होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगळवार दि. १७ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आजचा भाग....सुरुवात ते शेवट निव्वळ मुगाच्या डोश्यांवरील चर्चेने खाल्ला. तीनचार बायका एकत्र येऊन जान्हवीने ते आजीला आवडणारे मुगाचे डोसे करावे की ना करावे यावरच अर्धा तास दळण घालीत होत्या...एक बोलते, दुसरी शंका काढते, तिसरी उत्तर देते....आणि शेवट काय तर तिघीनींही खाली जाऊन जान्हवीला सांगू या तू डोसे करू नकोस, या निर्णयाप्रत येतात. खाली येतात तर जान्हवी [आवाज न येणार्‍या मिक्सरवर] चटणी करीत आहे तर श्री तिला चहा करून देत आहे....प्रथमच तो किचनमध्ये काहीतरी काम करीत आहे. अर्थात त्याला चहाही येत नाही...हे त्याने अगोदरच जान्हवीला सांगितलेले असतेच, तरीही आज पत्नी सर्वांना नाष्टा करणार म्हणून तिच्यासाठी आपण निदान चहा तरी करू या भावनेने तिथे तो किचनमध्ये झटापट करीत आहे. शेवटी चहा झाला....एक कप बायकोला तर दुसरा कप स्वतःसाठी.... जान्हवी एक घोट घेते आणि नवर्‍याकडे बघत बघत स्मित हास्य करीत "व्वा...छान झाला आहे." असे म्हणते. आनंदाने श्री देखील एक घोट घेतो आणि त्याचा बेचवपणा पाहून तोंड वाकडे करतो....जान्हवीकडे तो कप परत मागतो पण ती देत नाही...मला असला चहा चालतो....शिवाय म्हटलेच आहे की खावून माज करावा...टाकून नाही....हे वचनही श्री ला सांगते. हा संवाद चालू असतानाच नर्मदाआई, शरयू आणि सरसूमावशी तिथे येतात. त्यानाही श्री ने चहा केला हे पाहून आनंद होतो आणि त्याही त्याच्याकडे तो चहा मागतात.....दरम्यान त्या जान्हवीला नाष्ट्याचे विचारतात तर ती सांगते, 'माझी तयारी झालीच आहे....आत्ताच चटणी केली...ती झाली की संपलेच..." एवढ्या बोलण्यावर जणू काही आता आभाळच कोसळले असाच चेहरा या तिघी करतात.

या अगोदर मध्यरात्री नर्मदाआई आणि जान्हवी बोलत असतानाच बेल वाजते आणि इतक्या वेळाने कोण आले असेल अशी भीतीने नर्मदाआई तिकडे जावे की ना जावे या विचारात आहेत तोच जान्हवीच हेरते की नक्की शरयू असणार आणि लगबगीने पुढे जाऊन दार उघडते,....आनंदाने शरयू आत येते आणि जान्हवीशी काही बोलणार तोच नर्मदाआई तिथेच असल्याचे पाहून तिला काहीच सुचत नाही. नर्मदाआई तिला जाब विचारतात "मध्यरात्री कुठे गेली होतीस ?" त्यावर शरयू चूप राहिल्याचे पाहून जान्हवी तिची बाजू घेते आणि म्हणते, "म्हणजे आई, माझे डोके खूप दुखत होते आणि शरयूआई बाहेर जाऊन गोळ्या घेऊन येतो म्हणाल्या. त्या गेल्या होत्या...". त्यावर नर्मदाआई 'मग हा गजरा कुठला आला ?" याला उत्तर म्हणून शरयू चाचपडत, 'रस्त्याने येताना एक गरीब मुलगा हे गजरे विकत होता....त्याला मदत म्हणून मी घेतला एक..." असे दोघीही काहीबाही सांगून तो प्रसंग निभावून नेतात.

इकडे सदाशिवरावांच्या फ्लॅटमध्ये शशीकलाबाई जुन्या कपड्यांचा ढीग बाहेर काढून वॉशिंग मशिनसंदर्भात नवर्‍याशी चर्चा करीत आहेत. मध्येच त्यांच्या हातातून कपाटातील एक टॉवेल बाहेर पडतो....त्या टॉवेलबरोबर कपाटातील एक वस्तूही पडते....ती वस्तू पाहाताच शशीकलाबाई सुरुवातीला दचकतात....पण काही वेळाने पिंट्यामुळे आपल्यावर जगबुडी आली अशा आविर्भावात रडू लागतात....नंतर सदाशिवरावही तिथे येतात, तेही सुन्न झाल्याचे दाखविले गेले. तेही आपल्या मुलाविषयी तसलेच शब्द वापरतात.

