अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक वाचनात आलेला अनुभव

सिने जन्नत चित्रपट गृहाच्या रात्रीच्या शो वरून आम्ही परतत होतो. रात्रीचे २ वाजले होते. चित्रपट संपून गर्दी अचानक पांगली. रिक्षा, बाईक्स वरून लोक अचानक घरी गेले. मी आणि अब्दुल मात्र चालत घरी जाणार होतो. आमचा फ्लॅट काही मिनिटेच दूर होता. चित्रपट गृहाच्या मागील बाजूने एक कचरा पेटी होती. तेथून आम्ही चालत जात होतो आणि अचानक कुणाचा तरी हुंदका ऐकू आला. आम्ही निरखून पहिले तर दूर एका बंद दुकानाच्या शटरजवळ एक ५-६ वर्षांचा मुलगा बसून रडत होता. त्याच्या अंगावर चांगले स्वछ कपडे होते. चांगल्या घरातील वाटत होता.
"अरे रडायला काय झाले ? कुछ मदत चाहिये है क्या ? " अब्दुल ने त्याला विचारले. मुलगा भांबावून आमच्या कडे पाहत होता.
"औषध पाहिजे. मला नाही ठाऊक कसे आणायचे." असे म्हणून त्याने कागदाचा तुकडा पुढे केला.
आम्ही कागद हातांत घेऊन पहिला त्यावर काही औषधांची नावे लिहिली होती. सुमारे ३०० रुपयांचे बिल होते. आम्ही काही वेळ गोंधळून एकमेका कडे पहिले. मुलाला मदत करावी असे वाटते.
"औषध कुणासाठी पाहिजे बाळा ?" मी विचारले. "आईसाठी" त्याने सांगितले आणि चित्रपटगृहाच्या दिशेने बोट केले. तिथे जवळच्या एखाद्या हॉस्पिटल मध्ये त्याची आई असेल असा आम्ही विचार केला.
"चल ये बरोबर आम्ही घेऊन दितो औषधें" मी कागद खिश्यांत टाकत त्याला सांगितले. अब्दुल ने माझ्याकडे पहिले.
"मी नाही येऊ शकत, मला राहायला पाहिजेल" असे त्याने सांगितले. त्याची कळी थोडी खुलली होती.
ठीक आहे आमच्या घराच्या बाजूला निशा फार्मसी होती ती रात्रभर खुली असायची. तिथून आम्ही औषधें आणून देऊ असा विचार केला आणि झपाझप पावले टाकत आम्ही फार्मसी जवळ पोचलो.
पण तिथे पोचताच खिसा पहिला तर ते औषदांचे कागद गायब. मला घाबरायला झाले. आधीच त्या मुलाची आई अत्यवस्थ आहे आणि आम्ही ते औषधांचे कागद हरवले तर त्याला बिचार्याला आम्ही औषधे कशी आणून देऊ असा प्रश्न निर्माण झाला.
आमचे गोंधळले चेहरे पाहून फार्मसी वाल्याने "तुम्ही जन्नत सिने च्या रात्रीच्या शो वरून तर येत नाही ना ? " असा प्रश्न केला.
"तुम्हाला कसे ठाऊक ?" अब्दुल ने विचारले.
"दररोज ची गोष्ट आहे साहेब. एक लहान मुलगा दिसतो, औषधें पाहिजे म्हणून लोकांना सांगतो. काही भले मानूस मदत करण्याचा प्रयत्न करतात पण परत गेलात तर तिथे कुणीही नसतो. खरे तर हि फार्मसी आम्ही १९७५ साली बांधली होती कारण आज जिथे सिने जन्नत आहे तिथे त्या काळी फार मोठे हॉस्पिटल होते. तिथे ह्या मुलाची आई विना औषधाने दगावली होती. मुलाकडे आईचे मृत शरीर नेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते आणि त्यामुलाने प्रचंड अकांड तांडव करून लोकांचे लक्ष वेधून शेवटी आईचा अंत्यसंस्कार केला होता." असे म्हणून फार्मसी वाल्याने आपल्या ड्रावर मधून एक लॅमिनेट केलेले बातमीचे कात्रण काढले. त्यावर १९९३ मधील तसे वृत्त होते.
आम्ही आश्चर्याने चकित झालो होतो. घाबरलो असलो तरी आम्ही पुन्हा त्या चित्रपटगृहाकडे गेलो. कारण कुणाची तरी कथा ऐकून एका लहान मुलाला संकटात सोडण्याची आमची मानसिक तयारी नव्हती. आम्ही फार दुरूनच त्या बंद दुकानाच्या शटर कडे नजर टाकली. तिथे तो लहानगा अजून उकिडवा बसला होता. पण ....
पण त्याच्या पुढेच जे आम्ही पहिले ते पाहून आम्ही मागच्या मागे पोबारा केला. त्या मुलाच्या पुढे पांढऱ्या कफनात गुंडाळलेले एक शरीर ठेवले होते.

