अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"भुत दाखवा व एकलाख रुपये मिळवा अशी माझी योजना इथे जाहीर करतो.कुणाला हवेत एक लाख रुपये."
सिन्जी,
भूत हे दिसत नाहि पण अनुभव मात्र येतो, स्पर्श जाणवतो, असो या अनुभुती च्या गोश्टी आहेत , या लाखो रुपये खर्च करुन सुद्धा दाखवता येत नाही , निदान मला तरि असो
अनिरुद्ध

रच्याकने

ईथे ड्यू आयडी ने सामान्य लोकांना त्रास देणारी भूते (मूळ आयडी एडमिन प्यारे झाल्यावर भटकणारे त्याचे विविध रूपी आत्मे Wink ) बघायला एक लाख न देता सुद्धा सहज दिसतात

आज फबु वर वाचलेलि कथा :

राहुल :- "ए थांबा रे... सॉलिड्ड भूक लागलीये यार .. खाऊन घ्यायचं का ? पुढे अजून किती वेळ लागेल सांगता येत नाही .. नकाशाप्रमाणे तर अजून अर्ध्यापेक्षा जास्त बाकीये . ".
केतन :-"हो मलापण भूक लागलीये .. ए सम्या चल इथेच बसुयात .. मस्त जागा आहे . काय भारी वाटतंय राव .. खरंच आपलं इकडे एक फार्म हाऊस हवं रे ".
समीर :- "हम्म फार्म हाऊस हवं म्हणे .. तुला काय अवघडे रे.. सांग कि तुझ्या बापाला .. .. राजकारणी माणसं तुम्ही . जे हवं ते लगेच पुढयात हजर . जागा असो.. मुलगी असो... हा हा ह्या हा .. " मोठमोठ्याने हसत समीर केतन ला उचकवत होता .
केतन :- "कसलं काय.. मिळतंय ... ती नाही म्हणाली आपल्याला ... तोंडावर ... ".
राहूल :-"काय सांगतो ? मधुरा नाही म्हणाली? काय कारण पण ?"
समीर :-"पाणी घे रे .... कसं काय केत्या ... अरे तुला नाही म्हणाली? तुला नाही म्हणाली ती ? "
केतन :-"काही नाही रे ... मस्ती चढलीये दुसरं काय ... दिसण्याची मस्ती "
राहुल :-"मग आता काय करणारेस ?"
केतन:-"आता काही नाही .फायनल एक डोस देऊन आलोय प्रेमाचा .बघू बदलते का ?"
समीर :- "बरं चला मंडळी .. निघुयात .. अजून परत जायचंय.. रात्र होणार इथेच असं वाटतंय .. अजून तर काही पुतळा मावशीने दर्शन दिलं नाहीये .. बघू पुढे भेटते का? ह्या ह्या हा .... " .
समीर , केतन आणि राहुल तिघेही आज जंगलात भ्रमंती करायला जाणार होते . हे जंगल फार कुणाला माहिती नव्हते किंवा माहिती असेल तरी तिथे फिरायला जाणारी माणसे कमीच होती . जंगलाला वेगळे नाव नसले तरी तेथील स्थानिक लोक जंगलाला पुतळ्याचे जंगल म्हणत असत . तेथे पुतळा नावाची बाई मेली आणि आता तिचा आत्मा जंगलात फिरून सगळ्यांना त्रास देतो अशी तिथल्या लोकांची धारणा होती . त्यामुळे जंगलाकडे कुणीच फिरकत नसे . मुख्य वस्ती जंगलापासून साधारण ५ -६ किमी वर होती . तिथे साध्या वस्ती पेक्षा बंगले जास्त होते . शहरातील प्रदूषित वातावरण सोडून निसर्गाच्या सानिध्यात राहता यावं म्हणून श्रीमंत लोकांनी तिथे बंगले , रो हाऊसेस बांधायला सुरवात केली होती .तर अशा ह्या रहस्यमयी जंगलात मुद्दाम समीर ,केतन आणि राहुल फिरायला येणार होते . तरुण पणीची मस्ती म्हणा किंवा सध्याच्या विज्ञानाच्या युगात आत्मा वगैरेंवर असलेला अविश्वास म्हणा हे तिघे पुतळा बाईंच्या आत्म्याची परीक्षा घ्यायला कि द्यायला (?)निघाले होते .
समीर चे वडील व्यावसायिक होते . त्यामुळे घरात जन्मापासून पाहत असलेली श्रीमंती आणि घरचे लाड ह्यामुळे समीर जवळपास वाया गेला होता . पैशाचा माज त्याच्यात ठासून भरला होता . श्रीमंतांचे मित्रही श्रीमंतच असतात बऱ्याचदा . केतन ची परिस्थिती पण फार वेगळी नव्हती. वडील राजकारणात असल्यामुळे "मैं सब संभाल लुंगा " अशी खात्री होती . त्यामुळे काहीही करायला हे मोकळे. राहुल ह्या दोघांइतका श्रीमंत घरात मोडणारा नसला तरी आई वडील दोघेही बँक मध्ये कामाला असल्याने सधन प्रकारात मोडत होता.