मात्र ती वस्तू कसली वा काय आहे हे दिग्दर्शकानी गुलदस्त्यात ठेवले आहे....त्याचा खुलासा अर्थात होईलच.

मामा वाचले. सध्या ही मालिका मी बघत नाही ते बरे आहे. रात्री मध्यरात्री श्रीला गोळ्या घ्यायला न पाठवता, शरयूला का पाठवले, हा प्रश्न नर्मदाआईच्या मनात येत नाही का? ठाण्याला इतक्या मध्यरात्री गजरे विकायला असतात का? असे प्रश्न नर्मदाला पडत नाहीत?

मामा तुम्हाला धन्यवाद अपडेट्ससाठी.

अदिति.....अन्जू.... धन्यवाद.

~ का, कसे, असे का नाही....मध्यरात्री शरयू बाहेर का जाते...श्री गोळ्या आणायला का गेला नाही ? हे आणि असले अनेक प्रश्न माझ्याही कानीमनी भुंगा घालतात.....पण याला माझ्याकडे कसलेच उत्तर नाही. फक्त दाखवित असलेल्या भागातील मनाला बरे वाटेल तेवढाच भाग स्वीकारावा आणि जे पटत नाही ते सोडून द्यावे, असेच सध्या मी करीत आहे. तसे केले नाही तर मग जो काही पाचदहा मिनिटांचा आनंद मिळतो, तोही विरुन जाईल.

शरयु बेल का वाजवते? बेल सगळ्यानांच ऐकायला जाइल ना?>>मग ती घरात कशी येणार? हा तिने जानूला फोन करुन यायला हवे.

हि छोटी आई रात्री बाहेर जाते न मग खूप उशिरा घरात शिरते.....त्यांच्या घराला रात्री पहारेकरी नाही ठेवत वाट्ट....घरातल्या बायकांना एकदा वॉचमन बद्दल (दिवसा) बोलताना दाखवले होते. तसेच त्यांच्या मुख्य दरवाज्याला फक्त वरच्या बाजुला हाताने लावता येतील अश्या कड्या आहेत....म्हणजे दार बंद कराचे असेल तर आतून कडी लावायची किंवा बाहेरुन कडी लावावी लागेल. दार ओढून लॉक करायची सोय नाही.
छोटी आई दाराला कडी न लावताच बाहेर पडायची....अन सगळे आपापल्या खोलीत गाढ झोपायचे/झोपतात. नवर्याला भेटण्यासाठी एव्हढी रिस्क!!! काहिही!!!

बेल वाजवली की दार ठोठावले? शरयू काल फोन घरी विसरून गेली होती.

आम्ही आमच्या श्रीबाळाला कोणतीही कामे सांगत नाही

श्री आणि जान्हवीचे संवाद ऐकणे म्हणजे कायच्याकै गोडं गोडं होत.. आईस्क्रीम आणि गुलाबजाम एकत्र खाण्यासारखं Uhoh
कोण नवरा बायको एवढे गोड आणि अती समजूतदारपणे बोलतं प्रत्येक वेळेला? जाम बोअर झाल्ये आता ती मालिका. त्यापेक्षा इथे येऊन अशोक मामांचे अपडेट्स आणि त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया जास्त चांगलं वाटतं Happy

रच्याकने झाला ना तो शरयूकाकू रात्री यायचा सीन कालच?? Biggrin

मुगाच्या डोशांचं शिवधनुष्य??? हहगलो! एका पदार्थावरून कितीईईईईईई चर्विचरण!! आणि आज हट्टंगडीबाईंच्या तोंडाकडे सगळ्या आशेने बघताना दाखवणार आहेत(- हे तरी पाहिलंत ना लोकहो 'उद्याच्या भागात' अंतर्गत? की तेही प्रोमोजमध्ये दाखवलं होतं आधी? ;)) सबंध जग हादरवून टाकणारा निर्णय त्या देणार आहेत अशी उत्सुकता अगदी!

