भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199
भाग २१ - http://www.maayboli.com/node/46297
भाग २२ - http://www.maayboli.com/node/46425
*****************************************************
रफिक पुरणपोळी खाऊन आपला आनंद सेलिब्रेट करत होता आणि त्याच क्षणी मी विचारात गढले होते. असा कसा हा? दोन टोकं गाठणारा? मनासारखं झालं तर इतकं लाघवी वागणारा आणि मनासारखं नाही झालं तर क्रूरपणा दाखवणारा. एखादी पर्सनॅलिटि डिसऑर्डर तर नाही ना? इथे मला डायग्नॉसिस करणं शक्यही नव्हतं आणि करून फारसा फायदाही नव्हता. समजा त्याला कोणताही मानसिक आजार असता तरी मी त्याला सायकिअॅकट्रिस्टकडे जा असा सल्ला देऊ शकत नव्हते. विचारातच माझे खाऊन झाले. रफिकचे मुळी लक्षच नव्हते माझ्याकडे. तो स्वतःच्याच आनंदात मला काही काही सांगत होता. आणि माझं लक्षच नव्हतं तो काय बोलत होता त्याकडे. मी हाच विचार करत होते हा असा कसा? ह्याच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता तर नाही ना? एवढ्या मोठ्या एम्पायरच्या मालकाचा एकुलता एक मुलगा म्हटल्यावर काय कमतरता असेल ह्याला आणि कशी? पण कोणत्याही निष्कर्षाला मी कशी पोहोचणार होते? मला रफिक बद्दल काहीच माहित नव्हतं. सागरकडून जेवढं ऐकलं होतं तेवढच, पण त्यात रफिकच्या स्वभावाबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल फारसं काहीच नव्हतं. मी इथे आल्यापासून माझ्याशी कोणीच वैयक्तिक गोष्टी बोललं नव्हतं. माझ्याशी बोलणारं तरी अशी किती लोकं होती. फातिमा आणि रफिक स्वतः. आणि पहिल्या दिवशी मी रफिकच्या चार आया आणि छोट्या बहिणीला भेटले होते तेवढच. भेटले सुद्धा किती वेळ होते फक्त काही मिनिटं. तसं तर मला आजचा दिवस कोणता तारीख कोणती महिना कोणता हेदेखील लक्षात नव्हतं. खरच काय तारीख आहे? दिवस कोणता? किती दिवस मी या राजमहाल सदृश्य तुरुंगात होते?
"रफिक.."
"हा बोल. अरे केव्हाचा मीच बोलतो आहे. तुला सुद्धा काही बोलायचं असेल. मी एकदा सुनिता बद्दल बोलायला लागलो ना की माझं मलाच कळत नाही."
म्हणजे हा सुनिताबद्दल बोलत होता. म्हणजे फारसं महत्वाचं नाही. पण महत्त्वाचं नाही कसं मी लक्ष दिलं असतं तर मला सुनिता कशा वागायची ते कळलं असतं.
"रफिक आज दिवस कोणता आहे रे?"
"काय फरक पडतो आहे तुला."
"फरक काहीच पडत नाही. सहज विचारलं."
"तो टीव्ही लावलास तर कळेल तुला दिवस कोणता तारिख कोणती."
"अरे खरंच की. मी आज काल टीव्ही पाहातच नाहीये. योग, मेडिटेशन, पुस्तकं ह्यातच वेळ जातो. पण टॅबवर सुद्धा डेट टाईम दिसत नाहीये."
"सेटींग बदलून देतो. पण तुला काय फरक पडतो किती वाजले? तुला सगळ्म तर हातात मिळतं. कोण्ता दिवस आहे त्याने काय फरक पडतो तुला काही इतरांसारखा ह्यादिवशी उपास किंवा ह्यादिवशी सगळे नमाज किंवा ह्यादिवशी चर्च मध्ये जाणे असा काही प्रश्न नाहीये."
"अरे मी माणूस आहे. इतकी वर्ष वेळ दिवस ह्याच्या तालावर नाचले आहे. आता असं वाटतय वेळ दिवस गायबच झालेत माझ्या आयुष्यातून."