गावच्या मुख्य वस्ती पुढे जिथे बंगले सुरु होतात तिथे "प्रतिमा " बंगल्यावर गाडी लावून हे तिघे जंगलात आले होते .खरं तर तिथे वॉचमन असणे अपेक्षित होते पण तो जेवायला बाहेर गेला असेल .. किल्ली आल्यावर घेऊया असा विचार करून हे तसेच निघाले होते. हा बंगला समीर च्या वडिलांचे मित्र डॉ . गोखले ह्यांचा होता . डॉ आणि त्यांची बायको सध्या डॉ च्या कामानिमित दिल्ली ला राहत होते . अगदी जवळचे मित्र नसले तरी डॉ आणि समीर चे बाबा संपर्कात मात्र होते . त्यांना सांगून समीर च्या बाबांनी एक दिवस ह्या तिघांना तिथे राहण्यसासाठी डॉ ची परवानगी घेतली होती .
जंगलात सुखद गार वारा जाणवत होता . आजूबाजूला दाट हिरवीगार उंच झाडे .. पक्षांचे आवाज .. वातावरण खूपच मस्त होते. समीर केतन आणि राहुल हांचा मस्त गप्पा मारत, एकमेकांची चेष्टा मस्करी करत ट्रेक सुरु होता . राहुल ला फोटोग्राफी ची खूपच आवड होती . त्यामुळे वेगळ्या प्राण्यांचे किंवा पक्षांचे फोटो ,निसर्गचित्रण, विडिओ शूटिंग करत ते पुढे पुढे चालले होते . आपल्या DSLR मध्ये तो सगळ्या आठवणी साठवत होता . राहुल चा हा कॅमेरा म्हणजे त्याचा जीव कि प्राण होता . अगदी कुठेही जाताना कॅमेरा त्याच्या सोबत असे . जंगलातली झाडे खूपच उंच वाढली असल्याने आणि त्यांचे टोके एकमेकांत गुंतल्याने सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत तसा कमीच पोहोचत होता . त्यामुळे उन्हाची झळ अजिबातच लागत नव्हती .
असे करत मजल दरमजल करत ..हे तिघे मस्त जंगल फिरत होते . खरं तर ते आता खूप आतुरतेने काहीतरी होईल अशी वाट बघत होते . पण घोंगावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाशिवाय काहीच नाही .. आता तिघे शेवटच्या ठिकाणी आले. तेथून उजव्या हाताच्या वळणाला लागले कि तो रस्ता शेवटी वस्तीच्या दुसऱ्या टोकाच्या जवळ निघत होता .. हे तिथेसुद्धा पोहोचले. आता जंगलातून बाहेर पडणार तरी काहीच अनुभवास न आल्याने तिघे थोडे उदास झालेले खरे पण त्याच बरोबर गावचे लोक किती मूर्ख आहेत आणि ते कशालाही घाबरतात आणि अफवा पसरवतात अशी थट्टा मस्करी करणे सुरूच होते .
आता रात्रीचे ८ वाजलेले .. हे तिघेही आता बंगल्यावर पोहोचले . आत्तासुद्धा वॉचमन तिथे नव्हताच. आत्तापण वॉचमन नाही बघून तिघांना खूपच राग आला . कारण वॉचमन नाही म्हटल्यावर बंगल्यात जाणार कसं ? किल्ल्या त्याच्याकडूनच तर घ्यायला सांगितल्या होत्या. थोडा वेळ थांबून वाट बघायचं ठरलं .. एक तास झाल्यावर तिघांनाही एका जागी थांबून कंटाळा आला. तिघांनीही एकदा दाराच्या आजूबाजूला किल्ली किंवा काही आत जायचा मार्ग आहे का किंवा अगदी खिडकी एखादी उघडी आहे का बघायला आत जायचे ठरवले .. दाराच्या आजूबाजूला फिरत असतानाच केतन ला दरामध्ये फट असल्याचे लक्षात आले .
केतन :-"ए ए ए इकडे या .. हे बघा दार उघडच वाटतंय .. अरे हा वॉचमन काय आत जाऊन झोपला कि काय ... जायचं का आत ?"
राहुल :- ए अरे नको ..... असं कसं जायचं यार ... अचानक घुसायच म्हणजे .... नको.. कुणी असेल आत तर
समीर :- अरे कुणी असेल तर बोलू ना त्यांच्याशी ... सांगू आपण का आलोय ते ... बाबानी नाहीतरी डॉ ना विचारलेलं आहेच कि ... मी बोलतो कुणी असेल .. तर... घाबरू नका ...
केतन :- हो आणि न जाऊन सांगताय कुणाला.. आपल्याला आज इथेच राहायच आहे.. दुसरा ऑपशन नाहीये ... ह्या एवढ्या बाटल्या आणल्यात मजा करायला त्या काय परत घेऊन जाऊ का ? घरी कळलं ना आईला ... जोड्यांनी मारेल मला .. चला आत .
शेवटी तिघेही एकत्र दार उघडून आत जातात ... तो एवढा मोठा दरवाजा उघडतानाच अगदी कर्णकर्कश वाजतो . दरवाजावरून तरी तिथे खूप दिवसात कुणी आल्याचं जाणवत नाही . आत पाऊल ठेवताच तिघंही आ वासून बघतच राहतात . इतका भव्य आणि सुंदर बंगला त्यांनी आतापर्यंत बघितलेला नसतो . खरं तर बंगला प्रकार त्यांना नवीन नसतो पण ह्या बंगल्याचं सौंदर्य काहीतरी वेगळच असतं .. एखाद्या महालासारखी भव्यता ... मोठमोठी झुंबरे ... मोठमोठे सोफे ... वेगवेगळ्या प्रकारचे शो पीस .. खाली मोठी भारतीय बैठक .. आत शिरल्या शिरल्या पहिले मोठा हॉल .. मग तिथूनच पुढे गेल्यावर स्वयंपाकघर . स्वयंपाक घराला वेगळी डाईनिंग रूम .. .. स्वयंपाक घरामधूनच वरच्या खोल्यांमध्ये जायला गोलाकार प्रशस्त जिना . वर दोन बेडरूम .. एवढ्या मोठ्या घराला बेडरूम मात्र दोनच होत्या .. "आयला सम्या तुमचा डॉ खूप श्रीमंत दिसतो राव ... काय बांधलाय बंगला .. " केतन . घर बघत वर जात असताना पाणी , वीज ह्या सर्व गोष्टी तिघांनीही तपासून घेतल्या होत्या . सगळं काही व्यवस्थित चालू होतं . वरच्या दोन बेडरूम पैकी एका बेडरूम मध्ये सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं होतं . एक रूम मात्र जरा अव्यवस्थितच होती. त्यामुळे ह्या आवरलेल्या रूम मध्ये तिघांनीही राहायचं ठरलं . सगळं आवरून , उरलेलं खाऊन तिघे थोडे फ्रेश झाले .. वर येताना राहुल नि परत बंगल्याची सगळी दारं , खिडक्या नीट बंद आहेत ना ह्याची खात्री करून घेतली . भिंतींएवढ्या मोठ्या प्रशस्त खिडक्या असल्यामुळे जर खिडकी उघडी राहिली तर कुणीही आत घुसण्याची दाट शक्यता होती आता वर रूम मध्ये आल्यावर ह्यांचा आवडीचा प्रोग्रॅम चालू होणार होता .. पिण्याचा .. ह्याच रूम मध्ये एक मोठ्ठा भिंती एवढा आरसा होता ... कोणतीही बाई काय अगदी पुरुष सुद्धा प्रेमात पडतील इतका सुंदर भव्य आरसा .. आरश्याला लाकडी फ्रेम होती.. पॉलीश केलेली अगदी सुंदर नक्षीदार फ्रेम . हा आरसा पूर्वीच्या राण्यांपैकी कुणाच्या तरी महालातून उचलून आणलाय असेच अगदी वाटत होते.
