होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्या.....तुम्ही दोघी डोम्बिवलीच्या....जान्हवीदेखील तिथलीच....तरीही तिच्यावर तलवारी चाकू सुरे भाले धनुष्यबाण अशी शस्त्रे घेवून हल्ला करीत आहात ?

थॅन्क्स रिया....रेशीमगाठी या मालिकेविषयी मी ऐकतोय, पाहात नाही...पण मला वाटले गीतालाच तू मेघना म्हणालीस की काय ? वेल, सॉरी.

अनिश्का, पते की बात.
जान्हवी ला खरोखर अ‍ॅक्टिंग येत नाही आणि ती अ‍ॅक्टिंग केल्यासारखीच बोलते . तीचे हसणे तर एक्दम खोटे वाटते.
आपली लीना भागवत छान हसते.

पहिल्या पहिल्यांदी अभिनय आवडत होता जानव्हीचा .नाही अस नाही. पण आत्ता खूप एकसुरी पण वाटत तीच बोलण. एक तर सारख कुणालातरी समजावण्याचा सूर. आत्ता तिची भूमिकाच तशी लिहिलेय तर ती तरी काय करणार म्हणा Happy तेही आहेच . पण बोलण्यात काहीच चढ उतार नाहीत. आणि तिच्या आईला गायबच केलेय आजकाल. ती कशी मस्त ठसकेबाज भूमिका करायची Happy .

जान्हवी जाड झाली आहे ह्या अनिश्काच्या मताला पुर्ण अनुमोदन. फार तर लग्न मानवले आहे असे म्हणूया Wink

देवा....काय करावे ह्या पोरींचे आता ? >
अशोक मामा , जान्हवी चांगली दिसते मान्य आहे. सुरवातीला गोड वाटायची. पण खरोखरच तिची अ‍ॅक्टिंग नॅचरल वाटते का? मी रोज ही सिरीयल बघत नाही, पण जेव्हा कधी तिचे हसण्याचे सीन बघते तेव्हा ते खूप क्रुत्रीम वाटतात.
मला नेहेमी 'एका लग्नाची गोष्ट' नाटका मधली नायिका हात डोक्यावर घेऊन हसते तेच आठवते, Happy

जान्हवी न आवडणार्‍यांच्या यादीत मी पण. मला ही ती अज्जिब्बातच आवडत नाही.
आपण कसे फार समजूतदार, सोज्वळ हे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न आणि तसाच पचपचित अभिनय. त्यापेक्षा ती तडक फडक बेबी परवडते.

मी आता ब्लॅक लिस्टीत.....जान्हवी हेट क्लब हा धागा याच धाग्यात सुरु केला मी....... पळा.......

एकेकाळी ह्या सार्‍या भाच्यांनी मी फार फार फार चांगले म्हणतो होतो....आणि मिळून त्या गरीब बिचार्‍या जान्हवीला सगळे टपले छळण्याला अशा गटातील झाल्या आहेत..... आता मी माझे मत बदलणार.

काहीही म्हणा....पण आमची जान्हवी अगदी मीनाकुमारीच आहे....हसण्यामध्ये आणि रडण्यामध्येही.

काहीही मामा..... कुठे मीनाकुमारी.......जान्हवीला तीच्याशी कम्पेअर करुच नका......हव तर माला सिन्हा म्हणा.....

काहीही मामा..... कुठे मीनाकुमारी.......जान्हवीला तीच्याशी कम्पेअर करुच नका......हव तर माला सिन्हा म्हणा..... Happy

मामा तुम्हाला खरोखर मीना कुमारी आवडते ना ? मग जान्हवीला मीना कुमारी कसे काय बोलु शकता?
आणि तरी बर तिने रडायचे सीन नाही केले, हसते एवढी खोटं खोटं मग रडेल कशी ? कान्ट विझ्युअलाईझ

ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ.....ऑहॉहॉ..... Rofl
नताशा मी बेशुद्ध पडेन आता

Pages