अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९७० ला नगर मध्ये टीव्ही?>>>

१९७३-७४ च्या आसपास सिद्धीबागेत नगरपालिकेने टीव्ही बसविलेला होता! तो केंव्हातरी बघितल्याचे आठवतेय! तो एक आणि आम्ही रहात असलेल्या गल्लीत एकजणाकडे टीव्ही होता त्या सुमारास!

भुत्याभाऊ सगळा धागा वाचला . तुमचे प्रतिसाद सगळ्यात जास्त आहेत. आणि ते अनुभव कथन करणारे अथवा जवळच्या लोकांचे अनुभव पुनर्कथन करनारे आहेत. तुम्हाला हे अनुभव सातत्याने का यावेत? रागावू नका, तुम्ही खरेच ट्रीटमेन्ट घ्या. ही लक्षणे गंभीर आहेत. एवढेच सुचवावेसे वातते.

महाराष्ट्रात TV प्रसारण १९७२ ला मुंबईत सुरु झाले
>>
इथे लोकाना भुते दिसतात तसा (नसलेला) टीव्ही पण दिसला असेल. काय सांगावे?

Rumache navach chavaTanand asalyane tumhala seriously ghyayacha prashnach mitala!
Happy

स्वामी चावटानन्द - मित्रा काही ऐकलेले आणि आणि काही वाचलेले किस्से मी इथे टाकतो, एक विरंगुळा म्हणून ...

तुला प्रॉब्लेम असेल तर नको वाचू किंवा मग आपल्या नावातील धंदा चालू ठेव ...

माझा काका महाडला MIDC मध्ये काम करतो. हि गोष्ट साधारण १२-१५ वर्षांपूर्वीची असेल. त्यावेळी त्याची दुपारपाळी होती. रात्री ११-११.३० वाजता तो घरी यायला निघाला. रात्रीची वेळ आणि त्यात तुफान पाऊस कोसळत होता. गावाच्या अलीकडे साधारण १.५-२ किलोमीटरवर एक पूल आहे. तो पूल अघटित घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे. अनेक वेळेला काही कारण नसताना या पुलावर अपघात होतात. तर साधारण ११.३०-१२.०० च्या आसपास तो या पुलावर आला. पुलावर आल्यावर त्याला तीन माणसं रस्त्याच्या बाजूने पाठमोरी चालताना दिसली. तिघांनीही पूर्ण पांढरे शर्ट पांढरे प्यांट घातलेले. रेनकोट छत्री काहीही त्यांच्यासोबत न्हवत. आणि विशेष म्हणजे ते तिघे सोबत न चालता एकामागोमाग भराभर ओळीने चालत होते. काका घरी येण्याच्या घाईत असल्याने त्याने या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं, पण थोडं पुढे गावाच्या नाक्यावर आल्यावर(साधारण २००-३०० मीटर) त्याच्या मनात या तिघांबद्दल विचार आला. आणि त्याने गाडी थांबवली व या तिघांची वाट पाहू लागला. १५-२० मिनीट त्याने वाट पाहिली पण ते तिघे त्याला त्या रस्त्याने येताना दिसले नाहीत. विशेष म्हणजे तो पूल आणि नाका यांच्यामध्ये एकही घर नसून दोन्ही बाजूला शेती आहे.एरव्ही कोणी शेतकामासाठी रात्री बाहेर पडत नसे, त्या मुसळधार पावसात कोणी बाहेर पडण्याची शक्यता शून्य होती. जरी पडले असते तरी एकसारखे पूर्ण पांढरे कपडे घालून एकामागोमाग भिजत का चालतील?कोण असतील ते तिघे?

कल्याणात नुकताच ऐकलेला किस्सा.
एका शाळेत खुप प्रॉब्लेम्स होते. महानगरपालिकेने शाळा सिल करण्यापर्यंत सगळ झाल. MSEB ने इलेक्ट्रीसिटी कापली. अश्या नाना कटकटी होत्या.
शेवट ट्रस्टीज नी पुजा करायच ठरवलं. अगदी प्रत्येक मजल्यावर केली. बरीच negative energy निघत होती. किंचाळ्यांचे रडण्याचे आवाज आले.
अचानक एक युपीकडची बाई अस्खलीत मराठीत ओरडू लागली "माझ्या मुलाला १लीत प्रवेश हवाय. पुजा करणार्यांनीच तिला शांत केल.

गुगु Happy

सन १९४९ च्या सुमारास अमेरिकेतच गाजलेल्या एका केसची चर्चमधली कागदपत्रं वाचून विल्यम पीटर ब्लॅटी यांनी ‘द एग्झॉर्सिस्ट’ याच नावाची कादंबरी लिहिली. त्यावर आधारित द एग्झॉर्सिस्ट हा चित्रपट दिग्दर्शक विल्यम फ्राइडकिन यांनी केला.
म्हणजे हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता असे म्हणावे का ?

म्हणजे हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता असे म्हणावे का ? - by भुत्याभाउ >>> हो हा सत्य घटनेवर आधारित असा चित्रपट असल्याचा दावा हॉलिवूड करते. ओमान, कॉन्जुरीन्ग, अनाबेला हे चित्रपट सुद्धा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा केला जातो. इतकंच काय तर बॉलीवूडचा रागिणी MMS चा पार्ट १ सुद्धा सत्य घटनेवर आहे असं ऐकलं आहे !!!

@kau

होय रणविजयचा आहे तो मूवी.

Pages