मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचारवांती उर्फ मंदार जोशी,
अजूनही मला अरेतुरे करून बोलायची लायकी अन ऐपत तुम्हाला आलेली नाही, याची अक्कल आली नाहिये का? की आपले खानदानी असभ्य संस्कार दाखवल्याशिवाय राहवत नाही तुम्हाला?

बरं चित्र सोडून देऊ या. देहबोली तितकीशी योग्य वाटली नाही. पण हा माझ्या पूर्वग्रहदूषित नजरेचा परिणाम असू शकतो.

<<पण राजधानीत इतका गोंधळ चालू आहे तर केंद्र काही करू शकत नाही का? की ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे तिथेच केंद्र हस्तक्षेप करणार? >> ह्याबद्दल काय ?

बाकी, वेळ काढून नागरिकशास्त्राचं पुस्तक खरंच वाचावं लागणार आहे.

णि तिथले LG आणि श्रीमान जेटली ह्यांचे संबंध व्यक्त करायला हे चित्र पुरेसं बोलकं असावं.>> कालचा राहूल आणि मोदींचा फोटो पाहिला का? त्यांच्यात कसे संबंध आहेत ते ही सांगा. तुम्ही बहुदा टॅरोकार्ड सारखेच फोटोरिडिंग मास्टर दिसता. Happy

नंदिनी, छे त्याला अभ्यास करावा लागेल. मग मुक्तछंदात कसे लिहिता येईल.

असे पोस्टर्स लावले होते जागोजागी. आपलाच पैसा खर्च करून. >>. पूर्ण देशासाठीचे ते धोरण. आधी १५ वर्ष तुमचेच राज्य होते दिल्लीत हे तुम्ही १६ मे च्या त्सुनामीत विसरला की काय?

पुढची पाच वर्षे : इतकी वर्षे तुमचेच राज्य होते, त्या चुका दुरुस्त करायला वेळ लागणार हीच टेप ऐकायला लागणार नाही अशी आशा आहे.
ही टेप आधी राजनाथ सिंग यांनी वाजवली. : अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावरून यंत्रणेत आलेली सुस्ती दूर करायला वेळ लागेल म्हणून. (गेल्या काही महिन्यांत इंडियन मुजाहिदीनचे अनेक मोहरे पकडले गेल ते कसे? वाघाने डरकाळी फोडली की वानर आपसूक झाडावरून गळून पडतात तशीच अबकी बारची डरकाळी ऐकून अतिरेकी आपसूक पकडले गेले.)
(मा. राजनाथ सिंग यांचा रोख गुजरात पोलिसांचे अनेक वरिष्ठ नेते गजाआड इ. असल्याने किंवा आपल्याच धन्याविरुद्ध बोलायला लागल्याने आलेल्या सुस्तीकडे असल्यास कल्पना नाही)
आता ही टेप केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल (भाजप नेते /मंत्री वेदप्रकाश गोयल यांचे चिरंजीव) वाजवत आहेत.
या धाग्यावर ही टेप किती वेळा वाजवली जाते याची गणना धागाकर्त्या सातींनी ठेवायला सुरुवात करावी.

कालचा राहूल आणि मोदींचा फोटो पाहिला का? >> नाही पाहिला. असेल तर टाका इथे.
तुम्ही बहुदा टॅरोकार्ड सारखेच फोटोरिडिंग मास्टर दिसता.>> वैयक्तिक टिप्पणीची गरज नसावी.
आधी १५ वर्ष तुमचेच राज्य होते दिल्लीत>> मी काॅँग्रेस समर्थक नाही.

वैयक्तिक टिप्पणीची गरज नसावी >>. बरोबर. अजाणता चुक झाली. माफ करा ! (पण तुम्ही ते मजेशीर लिहिले होते म्हणून राहवले नाही)

Lol इतरांचे जाऊद्या, मयेकर अहो तुम्ही असे पोस्ट लिहिता. अजून एक महिनाही झाला नाही आणि लगेच सगळे बदल हवेत.

की भाजपा अपप्रचार करत आहे इतके वर्ष तुमचीच सत्ता होती असा?

गिव्ह हिम २ इयर्स. त्यात भरपूर बदल दिसायला हवेत. हे वाक्य माझ्यामते मी पाचवेंदा लिहितोय. (आपलं उगा गणना ठेवण्यासाठी हे वाक्य )

पण इथे सगळ्यांना जाऊद्या की घरी, वाजले की बारा अशी घाई झाली आहे.

धाग गंडला आहे ( काउंट २ )

>>अजून एक महिनाही झाला नाही आणि लगेच सगळे बदल हवेत>>

अगदी अगदी, माझ्या एका मित्राने मार्मिक टिप्पणी केली होती. "अरे मेरे घर का बाथरुन रिनोव्हेट करनेका तो उसकु महिना लग गया और इनकु अभ्भी के अभ्भी सबकुछ मंगताय."

Lol

Uhoh
मी चटपट बदलाबद्दल काहीही लिहिलेले नाही. (आर्थिक क्षेत्रातील निर्णयांबद्दलही नाही)
मागच्यांना दोष देण्याबद्दल लिहिले आहे.

