाय फ्रॅक्चर झाला अन दीड महिना घरी झोपावं लागलं, तर फाके पडायची वेळ येऊ शकते घरादारावर. कमाई बंद पडते, अन खर्च सुरू रहातात!

आधीच एकतर वर्क कल्चर नाही आपल्याकडे. मी जितका पगार घेतो तितक्या रुपयांचं काम मी इमानदारीत करीन ही वृत्तीच नाहिये. तसं काम करणारा कुणी असेल तर त्याला लिमिटबाहेर राबवून घ्यायला कुणीही एम्प्लॉयर मूर्ख नसतो. इमानदार अन कामसू नोकर मिळण्यासाठी अन टिकवण्यासाठी काय करावे लागते ते मला चांगले ठाऊक आहे.

तेव्हा 'नाईन टू फाईव्ह' ही आदर्श संस्कृती हवी असेल ना? तर ती सगळ्या संपूर्ण बेल्स अँड व्हिसल्ससह मिळेल हे लक्षात ठेवा. २-५०० रुपये कन्सल्टिंगमधे डॉक्टर मिळणार नाही. स्वयंपाकी, धुणे भांडी, डेकेअरचे चार्जेस पाहून तोंडाला फेस येईल. अन अशाच अनेक घी देखा लेकिन बडगा नही देखा बाबी सहन कराव्या लागतील.

इब्लिस,

मस्त प्रतिसाद!

(फक्त एकच गोष्ट मनात आली, तुम्ही स्वतः व्यावसायिक असणारे व कर्मचारी म्हणून काम करणारे ह्यांच्यातील तुलना दाखवलेली आहेत, मूळ धाग्यात बहुधा 'फक्त कर्मचारी' असे अभिप्रेत असावे. आता जर तुम्हाला 'फक्त कर्मचारी' असलेल्यांना हे सांगायचे असेल की 'स्वतः व्यावसायिक' होण्याने ह्याहीपेक्षा अधिक कष्टप्रद आयुष्य जगावे लागते, तर ते बरोबर आहे की चूक हा भाग वेगळाच, पण ते तितकेसे सुसंगत नसावे असे मला तरी वाटते) Happy

चु भु द्या घ्या

ता.क.
'कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही' मधील 'कारण नसताना' हे मी वाचलेले आहे, व ते मला समजलेले आहे. पण एकंदरीत लेखातला सूर जो लागलेला आहे त्याच्याशी मला ते सुसंगत वाटत नाहिये.

माना की, काहीही गृहीत धरा, माझे काही म्हणणे नाही.<<< म्हणजे तुम्ही ह्या व्यासपीठावर येणार, तुम्हाला जे वाटले ते लिहिणार, त्यावर काही चर्चा होऊ लागली तर म्हणणार की हवे ते म्हणा? हे मस्त आहे. >> मग काय म्हणायला पाहिजे ते तुम्ही सांगा, ते म्हणतो.

'मायबोलीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात झालेले बदल' असा एक धागा काढावा असे वाटू लागले आहे. फिदीफिदी

ह्या प्रतिसादावर तुमचे उत्तर (तुमच्या वतीने) आधीच नोंदवून ठेवतो, उगाच त्रास नको स्मित

"काढा की, हवे ते धागे काढा, माझे काहीही म्हणणे नाही" >> एकतर माझ्याबद्दल काहीही व्यक्तिगत माहिती नसतांना तुम्ही 'माझे गृहीतक मर्यादित अनुभवातून आले आहे' असे आपले एक सोयीस्कर रित्या मानून घेतले. ज्याला मी 'ठीक आहे तुम्हाला हवे ते माना माझे काही म्हणणे नाही' असे म्हणत पुष्टी दिली तर तुम्ही काहीतरी तिरसट लिहून घेतले. त्यालाही मी म्हणेन 'तेही ठीकच आहे. लिहा माझे काही म्हणणे नाही, मी थोडीच तुमचा हात धरायला येणार आहे'

आता जर तुम्हाला 'फक्त कर्मचारी' असलेल्यांना हे सांगायचे असेल की 'स्वतः व्यावसायिक' होण्याने ह्याहीपेक्षा अधिक कष्टप्रद आयुष्य जगावे लागते, तर ते बरोबर आहे की चूक हा भाग वेगळाच, पण ते तितकेसे सुसंगत नसावे असे मला तरी वाटते
<<
धन्यवाद बेफि.

