अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>खिडकीबाहेर बाई गाडीच्या वेगात बाजूने चालत होती

अहो वडखळ नाक्याला इतकं ट्राफिक असतं की गाडी सेकंड गियरला पण टाकता येत नाही. बाई गाडीच्या वेगात चालली तर नवल नाही Proud Rofl

व्यत्यय >>> कदाचित मग ती गाडीच्या पुढेहि गेली असेल ... बघा तुम्ही परत तुम्हाला दिसतेय का ते आणि सांगा आम्हाला Happy

हा किस्सा माझ्या वडिलांनी सांगितला होता साधारण ते 5-6 वीत होते तेव्हाची हि गोष्ट माझे वडील त्यांच्या आजीकडे शिकायला होते.
एके दिवशी सगळे संध्याकाच्या वेळी शेतातून परत येत होते (शेतामध्ये एका बाजूने छोटे छोटे रस्ते असतात आपल्या सर्वांना माहितीच असेल.)
माझे वडील लहान असल्याने ते सर्वात पुढे चालत होते आणि चालता अचानक वडिलांना आजीने मागून जोरात आवाज दिला आणि पटकन मागे येण्यास सांगितले सोबत असलेल्या सगळ्या बाया त्यांना विचारू लागल्या "काय झाले" पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही आणि त्या दिवशी त्या सगळ्यांना रस्ता बदलवून घेऊन गेल्या, घरी आल्यावर त्यांनी सगळ्यांना हकीकत सांगितली त्यानंतर त्यांना जवळ जवळ 10 दिवस ताप होता
त्यांच्या सांगण्यानुसार माझे वडील ज्या रस्त्याने जात होते तेथून थोडेच पुढील अंतरावर एक स्त्री आजीकडे सूर्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभी होती तिच्या एका हातात पदर होता जो तिने डोक्यावर घेतला होता आणि त्या पदराने तिने तिचा अर्धा चेहरा झाकला होता आणि दोन्ही हात नामस्काराच्या अवस्थेत होते म्हणजे ती स्त्री विचित्र नजरेने आजीकडे अर्धा चेहरा झाकून हात जोडून उभी होती.

कसली चावाचावी,सगळे फेकाडे आहेत .आता मलाच माझा खराखुरा अनुभव सांगितला पाहीजे.उद्या टंकतो.

अरे व्वा!! सिंजी अनुभव लिहीणार! तेही अमानवीय...नक्की लिहा सिंजी. प्रतिक्षेत.. Happy
...पण फक्त शेवटी ते 'निर्मूलन' वैगरे करायच्या भानगडीत पडू नका.. Lol नाहितर मग आम्ही भूतं घाबरून पळून जाऊ हो.. Wink

कसली चावाचावी,सगळे फेकाडे आहेत .आता मलाच माझा खराखुरा अनुभव सांगितला पाहीजे.उद्या टंकतो>>> सिन्थेटिक जिनियस बरयाच वेळा चवाचवी आणि फेकाड वाटणारे अनुभवच खरे असतात रील लाईफ पेक्षा रिअल लाईफ जास्त भयानक असते

कोन होति ति?>>>
प्रिया येवले अर्थातच ती स्त्री म्हणजे अमानवीय प्रकार होता आणि गावातील लोकांना अश्या गोष्टी समजायला वेळ लागत नाही

हास्य विनोद करायची आणि पारसिक बोगदा ते मुंब्रा खाडीच्या दरम्यान ट्रेन आली कि अचानकच जोरजोरात किंचाळून ट्रेनबाहेर उडी मारायची. >> बाप रे

एकदा मी गांणगापुरला गेलो होतो, तेथे एक दृश्य पाहिले, एका वयोवृध्द बाईला ४ ते ५ जण जबरधस्तीने मंदिरात घेऊन जात होते, पण ती त्या चैाघांन वर भारी पडत होती….कसेबसे तिला मंदिरात आणले, पण जेव्हा आरती चालु झाली तेव्हा ती बाई स्वत:हून खांबावर सरसर चढली आणि “दत्ता मला सोड, दत्ता मला सोड” ओरडू लागली,…..नंतर घरी येताना त्या बाईला पहिले तेव्हा ती बरी झाली होती ... नक्की काय होतं कळले नाही, मनोरुग्ण म्हणावा तर मग बारी कशी काय झाली ... तिथे अश्या अनेक केसेस पाहिल्यात

हे मि माबो कुठेतरी वाचलेले आहे ....