<धाग गंडला आहे ( काउंट २ )>

सहमत : धाग्याचा उद्देश मोदी सरकारची रोज काकड आरती ते शेजारती करणे आ उद्देश्य साध्य होत नाही आहे.

उगाच रिझर्व्ह बँकेच्या कृती मोदी सरकारच्या नावावर खपवाव्या लगताहेत.

मागच्यांना दोष देण्याबद्दल लिहिले आहे. >> अहो मग मागच्यांनी दिल्लीतली वीज पॉलिसी (एक उदाहरण) नीट ठेवली असते (आणि परत वर ते वादळ आले नसते) तर वीज प्रॉब्लेमच निर्माण झाला नसता हे मी म्हणत आहे.

काकड आरती >> Lol अहो मी काँग्रेसी नाही. आमचे विकूउल्लाखान रोज सोनिया चाळिसा म्हणतात आहात कुठे. मोदीला तुम्ही शिव्याद्या मला फरक पडत नाही ! पण त्या विनाकारण असतील तर मी प्रत्यूत्तर देईन.

असो !

बाकी तुमची मोदीवरची निगेटिव्ह भक्ती माझ्या न असलेल्या पॉझिटिव्ह पेक्षाही जास्त आहे ह्याची कल्पना आहे मला. Light 1

Happy

गिव्ह हिम २ इयर्स. त्यात भरपूर बदल दिसायला हवेत. >> हा विश्वास तुम्हाला का वाटतोय? कारण तुमचा गुजरातमध्ये वारेमाप विकास झालाय ह्या गोष्टीवर विश्वास आहे. पण आमचं घोडं अजून त्याच वेशीत अडकलंय Happy

फोटो टाकताय ना? उत्सुकता.

फोटो टाकताय ना? उत्सुकता. >> टाईम्स पाहा कालचा,त्यात कदाचित मिळेल. काल आर्टिकल होते. फोटो नसला तरी निदान आर्टिकलने छबी तयार होईल.

कारण तुमचा गुजरातमध्ये वारेमाप विकास झालाय ह्या गोष्टीवर विश्वास आहे >>

नाही ये. तुम्हाला तसे वाटते. वारेमाप नाही, पण विकास झाला हे माहिती आहे, प्रत्यक्ष पाहिले आहे म्हणून खात्री वाटते. वारेमाप हे आपले शब्द आहेत.

बाकी माझी खात्री तुम्हाला कशाला हवी? माझ्या त्या धाग्यावरही मी लिहिले होते मी गुजरात बद्दल नाही तर युपीए बद्दल लिहितो. तेच उत्तर घ्या

विचारवांती उर्फ मंदार जोशी,
अजूनही मला अरेतुरे करून बोलायची लायकी अन ऐपत तुम्हाला आलेली नाही, याची अक्कल आली नाहिये का? की आपले खानदानी असभ्य संस्कार दाखवल्याशिवाय राहवत नाही तुम्हाला?

विचारवंत | 10 June, 2014 - 17:00
इब्ल्या, संस्कार या शब्दाचा आणि तुझा काय रे संबंध? माझ्या आणि माझ्या खानदानातल्या कुणाच्याही पायताणाशीही बसायची तुझी आणि तुझ्या खानदानातल्या कुणाचीही लायकी, ऐपत, आणि औकात नाही हे तुझ्या लक्षात आलेले नाही का? माझ्या नादाला लागले तरच मी बोलतो समजले नाही का तुला? माझी खोडी काढणे सोडून दे मग मग अरे तुरे आणि अहो ची भानगडच उद्भवणार नाही. काय?
>>>

ह्याचा अन मोदी सरकारच्या मूल्यमापनाचा काय संबंध बुवा ?::अओ:

ही बातमी वाचली आहे. आश्चर्य नाही वाटलं. भाजप आणि काॅँग्रेस आतून एकच आहेत. नाहीतर ६५ वर्षांत ही वेळ आली नसती.
(चला, आता विचारवंतांच्या हसर्या बाहुल्या येणार)

मिर्ची, तुमच्या टिप्पणीचा आणि त्या बातमी चा काय संबंध. नंदिनींची पोस्ट पुरेशी ठरावी. सार्वजनिक संमारंभात राजकीय (किंवा एकंदर) शिष्टाचार म्हणून हात मिळवले तर भाजप आणि काँग्रेसआतून एकच आहेत? वाह. काय पण लॉजिक आहे. अशा पोस्ट वाचल्यावर हसू नाही आले तरच आश्चर्य.

<< वारेमाप नाही, पण विकास झाला हे माहिती आहे, प्रत्यक्ष पाहिले आहे म्हणून खात्री वाटते.>> पण आकडे काहीतरी वेगळंच सांगत आहेत. जे मिडियाने आपल्याला दाखवलं नाहीये.
दिवाणखाना एकदम सुशोभित आहे....आत मात्र ठिगळं !