'तितकेसे सुसंगत नसावे' हे कशाशी ते नक्की समजले नाही, पण तरीही माझ्या इंटरप्रिटेशनवर पुढचे लिहितो आहे.

टु बिगिन विथ, येस. एक लेव्हल आल्यानंतर मी किंवा कोणताही मोठा व्यावसायिक स्वतःचे काम कमी करून एकप्रकारे स्ट्रेसमुक्त झालाय असे वाटते. तेच नोकरीतही सिनियर लेव्हलला पोहोचल्यावर होते. डेलिगेशन ऑफ फिजिकल वर्क मुळे हे होत असावे.

अर्थात स्ट्रेसचा प्रकार बदलतो. सरकारी नोकरी नसली तर प्रत्येकाचीच फ्याफ्या होत असते. अगदी बिलियन डॉलर एंपायरवालाही करोडोंच्या उलाढाली करताना केलेले डील फसले तर फाईवस्टार हॉटेलच्या १००व्या मजल्यावरून उडी मारून जीव देईलच की!

स्ट्रेस रिडक्शन हवे हे मान्य. पण त्यासाठी मी कामाचे 'तास' लिमिट करीन, हे अमान्य. स्पेसिफिकली इफ यू आर अ‍ॅन एम्प्लोयी. You have already sold your effort for a specific sum. Please give that much effort in return. अन्यथा, दुसरे काम शोधण्यास अथवा स्वतःचा नवा बिझिनेस सुरू करण्यास आपण मुखत्यार आहात.

*

'तितकेसे सुसंगत नसावे' हे म्हणजे इथे एम्प्लॉयर ची बाजू एम्प्लॉयीज ना समजवून सांगणे सुसंगत नाही असे म्हणायचे होते की काय??

असो.

>>>एकतर माझ्याबद्दल काहीही व्यक्तिगत माहिती नसतांना तुम्ही 'माझे गृहीतक मर्यादित अनुभवातून आले आहे' असे आपले एक सोयीस्कर रित्या मानून घेतले. ज्याला मी 'ठीक आहे तुम्हाला हवे ते माना माझे काही म्हणणे नाही' असे म्हणत पुष्टी दिली तर तुम्ही काहीतरी तिरसट लिहून घेतले. त्यालाही मी म्हणेन 'तेही ठीकच आहे. लिहा माझे काही म्हणणे नाही, मी थोडीच तुमचा हात धरायला येणार आहे'<<<

मनापासून माफी मागतो चमन, थोडे उत्साहात लिहिताना चूक झाली.

>>>स्पेसिफिकली इफ यू आर अ‍ॅन एम्प्लोयी. You have already sold your effort for a specific sum. Please give that much effort in return. अन्यथा, दुसरे काम शोधण्यास अथवा स्वतःचा नवा बिझिनेस सुरू करण्यास आपण मुखत्यार आहात.<<<

इब्लिस,

हे पटत नाही.

समजा मी साठ हजार पगारासाठी मला स्वतःला स्वानुभव, शैक्षणिक पात्रता व उपलब्धता ह्या दृष्टीने एका कंपनीच्या हवाली केलेले आहे. जर सगळेच नियम असले तर कंपनीचे टायमिंग हाही नियमच की?

ह्या नियमावर बोट ठेवून काही कर्मचारी वेळच्यावेळी निघू शकत नाहीत कारण इतर थांबणारे कर्मचारी कंपनीचे वातावरण कलुषित करतात. आता तुम्हाला ठाम भूमिका घ्यायची असेल तर अवश्य घ्या, माझा पहिल्यापासूनचा मुद्दा इतकाच आहे की लेख 'भाबडेपणाने' लिहिलेला आहे.

इतर कर्मचार्‍यांमुळे 'वगैरे' नव्हे तर मला थांबून मला स्वतःच्या ज्ञानाचा विकास करायचा आहे (व त्यासाठी तीच वेळ योग्य आहे हे मला माहीत आहे) असे असले तर जे थांबतात (किंवा मी वर दिलेल्या इतर कारणांसाठी थांबतात) त्यांचा विचार ह्या लेखात नाही. Happy

Pages