T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल कॉमेंट्री बॉक्समधे भारताने 'रन-रेट' वाढवण्याबद्दल चर्चा होत होती. सामना जिंकला तर रन-रेट फारसा महत्वाचा नसल्याने भारताचा खेळ योग्य असल्याचा निर्वाळा वासिम अक्रमने दिला. पण इतर संघांच्या धांवा करण्याच्या तुफानी वेगाकडे पाहिलं कीं भारताच्या फलंदाजानी संधी आलीच तर तशाच आक्रमक पवित्र्याची व फटकेबाजीची संवय स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात करणं हितावह ठरलं असतं ; वे.इंडीज व काल बांगलादेशविरुद्ध अशी सुवर्णसंधी आयती मिळाली होती पण आपण ती गमावली, असं आपलं मला वाटतं. [काल ९०-१ व भरपूर षटकं असतानाही एकेरी धांवा काढण्यावरच कोहली व त्यापेक्षाही शर्माचा भर होता, हें खटकलं. मात्र धोनीने उशीरा व वरच्या क्रमांकावर येवून हा आवश्यक असलेला सराव करून घेतला !]

Biggrin

रहाणे ला उगाच बसवुन ठेवला आहे... फॉर्म चालु आहे तो पर्यंत संधी द्या....... फॉर्म गेल्यावर संधी देउन काय उपयोग ?

<< रहाणे ला उगाच बसवुन ठेवला आहे... >> सहमत. रहाणेला धवनच्या जागीं खेळवून धवनला युवीच्या जागीं खेळवणं कदाचित लाभदायक होईल. [ काल धोनी आपल्याआधीं फलंदाजीला जातोय हें पाहून युवीचा चेहरा अक्षरशः दयनीय झाला होता; पण असे निष्ठूर निर्णय घेणं मोठ्या स्पर्धेत अपरिहार्य असावं. युवीला आत्तांच्या स्पर्धेत तरी संघात न घेणं हें निश्चितच त्याच्यासाठींही अधिक हितावह ठरावं.]

अटीतटीच्या सामन्यात द, आफ्रिका १९६ , इंग्लंड १९३ ! द.आफ्रिका पुढच्या फेरीत , इंग्लंड स्पर्धेबाहेर !!
दोघांसाठीही हा सामना बाद फेरीसारखाच असूनही .... 'चोकर्स' जिंकले !! Wink
ह्या स्पर्धेत सर्वसाधारणपणे धांवांच्या बाबतीत महाग न पडणारे गोलंदाज हे फिरकी गोलंदाजच ठरताहेत !!

सर्वात आधी मलिंगाला धु धु धुणारा..... विराट कोहलीच होता >>. नाही सचिन होता. असो.

आजची SA vs Eng मस्त होती. आपण एकदाही १६०+ केले नाहीत कारण आपली नेहमी दुसर्‍यांदा बॅटिंग होती. त्यामुळे आपण नक्की काय करू हे वर्तविता येत नसले तरी आता नक्कीच दावेदार आहोत.

विंडिज ला ऑसिजनी डिवचले होते म्हणून त्यांनी इतका आनंद व्यक्त केला. मजा आली त्या मॅचला.

अरे मी म्हणतो आपल्याला १६०+ करायची गरजच काय जेव्हा आपली बॉलिंग कधी नाही ते चांगली चालु आहे ..

१६०+ समोरचे करणार म्हणजे आपल्या बॉलर्स ला धुणार .. परत मग आपण त्यांना शिव्या घालणार .. चांगली बॉलिंग करता येत नाही इत्यादी..

त्यापेक्षा जे चालु आहे ते चालु द्यावे ... सगळ्या टीम्स १५०+ च्या वर धावा देत असताना आपले बॉलर्स ३ ही मॅच मधे १४० सुध्दा क्रॉस करु देत नाही आहे.. यातच सगळे आले..

एक स्पर्धा तरी बॉलर्स यांना गाजवु द्या..