हे तिघे भरपूर पिऊन आता अशा अवस्थेत पोहोचले होते की २ मि मध्ये कुणी कुठेही कलंडेल .शेवटी तिघांनाही झोप लागली .
थोड्या वेळानी धाड धाड धाड ...दारावर जोरात कुणीतरी मारल्याचा आवाज आला .. पहिले ५ मि तर ह्या तिघांच्याही लक्षातच आले नाही . आवाज तसाच येत होता ... थोड्या वेळानी पहिले राहुल ला आवाज आला.. त्याने त्यातल्या त्यात कमी प्यायल्याने त्याला थोडी तरी शुद्ध होती .. बहुतेक वॉचमन आला असावा असा विचार करून राहुल उठला. उठता उठता किती वाजले म्हणून त्याने मोबाईल वर किती वाजलेत ते बघितले . ११ वाजले होते . उठून बसल्यावर राहुल ला समोरच्या भिंतीवर त्या खोलीतले घड्याळ दिसले. त्यातही ११ वाजले होते . हे घड्याळ समोर कसं काय ? झोपताना तर हे मागच्या भिंतीवर होतं . असं म्हणून मागे बघायला राहुल मागे वळला आणि इतक्यात घड्याळानी एकचा टोला दिला . राहुल ला कळले नाही कि ११ वाजता एकाच टोला कसा काय ? घड्याळ बिघडले असेल असे वाटून त्याने दुर्लक्ष केले पण परत जेव्हा त्याने त्या घड्याळात पहिले त्यात १ वाजला होता . आपण प्यायल्यामुळे असं होतंय असं वाटून राहुल नि दुर्लक्ष केलं .. आणि तो खाली जायला उठला ... पण समोर बघतो तर काय? सगळंच कसं बदललं ? दार तर उजवीकडे होत .. हे डावीकडे कसं काय आलं ? राहुल ला आता त्या अवस्थेत पण थोडं विचित्र काहीतरी आहे हे जाणवू लागलं .. खोलीतल्या सगळ्याच गोष्टी बदलल्या होत्या . बेड ची दिशा .. ठेवलेल्या खुर्च्या .. सगळंच बदललेलं .. आणि आरसा ? तो कुठे गेला? एवढा मोठा आरसा अचानक कसा काय गायब होतो? राहुल ला आता घर फिरायला लागलंय असं वाटत होतं .. खाली दारावर जोरात आवाज चालूच ... घाबरलेल्या राहुल ला समीर आणि केतन ला उठवायचं पण लक्षात आलं नाही . जोरात वाजणारं दार उघडायला म्हणून तो तसाच खाली जायला धावला ... आणि हे काय .... ? ? काही कळायच्या आताच राहुल जोरात खाली पडला.. कारण जिन्याची दिशा सुद्धा बदललेली . ... खाली पडलेल्या राहुल ला आता उठताच येत नव्हते ... राहुल खूप प्रयत्न करतो...पण छे ... उजव्या पायातून एक जोरदार काळ जाते .... इतक्या भयंकर वेदना होतात कि त्याचा ठणका अगदी त्याच्या मेंदू पर्यंत जातो ... वातावरणात पण आता खूप बदल झालेला असतो. बंगल्याच्या बंद केलेल्या सगळ्या खिडक्या सताड उघड्या असतात ... जणू काही बाहेर घोंगावणाऱ्या वादळाला अगदी सहज ह्या घरात प्रवेश देण्यास त्या तयार आहेत ... राहुल जिथे पडतो तिथे आजूबाजूला काहीच दिसत नाही त्याला .. सोफा? स्वयंपाकघर? त्या शोभेच्या वस्तू? छे काहीच नाही ... राहुल आश्चर्याने समोर बघतो... हे काय ? हा इथे कसा आला? राहुल च्या समोर आता फक्त तो महाकाय आरसा असतो... आरशात सुद्धा फक्त त्याची प्रतिमा .... मागे मिट्ट काळोख ... आरशात बघितल्यावर राहुल जोरात किंकाळी फोडतो.. पळून जाण्याचा केविलवाणा प्रयत्न पण करतो..स्वतःच्या डोक्यातून येणारे रक्त त्याला अजिबात पाहवत नाही.. रक्ताचे ओघळ आता राहुल च्या कानावरून गालावर येऊ लागतात ... आणि तेवढ्यात दिव्यांचे लखलखाट .. आणि फोटो क्लिक होण्याचे आवाज.." ह्या अवस्थेत कोण माझे फोटो काढतंय ? बंद करा ते ... केत्या .. सम्या तुम्ही मजा करत असाल तर ते बंद करा... मला खूप त्रास होतोय रे "... बंद करा बंद करा असं ओरडतच राहुल बेशुद्ध पडतो . आता बंगल्याच्या दारावरचा आवाज बंद होतो ..दोन मिनिटे पूर्ण शांतता ... कुणीतरी जिना चढल्याचा आवाज ..आता बाहेर होणारी टकटक बेडरूम च्या दारावर होऊ लागते . त्याचा आवाज अजूनच जोरात येऊ लागतो.. गाढ झोपलेला समीर तो आवाज ऐकून दचकून उठतो ... "अरे इतक्या रात्री कोण कडमडलंय ..किती वाजलेत “असं म्हणून समीर उठतो. समीर च्या घड्याळात आता १२ वाजलेत ... समोरच्या घड्याळात पण १२ .. १२ टोले ..समीरसाठी सगळं नॉर्मल ... पण खोली? सगळं बदललेलं .. तेच .. तसचं सगळ्या दिशा सगळ्या मिती बदललेल्या ... समीर डोळे चोळून पुन्हा पुन्हा सगळं बघतो... पण व्यर्थ ... तोंडावर पाणी मारू आधी म्हणून तो बाथरूम मध्ये जातो... पण तिथेही तेच... गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम डावलून बाथरूम मधल्या सगळ्या गोष्टी छताला चिकटलेल्या.. आता समीर ची झोपच उडते ... घाबरत कसाबसा तो नळ सोडतो.. सगळे पाणी वर वाहू लागते .. छताकडे ... दुर्गंधीयुक्त पाणी ..समीर जोरजोरात ओरडत रूम च्या बाहेर येतो.. आता त्याला तिथे झोपलेल्या केतन ची पर्वा नसते.. मैत्री वगैरे सगळं ठीके हो. . पण स्वतःच्या जीवावर आल्यावर कसली मैत्री आणि काय .... रूम च्या बाहेर पाऊल ठेवता क्षणीच समीर सुद्धा खाली कोसळतो ... अगदी खूप उंचावरून ... खूप जोरात आवाज येतो ... आजूबाजूला मिट्ट अंधार ... आणि समोर तोच आरसा ... स्वतःला कसं बस सावरत समीर आरशात पाहू लागतो ... हा कोण बसलाय असा पाठमोरा ? आरशात पाठमोरा दिसतोय म्हणजे मला सरळ चेहरा दिसायला हवा ... समीर विचार करतो.. मला का नाही दिसते मग... ?? कोण आहे हा? नीट लक्ष दिल्यावर समीर चे हृदय जोरात धडधडू लागते. कारण तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून समीरचा असतो.. तोच शर्ट ... तसेच केस ... बसण्याची पद्धत पण तीच .... इतक्यात आरशामध्ये समीर च्या मागे गाडी येते..