T-20 विश्वचषक २०१४

Submitted by केदार जाधव on 17 March, 2014 - 02:38

कालपासून टी२० विश्वचषकाला बांग्लादेश मधे सुरूवात झालीये . त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

मुख्य स्पर्धेतील गट खालीलप्रमाणे . प्रत्येक ग्रुपमधून २ संघ पुढे येतील,
१ . इंग्लंड , न्यूझिलंड , अफ्रिका , लंका , (झिम्बाबे/आयर्लंड्/अमिरात्/हॉलंड)
२. भारत , पाक , ऑसीज , विंडीज , (बांग्ला/अफगाण्/नेपाळ/हाँगकाँग)

प्रथमदर्शनी तरी भारताच काही खर दिसत नाहीये Happy
एक तर हा "ग्रुप ऑफ डेथ वाटतोय" आणी ऑसीज अन विंडीज अगदी बॅलेंसड दिसतायत.

आपला घोडा यावेळी ऑसीज . वॉर्नर , फिंच , वॉटसन , Can Top 3 be more aggressive than this ? Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे स्वरुपा

नाव :MAAYBOLI LEAGUE असे आहे नुसते MAAYBOLI नाही.......... Biggrin

MAAYBOLI LEAGUE असे टाईप कर..........

1 Kedar WarriorsKedar Jadhav 267 Happy
2 HRKHimanshu Kulkarni 187
3 Galli XISujit Pande 186
4 Perfect PunchSwaroop Kulkarni 157
5 UDAYLN'S TEAMuday inadmar 82
6 asmi 11Asmita Bapat19

आजचे रँकींग:

RankTeam NameManagerPoints
1 Perfect Punch Swaroop Kulkarni 487
2 Kedar Warriors Kedar Jadhav 452
3 Galli XI Sujit Pande 436
4 HRK Himanshu Kulkarni 388
5 UDAYLN'S TEAM uday inadmar 350
6 Gargi winners GARGI PANDE 226
7 asmi 11 Asmita Bapat1 55

Happy

काल आफ्रिकेला चान्स होता.... पण मिलर जरा गंडल्यासारखा वाटला.... फारच टुकुटुकु खेळत होता
इंग्लंडचे लंब आणि अली भारीच खेळत होते... पावसाने वाचवले न्यूझीलंडला Happy

चांगली जिंकत आलेली मॅच हाताची घालवली.... ऑस्ट्रेलिया ने... Angry

आज पाकिस्तान हारली असती तर बाहेरच होती सरळ .........

जडेजा सोडून सर्वांची बॉलिंग अप्रतिम झाली. भुवनेश्वर नी सुरूवात जबरी केली आणि अमित मिश्राने कळस चढवला. फॉर अ चेंज इट वॉज बॉलिंग शो ! जबरी.

१८ व्या ओव्हर मध्ये गॅम्बल केल्यावर परत २०व्यात करायची गरज नव्हती असे मला वाटते.

शेवटची ओव्हर जडेजाला का दिली..? :| मिश्राने १९व्या ओव्हरमध्ये फक्त २ रन दिले. आणि जडेजाला झोडला !
आधी सगळ्यांनी मस्त बॉलिंग केली पण..

आत्ता स्कोर कार्ड बघितलं.. भुवीची एक ओव्हर शिल्लक होती.. ! धोनीचं जडेजा प्रेम की जुगाराचा प्रयत्न ? Happy

<< चांगली जिंकत आलेली मॅच हाताची घालवली.... ऑस्ट्रेलिया ने... >> मला वाटतं कीं तेज गोलंदाजीपेक्षां दर्जेदार फिरकी गोलंदाजीवर धांवांची गती वाढवणं अधिक कठीण असतं हें अधिकाधिक स्पष्ट होतंय. म्हणूनच, निर्णायक षटकांतही पाक फिरकीवर विश्वास ठेवूं शकतो व तो आजच्यासारखा सार्थही ठरतो. भारतही आज वे.इंडीजला [ वे. इंडीजच्या हातात विकेटस असूनही व भारताच्या गोलंदाजीसाठी चेंडू ओला होत असूनही ] कमी धांवावर रोखूं शकलाय त्याचंही श्रेय बव्हंशी फिरकीच्या या
गुणधर्मालाच जात असावं. [ आजही मिश्राने २ बळी मिळवलेच ! ]

आत्ता स्कोर कार्ड बघितलं.. भुवीची एक ओव्हर शिल्लक होती.. ! धोनीचं जडेजा प्रेम की जुगाराचा प्रयत्न ? >> शमी, भुवी कि जडेजा असा choice होता, पहिल्या दोघां पेक्षा जाडेजा लाईन जास्त नीट ठेवेल असे वाटले असेल. १८व्या मधे तो नो बॉल नसता तर ? Happy

आपली fielding दिवसेंदिवस खराब का होत चालली आहे ? अश्विन ला स्लिप मधे ठेवण्याचा निर्णय कोणाचा आहे ? त्याला विशेष सराव वगैरे करून घेतात असे कोणी तरी म्हणाले. युवी पुढच्या मॅचमधे बाहेर ?