परवा एकदा गप्पा मारता मारता एका परिचिताने सांगितलेला अनुभव त्यांच्याच शब्दात इथे लिहित आहे...

सन २००१ ची गोष्ट आहे. पुण्यात नुकतेच स्थलांतरित झालो होतो. तात्पुरते नातेवाईकांकडे थांबलो. नवीन घर बघायला फारसा वेळ नव्हता. दुसऱ्या कि तिसऱ्या दिवशी लगेच ड्युटीवर जायचे होते. त्यामुळे सहकारनगर परिसरात एजंटने जे एक छोटे घर दाखवले तिथेच राहायला जायचे नक्की केले. गेल्या अनेक महिन्यात कोणी तिथे राहत नव्हते असे तो म्हणाला. तो काहीतरी कारण पण सांगू लागला. पण वेळेअभावी आम्ही कारणे वगैरे नीट जाणून घ्यायच्या फंदात पडलो नाही. साहित्य घेऊन लगेच तिथे राहायला पण गेलो.

घर म्हणजे एका मोठ्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या वरच्या दोन खोल्या होत्या. लोखंडी जिन्याने वर जावे लागे. किचन आणि बाहेरची खोली. व त्याला लागूनच संडास बाथरूम वगैरे बांधून त्यांनी ते युनिट भाड्याने देता येईल अशी सोय केली होती. बंगल्यात कोणीही राहत नव्हते. मालक मालकीण हयात नव्हते. त्यांचा मुलगा परदेशी स्थायिक होता. कोणीतरी नातेवाईक अधूनमधून येऊन मेंटेन करून जात. त्यामुळे बंगल्याचे आवार खूप सुनसान होते. राहायच्या खोल्या मागच्या बाजूला. आणि थोडी जागा सोडून बंगल्याचे मागचे कंपाऊंड व त्यापलीकडे पर्वती परिसरातला दाट झाडीचा भाग पसरलेला. त्यामुळे तिथे अजूनच सुन्न वातावरण होते. घरात प्रवेश केला आणि अनेक दिवस बंद असल्याने एक विशिष्ट जुनाट वास साचून राहिला होता तो जाणवला. दारेखिडक्या उघड्या ठेवल्या. पण का कुणास ठावूक तिथे कोणाचेतरी गूढ अस्तित्व सतत जाणवत होते. कुणाचीतरी चाहूल लागावी असे भास व्हायचे. पण दिवसभर साहित्य जागच्या जागी लावण्यात गेल्याने त्यावर जास्त विचार करायला पण वेळ मिळाला नाही.

संध्याकाळी मात्र पत्नी आणि मुलगा नातेवाइकांना भेटून यायचे म्हणून गेले. मी एकटाच घरी थांबलो होतो. भयाण सन्नाटा पसरला होता आणि फारच गूढगंभीर वाटू लागले होते. पण मला भूतखेत ह्यावर जास्त विश्वास नसल्याने भीती अशी वाटत नव्हती. एक पुस्तक घेऊन खुर्चीवर खिडकीला पाठ करून वाचत बसलो होतो. येताना बरोबर मुलाने एक मांजरीचे पिल्लू आणले होते. ते मांडीवर निवांत झोपले होते. संध्याकाळचा सन्नाटा पसरला होता. मी वाचनात गुंतलो असताना काही वेळ गेला असेल तोच अचानक पाठीमागे खिडकी आणि खुर्चीच्या मधल्या जागेत काहीतरी धाप्पकन पडल्याचा आवाज आला. चमकून मागे पाहिले तर काहीही नव्हते. आवाज मात्र तिथूनच आला होता. तरीही उठून खिडकीबाहेर पाहिले. कुठेच काही दिसले नाही. तो भास मात्र नक्कीच नव्हता. मांजरीचे पिल्लू सुद्धा खिडकीकडे बघून काहीतरी दिसल्यासारखे आवाज काढून ओरडत होते. मग मात्र मनातून थोडा घाबरलोच.