खूप वेगात .. गाडीच्या दिव्यांमुळे दोन सेकंद समीर ला काही दिसेनासे होते.. गाडीचा कर्णकर्कश हॉर्न ... . तो जोरात ओरडतो... पण गाडी समीर ला धडकून पुढे गेलेली असते... आणि समीर चा हात? आत्यंतिक वेदनेने समीर तळमळतो.. आरशामध्ये आपला तुटलेला हात बघून तो जास्तच कासावीस होतो ... तो ओरडत असतानाच अचानक त्याला बरीच माणसे आजूबाजूला असण्याचा भास होतो ... तो मदतीसाठी कुणाला हाक मारणार इतक्यात तो बेशुद्ध पडतो ...
दारावरचा आवाज आता बंद झालाय ..सगळीकडे नीरव शांतता ...अचानक केतन च्या मोबाईल वर फोन ची रिंग जोरात वाजते ... “एवढ्या रात्री कोण झोप मोडतंय राव”असं म्हणत झोपेतच केतन फोन उचलतो ... फोन वरचा आवाज ऐकून केतन च्या चेहऱ्यावर भीती काळजी आणि थोडा आनंद सुद्धा पसरतो “केतन plz दार उघड केतन ... मी केव्हांच वाजवतेय ... मला भीती वाटतेय रे बाहेर plz दार उघड .” “मधुरा? तू इकडे कशी काय ? तुला कसं कळाल?” “तू आधी दार उघड मग सांगते” ... "अरे हे दोघं इथे नाहीत ... खाली असतील. मग दार उघडायला काय झालं ह्यांना ... आळशी लेकाचे ... का हेच मस्ती करतायेत माझ्यासोबत ? पण इतक्या रात्री? किती वाजले? १ वाजलाय " असा स्वतःशीच बडबडत केतन उठतो .. समोरच्या घड्याळात आता ११ वाजलेत ... ११ टोले . .. "हे काय.. घड्याळ बिघडलेलं दिसतंय ..ते मरू दे मी खाली जाऊन मधुरा चं काय आहे ते बघतो? " केतन पुन्हा स्वतःशीच बडबडत उठतो .. बदललेल्या काही गोष्टी आता जागेवर आलेल्या असतात ... काही तशाच ... विचित्र.. जिना उतरून केतन खाली येतो.. आणि इतक्यात "ए अरे सोडा पोरांनो.. डोळ्यावर काय कापड टाकताय.. इथे आधीच अंधारात काही दिसत नाहीये बाहेर मधुरा आलीये तिला आधी आत घ्या रे ... ए अरे सोडा .. कुठे नेताय मला ... सम्या राहुल्या बस झालं काय... चेहऱ्यावर काहीतरी होतंय राव... काढा ते कापड काढा... खूप जळजळतंय रे .... काढा ... " असं ओरडत असतानाच केतन च्या चेहऱ्यावरील कापड दूर होते .. आणि केतन भयानक किंकाळी फोडतो.. आरशातलं हे अर्धवट जळलेले स्वतःच रूप बघून केतन दुःखानी जोरजोरात ओरडायला लागतो... रडायला लागतो. .... तेव्हाच अचानक आरशातून एक मंद प्रकाश येतो. त्या प्रकाशाने समीर आणि राहुल सुद्धा शुद्धीवर येतात . त्या तिघांनाही आपल्या सोबत भयंकर काहीतरी घडत आहे ह्याची जाणीव होते . तिघेही एकमेकांकडे आणि आजूबाजूला काहीतरी शोध घेत असतात ... अशातच समोर आरशात त्यांना एक मुलगा दिसतो .
समीर :- रो रो रो रोहन ... तू तू इथे ? तू कसं काय म्हणजे ? ???
राहुल :- तू तर त्या दिवशी ... त्या ... रोड ऍक्सिडेंट मध्ये ....
रोहन :- हो मीच.रोहन. तुमचा वर्गमित्र आठवतोय ना मी? कि विसरलात ? मीच तो रोड ऍक्सिडेंट मध्ये मारल्या गेलेलो. डॉ गोखलेंचा एकुलता एक मुलगा... रोहन गोखले ..
केतन :- तू ... तू ... केलंस हे सगळं ?? का …का केलंस ? आमचा काय संबंध तुझ्याशी ??
रोहन :- सांगतो सगळं सांगतो ... तुमच्या मुळे माझा ऍक्सिडेंट झाला नाही आणि तुमच्यामुळे मी मेलो पण नाही. मला माहितीये . त्या दिवशी झालेल्या त्या दुःखद घटनेला कुणीच जबाबदार नाही. अनावधानाने झालेला एक अपघात होता तो. पण तुम्हाला माहितीये? सगळ्यात दुःखद गोष्ट कोणती होती माझ्यासाठी? माझा ऍक्सिडेंट झाला.. माझ्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या.. माझा हात तुटलेला.. पण पण त्या अवस्थेत माझ्या मदतीला कुणीच नाही आले. तुम्ही तिघंही तुमच्या कार मधून हा सगळं प्रसंग बघत होतात .. मी तुम्हाला बघितलेलं .... मदतीसाठी मी अतिशय आर्त नजरेनी तुमच्याकडे बघत पण होतो ... पण नसत्या भानगडी नको म्हणून तुम्ही कुणीच माझ्या मदतीला आला नाहीत... समीर तू? तुझी गाडी होती ना स्वतःची? तू तर अगदी सहज मला दवाखान्यात नेऊ शकला असतात ... अगदी ५ मि वर होता रे .... केतन आणि राहुल तू? तुम्ही दोघेही नुसतं बघत राहिलात माझ्याकडे .... राहुल तू ? तू तर माझा फोटो काढणार होतास त्या अवस्थेत? खरंच ? ऍक्सिडेंट चा फोटो? हि कोणती मानसिकता रे ? जेव्हा स्वतःच्या डोक्यावर रक्त बघितल आणि फ्लॅश चे नुसते लाईट बघितले तर तुला नको वाटलं .. माझी काय अवस्था झाली असेल रे मित्रांनो ? का नाही आलात माझ्या मदतीला? मी जरी वाचलो नसतो ना तरी मला वाचवण्यासाठी कुणीतरी प्रयत्न केले ह्याच समाधान घेऊन मेलो असतो रे मी ... रस्त्यावर एखादा माणूस मरतोय. आणि कुणालाच त्याची दया येत नाही ?.... एखाद जनावर गाडी खाली येतं तेव्हा माणसं फार लक्ष नाही देत .. तसं वाटलं रे मला ... किडामुंगी सारखी वागणूक आज आपण माणसं माणसांना देतोय रे ... रस्त्यावरच मेलो रे मी ... तुमच्याकडे बघत ... तुमच्या प्रतिमा माझ्या डोळ्यात तशाच साठवून मेलो एकुलता एक होतो रे मी पण आई बाबांना ... मलासुद्धा पुढे जाऊन डॉ व्हायचं होतं ... सगळं सगळं राहून गेलं रे ..