अश्विन ला स्लिप मधे ठेवण्याचा निर्णय कोणाचा आहे >> अरे बाबा तो जन्मला तेंव्हापासून स्लिप मध्ये आहे. (सचिन, लक्ष्मण, सेहवाग वगैरे गेल्यापासून)

आजची मॅच आपण १५ ओव्हर्स मध्ये जिंकायला हवी होती. १८० चेस करताना फ्या फ्या होईल की काय? असे वाटते आहे. दरवेळी आपण < १५० थोडी आउट करू शकू? अजून थोडा वाव आहे सुधारायला.

१८व्या मधे तो नो बॉल नसता तर ? स्मित >> अरे पण तो नो बॉल आहे कळले होते की. मग त्यानंतरही २०व्यात देणे जरा अतिच. माझा गेस की धोणी ऑप्शन्स शोधतोय डेथ साठी. ह्या मॅच मध्ये गॅम्बल करणे सोपे होते कारण १९ पर्यंत धावा कमी होत्या. पण तरीही आवडले नाही.

जिंकले ! पण खटकणार्‍या क्षेत्ररक्षणाची व इतकी छान संधी असताना कमीत कमी षटकात सामना जिंकण्याची ईर्षा न दाखवतां सामना शेवटच्या दोन चेंडूंपर्यंत ताणल्याची रुख रुख मनात निर्माण करून !!

१८व्या मधे तो नो बॉल नसता तर ? >>> तो नो बॉलही जडेजानेच टाकला ना? तरी त्यालाच शेवटची ओव्हर.. काही कळलं / पटलं नाही त्या मागचं लॉजिक..
हो युवराज बाहेर बसणार बहुतेक पुढच्या मॅचला..
युवराजने खूप चेंडू वाया घालवून मॅच ताणली..

One billion Indians and the best man for first slip is Ravichandran Ashwin?

Ravichandran Akmal.

Lol

अरे बाबा तो जन्मला तेंव्हापासून स्लिप मध्ये आहे. (सचिन, लक्ष्मण, सेहवाग वगैरे गेल्यापासून) >> अरे तेच तर म्हणतोय मी की हा कोणाचा निर्णय आहे ? He does not posses fast reflexes which is basic requirements for slip fielding. इतरत्र कुठे चान्स घेण्यापेक्षा स्लिपमधे घेऊ असा विचार केला असेल Wink

तो नो बॉलही जडेजानेच टाकला ना? तरी त्यालाच शेवटची ओव्हर.. काही कळलं / पटलं नाही त्या मागचं लॉजिक.. >> तो चांगल्या line वर dart टाकतो म्हणून असेल असे मला वाटते. परत ड्यु असल्यामूळे पेसर्सना देऊन रिस्क नको असे वाटले असेल.

e does not posses fast reflexes which is basic requirements >>. अरे पण आपल्याकडे जे जे स्लिप फिल्डर्स होते त्यातील द्रविड वगळता सर्व तसेच स्लो मूव्हर होते. सेहवाग, लक्ष्मण ही वरचीच ठळक उदाहरण. आपल्याकडे फिल्डरला लपवायचं झालं की लॉंग ऑन / स्विपर नाही तर मग स्लिप. पण त्याने आज जे काही केले तसे कोणीही केले नाही. तो वळलाच नाही. त्याचे कम्पॅरिझन करायचे झाले तर मोहिंदर अमरनाथच्या हेड बिफोर विकेट शी करावे लागेल. Lol

मला वाटतं ड्यु असल्यावर फास्ट बॉलर जास्त स्पिन बॉलर पेक्षा जास्त उपयोगी असतो.

मला वाटतं ड्यु असल्यावर फास्ट बॉलर जास्त स्पिन बॉलर पेक्षा जास्त उपयोगी असतो. >> बॉलिंगच्या द्रुष्टीने नाहि तर लूज बॉल पडला (बॉल स्लिप झाल्यामूळे) तर पेस मूळे एज लागली तरी बाउंड्री मिळेल अशा अर्थाने.

पण त्याने आज जे काही केले तसे कोणीही केले नाही. तो वळलाच नाही. >> त्याला कळलेच नाहि बॉल कुठे गेलाय ते Happy

ह्या स्पर्धेमधे 'रन-रेट' लक्षात घेतला जाणार आहे का ? तसं असेल, तर काल १५व्या षटकात १०७ धांवा असताना केवळ दुसरी विकेट पडली असताना व फक्त २३ धांवा हव्या असताना, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावूं देणं ही अक्षम्य चूक ठरूं शकते; आपल्या गटात शेवटीं तीन संघ ६ गुणांवर असण्याची आज तरी शक्यता आहे व 'रन-रेट' निर्णायक ठरण्याचीही ! युवराज फलंदाजीला आला तेंव्हा त्याला व शर्माला याविषयीं स्पष्ट सूचना द्यायला हवी होती पण दिली नसावी असं वाटतं.