<<सार्वजनिक संमारंभात राजकीय (किंवा एकंदर) शिष्टाचार म्हणून हात मिळवले तर भाजप आणि काँग्रेसआतून एकच आहेत? >> फोटोवरून नाही म्हटलं. अनेक दाखले देता येतील.

Definitely an AAPtard

>>> फोटोवरून नाही म्हटलं. अनेक दाखले देता येतील.>>>

तुम्ही बराच वेळ फोटोची टेप लावली होती आणि फोटोवरुन लोकांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत ते जोखता येते अशा अर्थाच्या पोष्टी सातत्याने टाकत होतात. आता म्हणताय फोटोवरुन नाही म्हटलं. अवघडच आहे सगळं ब्वॉ.

<<बरं चित्र सोडून देऊ या. देहबोली तितकीशी योग्य वाटली नाही. पण हा माझ्या पूर्वग्रहदूषित नजरेचा परिणाम असू शकतो.>>
हे दिसलं का??

हो हो दिसलं ना Happy पण तरी पुढे तुम्ही मोदी आणि राहुलचा फोटो मागत राहिलात. ते कशाला? जौद्याहो. पुढचं बोला.

एकीकडे चित्र सोडून देऊ म्हणायचे आणि दुसरीकडे उत्सुकतेच्या नावाखाली फोटो मागायचा. चालुद्या. मी पण व्यग्र आहे सद्ध्या.

१५ वर्ष सत्ता दिल्लीत असताना किती वेळ लाईट जात होती ते जरा भाजप्यांना विचारा बरे.. बिनडोक पियुष गोयल आता आरोप करत आहे मुर्खासारखे.. स्वतःला वीज मॅनेज करता येत नाही आणि दुसर्यांना तोंड वर करुन बोलायला लाज कशी वाटत नाही निर्लज्ज लोकांना हेच कळत नाही.. स्वतःला आले नाही की दुसर्यामुळे झाले बोंबलायचे
आणि दुसर्याचे श्रेय मात्र स्वतःकडे बळजबरीने लाटायचे हेच भाजप्यांचे आहे

बदायु प्रकरण :- मोदी चे मौन
हिमाचल प्रकरणः- मोदीचे मौन
पुणे प्रकरण :- मोदी चे मौन
दिल्लीचे वीज प्रकरण:- मोदीचे मौन

अश्या गोष्टींवर एरवी विरोधी पक्षात असताना बाकावर बसुन ठो ठो बोंबलणारे तोंड मौन कशी राहतात ????

आणि तोंड यांची उघडतात कुठे ???? तर

विजय प्रकरण :- बीजेपी स्वतः तपास करणार सत्यपाल कडे जवाबदारी सोपवली .. ( बीजेपीचा आमदार पोलीसांना धमकी देत होता .. ऐसा बवाल मचाउंगा के देख ते रह जाओगे)
मुझ्झफ्फर नगर प्रकरण :- बीजेपी ने पोलीसांना २४ तासांचा अल्टिमेट दिला . ..

का.....?? बदायु प्रकरणात बवाल करता आला नाही..... पुणे प्रकरणात बवाल करता आला नाही.. दिल्ली च्या वीज प्रकरणात बवाल करता आला नाही.......अश्या वेळॅला तोंड शिवली जातात का ?>>>

बदायु प्रकरण :- मोदी चे मौन<<<

आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या प्रकरणाची दखल घेतली जाण्याआधी केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले होते. जनतेने अखिलेश यादव व त्यांच्या पक्षाला निवडून दिलेले असल्याने 'केंद्र सरकार' ह्या भूमिकेतून प्रथम स्थानिक सरकारला आदेश देणे व त्याचेही पालन झाले नाही तर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतानाच स्थानिक सरकारला सत्तात्याग करण्यास जाहीररीत्या सुचवणे हे मार्गच योग्य आहेत. हे करायला 'केंद्र सरकारतर्फे' नियुक्त असलेले गट / समूह / व्यक्ती पुरेश्या आहेत. देशात कुठेही काहीही झाले (जे झाले ते अत्यंत निंद्य होते ह्यात वादच नाही, कृपया विपर्यास केला जाऊ नये) तर त्यावर मोदींनीच स्टेटमेंट द्यावे किंवा कारवाई करावी ही अपेक्षा गैर आहे. Happy

ज्या यंत्रणा सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेल्या आहेत त्यातील सर्वात पहिली यंत्रणा स्थानिक राज्यसरकार ही आहे. ती प्रभावी ठरत नसेल तर पुढचे उपाय केले जातात. असे असताना मोदींनी मौन पाळले ही टीका करणे म्हणजे आजवर अखिलेश यादवांनी नुसता दिव्य उजेडच पाडलेला आहे हे नकळत मान्य करण्यासारखे आहे.

इब्लिस व विचारवंत ह्यांची वर झालेली चर्चा ह्या धाग्यावरून नष्ट झाल्यास (म्हणजे त्यांनी स्वतःच संपादीत केल्यास) खूप चांगले होईल असे वाटते. Happy

Pages