कोकणात चालगती म्हणून प्रकार आहे. तो तंत्रमंत्राशी संबंधित आणि त्याचे रुल्स regulations खूप कडक असतात. जो चालगती घेऊन येतो त्याला ते माहित असतात पण त्याने किंवा त्याच्यानंतर घरातल्यानी जर ते नीट पाळले नाहीत तर पूर्ण घर उध्वस्त व्हायचा धोका असतो. इथे माबोवरच्या शिक्षित लोकांचा विश्वास बसणार नाही पण आमच्या गावी पूर्ण घराणे वर्षभरात लयाला गेल्याची आणि भावकीतले उरलेले उध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. मी विश्वास ठेवत नाही आणि अविश्वासही दर्शवत नाही. काही घटनांचे तात्काळ स्पष्टीकरण मिळत नाही तेव्हा गावचे लोक देवाचे वगैरे शोधायला लागतात आणि त्यातून अशा कथा निर्माण होतात.

चालगती किंवा बायंगी हे नक्की काय कसं आहे कल्पना नाही पण यांच्यासारखेच एक अघोरी साधन म्हणजे मांढरदेवीच्या काळूआईचे 'चेडेगोटे.' जवळपास सगळ्यात डेंजर! चेटूक, भानामती, करणी करण्याचं एक बहुमोल(?) साधन. हे मांढरदेवीच्या गडावर बनवून मिळतात. गोल गरगरीत लहानलहान दगड असतात त्यावर विशिष्ट विधी करून बनवून दिले जातात. अर्थात् मोबदला घेऊन. मोबदल्याची रक्कम ज्याला हे घ्यायची इच्छा असते त्याच्या आर्थिक क्षमतेवर ठरवली जाते. जे बनवून देतात त्यांना घेणार्याची आर्थिक स्थिती त्यांच्यासमोर गेल्याबरोबर लगेच समजते. एकदा ती 'वस्तू' तुम्हाला देऊन उपासनेचा विधी समजावला की देणार्याची जबाबदारी संपते. तुम्ही त्या वस्तूचा वापर करायला मोकळे!
घरी आणल्यावर विधीपूर्वक त्यांची स्थापना करून दर अमावस्या-पौर्णिमेला त्यांचे भोग चढवावे लागतात. नाहीतर तुम्ही, तुमचं सगळं कुटूंब उध्वस्त करतात. दिवसा दगडगोटे दिसतात पण रात्री कोंबडीच्या पिल्लांसारखा आकार घेऊन सजिव होतात. (हो सजिव!!!) यांचा चिवचिवाट ऐकायला येतो. उपासना करणार्याशी बोलतात. सांगितलेलं कुठलंही काम करतात. (कु ठ लं ही ) दुसर्यांचं वाईट करण्यात माहिर असतात. दररोज यांना काम पुरवावंच लागतं. नाही पुरवलं तर मग उपासना करणार्याला हैराण करून सोडतात. जर पलटले तर होत्याचं नव्हतं करून टाकतात. संपुर्ण घरादाराचं आणि कुटुंबाचं वाटोळं! उपासना करणार्याला अक्षरश: कुरतडून खातात. सडवतात. कोणीच वाचवू शकत नाही मग. ना कुठले वैद्यकीय उपचार, ना कुठला देव, ना कुठला चमत्कार..
२, ३, ५, ७ अशा संख्येने असतात. टाकून दिलेले कुठे सापडले तर यांना हाताळणं जिवावर बेतू शकतं. समजा कुणाला असं काही सापडलं तर ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं असतं.

सांगितलेलं कुठलंही काम करतात. (कु ठ लं ही ) दुसर्यांचं वाईट करण्यात माहिर असतात

हे दगड गोटे पाकिस्तानवर आप्लाय करू या .
१. हाफिझ सईद वर करणी करू
२. दावूदला भिकारी करू
३. मल्य्ल्याचे वाईट करू

आपल्या सैनिकांचे मृत्यू तरी कमी होतील.

समजा कुणाला असं काही सापडलं तर ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं असतं.
हे ज्याच्यावर उलटतात त्यानेच पाण्यात सोडले तर नाही चालत का?

@शाहि@शाहिर >>> मी आधीच सांगितले कि मी हे माबो वरच वाचले आहे त्यामुळे किस काढू नये

@भुत्याभाऊ चालगती हा प्रकार आमच्या माण तालुक्यात पित्रे या नावाने ओळखले जाते. या मध्ये तुम्ही म्हणता तसे कोंबडीची पिल्ले नसून आमच्या कडे बाहुलीच्या आकाराचे मानवी प्राणी असतात. आमच्याकडे ही अशीच उदाहरणे आहेत. एका वर्षात त्यांनी केलेली प्रगती आणि आताची वाईट परिस्थिती म्हणजे त्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही. ही परिस्थिती त्या चालगती मुळे झाली आहे. असे गावातील लोक म्हणतात

Submitted by शाहिर on 1 November, 2017 - 12:16>>>
हो तर! अगदी तुम्हाला हवा तसा उपयोग करून घेता येईल. Lol
हे असं आणणं, सांभाळणं सोप्पं नसतं. स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जिवाशी खेळ असतो. क्षणात प्राण काढून घेऊ शकतात ह्या गोष्टी. पण एखाद्यानं विषच प्यायचं ठरवलं तर मरायची तयारी पण ठेवायची असते. आणि त्यातही ही साधनं आहेत त्यांचा हवा तसा उपयोग करून घ्यायला काही खास अभ्यास करावा लागतो, तो दिवसेंदिवस वाढवत न्यावा लागतो...आणि हो ह्यांच्या अभ्यासाची सुरूवात विष्ठा, मलमूत्र खाऊन करावी लागते. तरच ती विद्या अवगत होते. Lol जे ह्या अघोरी गोष्टी बाळगतात त्यांनी हे खाणंपिणं सगळं केलेलं असतंच असतं.