दंवाचा फटका आपल्यापेक्षां वे.इंडीजला अधिक बसला होता हें नरैनच्या हातून चेंडू सुटून 'फुलटॉस' किंवा 'वाईड' होत होता यावरून दिसत होतं. भु.कुमारला म्हणूनच काल विशेष मानायला हवं.
युवराज फिरकीविरुद्ध 'व्हल्नरेबल' वाटतो तर पाकिस्तान, वे.इंडीज व श्रीलंका या संघांविरुद्ध त्याला न खेळवतां इतर संघांविरुद्ध खेळवण्यात शहाणपणा नाही ? त्याचा आत्मविश्वास परतण्यासाठी एवढा मोठा धोका कां घ्यावा ? शिवाय, टी-२० ही स्पर्धा फॉर्ममधे असलेल्यांसाठीच आहे व फॉर्म परत येण्यासाठी ती नक्कीच आदर्शवत नाही, असंही मला वाटतं.
फलंदाजी व गोलंदाजीने मिळवलं व क्षेत्ररक्षणाने घालवलं असं न होवो, ही प्रार्थना !

ह्या स्पर्धेमधे 'रन-रेट' लक्षात घेतला जाणार आहे का ? तसं असेल, तर काल १५व्या षटकात १०७ धांवा असताना केवळ दुसरी विकेट पडली असताना व फक्त २३ धांवा हव्या असताना, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावूं देणं ही अक्षम्य चूक ठरूं शकते; >> +१००
युवराज संपलाय ?

युवराज ला खरच काढुन टाकावा....... कॅच सुध्दा सोडत आहे .. फॉर्म नाही... जेव्हा बिना टेंशनची फलंदाजी करायची होती तेव्हा उगाच हळु हळु खेळुन शेवट पर्यंत मॅच खेचली... रैनाने आल्याबरोबर चौकार मारला.. आणि सामना संपवला .. युवी च्या जागी खर तर रैनाला उतरायला हवे होते... मॅच लवकर संपली असती...

आपला आणि पाकिस्तान चा रनरेट मधे जास्त फरक नाही आहे...... आपली मॅच लो स्कोरिंग झाली त्यांची जास्त स्कोरींग आहे.. याचा सुध्दा फायदा त्यांना नेटरनरेट मधे होणार

केवळ सामना जिंकला म्हणून दुर्लक्ष न करतां येण्यासारखी गोष्ट म्हणजे रैनाची दुर्दैवाने विकेट गेली असती तर घाईघाईने पॅड बांधून आलेला धोनीही त्याच्या पहिल्या व सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पचकूं शकला असता ; हातातलाच नाही तर खिशात पडलेला सामना बाहेर काढून फेंकून दिल्याची नामुष्की भारताला पत्करावी लागली असती !
<< युवराज संपलाय ? >> फिरकीपुढे तरी तो सध्या फिक्का पडतो आहे आणि हे आतां गुपीत राहिलेलं नाही; इतर संघ ह्याचा फायदा उठवणारच !

<< केवळ सामना जिंकला म्हणून दुर्लक्ष न करतां येण्यासारखी गोष्ट ... >> सामना शेवटच्या षटकात गेला की कांहींही होऊं शकतं याचं प्रात्यक्षिकच आज द. आफ्रिका वि. न्यूझीलंड सामन्यात सादर झालं !
शेवटच्या षटकात न्यूझीलंडला जिंकायला ७ धांवा व ५गडी खेळायचे शिल्लक ! स्टेनने त्या एकाच षटकात तीन बळी घेवून २ धांवानी द. आफ्रिकेला सामना जिंकून दिला !!

<< आज चोकर्स ....जिंकले >> सुरवातीच्या नाही तर अंतिम फेरीच्या जवळ पोचले कीं त्यांचा अवसानघात होतो , म्हणून द.आफ्रिकेला 'चोकर्स' म्हणत असावेत; ह्या स्पर्धेत या शापातून मुक्त व्हायला त्याना आधी अंतिम फेरीजवळ पोहोचावं लागणार आहे व तिथें अटीतटीचे सामने जिंकावे लागणार आहेत. ती क्षमता त्या संघात निश्चितच आहे.
ड्युमिनीने आज त्याच्या प्रतिभेला शोभेसाच खेळ केला !

सामना शेवटच्या षटकात गेला की कांहींही होऊं शकतं याचं प्रात्यक्षिकच आज द. आफ्रिका वि. न्यूझीलंड सामन्यात सादर झालं ! >>. तसेच आधी भारत वि सा अ च्या वन डे सामन्यातही झाले. सचिनने शेवटची ओव्हर घेऊन विकेट काढल्या, आपण जिंकलो.

Pages