अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आगापिच्छा माहित नसतांना खिल्ली उडवत असेल तर जरा विचित्र वाटतं.>>> ही काहीतरी सीक्रेट चंमतग फ्रेज दिसतेय Happy हे वाक्य इतक्यात दोन तीन वेळा तरी वाचलं मी वेगवेगळ्या बाफ वर. रेफरन्स काय आहे? मला मुक्तपिठात लोक " संध्याकाळच्या वेळी एव्हरेस्ट च्या शिखरावर एकाकी उभे राहण्याच्या कल्पनेने थरकाप होतो" हे वाक्य संदर्भ नसताना कुठेही विनोद निर्मितीसाठी वापरायचे त्याची आठवण झाली! Happy Happy

आगापिच्छा माहित नसतांना खिल्ली उडवत असेल तर जरा विचित्र वाटतं.>>> ही काहीतरी सीक्रेट चंमतग फ्रेज दिसतेय हे वाक्य इतक्यात दोन तीन वेळा तरी वाचलं मी वेगवेगळ्या बाफ वर. रेफरन्स काय आहे? >>>
बदला म्हणतात तो हाच! अमानवी धागा आहे ना!!!! Lol

@ चिखलु >>> आपण त्या वास्तूची काही पूर्व माहिती काढिली आहे का? नसेल तर नक्की काढा .. तसेच आपण वास्तुशांती केलीये आहे का?

काही दिवसांपुर्वी मला रात्री २ वाजता एक लहान मुलगी दिसली. साधारण १-२ वर्षांची असेल.

>> हे तुम्हीच लिहिलेना भौ? म्हणून म्हटले कॅमेरे लावा.

भास होत आहेत त्याच्यासाठी कॅमेरा लावा म्हणायला मी काही ऋन्मेष नाही.

ही काहीतरी सीक्रेट चंमतग फ्रेज दिसतेय Happy हे वाक्य इतक्यात दोन तीन वेळा तरी वाचलं मी वेगवेगळ्या बाफ वर. रेफरन्स काय आहे?

>> कुठे वाचलं आणखी? मी तर हे इथेच पहिल्यांदा लिहिलंय? काय भुताटकी आहे का काय भास होतायत तुम्हाला पण Happy

चिखलु आधी चेक करा आजुबाजुला एखादे लहान् मुल आहे का? जे रात्री रडते.>>> नाहीये

काही दिवसांपुर्वी मला रात्री २ वाजता एक लहान मुलगी दिसली. साधारण १-२ वर्षांची असेल.
>> हे तुम्हीच लिहिलेना भौ? म्हणून म्हटले कॅमेरे लावा.
भास होत आहेत त्याच्यासाठी कॅमेरा लावा म्हणायला मी काही ऋन्मेष नाही.
>>>>> ओके, हा भास होता. म्हणजे मला असा भास झाला की एक लहान मुलगी बेडरूम च्या दारात उभी आहे आणि माझ्याकडे बघत आहे.

आपण त्या वास्तूची काही पूर्व माहिती काढिली आहे का? नसेल तर नक्की काढा .. तसेच आपण वास्तुशांती केलीये आहे का?>>
या घरात काहीही झालेले नाहीये. आम्हालाही याआधी असे काही अनुभव नाही.

