T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टी-२०मधे इतर फॉर्मॅटसारखं प्रत्येक सामन्यात 'स्ट्राईक रोटेट' करणं याला खरंच इतकं आत्यंतिक महत्व आहे का ? >> हे तुम्ही अगदी सॅमीसारखे बोललात बाकी Happy jokes apart, Ajamal's over was bad, he switched from his usual style for unknown reasons and paid handsome price. Will it always happen ? My guess is as good as yours. टी-२० हा सतत बदलता खेळ आहे, जे आज चालले ते उद्या चालेलच असे नाही त्यामूळे बदलण्याची तयारी नसेल तर मागे फेकले जाणार.

<< हे तुम्ही अगदी सॅमीसारखे बोललात बाकी >> हें कौतुक आहे कीं माझी टर उडवणं ? कांहींही असलं, तरीही टी-२०मधे 'स्ट्राईक रोटेटींग'ला अवास्तव महत्व देण्याचं कारण नाही, हें माझं ठाम मत; अशाने धांवचित होण्यापेक्षां धोका पत्करून दोन-चार फटके मारून धांवा पदरांत पाडून घेणं अधिक महत्वाचं.
<< ...जे आज चालले ते उद्या चालेलच असे नाही त्यामूळे .... >> द. आफ्रिकेविरुद्ध भारताने हें लक्षांत घेवून केवळ फिरकीवर अवलंबून न रहातां, जास्तीत जास्त धांवांचं लक्ष्य उभं करणं महत्वाचं; एबी, ड्यूमिनी कंपनी भारताच्या फास्ट गोलंदाजीवरच नव्हे तर, कालचा वे. इंडीजचा कित्ता गिरवत, फिरकीवरही तुटून पडणार हें निश्चित. धोनीच्या नेतृत्वाची खरी कसोटी गोलंदाजीतील बदल व फलंदाजीला पूर्ण कुवतीनुसार खेळायला प्रवृत्त करण्यात आहे.

एक लक्षात ठेवा... आता अनलिमिटेड आहे पण नंतर म्हन्जे दुसर्या सेमी आणि फायनल साठी आपल्याला फक्त ४ च बदल मिळणार आहे त्या हिशोबाने आताचा संघ निवडा

हें कौतुक आहे कीं माझी टर उडवणं ? >> ते तुम्ही स्वतःला सॅमीच्या जागी पाहता किनाहि त्यावर अवलंबून आहे Happy दोन्ही नही. सॅमी ही तुम्ही म्हणालात तेच म्हणत असतो एव्हढेच.

तरीही टी-२०मधे 'स्ट्राईक रोटेटींग'ला अवास्तव महत्व देण्याचं कारण नाही, हें माझं ठाम मत; अशाने धांवचित होण्यापेक्षां धोका पत्करून दोन-चार फटके मारून धांवा पदरांत पाडून घेणं अधिक महत्वाचं. >> अवास्तव मह्त्व ? कालच्या मॅचचे उदाहरण घ्या. १२० बॉलमधे १६६ धावा. त्यातल्या १०६ (९*६ + १३*४ ) फटके मारून होत्या. बाकी सर्व एकेरी धावा होत्या असे धरून सुद्धा ३८ बॉल नुसते खेळले होते. म्हणजे जवळ जवळ ६ ओव्हर्स काहिही धावा न घेता खेळल्या आहेत. धावचित होताना धोका असतो तसाच दोन-चार फटके मारतानाही असतोच कि.

द. आफ्रिकेविरुद्ध भारताने हें लक्षांत घेवून केवळ फिरकीवर अवलंबून न रहातां, जास्तीत जास्त धांवांचं लक्ष्य उभं करणं महत्वाचं >> +१.

[ I am not getting Marathi font on my PC. Sorry]
Asamiji, I am not underestimating importance of taking singles even in T-20. The point I am making is , as in other formats, rotating strike is of no paramount importance in T-20 format. While W.I. lost almost six overs because of not taking singles, they lost TWO valuable wickets [ out of six] as run-outs, in pursuit of 'strike rotating'! What would be the result of 'cost-benefit analysis' ?

In an interview to-day, Dyumini has praised Ashwin & Mishra; That's really making me nervous !!

While W.I. lost almost six overs because of not taking singles, they lost TWO valuable wickets [ out of six] as run-outs, in pursuit of 'strike rotating'! What would be the result of 'cost-benefit analysis' ? >> Is that accurate though ? Simons was watching the ball instead of going for single after the appeal while Bravo has lost his balance and still decided to go for single (since it was last over). So there is no reason they should not have ran out. Such basic mistakes show that WI do not have culture for strike rotation. They tend not play ball without soft hand. Check out wickets of Smith and Ramdin, they went for expensive drives/sweep and threw away the wickets. So does it mean the should not have tried shots ?
Main question is what does prevent WI from strike rotation ? It is very clear that they are not trying to read pitch out for onslaught as evident from Gayle's dismissal. Rotating strike can be difference between 140 vs 160. Choose your pick ! नाहि केले तर बरेच आहे लंका, RSA नि भारतासाठी Happy

In an interview to-day, Dyumini has praised Ashwin & Mishra; That's really making me nervous !! >>Matches will be played in Dhaka which favors spin more so let's hope for best.