"अरे चांगलं आहे ना, तुझ्या मेडिटेशन ला मदत. उद्याची चिंता नाही काल काय झालं विचार नाही. फक्त ह्या क्षणात जगायचं. अरे मला कोणी असं आयुष्य दिलं जगायला तर मी आनंदाने जगेन. रोजची धावाधाव नाही, उद्याचा विचार नाही. कोण माझ्याशी कसे वागेल ह्याची चिंता नाही. कोण काल कसे वागले त्याचा उद्यावर काय परिणाम होईल ह्याची चिंता नाही. माझं आणी सुनिताचं स्वप्न होतं असं जगायचं. उद्याची चिंता न करता, कालचा विचार न करता."
"तू तिला शोधायचा प्रयत्न नाही केलास का?"
"असं कसं न करेन मी. बिझनेस सांभाळायला लागल्यावर तिला काँटॅक्ट केलं. अगदी खूप शोधलं तिला. पण ती नाही सापडली. इंजिनियर होऊन कुठे गायब झाली माहित नाही. चल मी निघतो. माझं झालय खाऊन मला उशीर होतोय."
"चला ह्या निमिने तरी मी वेळेशी जोडली गेले."
"म्हणजे काय. म्हणजे तुला उशीर होतोय ना म्हणजे वेळेचा संबंध आलाच ना."
"कुठे कुठे काय काय विचार करतेस तू"
"डोकं रिकामं असतं ना दिवस्भर म्हणून."
"मी निघतो." असं म्हणून माझ्या गालावर ओठ टेकवून तो निघाला.
रफिक निघून गेला पण माझ्या मनात त्याच्या वागण्याबद्दलचा विचार नाही गेला. थोड्या वेळापूर्वी त्याने सुनिताबद्दल बोलता बोलता तिचा विषय बदलला होता. मला कसं कळेल त्याच्याबद्दल त्याच्या भूतकाळाबद्दल? त्याच्या घरच्यांबद्दल? कळेल हळू हळू म्हणून मी पुन्हा गप्पच बसले.
त्या दिवशी फातिमाचा रंग थोडा उडालेला दिसला. चेहर्यावर हसू नव्हतं तिच्या. त्या दिवशी ती माझ्याशी बोलली देखील नाही. इतर वेळी मी कोणती योगासनं करते, कशी करते हे ती विचारत असे. कधे कधी माझ्यासोबत एखादे मराठी किंवा हिंदी गाणेही ऐकत असे. तिला कळलं होतं का की रफिक माझ्या जवळ यायला लागला आहे. तिच्याशी बोलायला हवं होतं. कदाचित तिच्याकडून रफिकबद्दल समजलं असतं. पण तिच्याशी कसं बोलणार. तिचं इंग्रजी अगदीच मोडकं तोडकं होतं. तिच्याशी बोलायचं म्हणजे तिला इंग्रजी शिकवायचं किंवा मी अरेबिक शिकायचं. तिला इंग्रजी शिकवलेलं रफिकला चालेल का? मला अरेबिक कोण शिकवणार. म्हणजे मी इथे राहून कोणाशी काहीच बोलायचं नाही का? इतके दिवस काही वाटलं नव्हतं कारण पुस्तक वाचत होते, आता पुस्तक सुद्धा संपत आली होती. रफिक नवीन पुस्तकं आणोन देईल का? पण कितीही पुस्तकं आणून दिली तरी माणसाशी संवाद तो माणसाशी संवाद. त्याची तहान पुस्तकाने कशी भागेल?
काय करू मी अजून की मला इथे अधिक सुखदायी वाटेल. 'सुख हे मानण्यात असतं'.. हे माझ्या मनात उभं राहिलेलं वाक्य...पण मी मानतच होते ना जे चालू आहे त्यात सुख पण आता याहून अधिकची गरज वाटत होती.
(hyaapuDhachaa bhaag navyaane Taakalaa aaahe hyaa bhaaagaat
त्याच दिवशी लगेचच रफिकने टॅब वरचे सेटिंग बदलून तारीख आणि वेळ दिसेल असे करून दिले.