इथे नेहमीच अनुभव मी वाचतो असे बरेच अनुभव मी माझ्या अगदी जवळच्या नातेवाईकांकडून ऐकलेत... त्यांनी स्वतः अनुभवलेले पाहिलेले.
तरीही ह्या भूत तत्वाची अनुभुती मला स्वतःला आजवरच्या आयुष्यात कधीही आलेली नाही...
अगदी रात्री अपरात्री स्मशाना जवळून शेतात जाताना किंवा आमच्या ४ मजली आणि ४००० चौरस फुटाच्या २०० वर्षे जुन्या वाड्यात २ दिवस रात्र एकटाच वयाच्या १५ व्या वर्षी असतानाही अश्या प्रकारच्या भितीची जाणीव झालेली नाही अथवा भास झालेले नाहीत..
त्यावेळीची एकटा वाड्यात असतानाची गम्मत.. वाड्याच्या पहिल्या मजल्यावर मोठ्ठा हॉल आहे सधारण ३०० चौरस फुटाचा मी झोपलेलो संपूर्ण वाड्यात मी एकटाच वाड्यात ४ आड पाण्याचे त्यातले दोन बुजविलेले दोन्ही बाजुच्या भिन्ती साधारण ४ फूट जाडीच्या त्यात अन्तर्गत जिने.. ह्यान्ची संख्या किमान १५ असेल वाड्यात. वरच्या हॉल मध्ये ३ जिने एक खालच्या माज घरात जाणारा तर दुसरा खाली ओट्यावर जाणारा तर तिसरा वरच्या मजल्यावर जाणारा.. मी हॉलच्या मधोमध झोपलेलो संपूर्ण वाड्यात मी एकटा.. चुलत भावाचे लग्न असल्याने पण माझी १० वीची प्रीलीम असल्याने सगळे लग्नाला मी एकटा घरी... गल्लीतले पण सगळे शेजारीपाजारी लग्नाला... अश्या सामसूम रात्री बारा एकच्या सुमारास जिन्याचे दार खडखड वाजले..... मी थोडा गोंधळलो... सगळी दारे मी व्यवस्थित लावलेली... मोठ्या दरवाज्याला खालच्या आगळ पण लावलेले... वाड्यात कुणी येण्याची सुतराम शक्यता नाही... अगदी चोरांना सुद्धा वाड्यात सहजा सहजी येणे शक्य नाही असा भक्कम वाडा.. मग दार कोण वाजवतयं?? मी उठलो लाईट लावला... दार उघडून बघतो तर जिन्यात कुणीच नाही... पुन्हा झोपलो तर १०-१५ मि पुन्हा आवाज पुन्हा लाईट लावून तपासले... तर कुणीच नाही...
असे ३-४ वेळा झाल्यावर... नन्तर अगदी हळूच उठुन दाराजवळ उभा राहिलो हातात बॅटरी आणि एक काठी घेतली... दार वाजायला सुरुवात होताच पटकन दार उघडुन बॅटरी लावली.....

तर जिन्यातून मांजर पळत गेले... गेला अर्धातास बिचारे ते ऐतिहासिक जिन्याच्या दाराच्या फटीतून आत यायचा प्रयत्न करीत होते.... आमच्या वाड्याचा चौथा मजला हा केवळ अनावश्यक गोष्टी आणि आंब्याची अढी लावण्या पुरता उपयोगी आणला जायचा तिथे ह्या मांजराचा सहकुटुंब मुक्काम होता.. आणि आपल्या पिलांपाशी परत जायला व्याकूळ होते ते..

आजतागायत मला सदगुरु कृपेने कधीही भुता खेताचा अनुभव जाणीव झालेली नाही... देवमाणसे मात्र बरीच भेटली... Happy

<<<आमच्या ४ मजली आणि ४००० चौरस फुटाच्या २०० वर्षे जुन्या वाड्यात २ दिवस रात्र एकटाच वयाच्या १५ व्या वर्षी असतानाही अश्या प्रकारच्या भितीची जाणीव झालेली नाही अथवा भास झालेले नाहीत..<<<
काय सांगता कृष्णाजी! एवढ्या मोठ्या वाड्यात एकटे राहणे या नुसत्या कल्पनेने थरकाप झाला. Happy

गो नि दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमण गाथेत', गड, किल्ले, अनवट वाटा धुंडाळतांना अश्याच एका अमानवीय प्रकाराचा उल्लेख आल्याचं वाचल्याचं स्मरतंय.
सापडलं तर टाकते इथे .

लहान मुलगी बेडरूम च्या दारात उभी आहे आणि माझ्याकडे बघत आहे. >>>>>>>>>>>>>>>बापरे तरीही भिती नाही वाटली.. सलाम... >>>>>>>>> बापरे हो ना ..मला असं काही दिसलं असतं तर मी ईथे प्रतिसाद द्यायलाच राहिले नसते Proud

लहान मुलगी बेडरूम च्या दारात उभी आहे आणि माझ्याकडे बघत आहे. >>>>>>>>>>>>>>>बापरे तरीही भिती नाही वाटली.. सलाम... >>> अरे , तुम्ही लोकानी जुन्या धाग्यावरचे स्वप्नसुन्दरी(ड्रीम्गर्ल) चे अनुभव नाही का वाचलेत ?

गो नि दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमण गाथेत', गड, किल्ले, अनवट वाटा धुंडाळतांना अश्याच एका अमानवीय प्रकाराचा उल्लेख आल्याचं वाचल्याचं स्मरतंय.>>असा भास त्यांना राजमाचीला झाला होता. पण इतर कुठल्याही किल्ल्यावर त्यांना कधीच अमानवी अस्तित्व जाणवले नाही.

