T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेटेस्ट रँकींग:
Rank Team Name Manager Points
1 Perfect Punch Swaroop Kulkarni 1247
2 Kedar Warriors Kedar Jadhav 1042
3 Galli XI Sujit Pande 1039
4 HRK Himanshu Kulkarni 843
5 Gargi winners GARGI PANDE 742
6 UDAYLN'S TEAM uday inadmar 707
7 asmi 11 Asmita Bapat 571

>>मैथ्यू ला घेतलेला परत काढला
तसे माझे स्टेनच्या बाबतीत झाले Wink

पण स्टेनला मॅन ऑफ द मॅच द्यायला हवे होते यार!

माझ्याकडे काल डुमिनी ,मॅथ्थ्युज आणी मेंडीस होते Happy
पण मायबर्ग , मोर्केल अन मॅक्कलमही होते Sad

<< मैथ्यू ला घेतलेला परत काढला >><< तसे माझे स्टेनच्या बाबतीत झाले >> टी-२० हा स्वैरपणे बागडणारा फिरता प्रकाशझोत आहे; कधीं कोणावर पडेल व कोण चमकेल सांगणं कठीणच ! Wink

अहो भाउ....... पैसे पुरायला सुद्धा हवेत.... खेळाडुंना घ्यायला... एका ला घेतला तर दुसर्याला घ्यायला पुरत नाही Happy

९९

गेल फक्त आयपीएल मधे खेळतो वाटते ............ २९ बॉल मधे अवघे १९ रन्स... ते ही टुकुटुकुच... त्याच्या समोर तर स्मिथ ने धु धु धुतले ..

यंदा द.आफ्रिकेने 'चोकर्स' हा डाग पुसून टाकण्याचा निर्धारच केलेला दिसतोय; आज पुन्हा नेदरलँड विरुद्धही विजय खेंचूनच आणला त्यानी.
इंग्लंड वि. श्रीलंका सामनाही अफलातून झाला आज.मलिंगाच्या अप्रतिम योर्करमय षटकांना सुरवातीला मान देत मग नंतरच्या षटकांत कठीण लक्ष [१८९] धडाडीने पार केलं इंग्लंडने ! हेल्स नाबाद ११० ].Hales broke loose !!

आज पुन्हा नेदरलँड विरुद्धही विजय खेंचूनच आणला त्यानी. >> खेचून आणला ? मूळात खेचण्याची वेळ आली हाच problem आहे. त्यांचा chokers tag elimination round मधे घात करतो. बॉल स्पिन होते राहिले तर परत तेच होईल बहुधा.

Prasad: "Ishant Sharma :- @Faulknar :- I know that feeling bro... Welcome to the club... Pun Intended Proud Proud :P"
19.4
Faulkner to Sammy, SIX, it's all over! Straight six to seal the game and West Indies invade the field! Goes full and straight but Sammy bludgeons it down the ground! Gayle is going beserk! I've never seen him lose his cool like this. He was toppled over by his team-mates on the way to rushing out, but once he's back up he breaks out the gangnam
19.3
Faulkner to Sammy, SIX, full toss and it has room for Sammy to pummel it just over long-off. Cleared his front leg and secures a vital hit for West Indies. Chris Gayle pulls out a mini-chainsaw!

>:D

<< कालची हेलची इन्निंग जबरदस्त होती. कसले क्रिस्प शॉट्स होते.>> खरंय. मलिंगाच्या दुसर्‍या 'स्पेल'मधे त्याचे यॉर्कर चेंडूही हेल्स इतक्या सहज व सुंदर तर्‍हेने खेळून धांवा काढत होता कीं मलींगा हा शेवटच्या षटकांतला जगातला सर्वात खतरनाक गोलंदाज आहे यावर विश्वासच बसूं नये !

त्याचे यॉर्कर चेंडूही हेल्स इतक्या सहज व सुंदर तर्‍हेने खेळून धांवा काढत होता >>>>>> विराट ची बॅटींग बघितली असेल त्याने...