दोन दिवसांनी ऑक्टोबर महिना चालू होत होता. माझं सागरचं लग्न झालं मार्च महिन्यात मी सौदीला आले एप्रिलच्या शेवटी शेवटी आणि रफिकच्या घरात अडकले जून महिन्यापासून. म्हणजे मी चार महिने इथे होते जवळ जवळ. म्हणजे श्रावण, हरताळका, गणपती काहीच म्हणजे काहीच माझ्या लक्षात आलं नव्हतं. ऑक्टोबर म्हणजे दसरा जवळपासच होता? मी नवरात्रीचे नऊ दिवस उपास करायचे आई आजी सोबत. आजी म्हणायची आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेची शक्ती आपल्यात वास करू लागते.आता मला नवरात्र कधी आहे, दसरा कधी आहे हे विचारावं लागणार होतं रफिकला, सांगेल का तो मला?मी त्याला सांगितलं मला उपास करायचे आहेत तर काय म्हणेल तो?
तीन दिवस ह्याच विचारात गेले. बोलू का रफिकशी का नकोच.. दोन ऑक्टोबरला रफिककडे विषय काढलाच.
"रफिकएक विनंती होती. जरा नवरात्र कधी सुरु होतात हे मला सांगू शकशील?"
"नवरात्र म्हणजे ते नऊ दिवस सगळे मिळून गोल गोल फिरून डान्स करतात तेच ना? आता तू कुठे जाणारेस डान्स करायला."
"हो. त्याच नऊ दिवसांना नवरात्र म्हणतात. आणि गोल गोल फिरून डान्स करतात त्याला गरबा म्हणतात. मला गरबा करायला नाही जायचय कुठे. पण गेली अनेक वर्षे माझा उपास असतो नऊ दिवस. पूजा करण्याची इच्छा असली तरी मी नाही करू शकत माहित आहे मला, उपास तरी करायची इच्छा आहे. नवरात्र कधी सुरू होतात हे कळलं तर बरं होईल."
"उपास म्हणजे, ते कसे करणार तू. काही न खाता पिता उपास का खाऊन पिऊन उपास."
"उपासला मी पूर्वी दूध फळं आणि जमलच तर एक वेळ खिचडी किंवा बटाट्याची भाजी किंवा वरीच्या तांदळाचा भात किंवा रताळ्याचा किस किंवा शेंगदाण्याचा किंवा राजगिर्याचा लाडू, असं खायचे. इथे मला दूध फळं आणि शेंगदाण्याचा लाडू एवढे मिळाले नऊ दिवस तरी पुरेल. जमेल का?"
"साबुदाण्याची खिचडी. आहाहा - सुनीताची आई काय मस्त खिचडी करायची.. आपण दोघे मिळून खिचडी खाऊ आणि त्यावर थंड दही. वा वा वा. आणि त्यासोबत ना कसला तरी पापड असायचा तळलेला. अरे आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलय."
"बटाट्याचा पापड."
"मला खिचडी मिळावी म्हणून तरी मी नक्की सांगेन तुला नऊ रात्र कधी सुरु होते."
"मनापासून धन्यवाद. पण नऊ रात्र नाही, नवरात्र."
रफिकने मला नवरात्र कधी सुरू होते हे तर सांगितलेच पण वेगवेगळ्या देवींचे फोटो त्याने मला टॅबवर टाकून दिले. हा माणूस गेल्या जन्मी नक्की भारतीय होता असणार... माझ्या मनात विचार चमकून गेला. देवी सप्तशती ऐकून म्हणून आणि उपास करून मला अधिकाधिक मानसिक बळ येत होतं. रफिक रोज माझ्यासोबत सकाळचा नाश्ता करायचा.सकाळच्या नाश्त्याला बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी किंवा दह्यात भिजवलेला साबुदाणा असे. आलटून पालटून तेच. मी रात्री जेवत नव्हते त्यामुळे रफिक बुद्धीबळ खेळून परत जात होता. मीसुद्धा आता बराच चांगला बुद्धीबळ खेळत होते असे त्याचे मत होते.
नवरात्र संपत आली होती. मी अजून एक पाऊल पुढे टाकायचे ठरवले.
"रफिक, उद्या दसरा."