रात्री पत्नी व मुलगा नातेवाइकांकडून घरी आले. पण मी त्यांना काही सांगितले नाही. रात्री तर फार भयंकर वाटू लागले. बंगल्याच्या आसपास व मागे पूर्ण काळोख. बाहेर काहीही दिसत नव्हते. आम्ही तिघे जेवून बाहेरच्या खोलीत झोपी गेलो. लाईट बंद केल्यावर गडद अंधार वाटू नये म्हणून अगदी छोटी पणती तेवत ठेवली होती. मुलगा आम्हा दोघांच्या मध्ये, आणि मांजरीचे पिल्लू त्याच्या पायात झोपले होते. साडेअकरा वाजले असावेत. दिवसभराच्या थकव्यामुळे हे दोघे पट्कन झोपी गेले. पण मला मात्र काही केल्या झोप यायला तयार नाही. माझ्या तोंडावर पांघरून होते. अचानक पायावरून मांजराची पावले जाणवू लागली. मांजरीचे पिल्लू जागे होऊन पायावर आले असेल अशी समजूत करून मी दुर्लक्ष केले. ती मांजराची पावले हालचाल करून थोड्यावेळाने माझ्या अंगावरून पलीकडे गेली. मग मात्र मी पांघरुणातूनच डोळे किलकिले करून पाहिले आणि धक्का बसला. कारण मांजरीचे पिल्लू जसेच्या तसे मुलाच्या पायात झोपून गेलेले होते. आता मात्र मला पायावरून नक्की काय गेले याची खातरजमा करायचे धाडस झाले नाही. झोप पार उडालीच होती. रात्री खूप उशिरा कधीतरी डोळा लागला. काही काळाने पुन्हा कशाने तरी जाग आली. पणती अजून तेवत होती. पण खूप क्षीण झाली होती. विझायच्या अवस्थेत. खिडकीकडे लक्ष गेले आणि हबकलो. त्या अगदी अंधुक उजेडात खिडकीतून कोणीतरी लहान मुलगा बाहेरून आत आमच्याकडे टक लावून पाहत असल्याचे जाणवले. भास असणार. नक्कीच भास असणार. नक्कीच. मी स्वत:च्याच मनाची कशीतरी समजूत घातली आणि डोळे गच्च मिटून घेतले. सर्वांगावर काटा आला होता. घशाला कोरड पडली. अंगाला बारीक घाम पण सुटला होता.

रात्र कशीबशी पार पडली. सकाळी उठल्यानंतर पत्नीने विचारले रात्री सारखे पाणी प्यायला का जात होतात. माझ्या आश्चर्याला पारावर उरला नाही. तिला म्हणालो अगं झोपच कशीबशी उशिरा लागली तर उठू कधी? तर मला म्हणाली स्वयंपाकघरात उभारून पाणी पिताना रात्री दोन वेळा मला तिने पाहिले होते. ते ऐकून मी स्तंभित झालो. तेवढ्यात मुलगा पण जागा झाला. उठताच त्याने विचारले कि मी रात्री त्याच्या तोंडावरून सतत हात का फिरवत होतो? आता मात्र मला काहीतरी वेगळे वाटू लागले. इथे गोष्टी नॉर्मल नाहीत हे लक्षात आले. मनातून प्रचंड घाबरून गेलो होतो. तरीही पत्नीला काही जाणवून दिले नाही. कारण तिला मुलासह दिवसभर एकटीनेच तिथे राहायचे होते. पण मी ताबडतोब त्या एजंटला फोन केला आणि लगेच दुसरे घर पाहायला सांगितले. सुदैवाने त्याच दिवशी त्याला दुसरे घर सापडले. मग क्षणाचाही विलंब न लावता नवीन कंपनीचा पहिला दिवस असूनही रजा टाकून लगोलग साहित्य तिकडे हलवले.