>>गो नि दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमण गाथेत', गड, किल्ले, अनवट वाटा धुंडाळतांना अश्याच एका अमानवीय प्रकाराचा उल्लेख आल्याचं वाचल्याचं स्मरतंय. सापडलं तर टाकते इथे .

मला नीट आठवत असेल तर कुठलासा ओढा ओलांडताना त्यांना हे अस्त्तित्त्व जाणवलं होतं. पण त्यांच्या मते ती कुठलीतरी चांगली शक्ती होती. पुढे माणसांची चाहूल लागल्यावर ती शक्ति जाणवेनाशी झाली.

>>आमच्या घरात २ आठवड्यापासुन लहान मुलाचा किंचाळण्याचा आवाज येतोय. अचानक अवाज येतो. एक दोनदा मांजराचा आवाज सुद्धा आला.

कधीकधी मांजराचा आवाजसुध्दा तान्ह्या मुलाच्या रडण्यासारखा वाटतो हा स्वानुभव आहे. रात्री झोपेतून अचानक जागे झाल्यावर आपण लगेच पूर्ण सावध नसतो त्यामुळे असं वाटू शकतं. दोन वर्षं घरात काही अनुभव आला नाही पण आत्ता येऊ लागलाय म्हणताय म्हणून विचारते की घरात बाळाचा जन्म झालाय का? poltergeist जन्म किंवा मृत्यूच्या घटनेनंतर अ‍ॅक्टीव्ह होतात ही ऐकीव माहिती आहे.

>>समजा कुणाला असं काही सापडलं तर ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं असतं.

हे वाचून जरा घाबरले. नदीकाठचे वेगळे दिसणारे दगड-गोटे उचलायची सवय आहे. हे वेगळं प्रकरण आहे हे कसं ओळखायचं? उगाच धर्म करता कर्म अश्यातली गत नको व्हायला.

म्हणताय म्हणून विचारते की घरात बाळाचा जन्म झालाय का? poltergeist जन्म किंवा मृत्यूच्या घटनेनंतर अ‍ॅक्टीव्ह होतात ही ऐकीव माहिती आहे.
>>> हो पण ५ महिन्यापुर्वी, तेव्हा काहीच अनुभव नाही आले.

कधीकधी मांजराचा आवाजसुध्दा तान्ह्या मुलाच्या रडण्यासारखा वाटतो हा स्वानुभव आहे. रात्री झोपेतून अचानक जागे झाल्यावर आपण लगेच पूर्ण सावध नसतो त्यामुळे असं वाटू शकतं.
>>> दिवसाही आवाज आले आहेत

लहान मुलगी बेडरूम च्या दारात उभी आहे आणि माझ्याकडे बघत आहे. >>>>>>>>>>>>>>>बापरे तरीही भिती नाही वाटली.. सलाम... >>>>>>>>> बापरे हो ना ..मला असं काही दिसलं असतं तर मी ईथे प्रतिसाद द्यायलाच राहिले नसते Proud>>> Happy

@चिखलु - कोणीतरी आपलीकडे बघताय असा अनुभव मला पण आला होता मित्राच्या घरात. मी त्याबद्दल लिहले होते आधी या धाग्यावर. असो ...
आधी अनुभव नसतील आले कारण कदाचित तेव्हा काही गोष्टी सुप्त अवस्थेत असतील ... त्या काही कारणामुळे जागृत झाल्या असण्याची शक्यता आहे .. गेल्या काही महिन्यात त्या जागेत जन्म किंवा मृत्यू झाले आहेत का? किंवा काही विधी झाले आहेत का?

poltergeist जन्म किंवा मृत्यूच्या घटनेनंतर अ‍ॅक्टीव्ह होतात ही ऐकीव माहिती आहे.>>> ह्यावरचा पिक्चर पाहायाचा राहिला आहे . कोणी पाहिला असेल तर थोडक्यात लिहा ना.

चिखलु यांनी वर जे भासांबद्दल लिहीलेय ते वाचुन एक जुनी आठवण वर आली.

२०११-१२ ची घटना आहे, मी घरी एकटीच होते.

घरचे सगळे गावी गेले होते नात्यातल्या एका लग्नासाठी, मला सुट्टी नसल्यामुळे मी गेली नाही पण माझ्यासाठी पप्पा लगेच दोन दिवसात परत येणार होते .

एकटी असल्याने काहीतरी वाचत बसली होती अन वाचता वाचता कधी डोळा लागला ते कळले नाही.

२-२.३० वाजता जाग आली म्हणुन पाणी प्यायला ऊठली असता, अचानक कुणीतरी बाल्कनीमधुन आत डोकावतेय असे वाटले.