"हो हो उद्या दसरा. मी वाचलय दसर्याबद्दल. तुला काही चांगले कपडे वगैरे आणू का? मी फक्त एवढच करू शकतो. तुला पूजा वगैरे काही करायची असेल तर मी तुला मदत नाही करू शकणार."
"मला पूजा वगैरे काही नाही करायची. मला फक्त उन्हात जायचय बाहेर. अगदी तुझ्या घराच्या बागेत सुद्धा घेऊन गेलास किंवा तुझ्या घराच्या टेरेस मध्ये तरी चालेल. हव तर प्रिझनर्स ना घालतात तसे हँड्कफ्स घालून बाहेर नेलस तरी चालेल पण मला जरा मोकळ्या हवेत, मोकळ्या उन्हात जायचय. नेशील? हव तर डोळे बांधून ने. पण प्लीज मला मोकळ्या हवेत ने."
क्रमशः
waiting.. waiting... waiting.
waiting..
waiting...
waiting.....
waiting,,,,,,,,,,,,
then like feel boaring your story.
thanks.. for new post sundar
thanks.. for new post
sundar
साबुदाणा खिचडी खाणारा आणि
साबुदाणा खिचडी खाणारा आणि देवाचे फोटो टॅबवर वगैरे टाकून देणारा अरब!!!!
नंदिनी - पटणं थोडं कठिण आहे.
नंदिनी - पटणं थोडं कठिण आहे. पण ओरिजिनल कथेमध्ये थोडी भर.ओरिजिनल कथेमध्ये तो पुपो चा फॅन दाखवलाय मी त्याला सगळ्याच भारतीय खाण्याचा.
पण असा एकजण माझ्या पाहण्यात आहे. इथिओपियाच्या मुसलमान राजघराण्यातला आहे. मी जेवढं ऐकलय त्यावरून तो ओरिजिनल अरब असावा कारण उंच अत्यंत गोरा आणि निळसर कबरे डोळे. त्याची बायको मराठी आहे, पार्ल्यातली. लग्नानंतर तिने मुसलमान धर्म स्वीकारला. पण ती अजूनही गणपतीची निस्सिम भक्त आहे. संकष्टीला उपास करून व्यवस्थित उकडीच्या मोदकाचा नैवेद्य वगैरे दाखवून उपास सोडते. ह्या सगळ्यामुळे की काय, पण तिचा नवरा भारतात असतो तेव्हा तोही नातेवाइकांच्या घरी गणपती दर्शनाला जातो. त्यादिवशी आणि संकष्टीच्या दिवशी मांसाहार करत नाही.
वल्लरि, कथा बोअरिंग होतेय.
वल्लरि,
कथा बोअरिंग होतेय. काही तरी जबरदस्त व्हायला हव आहे आता. मी हि कथा खूप उत्साहाने वाचते नेहमी. पण मागच्या दोन भागापासून खूपच रेंगाळली आहे. सरिताला राफिकच्या जवळ जाताना लिहवत नाही कि काय, तस असेल तर समजू शकते.
एकच सांगेन लेखिकेने कथेच्या पत्रांमध्ये गुंतायचं नसत. अर्थान तुला माहितच असेल ते. काय आहे ना बेफिकीर पाठोपाठ आता तू माझी आवडती लेखिका झाली आहेस. इतका हक्क आहे ना आम्हा वाचकांचा
पु. ले . शु .
Manaskanya thoDaa Dheer dhaar
Manaskanya thoDaa Dheer dhaar ajoon ekhaadaa bhaag ...
कथा भरकट ल्या सारखी वाटते .
कथा भरकट ल्या सारखी वाटते .
hmmmm....
hmmmm....
नंदिनी - पटणं थोडं कठिण
नंदिनी - पटणं थोडं कठिण आहे.<< पटणं मला तरी कठिण नाही. घरी गणपती बसवणारे आणि आयुष्यात एकदाही नॉनव्हेज न खाल्लेले मुसलमान आहेत आमच्याकडे.