नवीन घरी गेल्यावर मात्र तिथल्या घरमालकांसमोरच पत्नीला सगळे सांगितले. ती आ वासून माझ्याकडे पाहू लागली. घरमालक पण स्तब्ध झाले आणि म्हणाले, मला सुद्धा या गोष्टीवर विश्वास नाही. पण काही वर्षांपूर्वी तिथे एका आजोबांनी आपल्या नातवाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली होती आणि तेंव्हापासून तिथे कोणीही राहत नव्हते असे सांगितले. ते ऐकल्यावर मात्र आम्ही दोघेही बसल्या जागेवर भीतीने गोठून गेलो. त्यानंतर आजतागायत त्या घराचा विषय सुद्धा कधी आम्ही काढला नाही.

Bhitidayak ahe ha khara asel tar.
Ekmev explanation hya manasane zopet Swapna pahile.. Panee pyayala (nakalat) ani ardhavat zopet kharech mulachya tondavarun haat firawala.
Mhanaje he chirfad karayachi mhanun nahi takalele..
Mala kisse vachayala avadatat.

अतुलपाटील
तुम्ही एकलेला किस्सा पण डेंजर आहे.

खरे खोटे सोडा, पण रात्री अंधार वाटू नये म्हणून कुणी दोन झोपलेल्या माणसांच्या मधे पणती लावून झोपतं का? ..... काहीही...!!!

खरे खोटे सोडा, पण रात्री अंधार वाटू नये म्हणून कुणी दोन झोपलेल्या माणसांच्या मधे पणती लावून झोपतं का? ..... काहीही...!!!>>आंबटगोड अहो व्यवस्थित वाचा.. कुठेच असं लिहिलेलं नाही कि दोघांच्या मधे पणती लावून झोपले अस..

किस्सा मस्त.. भास ठिके पण तिघांनाही एकत्र भास..योगायोग असावा तरी किती..

सस्मित Happy
लाईट बंद केल्यावर गडद अंधार वाटू नये म्हणून अगदी छोटी पणती तेवत ठेवली होती; मुलगा आम्हा दोघांच्या मध्ये, घाईत हे वाक्य मी मुलगा 'व' आम्हा दोघांच्या मध्ये...असं वाचलं!

लाईट बंद केल्यावर गडद अंधार वाटू नये म्हणून अगदी छोटी पणती तेवत ठेवली होती. मुलगा आम्हा दोघांच्या मध्ये, आणि मांजरीचे पिल्लू त्याच्या पायात झोपले होते. >>>>>आंगो हे असे आहे. बाकी किस्सा भीतीदायकच आहे.

कथा कोणत्या व प्रत्यक्ष अनुभव कोणते हे कधी कधी समजत नाही. अमानवीय ठीक आहे फक्त ते अमानुष असू नये. जगभरात असे अनुभव येताना दिसतात. अद्याप त्याला वैज्ञानिक आधार नाही.मेंदुच्या संशोधनात असे प्रयोग केले जातात. कधी ते अतर्क्य वाटतात.

घाटपांडे सर तुम्हाला किती माहिती आहे हो विज्ञानाविषयी? तुमचा शास्त्रज्ञ न्यूटन म्हणून गेलाय कि त्याला वाळूच्या कणाइतकही ज्ञान नाही. असे कितीतरी विषय अजून विज्ञानाला उमगले नाहीत. तर या अशा अपुऱ्या विज्ञानाच्या बेसवर तुम्ही इतर क्षेत्रांना कशाला जज करता? अनुभव वाचा आणि एन्जॉय करा. नाही पटलं तर सोडून द्या कशाला त्या लंगड्या विज्ञानाचा टेम्भा मिरवताय? वैज्ञानिक आधार नाही ह्याव नी त्याव.

>> असे कितीतरी विषय अजून विज्ञानाला उमगले नाहीत. तर या अशा अपुऱ्या विज्ञानाच्या बेसवर तुम्ही इतर क्षेत्रांना कशाला जज करता?