राहुल (रडत ):- रोहन आम्हाला माफ कर रोहन ... आम्ही असं वागायला नको होतं ... आम्ही मुद्दाम नाही केलं रे.it was totally unintentional ..

रोहन :- खरंच ते unintentional होतं ? समोर माणूस मरतांना दिसतोय आणि आपल्याला शक्य असूनही आपण काहीच करत नाहीये हे unintentional असू शकतं ?.
उलट झालेला ऍक्सिडेंट अनावधानाने झाला होता असा म्हणेन मी... माझ्या मृत्यूला त्या अनावधानाने झालेल्या ऍक्सिडेंट पेक्षा जागृत अवस्थेत असलेले तुम्ही जास्त जबाबदार आहात.

समीर :- रोहन खरंच आमचं चुकलं .. तू तू आम्हाला हवी ती शिक्षा दे ... आम्ही तुझे अपराधी आहोत ..
रोहन :- मला तुम्हाला मारणं सहज शक्य आहे .. मी ह्या अवस्थेत काहीही करू शकतो ... अगदी काहीही . .. पण माझा तो उद्देश नाही . .. तुम्हाला मारलं तर.. काय उपयोग ... तुमचा मृत्यू गूढ मृत्यू म्हणून सगळे सोडून देणार .. मला हेच नकोय .. मी काय सांगितलंय त्याचा विचार करा . ह्या आरशात तुम्हाला जे काही दिसलं ते आठवा ... हा आरसा तुम्हाला फक्त बाह्य रूप नाही दाखवत .. तुमच्या मनातील चांगले वाईट सगळे विचार तुम्हाला दिसतात .तुम्हालासुद्धा तुमच्या मनात खोलवर दडून बसलेलं guilt दिसलं . त्या guilt मुळे माझी अपघातात झालेली अवस्था तुम्ही स्वतःसोबत जोडलीत.. तुम्हाला आठवतंय ? आपण लहानपणी आपल्याला कुणी काही वाईट बोललं किंवा चिडवलं तर आपण त्याला "आरसा " असं म्हणायचो? म्हणजे काय रे ? म्हणजे तू जे बोललास ते तुलाच बोललास .... आपल्या आयुष्यात सुद्धा तेच आहे रे .... आपण जी कर्म करतो तीच आपल्या समोर येतात ... तुम्ही मदत केलीत तर वाईट प्रसंगाला तुम्हालाही मदत होईल ... आरसाच आहे तो. तुमच्या खऱ्या खुऱ्या प्रतिमा .दाखवणारा .. तुमची कर्मे दाखवणारा .....चला ... . मी जातो ... पुढे काय करायचं हे तुम्ही बघा. ... नाहीतर मी आहेच तुमचा आरसा ... तुम्हाला सतत तुमच्या प्रतिमा दाखवणारा ..