O.K., Asamiji , I concede.
<< WI do not have culture for strike rotation. >> But let us not, please, deprive W.I. of the credit for achieving a great victory by boldly showing faith in & adhering to their own 'culture' ! And , who knows, that may pay even against ......Lanka and then India/ SA !!!!
<< Matches will be played in Dhaka which favours spin more so let's hope for best.>> Amen !!
[ I am not comfortable batting on 'English' wickets; Why I am not getting Marathi font on my PC !]

हायला इथे तर ईंग्लिश कॉमेंट्री सुरू झाली.... स्टार स्पोर्टस ३ लावा रे.. Wink

ओये चक दे फट्टे
लक दे चड्डे
गुरु खुश करे तो नसिब खुल जाये
जाने कैसे गुल खिल जाये
गुरु भारत मिलेगा दक्षिन आफ्रिकासे
तो पाकिस्तान मिलेगा एअरपोर्ट पे ऑस्ट्रेलिया से ..

ठोको टाली

भाऊ concede वगैरे कुठे म्हणताय. चांगली विंडीज टीम सगळ्याच format मधे पुढे आली तर चांगलेच होईल म्हणून वाटते एव्हढेच.

"What happens if the match between India and SA is washed out, who qualifies? " -- Brijesh, India go through, on account of topping their group.. >> सांग सांग भोलानाथ, म्हणायचे का ? Wink T-20 साठी D-L वापरणे निर्दय वाटते. एखादा reserved day का नाहि ठेवत मह्त्वाच्या tournaments च्या final phases साठी ?

ए मराठीत बोला रे !!
इंग्लिशमधलं क्रिकइन्फोवर पण वाचता येतं..
तिथे गारा पडतायत !! (बांग्लादेशात.. क्रिकइन्फोवर नाही)

ओह ते मी वाचलं नाही.. भाऊ एकडाव माफी द्यावा..
पण त्यांच्या पिसीवर मराठी फाँट चालत नाही म्हणून तू का इंग्लिशमधे लिहितो आहेस ? आणि ते ही त्यांच्या आधीपासून ? Happy
झक्कीगिरी नाही पण इथे इंग्लिशमधल्या पोस्टी वाचायला खरच कंटाळा येतो..

त्यांच्या पिसीवर मराठी फाँट चालत नाही म्हणून तू का इंग्लिशमधे लिहितो आहेस ?>>
तेच की. Proud

बाकी पाऊस आल्यावर २०-२० ला तरी खरच एक दिवस असावा राव. कालची मॅच सॅम्युएस्लने तशी घालवलीच होती.

आज बघुया सा. अप्रिका चोकरपणा करते का आपले लोक घाण करतात. खरी चुरस. Proud

कालचे मॅच गेलनी पण घालवली... फक्त सॅम्युअल्सला दोष देऊन उपयोग नाही... १३ बॉल ३ धावा... गेल कडून अपेक्षितच नाहीत..

[ Maraathi font ajunahi rusalaach aahe maazya P.C.var ! sorry !!]

<< त्यांच्या पिसीवर मराठी फाँट चालत नाही म्हणून तू का इंग्लिशमधे लिहितो आहेस ?>> Consolation for pitiable exit of England & Australia from the World Cup!!
There seems to be no real worry about our batting against SA bowling attack. But Dhoni's captaincy , particularly his use of bowlers, will be really tested for the first time in this World Cup. AB , Dumini & Co. are likely to attack successfully our pace bowlers, as they have shown in their previous matches against much better pace attack. Will Dhoni dare to use spin against them in powerplay overs ? Will he use bowlers subjectively depending on stregnth & weakness of each batsman against spin ?
It will be very interesting to watch.
All the best India . And this time please don't bank on the 'chokers' image of S.A.!!!

१७२ चे आव्हान ...!!!

आज शर्मा खेळला पाहिजे. त्याची धडाकेबाज खेळी तर अर्धा सामना खिशात.

रनरेट आवाक्यात ठेऊन सुरुवात झाली तर कोहली शेवटापर्यंत घेऊन जाईल.

What a chase ! पहिल्या पाचांनी वाटा उचलला. धवन नि शमी ला बाहेर ठेवण्याचा निर्णय मस्त ठरला.

धोनीने तो एक बॉल नुसता ब्लॉक केला हे मस्त केले. नित्यावर कोहलीची reaction priceless होती. धोनीला किती मानतात हे पण दिसले नि कोहली कसला टीम प्लेयर आहे ते पण कळले. रैनाने शॉर्ट बॉल्स मस्त वापरले. रोहितची सुरूवात जबरा होती. स्टेन्ला मारलेला सिक्स कसला क्लास होता राव नि राहाणे पारनेलला मारलेला.

Pages