प्रश्न तो "मुसलमान" असण्याचा नाही तर "अरब" असण्याचा आहे. त्या देशाची मेण्टालिटी आणि तिथली पुरूषी मानसिकता भारतीय मुसलमानांपेक्षा पूर्ण भिन्न असते. रफीकच्या पात्रामधे त्या मानसिकतेचा पूर्ण अभाव दिसतोय. कुठेतरी ते पात्र पूर्णपणे फिकं पडत चाललेलं आहे. एखाद्या बाईला (ती आवडते म्हनून) कैद करून ठेवणारा माणूस कुठेतरी थंड काळजाचा आणि अत्यंत कॅल्युलेटेड मूव्हज करणारा असायला हवा. ते इथे दिसत नाही. उलट तुमची नायिका उपास बिपास असल्या टिपिकल गोष्टींमधे अडकून पडली आहे. गेले कित्येक भाग (हा तेवीसावा भाग आहे.) कथा तिथेच फिरते आहे.
हा पुढचा भाग तुम्ही वाचलात की सांगा, एडीट करेन.
जर मी या कथेची लेखिका असते तरः
१. सरिता सागरपासून प्रेग्नंट. रफीक तिचं जबरदस्तीने अॅबॉर्सन करवतो आणि त्याने चिडून सरिता रफीकचा खून करते. (शारीरीक मानसिक भावनिक हिंसाचारच हिंसाचार)
२. सरिता रफीकला चकवून घराबाहेर पडते, पळून एम्बॅसीमधे येते, तिथून भारतात परत येते, इथे आल्यावर सागर तिला स्विकारत नाही. दु:खी सरिता जीव देते (स्त्रीजन्मा तुझी कहाणी इत्यादि इत्यादि)
३. सरिता रफीकबरोबर लग्न करते, इस्लाम स्विकारते आणि त्याच्या घरामधे फॅमिलीमधे अॅडजस्ट व्हायचा प्रयत्न करते, इथे तिला पदोपदी प्रत्येक वेळेला घरच्या इतर महिलांकाडून कारस्थानाला बळी पडावं लागेल. (जोधा अकबर... जय केकता कपूर. हजार एपिसोडची निश्चिंती)
असे अनेक मार्ग दिसत आहेत. तुम्हीदेखील तुम्हाला जो मार्ग सुचलाय तो पकडा.
GAYAB...........
GAYAB...........:दिवा:
are navin bhag yenar ahe
are navin bhag yenar ahe ka??????
वल्लरी लवकर मार्ग पकड गं
वल्लरी लवकर मार्ग पकड गं
नंदीनी, पटणं मला तरी कठिण
नंदीनी, पटणं मला तरी कठिण नाही. घरी गणपती बसवणारे आणि आयुष्यात एकदाही नॉनव्हेज न खाल्लेले मुसलमान आहेत आमच्याकडे.>>>>>>>>>>> सहीच................ असे मुसलमान मी पण पाहीलेय........
वल्लरीच्या उदाहरणात बायको
वल्लरीच्या उदाहरणात बायको हिंदु होती त्यामु ळे समजु शकते. पण विकास्/नंदीनी तुम्ही पाहीलेले मुसलमान पण लग्नानंतर बदलले आहेत का? नसतील तर ग्रेट!
पण विकास्/नंदीनी तुम्ही
पण विकास्/नंदीनी तुम्ही पाहीलेले मुसलमान पण लग्नानंतर बदलले आहेत का? <<< लग्नानंतर बदलले म्हणजे मला समजले नाही. माझा मित्र लग्नाआधी जसा होता तसाच आताही आहे.
पण विकास्/नंदीनी तुम्ही
पण विकास्/नंदीनी तुम्ही पाहीलेले मुसलमान पण लग्नानंतर बदलले आहेत का? <<< लग्नानंतर बदलले म्हणजे मला समजले नाही. माझा मित्र लग्नाआधी जसा होता तसाच आताही आहे.
<<<<<<<<<<<<<<<<<<<< अनुमोदन
वल्लरीच्या उदाहरणात बायको हिंदु होती त्यामु ळे समजु शकते. <<<<<<<<<<<<<<<<<< कथेत ती अजुन बायको नाही.......... तर रफिकने तिला डांबुन ठेवलेय.. ती तर सुटकेचे प्रयत्न करतेय......