पहिल्यांदा आपण फलंदाजी ने नाही तर गोलंदाजीमुळे जिंकत आहोत ... Happy

<< आपण एकदाही १६०+ केले नाहीत कारण आपली नेहमी दुसर्‍यांदा बॅटिंग होती. >> हें खरं असलं तरीही ज्या तर्‍हेची तुफान, नाविन्यपूर्ण फटकेबाजी इतर संघांकडून होते आहे त्याची झलकही आपल्या संघाकडून पहायला मिळालेली नाही, हेंही जाणवतंच. काल पदलालित्य व ताकद वापरून, डि व्हिलीयर्स जे अप्रचलीत फटके सफाईने मारत होता त्यावरून अशा खेळाचा त्याने खास सराव या स्पर्धेसाठी केला असावा, हें लक्षात येतं. आपल्याला संधी असूनही कमी धावांचं लक्ष्य गाठतानाही आपले फलंदाज असे फटके सामन्यात घोटून घेताना दिसले नाहीत [धोनीचा गेल्या सामन्यातील कांहींसा अपवाद वगळतां ].बाद फेरीत हा पवित्रा किती यशस्वीपणे आपण बदलतो, यावर तिथलं यश अवलंबून राहील असं वाटतं.

अरे चक्क आपल्या फलंदाजीवर शंका चालूय इथे. सारे आयपीएलचे हिरो आहेत. या खेळपट्ट्यांवर कोणत्याही बॉलिंग अ‍ॅटेकला तुडवू शकतात. कोहली तर फलंदाजीतील ट्रंप कार्ड आहे. शर्मा रैना धोनी रहाणे फॉर्म गेलेले धवन युवराज अष्टपैलू जडेजा वा पाठोपाठचा आश्विन यातील कित्येक जण हिटरच नाहीत तर अश्या खेळपट्ट्यांवरचे क्लासिकल हिटर आहेत, कोणीही अंदाधुंद नाही. जर नशीब वा दिवस खराब नसेल तर हे १६०-१७० धावसंख्या आपल्यासाठी कधीच चिंतेचा विषय ठरू नये. आतापर्यंतच्या सामन्यात कोहली रैना शर्मा आणि धोनीने आपण पुरेश्या फॉर्ममध्ये आहोत हे दाखवून दिलेय. आज रहाणेला चेक केले आणि त्याचाही फॉर्म चांगला निघाला तर हा कप ९० टक्के आपलाच .. काही जास्त तर नाही बोल्लो ना Wink

तर अमित मिश्रा हा गोलंदाजीतील ट्रंप कार्ड ठरत आहे. एकातरी विकेटटेकर गोलंदाजाची नितांत गरज असते या फॉर्मेटमध्ये. विकेट घेऊन सामना फिरवेल असा गोलंदाज आश्विनही वाटत नव्हता. मात्र शर्माच्या जोडीने आता तो देखील प्रभावी वाटू लागलाय. मात्र भुवनेश्वर कुमारचेही कौतुक करावे लागेल, त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यात मस्त लाईन लेंथ पकडली आहे, कोणी येऊन बिघडवली नाही तर तो देखील गोलंदाजीतील एक की फॅक्टर बनतोय आपला. त्याने सुरुवातीला रोखलेल्या धावा नंतर मिश्राला विकेट काढायला कामी येत आहेत.

आज युवराज खेळला तर धोनी सुटकेचा श्वास सोडेल, कारण त्याच्यासाठी तो विश्वचषकातील लकी खेळाडू आहे.

युवराज खेळतच आहे........

पण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
टेस्ट मॅच

क्लास इनिंग्स. युवराजवर शक घेणार्‍यांसाठी चांगले उत्तर !

आणि थँक गॉड सम सेन्स इज रिस्टोअर्ड. रहाणेला घेऊन ओपनिंगला पाठवले. माझ्यामते ही मोहित वगळता हीच आपली ११ असेल सेमीज मध्ये.

अर्थात अजून आपली बॉलिंग बाकी आहे. मोहितने चांगली टाकावी.

उदयन,
युवराजचा फायनल स्कोअर ४३ चेंडूत ६०
४ षटकार आणि स्ट्राईक रेट १४० ..
आजच्या आपल्या डावाचा शिल्पकार Happy
तो जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यासारखा स्ट्रोकप्लेअर नाही जगात, तरी आज १०० टक्के फुल फ्लो मध्ये वाटला नाही तो, अन्यथा बाद झाला तो चेंडू पण षटकार असता. तरीही ऑफला मारलेला षटकार भारीच ..

