खेकड्यांची कलाकुसर

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 November, 2011 - 06:45

कोणत्याही समुद्रकिनार्‍यावर गेलो की ओहोटी असेल तर किनार्‍याच्या ओलसर वाळून हमखाच खेकड्यांची बिळे दिसतात. मला ही बिळे पहायला नेहमीच आवडतात कारण त्या बिळांच्या बाजूला सुंदर नक्षीकाम तयार झालेले असते. हे खेकडे अगदे छोटे असतात. मधूनच ते तुरु तुरु किनार्‍यावर चालतानाही दिसतात. ते बिळ खणताना जी वाळू वर फेकतात त्याने सुंदर डिझाईन तयार झालेली असते आणि त्या डिझाईनला कोणते ना कोणते रुपही दिसून येते एक दिवस आम्ही सकाळी मॉर्नींग वॉकला समुद्रावर गेलो आणि गर्दी नसल्याने निवांत हे फोटो काढले.

१) खेकड्याचे बिळ

२) मला ही दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी वाटली.

३) समुद्राच्या लाटांचे वलय आणि खेकड्यांनी केलेले नक्षीकाम यामुळे हे जंगल तयार झाले आहे.

४) साडीची किनार

५) फुलपाखरू

६) जंगल

७) सुर्य किंवा चक्र

८) निवडूंगाचे झुडूप
'

९) ही खेकड्यांची आवडती डिझाईन दिसते.

१०) झुडूप किंवा ताटाभोवतालची नक्षी

११) ह्याला काय म्हणायचे ?

१२) मॉडर्न आर्ट

१३) ताड किंवा नारळाचे झाड

१४) ह्यात मला जंगल आणि त्या जंगलात हत्ती त्याच्या पिल्ला सकट दिसत आहे.

१५) कलाकार

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

११) ह्याला काय म्हणायचे ? >>> सेव्हन अपच्या कार्टुनचा चेहरा Lol
१४) ह्यात मला जंगल आणि त्या जंगलात हत्ती त्याच्या पिल्ला सकट दिसत आहे >>> जबराट नजर
अगदी खादीग्रामोद्योगमधील कलाकुसर आठवली. Happy

जागू, तू खरी रसिक. आम्ही समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर हे खरेतर पाहतो पण असा विचार कधीच आमच्या मनातसुद्धा आला नाही.आता तुझ्या नजरेने बघताना खरेच त्यात भन्नाट नक्षीकाम दिसतंय ग!
पण एक विचारू त्या कलाकाराला जीवदान मिळालं ना ग? Proud

मस्त! अलीबागला गेलो होतो, तेव्हा तिथे न जाता नागाव बीच वर गेलो. संध्याकाळी परतताना पाहीले तर वाळुत पिट्ट्या पिट्ट्या खेकडुल्यांनी बरीच बिळे खोदली होती. त्यातले एक बाहेर आले, त्याला पकडायला गेले तर तर ते धुम पळाले.:फिदी: आता परत जाऊ तेव्हा मग तुझ्या सारखे फोटो काढणार. तुझी नजर पारखी आहे, बारकाईने पाहीले तर खरच हत्ती दिसतोय.