अन माझी मैत्रिण तर माझ्यासाठी धर्मसुध्दा बदलायला तयार आहे. तीला तर मुस्लीम अन् हिंदु धर्मातले सर्वच करायला येते अन् करतेपण...................
vikas dada, मी एक खरोखर
vikas dada, मी एक खरोखर पहिलेलं उदा. दिलं आहे. मराठी हिंदू मुलगी, घरच वातावरण एकदम धार्मिक. लग्न केलं शेजारी पेईंग गेस्ट म्हणून राहायला आलेल्या इथिओपियाच्या राजघराण्यातल्या मुसल्मान मुलाशी. तो बायकोसाठी बराच बदलला.
वल्लरीताई, बरोबर आहे पण मी
वल्लरीताई, बरोबर आहे पण मी आदितीने कथेतील नायिकेला आत्ताच बायको केली म्हणुन अजुन बायको तर आहे का ती.................. सुटकेचे प्रयत्न करतेय ना
अन मी माझेच उदा. तुम्हाला सांगितलेय ना की माझी मैत्रिण वागते हिंदुसारखीच तरीपण टिकलीसुध्दा लावते हिंदु दिसावी म्हणुन.........
विकास मी वल्लरीच्या
विकास मी वल्लरीच्या उदाहरणाबद्दल लिहीले होते कथे बद्दल नाही. माझी पण एक मैत्रीण आहे ऑफीस मधे. चांगलं टिपीकल हिंदु आडनावं असलेली आणि वागणारीही. मैत्री झाल्यावर बर्याच महिन्यांनी ती लग्नाआधी मुस्लिम होती हे कळाल तेव्हा शॉकच बसलेला.
नंदीनीच कळलं. तुमच्या उदाहरणात तुमची मैत्रीण मैत्री नंतर बदलली आहे वाटतं.
वल्लरी पुढचां भाग कधी?
अदिति, माझे हे काही मित्र
अदिति, माझे हे काही मित्र आधीपासूनच तसे आहेत. प्रेमात मैत्रीत वगैरे अजिबात बदललेले नाहीत.
वल्लरी पुढचा भाग लिही, नाहीतर इथे टीपी चालू होइल आता
आदिती, OK माझे अन नंदीनीचे
आदिती, OK
माझे अन नंदीनीचे मित्र सारखेच कसे?
योगायोग असेल कदाचित
तुमच्या उदाहरणात तुमची मैत्रीण मैत्री नंतर बदलली आहे वाटतं <<<<<<<<<<<< खर आहे
......... माझी मैत्रिण मैत्रीनंतर बदलली आहे.............. तो बदल मलापण आवडतो...
वल्लरी पुढचा भाग लिही, नाहीतर इथे टीपी चालू होइल आता<<<<<<<<अनुमोदन
माझे अन नंदीनीचे मित्र सारखेच
माझे अन नंदीनीचे मित्र सारखेच कसे? << असं मी कधी म्हणाले?
नाहीतर इथे टीपी चालू होइल
नाहीतर इथे टीपी चालू होइल आता<<<<<<<<अनुमोदन + १
टीपी करायला पुढचा भाग उद्या
टीपी करायला पुढचा भाग उद्या किंवा एकदम मंगळवारीच टाकू शकेन. खूप काम आहे. आज सकाळ्पासून आत्ता माबोवर आलेय.
आदितीताई, तुम्ही म्हणायला
आदितीताई, तुम्ही म्हणायला नाही मीच तुम्हाला विचारतोय..............
waiting..& waiting... &
waiting..& waiting... & waiting..... & waiting,,,,,,,,,,,,lost interest in reading further....
are navin bhag yenar ahe
are navin bhag yenar ahe ka?????? I think story purn honyasathi ajun 1 varsh lagel.
waiting..& waiting... & waiting..... & waiting,,,,,,,,,,,,lost interest in reading further....
waiting..& waiting... &
waiting..& waiting... & waiting..... & waiting,,,,,,,,,,,,lost interest in reading further.... + ++++++१
पहिला भाग २९ औगस्त ला आला
पहिला भाग २९ औगस्त ला आला होता ना?
गेले कित्येक भाग (हा तेवीसावा
गेले कित्येक भाग (हा तेवीसावा भाग आहे.) कथा तिथेच फिरते आहे.
>>>>> नंदिनीला अनुमोदन...
Pages