घाटपांडे सरांची मते हि या धाग्याला विषयाला अनुसरून नसली तरी ती चुकीची नाहीत. विवेकवादाचा पायावर उभारणी असलेल्या विज्ञानाने आजवर असंख्य गूढ प्रश्नांची बुद्धीप्रामाण्यवादी उकल केलेली आहे. जी क्षेत्रे अद्याप अज्ञात आहेत ती सुद्धा भविष्यात ज्ञात होतील यात शंकाच नाही.

पण दुसरी बाजू: या धाग्याच्या विषयासंदर्भात बोलायचे तर केवळ थ्रील आणि मनोरंजन म्हणून हे अनुभव/गोष्टी वाचायला ऐकायला छान वाटतं. मनाची ती पण एक गरज आहे. अन्यथा आयुष्य फार रुक्ष होईल. त्यामुळे व्यक्तिश: मला या कथा वाचायला छान वाटते. पण त्याचबरोबर काही कथांमध्ये घटना सांगून झाल्यावर त्या घटनेमागचे "वैज्ञानिक" नावाखाली पूर्णपणे अवैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा धार्मिक कृत्याची जोड देऊन "असे केल्याने हे प्रकार थांबले" वगैरे म्हटले जाते. ते मात्र अस्विकारार्ह आहे.

अनुभव आला. सांगितला. ऐकला. गम्मत वाटली. खलास. बस्स इतकेच हवे. त्यातच खरी मजा आहे. Happy

तर चला अजून अनुभवकथन येऊ द्या....

"पण त्याचबरोबर काही कथांमध्ये घटना सांगून झाल्यावर त्या घटनेमागचे "वैज्ञानिक" नावाखाली पूर्णपणे अवैज्ञानिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा धार्मिक कृत्याची जोड देऊन "असे केल्याने हे प्रकार थांबले" वगैरे म्हटले जाते. ते मात्र अस्विकारार्ह आहे."
हे विधान पटले नाही, मि तरि इथे कोणाला असे स्पष्टीकरण देताना अनुभवले नाही , तसेच इथे लिहिणारे माझ्यामते कोणीही वैज्ञानिक नाहीत, किवा नसावेत, अगदी घाट्पान्डे सुद्धा नसावेत, असो . . .

माझे काका नगरला भाड्याच्या घरात नवीन शिफ्ट झाले तेव्हाचा किस्सा ... काळ १९७०
आम्ही आपल्या खोलीत टीव्ही पाहत बसलो होते. बायको म्हणाली खूप रात्र झाली आणि मी झोपायला जात आहे आणि तुम्ही पण झोप आता. एवहडे बोलून ती बेडरूम कडे झोपलायला गेली. मी मुलाला म्हणालो तू पुढे जा आणि झोप मी आलोच. सहज घड्याळाकडे नजर टाकली तर १२:२० झाले होते. त्यांच्या मुलगा बेडरूमपर्यंत जाऊन परत आला आणि म्हणाला मला भीती वाटतेय मी एकटा नाही जाणार तिकडे तुम्ही पण चला. काका त्याला हसले आणि म्हणाले घरातल्या घरात काय घाबरतोस ... असा म्हणून ते पण त्याच्या बरोबर तिथे गेले. तिथे गेले तर त्यांना बाई पलंगावर बसलेली दिसली. त्यांना वाटले आपली बायको आहे म्हणून ते म्हणाले कि झोपायचे सोडून अशी अंधारात का बसली आहे आणि ते पण केस मोकळे सोडून. परंतु काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून ते जवळ जायला लागले तसं शेजारच्या attached बाथरूम मधून त्यांची बायको बाहेर आली आणि विचारले कि अंधारात कोणाशी बोलताय ... त्यांना २ मिनिट शॉक बसला कारण पलंगावर कोणी नव्हतं. ते जास्त काही ना बोलता मुलाला घेऊन झोपले कसे बसे. नंतर ३-४ दिवसांनी त्यांच्या लहान मुलांनी त्यांना परत उठवले आणि सांगितले कि घराच्या gate पाशी कोणी बाई रडत उभी आहे ... त्यांच्या अंगावर काटा आला ... त्यांनी काही दार उघडून पहिले नाही पण नंतर लगेचच ते घर बदलले ...

आजही त्यांना प्रश्न पडतो ती बाई कोण होती आणि त्यांच्या मुलालाच का दिसायची

Pages