मुगाच्या डोशांचं शिवधनुष्य??? हहगलो! एका पदार्थावरून कितीईईईईईई चर्विचरण!! आणि आज हट्टंगडीबाईंच्या तोंडाकडे सगळ्या आशेने बघताना दाखवणार आहेत, सबंध जग हादरवून टाकणारा निर्णय त्या देणार आहेत अशी उत्सुकता अगदी!>>>>>>>> अनुमोदन... शिवधनुष्यच उचलायच तर एखादा कठीण पदार्थ तरी असायला हवा होता. तसच जान्हवी नेमकी त्याच पदार्थांची नाव कशी घेते ज्यांच त्या घराला वावड असत? मागे त्या नारळीभातावरुन पण असाच अख्खा एपि वाया घातला होता.

'गोकुळ' बंगल्यात काय होते त्याहीपेक्षा सहस्त्रबुद्धे पतीपत्नी का रडत आहेत ? याचीच उत्सुकता जास्त लागून राहिली आहे. "असला पोरगा पोटी जन्माला येण्याऐवजी वांझ राहिले असते तर चालले असते" असे त्राग्याने जेव्हा शशीकलाबाई म्हणते त्यावेळी सदाशिवरावही मूक संमती देतात असे दिसले....म्हणजे त्या पिंट्या वाघ्याने केले तरी काय हीच उत्सुकता.

बेल वाजवली की दार ठोठावले>>> मयेकर काका तुमच बरोबर आहे तिने दार ठोठावल....
अजुन एक उशीर झाला, रात्र खूप झालीय एवढच प्रत्येक जण बोलत होत. नक्की किती वाजलेत हे कोणीच बोलल नाही.... त्यामुळे ती वेळ मध्यरात्र आहे की नुसतीच रात्र आहे हे नक्की माहित नाही....

मयेकर काका तुमच बरोबर आहे <<<

ही मालिका संपेपर्यंत बहुधा लोकं मयेकर आजोबा म्हणायला लागलेले असतील.

Light 1

ही मालिका संपेपर्यंत बहुधा लोकं मयेकर आजोबा म्हणायला लागलेले असतील. >>>> Lol

हे तरी पाहिलंत ना लोकहो 'उद्याच्या भागात' अंतर्गत? की तेही प्रोमोजमध्ये दाखवलं होतं आधी? >>>> मी कालचा भाग पाहिला नाही..
पण मुळात जे त्या भागात घडलं नाही ते त्या भागात घडलं असं लिहून वर ते खरं मानावं हा आग्रहं का? Wink

पण मुळात जे त्या भागात घडलं नाही ते त्या भागात घडलं असं लिहून वर ते खरं मानावं हा आग्रहं का? डोळा मारा>> ते त्या भागात घडलं नव्हतंच पण Wink

वाहवा!!
किती छान व्हॅलिड मुद्दे येत आहेत मालिकेविरोधात... गो अगो आणि भ.म.!

ते त्या भागात घडलं नव्हतंच पण >>> तो तेच म्हणतोय ना पण Proud

मी कोणालाही पुतण्या, पुतणी, नातू, नात, अगदी 'बाळ' असेही म्हणणार नाही. कोणाचा आग्रह असेलच तर काकू म्हणेन. Biggrin

तुम्ही कुणाला काही म्हणाव या हेतुने कोणीही तुम्हाला काहीही म्हणत नाहिये. मी तर नक्कीच नाही.... मयेकर काका. त्या बेफिजींकडे लक्ष देउ नका तुम्ही जास्त, ते त्यांचा आयडी सार्थकी लावत आहेत.

बेफिकीरपणे....

मुग्धा.रानडे, मला प्रत्यक्ष आयुष्यातली नाती पुरेशी आहेत. इंटरनेटवर दादा, ताई, काका, मामा, आजी-आजोबा,मावश्या, भाचरं,नातवंडं. इ. नाती जोडण्यात जराही रस नाही. तसाही आपला एकमेकांशी काहीही सरळ संवाद नाही. एखाद्याच्या नावापुढे नात्याचे कसलेही संबोधन न जोडता एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करणे कठीण नसावे. मला माझ्या नावा/आडनावापुढे 'जी' जोडलेलेही आवडत नाही. हे अनेकवेळा सांगूनही लोक पुन्हा ते करतातच.

अहो फक्त जी जोडतात हो... हांजी हांजी तर नाही करत ना? मग कशाला त्रास करुन घेताय? तुम्हाला रस नाही तर तुम्ही नका जोडु....मग कोणी तुम्हाला काका, मामा, आजोबा अस संबोधल तर काय बिघडल...काहींना नावापुढे काही न जोडता कुणालाच संबोधता येत नसेल.... आणि काका हे संबोधन तर आपण सगळ्यांनाच लावतो ना म्हणजे वडिलांचे मित्र, शेजारी, अगदी रस्त्यावरील अनोळखी व्यक्तीलासुद्धा.......

