T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसोटी सामन्यांतल्या कामगिरीचा दोष टी-२०वर लकटला गेला ; आतां दोष कसोटी सामन्यांवर लकटण्याची पाळी न येवो !! Wink
फलंदाजीपेक्षाही मला कुतूहल आहे तें या सामन्यांमधे भारतासहीत इतर देश फिरकीचा कसा व किती वापर करतात व तो कितपत परिणामकारक ठरतो, याचा. बाकी, सामने अटीतटीचे व्हावेत, यापलिकडे अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षाभंगाला आमंत्रण देण्यासारखंच !!

कालच्या पहिल्या सामन्यांमध्ये पराभूत झालेले दोन्ही संघ फिरकीच्या जाळ्यात अडकले.
या अश्याच खेळपट्ट्या असतील तर श्रीलंकेला भारी चान्स आहे.
पाकिस्तानी सुद्धा अजमल, हाफीज, आफ्रिदीच्या जीवावर हलवून सोडतील.
भारताने अमित मिश्राला खेळवायची हिंमत दाखवायला हवी.
ईंग्लंड-आफ्रिका-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांची संधी कमी दिसतेय.
बांग्लादेशही यापैकी एखाद्या संघाला दणका देऊ शकते.
वेस्ट इंडिज मात्र डार्क हॉर्स ठरू शकेल.

नेपाळ - बांग्ला सामना चांगला होईल अस वाटतय .
झिम्बाबे/आयर्लंड् यांच्यातल्या किमान एकाला बाहेर जाव लागण वाईट आहे .

ते मेन राउंड्स चालू झाल्यावर आहे . Happy
नाहीतरी नेपाळ किंवा अमिरातीचा कोणता प्लेअर कसा खेळणार याचा अंदाज लावण कठीणच आहे .

अफगाणिस्तानने काल अपेक्षाभंग केला; उदयोन्मुख संघांत तो संघ सर्व अंगानीं समतोल व जिगरी वाटतोय.
<< वेस्ट इंडिज मात्र डार्क हॉर्स ठरू शकेल.>> ह्या स्पर्धेत तरी वे.इं. सुनील नरैनला खेळवताहेत का ? बंगलादेशच्या विकेटसवर तो त्यांचा हुकमी एक्का ठरुं शकतो !
<< भारताने अमित मिश्राला खेळवायची हिंमत दाखवायला हवी. >> हें आवश्यक असलं तरीही धोनी कप्तान असताना हें कठीण वाटतं !

अफगाणिस्तानने काल अपेक्षाभंग केला; उदयोन्मुख संघांत तो संघ सर्व अंगानीं समतोल व जिगरी वाटतोय.
>>>>>>>
अफगाणिस्तान फिरकीला गंडताहेत, समतोल नाही बोलू शकत त्यामुळे..

ह्या स्पर्धेत तरी वे.इं. सुनील नरैनला खेळवताहेत का ? बंगलादेशच्या विकेटसवर तो त्यांचा हुकमी एक्का ठरुं शकतो !
>>>>>>
नक्कीच खेळवतील, २०-ट्वेंटी चा तर तो ट्रम्प कार्ड आहे, कलकत्त्याला आयपीएल त्यानेच मारून दिलीय, अर्थात गंभीर त्याचा वापर सुद्धा परफेक्ट करायचा.

<< नक्कीच खेळवतील, >> पण गेल्या टूरवर नरैनला वगळला होता वे. इंडीजने, म्हणून शंका आली.
<< अफगाणिस्तान फिरकीला गंडताहेत,>> 'आशिया कप'मधला त्यांचा खेळ पाहून- विशेषतः पाक व बांगलादेश विरुद्ध - खरं तर तसं नाही वाटलं !

<< injury omission होते ते,>> सॉरी, माहित नव्हतं हें व म्हणूनच खटकतही होतं. धन्यवाद.