<< युवीला आत्तांच्या स्पर्धेत तरी संघात न घेणं हें निश्चितच त्याच्यासाठींही अधिक हितावह ठरावं.>> मीं असं इथे लिहीलं, हें युवीला कोणी सांगितलं ? झोडलं ना त्याने मला आज !! Wink
" युवराजने वापसीका ऐलान कीया है ! " - सिद्धू . १००% सहमत.

भुवनेश्वर कुमारने आजही दोन टाईट ओवर टाकल्या आणि आश्विनने समोरून विकेट मिळवली.
सध्याची आपली गोलंदाजी पाहता हा सामना जिंकायला हरकत नाही. मिश्रा त्याच्या चार ओवरमध्ये दोन-तीन ऑस्ट्रेलियन विकेट काढेलच.

११.५० ची फ्लाईट काय.. बांग्लादेशशी मॅच बाकी आहे न त्यांची ... बांग्लादेश असे जाऊ देणार नाही त्यांना.. त्यांनाही यांच्याशीच जिंकायची आशा आता Wink

भारत चारही सामने जिंकला, नुसते जिंकला नाही तर क्या बात थाटात जिंकला.
हक्क आहे आपला या विश्वचषकावर !!

आक्रमक फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी व एकही झेल न सोडण्याची कमाल .... आज दृष्टच काढायला हवी भारतीय संघाची ! मनःपूर्वक अभिनंदन !

चार ही मैच मधे गोलंदाज सामनाविर ठरले आहे

अभिषेक

आधी टेस्ट खेळत होता सगळे बोलायला लागल्यावर मारायला लागला तरी 180-185 पर्यंत गेलो असतो

अत्यंत संतोषजनक सामना. युवराजची फलंदाजी नि कुमार ची काटकसरी गोलंदाजी. स्पिनर लोकांची गोलंदाजी!
अहो फिंच, वार्नर, वाटसन, मॅक्सवेल्ल हे काही असे तसे फलंदाज नव्हेत! त्यांचे आधीचे पराक्रम बघा. आपल्या लोकांनी मनावर घेऊन सामना जिंकला.
विष्वचषक मिळणार याची खात्री वाटू लागली आहे. अगदी श्री लंकेशीहि जिंकतील!
जय भारतीय लोक.!

आजचा श्रीलंका वि. न्यूझीलंड व उद्याचा वे.इंडीज वि. पाक हे सामने 'पैसा वसूल' वर्गात मोडणारे ठरावेत अशी रास्त अपेक्षा ! या चारही संघाना ऑसीजसारखी लवकरात लवकर घरीं परतण्याची अजिबात ओढ दिसत नाही !! Wink

न्युझीलंड जिंकावेत ........

वेस्ट इंडीज जिंकावेत .......

न्युझीलंड जिंकले तर दुसर्या क्रमांकावर येतील... आणि आपल्याबरोबर सेमी मधे भिडतील

श्रीलंका जिंकली तर द आफ्रीका दुसर्या क्रमांकावर येतील आणि आपल्याला ताप देतील

सध्यां सेमीमधे आपल्याला कोण भेटेल हा सुखवस्तु प्रश्न आपल्याला असला तरी न्यूझीलंड व श्रीलंकेला नाहीय; सेमी कशी एकदांची गांठतो एवढा एकच भुकेला विचार त्यां दोघांच्याही मनात आहे. म्हणून सामना अटीतटीचा व्हावा ही अपेक्षा !
डि व्हिलीयर्स, ड्यूमिनी, स्टेन कंपनी या स्पर्धेसाठी खेळाची व मनाची खास तयारी करून आल्यासारखेच वाटताहेत. आमलाही फॉर्मात येतोय. त्यामुळे, << द आफ्रीका दुसर्या क्रमांकावर येतील आणि आपल्याला ताप देतील >> हें खरंच असलं तरीही आपल्या द.आफ्रिकेच्या दौर्‍याचा वचपा काढण्याची संधी म्हणून आपली पोरंही विशेष खुन्नसने त्यांच्या विरुद्ध खेळतील हेंही तितकंच खरं !

Pages