ह्या सर्व प्रकारानी तिघेही एकदम शांत आणि सिरीयस झाले होते... केतन तर रडायलाच लागला होता ... रडत रडतच तो बोलू लागला
"मला मला माझा चेहरा जळलेला दिसला रे ...का ?? . का दिसला माहितीये ?? " समीर आणि राहुल नि नकारार्थी माना हलविल्या ... त्यांना ज्या गोष्टी आरशात दिसलेल्या त्याचा संदर्भ रोहन च्या ऍक्सिडेंट शी होता पण केतन चा? केतन पुढे बोलू लागला "मी ... मी... मधुरा ..ला धमकी दिली होती रे ... कि ..ती मला जर .... हो नाही म्हणाली तर .... तर ... तिला पळवून नेईन.... आणि चेहऱ्यावर ...... ... " पुढचं न बोलताच केतन ढसाढसा रडू लागला . समीर आणि राहुल ने त्याला सावरले .... तिघांचेही डोळे आता चांगलेच उघडले होते . तिघे विचार करताच झोपून गेले.. झाल्या प्रकरणानी झोप तर कुणालाच लागत नव्हती. सतत त्यांच्यासमोर रोहन चा ऍक्सिडेंट आणि त्यांच्याकडे बघत असलेला चेहरा येत होता . ह्या तिघांना रोहन नि चांगलाच धडा शिकवला होता .
सकाळ झाली.. तिघे परत जायला निघाले . सकाळी त्यांना बंगल्याचे खरे रूप कळले . .. जागोजागी जाळ्या जळमटं ... घरात काहीच सामान नाही ... फक्त तो आरसा .. आरशावर आता सूर्याचा लक्ख प्रकाश पडून परावर्तित होत होता ... ह्या तिघांच्या मनातल्या भावनाच जणू .. निघतानाच समीर च्या वडिलांचा दुबई हुन फोन आला .. "अरे माझा फोन बिघडला होता .. त्यामुळे कुणाशीच बोलणं झाला नाही घरी. डॉ शी सुद्धा बोलणं होत नाहीये.... तुम्ही तुमची ट्रिप पोस्टपोन करा .. तो बंगला मिळणं अवघड दिसतंय " फोन बंद करून समीर राहुल, केतन बाहेर पडले.... ह्यापुढे परत अशी चूक न करण्यासाठी .... अपघातग्रस्तांना शक्य असेल तेव्हा तात्काळ सेवा देण्यासाठी ... गरज पडेल तेव्हा अगदी वाट्टेल ती मदत करण्यासाठी .

ह्या घटनेला आता २ वर्षे उलटून गेलीत . समीर ने स्वतःच्या बिझनेस साठी बांधलेलीं एक इमारत अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून बांधलेल्या हॉस्पिटल ला दिली आहे .. त्यांना लागणारे निधी पण तो स्वतः देतो . केतन चे वडिलांच्या मदतीने ठिकठिकाणी मुखतः हायवे वर मोबाईल ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत .. त्यांची संख्या कशी वाढवता येईल ह्यासाठी तो जातीने काम करत आहे . ..

कसारा घाट मुंबई नाशिक हायवे बद्दल बराच ऐकलं आहे ... हा घाट रात्रीच्या वेळी महाभयंकर असतो म्हणे,तिथल्या लोकांच्या नाना कथा या हायवेवरील ऐकल्या आहेत. कुणाला काही माहिती आहे का?