<< अफगाणिस्तान फिरकीला गंडताहेत, समतोल नाही बोलू शकत त्यामुळे..>> काल अफगाणिस्तानने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात मला थोडासा दिलासा दिलाय ! Wink

२० षटकांचेच सामने असल्याने भारताची फलंदाजी खरंच 'क्लिक' झाली तर गोलंदाजीतली कसर
तितकीशी निर्णायक ठरणार नाही. पण.. क्षेत्ररक्षण मात्र निर्णायक ठरूं शकतं ! भारतावर आत्तांच तरी
काट मारणं तितकंसं योग्य होणार नाही.

रैना फायनल ११ मधे पक्का दिसतोय.
पत्ता कटणार कुणाचा शर्मा की रहाणे ?
की युवी बाहेर बसणार ?

रहाणेला काढणं हें अन्यायकारकच नाहीं तर दूरदृष्टीचा अभाव ठरेल !
काल एरॉनने दोन झेल सोडले व दोन्हीही मिश्राच्या गोलंदाजीवर ! असलं क्षेत्ररक्षण खतरनाक ठरूं शकतं !
इंग्लंडची फलंदाजी टी-२०साठी खूपच सरावलेली दिसते आहे; काल 'रिव्हर्स शॉटस' व 'फ्लिकस'चा हुकमी वापर त्यांचे फलंदाज करताना पहायला मिळाले.
दंवामुळे नाणेफेकीला खूपच महत्व येईलसं वाटतं.
नरैनने श्रीलंकेविरुद्ध २४ धांवांत ४ बळी घेतले ! वे. इंडीजची फलंदाजीही नेहमीच्या ढेपाळण्यापासून आतां बहरण्याच्या मार्गावर आहे. <<वेस्ट इंडिज मात्र डार्क हॉर्स ठरू शकेल >> सहमत.

शर्मा मला आवडत नसला तरी त्याला आता काढण्यात काही अर्थ नाही अस मला वाटत .
We have invested a lot in him Sad He has to deliver .

केदारजी, शर्मा प्रतिभावान आहे, हें नि:संशय व मला आवडतोही. पण, पर्याय निवडीचा बिकट प्रश्न आलाच तर मात्र .... Rahane seems to be a much more profitable long term investment option than Yuvi and sharma, असं आपलं मला वाटलं.

<< कारण अगदीच गरज पडली तर तो बॉलिंगही करतो.. >> २० षटकांसाठी ५ नियमित गोलंदाज + जडेजा ,रैना - व कोहली पण- आहेतच ! तौलनिक दृष्ट्या विचार करताना फक्त युवीचा फलंदाजीतला फॉर्म हाच भाग लक्षांत घ्यायला हवा, असं नाही वाटत ?

५ कुठले नियमित गोलंदाज?? शामी, भुवनेश्वर कुमार, अश्विन, मिश्रा/अरॉन... ह्या पेक्षा जास्त गोलंदाज खेळवायचे धाडस धोनी काही झाले तरी दाखवणार नाही.. पाचवा गोलंदाज काम चलाऊच असणार.. त्यातल्यात्यात जडेजा ऑलराउंडर म्हणून धरला तर तो पाचवा गोलंदाज.. रैना किंवा कोहली पेक्षा युवीकधीही बरा गोलंदाज आहे..

त्याचा फॉर्म फार चांगला नाहीये.. पण त्याच्या इतका स्फोटक कोणीच नाहीये.. फिनिशर म्हणून धोनी बरोबर कोणीतरी अजुन एक जण हवाच..

मिश्राला संधी मिळनार नाही.. ज्या पध्दतीने धोनीने त्याला नेट्स मधे धुतले त्यावरुन धोनी त्याला ११ मधे घेणार नाही कारण रैना युवी जाडेजा हे तीन अतिरिक्त गोलंदाज आहेत जे बांग्लादेशच्या खेळपट्टीवर आरामात चालतील ..

Pages