मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिद्द नावाचा एक धडा होता. त्यातल्या मुलाला जन्मतःच हात नसतात. पण जिद्दीने या व्यंगावर मात करून लिहिणे, चित्र रंगवणे इ. तो सगळे पायांच्या बोटात पेन/ब्रश धरून शिकतो.

सोनाली सिंहिणीचा धडा असल्याच आठवतंय. पण नक्की मला होता की नाही खात्री नाही.
जयप्रकाश नारायण यांचा पाचवीला पहिलाच धडा होता. आणि त्याचं नावही 'पहिला धडा' असेच होते. Happy
नाना शंकर शेठ यांच्यावरही एक धडा होता आणि त्या धड्यानंतर 'निर्झर' नावाची एक दोन्ही पानभर निर्झराचे चित्र असलेली कविता होता.

चैतन्य, हो हे सगळे धडे आम्हालाही होते.

मला कवी मुक्तेश्वर आणि वामन पंडित (नाव बरोबर आहे का?) यांच्या दहावीला होत्या त्या कविताही आवडायच्या.

'उद्धवा शांतवन कर जा, त्या गोकुळवासी जनांचे' ही कविताही होती दहावीला.

अजुन एक मशीन ची कथा होती...मानेवर ठेउन ती बाई चालत जाते मशीन विकायला,,...आणि ती मशीन पडुन मोडते...ती बाई गरीब असते...भाषा वेगळीच होती धड्यातली.... "तुह्यं कोन राह्यलं " ..."काहुन बोल्ली "... अशी काहीशी..... <<< हो, मला आठवतोय तो धडा. अकरावी/बारावीत होता. त्या नायिकेचे नावही तोंडासमोरच आहे पण आठवत नाही.
चुडीवाले बाबा मराठीत होता का? मला वाटत होते हिंदीत होता.
सातवीत 'अलीबाबा आणि चाळीस चोर' इंग्रजीत होती.

हो!

मला सगळेच धडे वाचल्यासारखं वाटते आहे. बहुतेक दादाची पुस्तकं पण मी वाचत बसायचे त्यामुळे ओळखीचे वाटते आहे सगळं.

स्वरूप पहा विनोबा भाव्यांचा ना ?>> हो पराग. Happy

गजानन, त्या उदाहरणामुळेच लक्षात राहिलेला.

बा द वे, आता वाचताना प्रकाश, प्रकाशचा धडा आठवत होता. ते चित्रदेखील.
लिहिणार होतोच तोवर पाहिलं की गजाननला देखील तोच धडा आठवला आहे. Happy

जिद्द बहुतेक दुसरीत होता.
गिलबिले आडनाव ना त्या व्यक्तीच?

शिवाय ईच्छा तिथे मार्ग नावाचा एक धडा होता.
प्राथमिक शाळेतच.
ट्रेन मध्ये गोळ्या बिस्कीटे विकुन शिकण्यासाठी पैसे कमावणार्‍या मुलाची गोष्ट.

अलिबाबा चाळीस चोर इन्ग्रजीत होता.
मन्थरा विणकर चा देखील इन्ग्रजीतच होता.

झकास, इच्छा तिथे मार्ग आठवला.. त्या मुलाचे नाव राजू असते का? Happy

'भाकरीची गोष्ट' हाही एक धडा होता. सुगीचे दिवस, एकीचे बळ, कोणासाठी बाळासाठी (हा धडा म्हणजे तोच वर कोणीतरी लिहिलंय तो हिरकणीचा) तसेच 'सांग ना ग आई' ही कविता (दिवसभर पावसात असून सां गं ना ग आई, झाडांना खोकला कसा येतच नाही. असे काहिसे प्रश्न होते.)

तिसरीत एक 'मुळांची तक्रार' नावाचा धडा होता. चौथीला 'चला चंद्रावर'. Happy

बिल्लु नावाच्या मुलाची एक गोष्ट होती..पाचवी का सहावीला..तो मुलगा पेपर टाकायचा आणि शिकयचा अशी काहीशी..आणि दादु नावाचे व्यक्तिचित्रण पण होते

तिसरी चौथीत 'असे झुंजले वायुपूत्र' नावाचा युद्धाबद्दलचा धडा होता..