खूपच छान धागा आहे. सगळेच किस्से खूप छान भीतीदायक आणि रोमांचक आहेत. काहीजण उगाचच त्यात शंका खोड्या काढतानाही पहिले. माझा त्यांना फक्त एकच सवाल - "का?"
तुम्हाला नाही ना पटत, भूत नाही ना अस्तित्वात, तुमचा नाही ना विश्वास म तुमी अशा कथा, माहिती सर्च तरी का करता ? सर्च पण नका करू. आमचा आम्हाला विरंगुळा असू द्या कि. भुताखेतांच्या गोष्टी केल्या, बोलल्या कि माणूस अंधश्रद्धाळू होतोच हा अट्टाहास का ? तुम्हाला नाही पटलं तर दुसरीकडे जाण्यास तुमि मोकळे असतात कि. का दुसऱ्यांची मज्जा खराब करता ?
या किस्स्यांमधलं काय घ्यायचं आणि काय नाही कि काहीच घेऊ नये हे ज्याचं त्याला कळत कि.
शाळेत असतात ना व्हिल्लन वाली पोरं तशी वाटली हि लोक. सगळी मज्जा खराब करणारे.
काजवे कुठले !!!

भुत दाखवा व एकलाख रुपये मिळवा अशी माझी योजना इथे जाहीर करतो.कुणाला हवेत एक लाख रुपये.?
Submitted by सिंथेटिक जिनियस on 22 July, 2017 - 17:44

--
@सिंथेटिक जिनियस
एकदा तुम्ही स्वत:चेच तोंड आरशात पहा व ते एक लाख रुपयाचे बक्षिस स्वत:च ठेवा.

"प्रकाश घाटपांडे सर, इथे गीतावाचन करून उपयोग नाही....."
@ चावटानन्द,
प्रकाश घाटपांडे सर हे अनिस चे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यान्चा गीतेवर विश्वास नसावा म्हणुन ते इथे गीता वाचन करणार नाहित असे वाटते असो . . .

ही घटना माझ्या आजिच्या वडिलांसोबत घडली होती.
१९६० ची हि गोष्ट, ठिकाण :- जळगाव
यावेळी लोक करमनुकीच्या साधनांची कमतरता असल्यामुळे आजुबाजूच्या गावात जर यात्रा भरली तर गर्दीच्या गर्दी जात असे. आजही यात्रा होती, सर्वजण जेवण झाल्यानंतर यात्रा असलेल्या गावात तमाशा बघण्यासाठी निघाले,
माझ्या आजीच्या वडिलांचे नाव फत्तूराव.
ते सुद्धा त्यांच्या चुलत्यासोबत निघाले तमाशा बघत बघत रात्रीचे २:५०am वेळ झाली होती. आजोबांच्या चुलत्याने आजोबांना तेथून निघण्यास सांगितले, ते म्हणाले
"वेळ झालीय बघ दूध धुण्याची ३:०० वाजायला आलेत"
तसा आजोबांनी होकार दिला व ते परत घरी येण्यासाठी निघाले.
मध्यरात्रीचा किर्रर्रर्र अंधार होता.
आणि विशेष म्हणजे मंडळीला दारू नावाचा लय शोक
आजोबा आणि चुलते दोघही अगदी समोरच्या माणसाला कदाचित ओळ्खणारही नाहीत इतकी दारू त्या दिवशी पिले होते
गावाच्या बाहेर ते बऱ्याच अंतरावर आले होते , आणि चालता चालता अचानक त्यांच्या नजरेला एक व्यक्ती जमिनीवर झोपलेली आढळली, ते त्याच्या जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू लागले,
अरे! "हा तर आपला नारायण भाऊ कि....."
आजोबा म्हणाले! "अरे..... हो कि दारू जास्त झालीय वाटत ह्याला"
असे म्हणत! या दोघ महारथिंनी पाय एकाच्या खांद्यावर आणि डोके दुसऱ्याच्या असे त्याला अगदी खांद्यावर उचलले
आणि आपला पुढचा रस्ता पकडला
रस्ते गावाच्या बाहेरूनच जात होते त्यांनी तरीही २ गाव आधीच मागे टाकली होती
दोघेही चालत असताना खांद्यावर घेतलेल्या माणसाच्या हालचाली टिपत होते
पण दारू डोक्यात असल्यामुळे काही गांभीर्य त्यांना जाणवत नव्हते त्यांच्या सांगण्यांननुसार "तो त्यांच्या खांद्यावर पालथा असल्यामुळे तो त्यांना मान लोम्बकवूंन बघण्याचा प्रयत्न करीत तर कधी डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत असे तर कधी त्याचे वजन इतके वाढत होते कि त्या दोघांनाही एका माणसाचे वजन जड जात होते!"
काही काळ हि गोष्ट अशीच चालू होती पण हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले कि काहीतरी विचित्र गोष्ट घडत आहे
असे म्हणतात कि "भुत हे गावाची वेष ओलांडत नाही"
जशी जशी गावाची वेष जवळ येत होती त्या माणसाची हालचाल जास्त होऊ लागली आणि इकडे यांची हालत खराब होउ लागली
आणि शेवटी ते गावाच्या वेशिजवळ येऊन पोहोचले दोघांनी एकमेकांकडे अगदी घाबरल्या नजरेने बघितले आणि युक्ती अशी केली कि दोघांनी एकाच वेळी त्या माणसाला खांद्यावरून खाली आदळले आणि वेशीला ओलांडून पळत सुटले
जस त्यांनी त्या माणसाला खांद्यावरन खाली आपटले तसा तो माणूस त्याच्या उंचीपेक्षा दुप्पट वाढु लागला आणि त्यांना म्हणू लागला
" वाचले कि रे तुम्ही , लइ नशीबवान तुम्ही..... नाही सापडले रे माझ्या तावडीत!"... बर जाता जाता बिडी तर देऊन जा! अरे फक्त एक बीडी".......
हे कसले थांबताय यांनी ताबडतोब तिथून धूम ठोकली , आणि घरी बघताय तर काय!
नारायणभाऊ तर यांच्या आधीच घरी पोहोचलेला त्याला झोप लागत असल्यामुळे तो लवकर घरी निघून आला होता.....
हा किस्सा मला माझ्या आजीने सांगितला होता
आणखीन बरेच आहेत..... जसा वेळ मिळेल तशे टाकत जाईल....

