Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मूगाचे डोसे जमतील क?......मी
मूगाचे डोसे जमतील क?......मी करते बरेचदा....असे नर्मदा आणि जान्हवी मधला संवाद....असेच काहीसे शेवटी पाहीले......
मीही नाही पाहिले ते! ते कधी
मीही नाही पाहिले ते! ते कधी झाले?
शरयूचा तो मध्यरात्रीचा प्रवेश
शरयूचा तो मध्यरात्रीचा प्रवेश काल एपिसोड संपता क्षणाचा होता.. >>>> नाही.. शरयूला दार उघडायचा प्रसंग कालच्या एपिसोडमध्ये किंवा एपिसोड संपताना दाखवण्यात येणार्या 'उद्याच्या भागात' नव्हता..
ओके ओके जे काय असेल ते आज
ओके ओके जे काय असेल ते आज कळेलच..... शांत व्हा शांत व्हा.
बहूदा फकस्त मामांच्या टीव्हीत
बहूदा फकस्त मामांच्या टीव्हीत दाखवलं
पण झाले कधी ते?
पण झाले कधी ते?
अरे बाप रे !!! मग
अरे बाप रे !!! मग भाचेभाच्यांनो.... मी पाहिले ते काय होते ? वर्णन केलेला प्रसंग जशाच्या तसा माझ्या नजरेसमोर आला आहे ना, बंधूनो !!
आता रात्री ८ वाजता तोच भाग [जान्हवी दार उघडत आहे....शरयू प्रवेश करते....आणि नर्मदाबाई चेहर्यावर आश्चर्य दाखवित आहेत.....इ.इ. ] दाखविला म्हणजे मग तुम्ही मला पेनल्टी देण्यास तयार राहा.
<आजीला मुगाचे डोसे हवे असतात
<आजीला मुगाचे डोसे हवे असतात पण ते कुणालाच करता येत नसल्याने त्यावर तो विकल्प बाजूला पडतो. > श्रीची आई ब्रेफासाठी हे पर्याय सांगत असते एकेक पर्याय बाद होत तिला मुगाचे डोसे सुचतात तेव्हा आईआजी सांगते की तुम्हाला कोणाला मुगाचे डोसे करता येत नाहीत तेव्हा करू नका.
आता जान्हवी मुगाचे डोसे करेल तेव्हा ही मला आव्हान देते, माझे म्हणणे झुगारून लावते अशी सुरुवात होऊन मस्त डोसे केले म्हणून कौतुक असे होईल.
अवांतर : इथे देशापुढे दिल्लीत राष्ट्रपती राजवट , लोकपाल कायदा असले महत्त्वाचे प्रश्न असताना या बायका रविवारी सगळ्यांनी एकत्र ब्रेफा करायचा, त्यासाठी मेन्यु ठरवायचा काथ्याकूट करतात. एकदम भंकस, बंडल, फालतू, टिनपाट,.....
असा प्रसंग आहेच. पण तो
असा प्रसंग आहेच. पण तो कालच्या भागात 'उद्या पहा' म्हणून दाखवला नव्हता. गेल्या आठवड्यात मालिकांच्या मधल्या जाहिरातीच्या वेळेत जे प्रोमोज (प्रमोशनल स्पॉट्स?) दाखवतात त्यात दाखवला होता.
नैत्तंकै
नैत्तंकै
हो जाहिरातिं मध्ये दाखवला
भरत.... "...कालच्या भागात
भरत....
"...कालच्या भागात 'उद्या पहा' म्हणून दाखवला नव्हता...."
माझे अनुमान असे की.....सासू आणि सून ह्या दोघी उद्याच्या नाष्ट्याची चर्चा करताना दाखविले आहे आणि त्याच वेळी बेल वाजते.... ह्या दोघी एकमेकीकडे पाहतात आणि जान्हवी दरवाजाकडे जाते, उघडते, समोर शरयू.
या दृष्यामुळे मला वाटत आहे की हा भाग आज दाखवितील. [अर्थात नाही दाखविले म्हणजे माझेच चुकले असे म्हणतो मी अपडेटच्यावेळी....]
पिंट्या जान्हवीला फोन करतो व
पिंट्या जान्हवीला फोन करतो व आपटेच्या भेटीबद्दल सांगतो. पूर्वीचा पिंट्या परत भेटला म्हणून जान्हवी खुष.
का सतत सिरियल्स मध्ये बायका
का सतत सिरियल्स मध्ये बायका फक्त खाणं पिणं दागिने आणि घरातलं राजकारण भोगणे अथवा करणे यातच बिझी दाखवतात?
बायका दुसरं काही करत नाहीत का?
सुधरलेला आपटे आणण्याच
सुधरलेला आपटे आणण्याच प्रयोजन सरु मावशी असावं
सुधरलेला आपटे
ईईईईईईई त्यापेक्षा ती मावशी
ईईईईईईई त्यापेक्षा ती मावशी अविवाहीत राहिलेली बरी...... बादवे मी आत्ता रिपिट टेलिकास्ट बघितला....शरयुच्या येण्याबद्दल काही नाही दाखवल एपि संपताना.... ते आजच्या भागात असेल......