'जिकडे तिकडे पाणीच पाणी' आणि 'झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला' कविता आठवतात का ?

सुगीचे दिवस वरचं चित्र आठवलं.

एक अशोक सराफ चा जूना पिक्चर होता मराठी, तो मला उगीचच (नववी मधल्या) स्मशानातील सोनं वरुन काढलाय कि काय असं वाटायचं .....

'असे झुंजले वायुपूत्र' <<< म्हणजे तोच का ज्याच मिलिटरी युनिफॉर्म मधल्या जवानांची चित्रं होती. हेलिकॉप्टर्स चा उल्लेख होता? नसेल तर मग हा कोणता? या धड्यातले 'तातडीने', 'इस्पितळ' वगैरे शब्द तेंव्हा अगदी वेगळे आणि पहिल्यांदा ऐकल्याने चांगलेच लक्षात राहिलेले.

'जिकडे तिकडे पाणीच पाणी' आणि 'झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला' कविता आठवतात का ? <<< हो, या दोन्ही कवितांबद्दल मी या पोस्टमध्ये लिहिलं होतं. Happy

मन्थरा विणकर चा देखील इन्ग्रजीतच होता.>>>> मंथरक.. तो वरदान म्हणून एक जास्तीचं डोकं आणि दोन हात मागून घेतो. लोक त्याला राक्षस समजून मारतात.

बिल्लु नावाच्या मुलाची एक गोष्ट होती..पाचवी का सहावीला..तो मुलगा पेपर टाकायचा आणि शिकयचा अशी काहीशी.>>>> बल्लू. हा बहुधा मधु मंगेश कर्णिकांचा धडा होता.

अगो, पराग, गजानन, तुम्ही माझ्या अभ्यासक्रमाचे नाही आहात (वाईट वाटलं, धक्का बसला इत्यादी)

स्वाती आणि वरदाच्या पोस्टी वाचून जरा (खरंतर अगदी किंचीतच) हायसं वाटलं.

मला शालेयच काय महाविद्यालयीन अभ्यासक्रमातलंही काही म्हणजे काहीही आठवत नाहीये.

मी एक पक्षीण आकाशवेडी दुजाचे मला भान नाही मुळी..>>> ही कविता आम्ही 'ओ मेरे सपनोंके सौदागर'च्या चालीवर म्हणायचे ते आठवलं. Wink

चला चंद्रावर आठवला. रॉकेटदादा अंगणात उभा होता अशी काही सुरवात होती. पाचवीला आजीने पाहीलेला चोर असा धडा होता आणि एक पोपटावर धडा होता त्याच नाव बहुदा 'माझा हिरवा मित्र'. तिसरीला एक हत्तीचा धडा होता त्यात त्याला पाण्यात डुंबायचे असते पण नदीत पाणीच नसते अशी गोष्ट होती.

म्हणजे तोच का ज्याच मिलिटरी युनिफॉर्म मधल्या जवानांची चित्रं होती. हेलिकॉप्टर्स चा उल्लेख होता >>>> गजानन, हो तोच तो.. Happy

गजानन, ती पोस्ट पाहिलीच नव्हती मी !

आणि ती एक तीन भावांची गोष्ट होती.. वडिल तीन मुलांना काही पैसे देतात आणि त्या पैशांमधून काही विकत घेऊन एक खोली भरून टाकायला सांगतात.. एकजण गवताचे भारे आणून टाकतो, एक अजून काहितरी.. सगळ्यात धाकटा उदबत्त्या विकत घेऊन त्यांच्या सुगंधाने खोली भरून टाकतो.. 'मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण.' असं काहितरी होतं..
'तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले' ची गोष्टही होती.

कुठल्याशा एका कवितेत्ली `ते रावे हेरावे ' एवढच आठवतय. ती कुठल्या कवितेतली ओळ ते काही आठवतय का कोणाला ? माझ्यापेक्षा लहान असलेल्या मैत्रिणीला `एंजिनदादा एंजिनदादा काय करता ' अशी एक कविता होती.