खरेतर ईतक्यावर काही येणे शक्यच नाही हे मला माहित होते तरीही शंका नको म्हणुन मी सगळ्या खिडक्या बंद आहेत कि नाही याची खात्री केली तर तसे काही वाटले नाही, घरी एकटीच असल्यामुळे भास झाला असेल म्हणुन दुर्लक्ष केले अन झोपायला गेले.

मध्ये कितीवेळ गेला माहीत नाही पण एक खुप वाईट स्वप्न पडले कुणीतरी माझा गळा दाबतेय अन मला मारायचा प्रयत्न करतेय असे वाटल, जोरात किंचाळावेसे वाटले पण आवाज निघत नव्हता, घामे घुम झाली पण कोणतीही हालचाल करता येत नव्हती.
असे वाटले की सगळे संपले, माझी शुद्ध जातीये. माझे घरचे समोर दिसु लागले अन खरतर मी नास्तीक असुनही मला दत्तगुरु दिसले अन क्षणात सगळे नाहीसे झाले. मोकळे वाटायला लागले.

नंतर थोडावेळ तशीच पडुन राहिली , मग ऊठुन किचनमध्ये जाऊन परत पाणी प्यायली. अन किचन मधला चाकु ऊशासी ठेवुन परत झोपले. तेव्हा अगदी शांत झोप आली. दुसर्या दिवशी ही कसलाच त्रास झाला नाही की कोणतेही स्वप्न पडले.
पण तेव्हापासुन घरी एकटी असताना चाकु ऊशी खाली ठेवुन झोपायची सवय लागली.

घरच्यांना जेव्हा हे सांगीतले तेव्हा मम्मी लगेच मला गाणगापुरला घेऊन गेली दत्ताच्या दर्शनासाठी.

आता हा प्रकार नक्की काय मला माहित नाही पण मी अनुभवलाय हे मात्र खरे.

>> कुणीतरी माझा गळा दाबतेय अन मला मारायचा प्रयत्न करतेय असे वाटल, जोरात किंचाळावेसे वाटले पण आवाज निघत नव्हता, घामे घुम झाली पण कोणतीही हालचाल करता येत नव्हती.

बाकीचे माहित नाही पण हा Sleep Paralysisचा प्रकार वाटतो.

स्लीप पॅरालिसिस चा प्रकार १६ ते २२ या वयोगटात जास्त होतो का? मला साधारण या वयात बरेचदा अनुभव आलाय, व अनेक मित्रांचाही तसाच अनुभव ऐकलाय. पण त्याआधीच्या व नंतरच्या वयातल्या कोणाला असे अनुभव येत नाहीत.

इथल्या मेंबरांचा काय अनुभव?

बाकीचे माहित नाही पण हा Sleep Paralysisचा प्रकार वाटतो. >>> माहित नाही पण कदाचित नसावा कारण त्या आधिही असे काही झाले नव्हते अन त्यानंतरही अजुन तसा काही अनुभव नाही.

>> स्लीप पॅरालिसिस चा प्रकार १६ ते २२ या वयोगटात जास्त होतो का?

असे काही नाही. २२ शी पार करून मला अनेक वर्षे झाली. पण मला अजूनही अधूनमधून अनुभव येतो आणि त्याचे माझ्यापुरते कारण मी नक्की शोधून काढले आहे. झोपेत अर्धे अंग गरम आणि अर्धे गार अशी अवस्था झाली असेल तर मला हमखास हे होते. विशेषकरून थंडीच्या दिवसात जाडजूड गादी आणि डोक्याखाली उबदार उशी असेल आणि अंगावर मात्र कोणतेही पांघरून नसेल अशा वेळी. सिनेमासारखे स्वप्न पडते. अगदी खरंखुरं वाटेल असे. पण खूपच भयंकर अनुभव असतो.

ओरडावं वाटतं पण आवाज निघत नाही. कितीही ताकद लावून ओरडायचा प्रयत्न केला तरी शब्द बाहेर पडत नाही. कसलीतरी अनामिक भिती वाटते. शरीराची हालचाल आजिबात करता येत नाही पण शरीर वर छताकडे चाल्लंय असं जाणवतं आणि थोड्यावेळाने सगळं शांत होतं. जाग येते. दहा मिनिटे तरी होत असावं असं. बरेच वर्षांपूर्वी दोन-तिनदा अनुभवलाय स्लिप पैरालिसिस. मीही हा अनुभव थंडीच्या काळात घेतलाय. पण एकंदर मस्त असतो थरारक! Lol

Pages