कशाला हवाय तो आपटे ???
कशाला हवाय तो आपटे ???
त्याला तीन तिठ्यावर नेऊन आपटा म्हणावं.
(हे त्या व्यक्तिरेखेबाबत आहे, हे वेगळे सांगणे नलगे.)
सिरिअलवाल्यांनो, बर्यापैकी चाललेल्या,
अभिनयाच्या बाबतीत खूपच उजव्या असलेल्या सिरिअलला उगाच भरकटवू नका हो.
उगाचच काहीतरी उपकथानकेही नकोत.
ती आली की(त्या छद्म्पादांमुळे - pseudopodia) सिरिअलचा अमीबा व्हायला वेळ लागणार नाही.
तेव्हा प्लीsssज.......
कशाला हवाय तो आपटे ??? त्याला
कशाला हवाय तो आपटे ???
त्याला तीन तिठ्यावर नेऊन आपटा म्हणावं.<<<
त्रिवार नाही काही
त्रिवार नाही काही दिवसांपूर्वी प्रोमोजमधे दाखवले होते.>>+१
सिरिअलवाल्यांनो, बर्यापैकी
सिरिअलवाल्यांनो, बर्यापैकी चाललेल्या,
अभिनयाच्या बाबतीत खूपच उजव्या असलेल्या सिरिअलला उगाच भरकटवू नका हो.>>>> भिडेकाका प्रचंड अनुमोदन...... अभिनयाच्या बाबतीत खरच बेस्ट आहे ही मालिका.
अमिबा + छद्मपाद =
अमिबा + छद्मपाद =
Mamanche barobar
Mamanche barobar aahe.....sorry mama...
मुगाच्या dosyanchi
मुगाच्या dosyanchi रेसिपी
साहित्य
मुगाची डाळ - हिरवी सालासकट येते ती.- २ वाट्या
आले - पाउण इंच
मिर्च्या - ३-४ ( तिखट आवदत असल्यास जास्त घ्याव्यात.)
लसुण - ६-७ कळ्या
जिरे- १/२ चमचा
मीठ - चविनुसार.
कृती
डाळ ५-६ तास पाण्यात भिजवुन घ्या... रात्रभर ठेवली तरी चालते.
मग त्यातले पाणी काढुन मिक्सर मधे वाटुन घ्या. वाट्ताना त्यात आले मिर्चि लसुण व जिरे घाला.
वाटताना थोडे पाणी घाला. आपण डोस्याला करतो तितपत पातळ करावे.
चविनुसार मीठ घालुन अर्धातास ठेउन द्यावे.
नॉनस्टीक पॅन मधे थोडा थोडा तेल टिश्युपेपर ने लावुन घ्या आणि डोसा करुन घ्या.......बाजुने थोडेसे तेल सोडा.
डोसा दोन्हि बाजुने परतुन घ्या.
आणि टोमॅटो सॉस किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर वाढा.
चविला मस्तच लागतो आणि पौष्टिक हि आहे
ही पाककृती केल्याने जान्हवीला
ही पाककृती केल्याने जान्हवीला सासर सुसह्य होईल... की बेबीआत्या नरम पडेल?
'गल्ली चुकलं की हो....' रावसाहेब...
मालिकेची प्रत्येक फ्रेम
मालिकेची प्रत्येक फ्रेम चकचकीत दिसावी ह्या अट्टहासापायी जान्हवीच्या आईवडिलांना नवीन घरात हलवलेय. अगदी चाळ नाही तरी वास्तववादी वाटेल इतपत बर्या फ्लॅटमध्ये हलवता आले असते पण तसे केलेले नाही. चाळीतून हलले तेव्हा त्यांनी सगळे घर रिकामे केलेले दाखवले आहे. ते सगळे सामान आता कुठे गेले ?
आज जान्हवीच्या आईचे वागणे तिच्या आत्तापर्यंतच्या व्यक्तिमत्त्वाला विसंगत ! जी बाई चहा करायलाही उठत नाही ती नवर्याला वेगवेगळे काढे उकळून देणार ?
जान्हवी कर्जाऊ काढणार
जान्हवी कर्जाऊ काढणार असलेल्या रकमेचे लोणी शिंक्याला टांगले आहे. मोलकरीण हवी म्हणून पुडीही सोडलेली आहे.
पिंट्यांच्या कपड्यांतून चंद्रहार पडला का?
अरे सगळ्यात महत्वाच म्हणजे
अरे सगळ्यात महत्वाच म्हणजे त्यांचा मिक्सर सायलेंट आहे.. आवाजच येतं नव्हता जान्हवी चटणी करत होती तेव्हा
पिंट्यांच्या कपड्यांतून
पिंट्यांच्या कपड्यांतून चंद्रहार पडला का?<<<
आजचा एपिसोड आला नाही राव अजुन!
अरे सगळ्यात महत्वाच म्हणजे
अरे सगळ्यात महत्वाच म्हणजे त्यांचा मिक्सर सायलेंट आहे.<< हो माझ्याही डोक्याच हाच विचार आला
२४ तास स्वयंपाक आणि घर करणार्या बायकांना मुगाचे डोसे जमत माहीत? कमाल आहे.
Pages