लहानतोंडी मोठा घास घेतला म्हणुन please don't mind

I do.

बुधवार दि. १८ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ आजच्या भागाबाबत केवळे एकदोन ओळीतच लिहिता येईल.....कारण पहिली दहा मिनिटे श्री ने केलेल्या चहाबद्दल अतिशय सविस्तरपणे तरीही तितकीच कंटाळवाणी चर्चा सा-या बायकांची तर पुढील १०-१२ मिनिटे जान्हवीने केलेल्या मुगाच्या डोशाबद्दलची चर्चा....त्यातही आईआजीला वाटत असते की नर्मदाबाईनी ते डोसे केले आहेत म्हणजे नक्कीच बिघडलेले असणार. तरीही सर्वच जमलेले असल्याने त्या एक घास खातात आणि डोळे आश्चर्याने मोठे करून म्हणतात, "व्वा ! कमाल आहे.. ! इतका चवदार आणि चटणीही तितकीच चविष्ट". बेबीआत्या मग आपल्या आईची री ओढते....ते पाहून इंदूबाईही बैलासारखी मान हलविते...... नर्मदाबाईना स्वतःचे कौतुक करून घेतलेले आवडत नाही...जान्हवी शेजारीच आहे...तिच्याकडे पाहात त्या आजीला म्हणतात, "आई, मी सांगते की हे मुगाचे डोसे मी केलेले नाहीत...." यावर आजी क्षणभर खाणे थांबवून विचारतात, "मग कुणी केले ?" नर्मदाबाई आणखीनच मान खाली घालून "जान्हवी ने केले आहेत सारे पदार्थ".... ह्या खुलाशावर बेबीआत्या सारे काही नासल्यासारखा चेहरा करते.....तर त्या उलट आजीना समाधान होते....त्या जान्हवीकडे पाहात, "गुड....सुरेख झाले आहे, सारे" असे कौतुकाचे शब्द काढून डोसा खायाला सुरुवात करतात. जान्हवीच्या डोळ्यात आनंदाश्रू....ते लपविण्यासाठी ती जिन्या चढून आपल्या रूममध्ये जाते, तिच्या पाठोपाठ तिचे कौतुक करण्यासाठी श्री ही जातो. आजी आनंदी झालेल्या शरयू आणि सरसूमावशीला सांगतात "तिला काही अडचण होणार नसेल तर इथून पुढे प्रत्येक रविवारी तिनेच नाष्टा केला तर चालेल....तुम्ही सांगा तिला." इतके ऐकल्यावर या दोघी तत्परतेने श्री च्या खोलीत येऊन जान्हवीचा हर्षाने ताबाच घेतात....तिला ही बातमी सांगतात.....जान्हवी व श्री खूष.

सहस्त्रबुद्धे यांच्या फ्लॅटमध्ये कालचाच भाग पुढे चालू.....त्या कपाटातून जे काही खाली पडले आहे, त्याबद्दलच दोघेही डोक्याला हात लावून बसले आहेत.

उंदीर... मेलेला.
कपाटातून मेलेला उंदीर पडला. पींट्याला सांगितलं होतं सगळं सामान बांधताना... की नीट लक्षं दे... नको असलेल्या वस्तू न्यायच्या नाहीयेत त्या नवीन जागी. पण त्याचं कशातच लक्षं नाहीये. एक काम नीट करेल तर शप्पथ.
मिसेस सहस्त्रबुद्धेंच्या हातून इथली काडी तिकडे होत नाही... उंदीर आणि तो सुद्धा मेलेला... त्या हलवणार?

मेलेला उंदीर न्यायचा नसणार सबुना नवीन घरी... म्हणून कपाळाला हात. आता पिंट्या कधी येणार घरी आणि त्यालाजाब विचारून उंदीर आणि त्याचाही पंचनामा होणार... ते सगळं पुढल्या भागांतर्गत.

....
सॉरी. ही सिरियल जाम म्हणजे जाम पकवतेय. पण इथे येऊन मामांचे अप्डेट्स आणि चर्चा वाचणं काही थांबत नाही माझं. आज जरा इथेच धतिंग कराविशी वाटली Happy

हं... तुमचं चालू दे आता.

Pages