रात्रीचे दोन वाजले होते. तरी अजून ईर्षाद आला नव्हता. तो येईल म्हणून आणी गर्मीचे दिवस होते म्हणूनही दार उघडं ठेऊनच फरीदा दोन्ही मुलांना जवळ घेऊन झोपली होती. मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. रात किड्यांचा आवाज तेवढा रात्रीची शांतता भंग करत होता. पाठीमागून झांडाच्या सळसळण्याचा आवाज कानावर येताच फरीदा उठून बसली. कोणीतरी झाडाच्या फांद्या सारण्याचा आवाज येत होता. ती लक्ष पुर्वक ऐकण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तीच्या कानावर 'बेटीડડ' असा आवाज आला. तीने रोखून दारावर पाहिल अन् ती तीन ताड् उडालीच. एक भणंग म्हातारा मौलवीच्या पेहेरावात ऊभा होता. विद्रुप जक्कड म्हातारा व त्याच बोट धरून एक आठ, नऊ वर्षाचा तेवढाच रूबाबदार मुलगा ऊभा होता. फरीदाला दरदरून घाम फुटला त्यात मुलही झोपलेली. तीला काहीच सुचेना काय कराव ते. कातर आवाजात तो म्हातारा म्हणाला, 'बेटी रात्री अस दरवाजा ऊघडा ठेवून झोपू नकोस. ती लोक येतील कुऱ्हाडी कोयते घेऊन आणि खतम करून टाकतील तूझ्या मुलांना". बोलता बोलता एकदम त्याचा आवाज चढला, 'उठं, बंद कर दरवाजा, नाहीतर बे मौत मराव लागेलડડડડ'. कशीबशी दबकतच फरीदा ऊठली अन् त्याच्या तोंडावरच दरवाजा आपटून कडी लाऊन घेतली. मुलांना मीठी मारून गपकून झोपली. झाला प्रकार तीने सर्व शेजाऱ्यांना सकाळी सांगीतला. वीस वरर्षापूर्वी साळूूाबाईनेही हाच अनुभव घेतला होता. तीच पुढे होऊन फरिदाला धिर देत सगळ्यांना म्हणाली, ' तो म्हातारा एक मौलवी आहे. हिंदू मुसलमानांच्या भाडंणात तो व त्याचा नातू मारला गेला. अस म्हणतात ते दोघे ऊशीरा रात्रीचे भटकतात येवढ्याच भागात. आपल्या वस्तीच्या मागेच त्यांची मशीद् होती. आता फक्त अवशेष ऊरलेत. शक्यतो रात्रीचा दरवाजा उघडा ठेऊ नका'.

>>>प्रकाश घाटपांडे सर हे अनिस चे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यान्चा गीतेवर विश्वास नसावा म्हणुन ते इथे गीता वाचन करणार नाहित असे वाटते असो . . .<<
मी माजी झालो. आता मी अ‍ॅक्टीव्ह नाही अंनिसत.माझा सहभाग हा फलज्योतिषापुरता असायचा. आता गीते बद्दल. तो एक कौन्सिलिंग करणारा प्राचीन ग्रंथ आहे. त्याविषयी आदर आहेच. पण तो काही हिंदू धर्माचा एकमेव प्रातिनिधीक ग्रंथ म्हणता येणार नाही. बादवे राजीव सानेंच नवपार्थ हृदगत- एक आधुनिकतावादी गीताचिंतन एक वेगळा पैलू मांडणार पुस्तक आहे.जड आहे पण वाचा.

प्रकाशजी,
आपल्या कार्याविशयी आदर आहे, आणि माझी प्रतिक्रिया हि चावटानन्द यान्च्या साठी होती, असो माझ्यामते हा विषय प्रत्यक्ष अनुभव येणार्यासाठी आहे, जे वैज्ञानिक द्रुश्ट्या सहज सिद्ध करणे सद्ध्यातरि कठीण दिसते,भविष्यात कदाचित सम्भव असु शकेल, असो आपल्याला असे उत्तर देणे हा लहान तोन्डी मोठा घास आहे,काही उणे अधीक झाल्यास क्षमस्व.
अनिरुद्ध

baapre

खर तर अमानवीय हा शब्दप्रयोग योग्य आहे का? तो मानवाला आलेले अनाकलनीय अनुभव असा रितीने इथे मांडला जातो.

खर तर अमानवीय हा शब्दप्रयोग योग्य आहे का?
प्रकाशजी,
माझ्यामते, ज्या काहि अनाकलनीय प्रसन्गान्चा अनुभव इथे मान्डला जातो तो मानवाने निर्माण केलेला असु शकत नाही, कारण तशी सामान्य माणसाचि क्षमता असु शकत नाही,म्हणजेच ते मानव निर्मित नाहित, म्हणुनच त्याला 'अमानविय' असे म्हणणेच योग्य आहे.
अनिरुद्ध

Pages