>>हे ज्याच्यावर उलटतात त्यानेच पाण्यात सोडले तर नाही चालत का? >>>
निर्झरा, दगडं हे त्या शक्तीचं फक्त साधन/शरीर असतं त्यामुळे उलटल्यानंतर पाण्यात सोडूनही ती शक्ती पिच्छा सोडत नाहीच. कोणाला सापडले तर का सोडावेत याचं स्पष्टीकरण देतो, समजा आपल्या मालकीच्या, वापरत्या जागेत ते सापडले तर त्यांनी आपल्याला आपल्या जागेत असल्यामुळे त्रास देऊ नये म्हणून. आपली न् त्यांची दुष्मनी नसते. त्यामुळे जा रे बाबा तू तुझ्या मार्गानं असं बोलून अपमान न करता त्यांना वाहत्या (वाहत्याच, साठलेल्या नव्हे) पाण्यात सोडणं योग्य राहतं. बरेचदा ते 'मृत' (युजलेस) झालेले असल्याने टाकून दिलेले असतात. शत्रूच्या जागेत टाकल्याने काही दिवसांनंतर ते पुन्हा जिवंत (युजफुल) होतात न् आपल्या मालकाकडे परततात म्हणून हे मृत गोटे सापडल्याक्षणी पाण्यात सोडणं ठिक राहतं.
(हा खुप गुंतागुंतीचा न् समजायला, समजवायला अवघड विषय आहे. सगळंच स्पष्टीकरण देणं शक्य होत नाही. मर्यादा पडतात.)

सुश्या,
चालगती, चेडेगोटे, पित्रे हे एकाच जातकुळीतील साधनं आहेत-असावेत असं वाटतं.

आमच्याकडील जुनी माणसं या बद्दल बोलण्यास नकार देतात.पण चालगती ,पित्रे हे सगळे प्रकार लोखंडा पासून दूर राहतात अशी माहिती मिळाली. म्हणून पूर्वीचे लोक घराचा जो उबंरा असतो त्यावर लोक घोड्याची नाळ ठोकत. म्हणजे कोणी हे प्रकार केले तर आपले घर यांपासून संरक्षित राहावे हा हेतू असे.

घोड्याच्या नालेवर काही विधी करून ती ठोकली जाते तर फायदा होतो.
तंत्रमार्गात वापरल्या जाणार्या शेकडो वस्तूंपैकी ती एक वस्तू आहे.

"सडावा"
हा एक करणीबाधेचा प्रकार आहे. काही तंत्र आणि मंत्रविधी करून इच्छित व्यक्तीच्या पाठीमागे लावला जातो. याचं नाव हिच याची ओळख आहे. माणसाचं शरीर सडवतो तो 'सडावा.'
योग्य वैद्यकीय निदान होऊन योग्य उपचार सुरू झाले तरीही माणूस बरा न होता अल्पावधीत सगळं शरीर सडत जातं, जखमांतून पाणी गळतं, किडे होतात आणि शेवटी दर्दनाक मृत्यू ओढावतो. एकदम किळसवाणा प्रकार असतो.

"मुठ मारणे"
हे एक ठेवणीतलं अस्र (?) आहे. ज्याच्यावर प्रयोग करायचा त्याच्या वापरातील वस्तू वापरून किंवा चालवणारा पक्का असेल तर नुसतं नाव आणि गाव यांचा वापर करून मारली जाते. मुठ मारण्याचा मंत्र असतो. काही विधी करून मंत्राचा वापर होतो. शेकडो किलोमीटरवर असलेल्या व्यक्तीला जेव्हा मुठ मारली जाते तेव्हा बाधित व्यक्तीला रक्ताच्या उलट्या होऊन दोन मिनिटांच्या आत मृत्यू होतो. मुठ पलटवता येते. ज्याच्यावर प्रयोग केला त्याला 'बंधनं' असतील तर तो वाचू शकतो. मांत्रिक लोकं एकमेकांचा बदला घ्यायला कधीकधी वापर करतात. पण जर समोरचा तगडा असेल तर त्याने पलटवलेला वार ज्याने मारली त्यालाच संपवतो.

Pages