घाटातली वाट आणि ते अमर हुतात्मे झाले ह्या कविता आठवतात का कोणाला ?
भुमिगत नावाचा एक धडा होता...
शिवाय लोकमान्य टिळक तुरूंगात असताना त्यांचे खायचे हाल होत असलेले पाहून तिथे काम करणारा एक जण रोज त्यांना गुळ खोबरं आणून देत असे. मग टिळकांनी त्याला हे उष्ण होत आहे हे सांगितल्यावर तो त्यांना बदाम आणि खडीसाखर देऊन लागला. नंतर टिळकांनी आपली पुस्तकं ठेवण्यासाठी एक पेटी बनवून घेतली तेव्हा ती बनवणार्‍या सुताराने झाकणाच्या आत 'दामू सुतारा कडून दंडवत' असा संदेश लिहून पाठवला होता..
हे सगळं पण त्या भुमिगत धड्यात होतं की दुसर्‍या ते मात्र आठवत नाहीये.

पराग, तुला किती आठवत आहे, बहुतेक तुमच्या बॅचला जास्त मेहनत घेऊन शिकवलं असेल Wink

आम्हाला तेचं शिक्षक असून एखाद दोन उल्लेख आठवत आहेत.

तू मागे मसापचा उल्लेख केला होतास, तेव्हा 'उपेक्षितांचे अंतरंग' पुस्तक होतं का आणि एक कवितासंग्रह - कुसुमाग्रजांचा होता का ?

घाटातली वाट काय तिचा थाट, मुरकते गिरकते लवते पाठोपाठ.
निळी निळी परडी कोणी केली पालथी, पाने फुले सांडली वरती आणि खालती.

प्राजक्ता.. आमची बॅच होतीच सिन्सीयर.. Wink

मसापला एक ते माणदेशी माणसं पुस्तक होतं आणि दुसरं ते कवितांचं पुस्तक होतं 'भावलेणी' नावाचं... फार डेंजर डेंजर कविता होत्या त्यात !!

ओह मग उपेक्षितांचे अंतरंग दुसर्‍या कोणत्या परिक्षेला होतं ? ते पुस्तक आवडीने वाचल्याचं आठवतयं Happy

ते रावे हेरावे<कुठल्याशा एका कवितेत्ली `ते रावे हेरावे ' एवढच आठवतय. ती कुठल्या कवितेतली ओळ ते काही आठवतय का कोणाला ?>

या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या
मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा

(या कविता संगीतबद्ध होऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्या आकाशवाणीवरून वाजवल्या जातात म्हणूनही कदाचित लक्षात राहिल्या.)

'सांगकाम्या बाळु' चा पण धडा होता..त्यात बाळु स्वत: चे डोक ना वापरता लोक जे सांगतीन ते एकायचा..आणि एकदा तो मांजरीचे पिल्लू केळ्याच्या पानात बांधून आणतो.

सांगकाम्या बाळु' चा पण धडा होता..त्यात बाळु स्वत: चे डोक ना वापरता लोक जे सांगतीन ते एकायचा..आणि एकदा तो मांजरीचे पिल्लू केळ्याच्या पानात बांधून आणतो.>>>>>>>>>. आणि दोरीला बांधुन जिलेब्या....

निळी निळी परडी कोणी केली पालथी, पाने फुले सांडली वरती आणि खालती <<< या ओळी वाचून आठवले की ही कविता आम्हाला नाचून म्हणायला शिकवली होती.

आणखी नाचून म्हणायल्या शिकवलेल्या कविता म्हणजे -
उघड पावसा ऊन पडू दे
उडू बागडू हसू खेळू दे
---------
नाच रे मोरा
आंब्याच्या वनात
(ही कविता तर आम्हाला टिपर्‍यांवर शिकवली होती! काय उत्साही आणि हौशी गुरुजी होते आमचे...)
---------

उघड पावसा ऊन पडूदे आणि नाचरे मोरा आम्हाला पण होती म्हणजे काही कविता,धडे evergreen म्हणून रिपीट होत असणार कारण यंदा १०वी होऊन मला चक्क तीस वर्षे होतील जूनमध्ये.

Pages