सर्वात आधी मलिंगाला धु धु धुणारा..... विराट कोहलीच होता

ऑस्ट्रेलिया च्या मॅच मधे... वॉट्सन इतकी चांगली गोलंदाजी करत होता तरी त्याला २ च ऑवर्स का दिल्या ? Uhoh

शेवटची ओवर तरी त्याला द्यायला हवी होती

बांगलादेश १२ षटकांत ७६-४; भारताला जिंकणं कठीण जावूं नये असं वाटतंय.
<< Gayle is going beserk! I've never seen him lose his cool like this. >> बर्‍याच वेळीं मला जाणवलंय कीं सामन्यातील तेढ अगदीं कळसाला पोचली असनाही क्षेत्ररक्षणात किंवा गोलंदाजीत एखाद्या खेळाडूकडून अक्षम्य चूक झाली तरीही वेस्ट इंडीयन खेळाडू त्या क्षेत्ररक्षकाकडे/ गोलंदाजाकडे बघून फक्त गोड हंसतात व त्यांत उपरोध नक्कीच नसतो. मला वाटतं आनंद व्यक्त करायची संधी शोधणं हा वे. इंडीयन्सचा स्थायीभावच असावा ! Wink

<< Gayle is going beserk! I've never seen him lose his cool like this. >> बर्‍याच वेळीं मला जाणवलंय कीं सामन्यातील तेढ अगदीं कळसाला पोचली असनाही क्षेत्ररक्षणात किंवा गोलंदाजीत एखाद्या खेळाडूकडून अक्षम्य चूक झाली तरीही वेस्ट इंडीयन खेळाडू त्या क्षेत्ररक्षकाकडे/ गोलंदाजाकडे बघून फक्त गोड हंसतात व त्यांत उपरोध नक्कीच नसतो. मला वाटतं आनंद व्यक्त करायची संधी शोधणं हा वे. इंडीयन्सचा स्थायीभावच असावा >>>>>>>>>>>>>>> मी comentri मधे सान्गितलेले एकल ऑस्ट्रेलिया च्या कुणीतरी प्रेस मधे म्ह्णल होते की मला west indies वाले आवडत नाहीत का असच काहीतरी म्ह्णून बहुदा west indies वाले जास्त आनन्द साजरा करत होते.....

जेव्हा सचिन खेळत होता आणि भारत पाकिस्तान match असेल तर शोएब अख्तर वल्गना करायचा..सचिन मला खेळायला घाबरतो आणि बरच काही....आणि दरवेळेला सचिन त्याला धुवायचा- फक्त ४ ,६.मारायचा..:D

मी comentri मधे सान्गितलेले एकल ऑस्ट्रेलिया च्या कुणीतरी प्रेस मधे म्ह्णल होते की मला west indies वाले आवडत नाहीत का असच काहीतरी म्ह्णून बहुदा west indies वाले जास्त आनन्द साजरा करत होते..... >> Faulkner ने म्ह्टलेले ते. मला वाटले कि WI ने त्यांचा highest chase केला म्हणून एव्हढा जल्लोष होता.

मस्त रे वेस्ट इंडीज, Sammy. काय मस्त मैच खेचून काढलीत (ऑस्ट्रेलियाच्या कराल जबड्यातून).. Sammy च्या Match Winning १३ चेंडूत ३४ धावा.

बाद्वे, मी पण लीग जॉईन केली. माबोवरचा पहिला प्रतिसाद माझा. Happy

भोगले सांगतोय कि काल जयवर्धने आऊट न देण्यासाठी TV upmpire ने जो रिप्ले वापरला तो इतरांना दाखवला नव्हता, त्यामूळे not out decisions बद्दल controversy झाली. मग असे रिप्ले का दाखवत नाहित आधीच ?

धवन्चे timing एव्हढे गंडलय सध्या त्याच्यापेक्षा राहाणेला घेतले तर उपयोग होईल.

जिंकले ! पण युवीला न पाठवता सामन्याची सांगता करायला धोनी वर फलंदाजीला आला !
आज भारताचं क्षेत्ररक्षण बरंच चांगलं झालं. मिश्राला वगळणं आतां धोनीसाठीही अशक्य झालंय !!! Wink

Pages