होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग पियु राणी मी सगळ्यांची मन जिंकुन घेईन ही वचनपूर्ती ग....आईआजीला आवडलेले मुगाचे डोसे हे त्यातल पहिल पाउल..... समझे Happy

अशा प्रकारे विशेष काही घटना घडलेल्या न दाखवता किंवा कथानक पुढे न सरकवता
सिरिअल तिथल्या तिथेच रेंगाळत राहिली की,
"पाणी घालून पातळ केलेली आमटी" असा वाक्प्रचार ऑर्कुटच्या काळात वापरला जायचा, त्याची आठवण झाली.

(आमटीत पाणी घालण्याच्या रेसिपीवरही एखादा एपिसोड काढता येईल का असा एक विचार मनात डोकावून गेला)

अंजली बारा,

म्हणजे शलाका म्हणतात तसा मेलेला उंदीर कुठेच नव्हता का? की मेलेला उंदीर ही शलाकांची फँटसी होती?

त्यांचा जोक फुकट गेला की हा धागा? हल्ली काहीच समजत नाही.

गुरुवार दि. १९ डिसेंबर २०१३ : अपडेट

~ दोनतीन दिवस सहस्त्रबुद्धे पतीपत्नी तिजोरीतून फरशीवर जी वस्तू पडली होती ती पाहून त्याना दु:खाचा जबरदस्त धक्का बसला आहे आणि त्यामुळे ते आता काही सारे नष्ट झाले पोराच्याबाबतीत म्हणून रडत होते. पोरगा कायमचा वाया गेला....शिवाय असले कार्टे पोटाला का जन्माला आले असाही आक्रस्ताळेपणा कलाबाई करत होत्या....प्रेक्षकांनीही ती रहस्यमय वस्तू म्हणजे चंद्रहारच आहे आणि तो त्या लग्नाच्या आदल्या रात्री पिंट्याने चोरला होता अशी या दोघांची समजूत झाली असणार असा तर्क केला होता.....पण शेवटी ती वस्तू निघाली एक सिगारेट. पोराच्या खिशात सिगारेट सापडली म्हणजे तो धुम्रपान करीत असणार आणि म्हणजेच तो वाया गेला हे सिद्ध झाले. आज जावई आणि कन्या घरी मुगाचे डोसे घेऊन आले आहेत आणि अगोदर आनंदाने आईबाबा त्याचा आस्वाद घेताना पाहून जान्हवी सासुरवाडीकडील गोड वृत्तांत त्याना सांगतेच शिवाय आईआजीनी किती प्रेमाचा आशीर्वाद दिला त्याचेही हसतखेळत वर्णन करते. कलाबाईंच्या तोंडाचा पट्टा सुटतोच आणि जावयाला माझी पोरगी म्हणजे कशी हिर्‍यासारखी आहे हे साग्रसंगीत वर्णनाद्वारे सांगते....ते ऐकून सदाशिवरावच तिच्याकडे पाहून, "पुरे कर आता...!" असे म्हणतात. ते ऐकत असतानाच कलाबाई "अहो करू द्या मला कौतुक माझ्या मुलीचे....नाहीतर आता पोरगा तर सिग्रेटी ओढून वाया जाणारच आहे...तेव्हा..." इथे जान्हवी व श्री चमकून या दोघांच्या चेहर्‍याकडे पाहतात. जान्हवीलाही हा धक्का असतो. ती आईबाबाना सविस्तर विचारते.....त्याला सदाशिवराव उत्तर देत नाहीत, पण कलाबाई त्याच्या खिशात सिगारेट सापडली म्हणजे तो बाद झाला....अभ्यासाचे खोटे कारण सांगत होता...इ.इ. सांगते. जान्हवी भावावर चांगलीच संतापते, पण तो तर घरात नसतोच....श्री आपण नंतर त्याला फोन करून बोलावून घेऊ असा सल्लाही देतो....त्याच दरम्यान बाबा "मी पायाचे ऑपरेशन करून न घेता कॉलनीतील आयुर्वेदिक डॉक्टरांकडून उपचार करून घेतो..." असे सांगितल्यावर जान्हवी आणि बाबा यांच्यात एक मोठा संवाद घडतो. जान्हवी ऑपरेशनच्या बाजूने बोलते तर बाबा आयुर्वेदिक उपचारच योग्य ठरतील असा आग्रह धरतात.

बाहेर आल्यावर जान्हवी पुन्हा पिंट्याला फोन करण्याचा प्रयत्न करते मात्र तो फोन उचलत नाही. ती आणखीनच संतापते. श्री तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण असफल होतो. शेवटी 'अगं, तो जर फोन उचलणारच नसेल, तर वारंवार तू तरी कशाला प्रयत्न करीत आहेस ? घरी चल, तिथून करू. पण त्य अगोदर अशा अवतारात घरी जाण्यापेक्षा येथील एका हॉटेलमध्ये कॉफी घेऊन जाऊ..." जान्हवी निराशेने होकार देते.

गोकुळ बंगल्यात नेहमीप्रमाणे सरू, शरयू आणि इंदू यांचा शब्दांचा खेळ चालला आहे....ढवळ्या कोण आणि पवळ्या कोण ? काहीही. तर दुसरीकडे बेबीआत्यांचा नित्यनेमाचा फणकारा आहेच. ही येते आणि आईआजीपुढे उभी राहून जणू त्यानाच जाब विचारते, 'तू जान्हवीने केलेल्या पदार्थांचे इतके कौतुक का केलेस ? असे केल्याने ती डोक्यावर बसेल एक दिवस....आणि या घरातील सारी शिस्त मोडेल...". आईआजी बेबीला समजावून सांगतात, "जर तिने चांगले केलेच होते तर तिच्या कामाचे कौतुक हे केलेच पाहिजे. प्रत्येकवेळी तू तिच्या कामाकडे चुकीच्याच नजरेने पाहात राहिलीस की शिस्त कुठे राहिल ? तिने केलेले काम मला चांगले वाटले...त्यामुळे मी तसे म्हटले...." बेबीआत्या पाय आपटत किचनमध्ये जाते.

<< की मेलेला उंदीर ही शलाकांची फँटसी होती?>ईईईई
बेफीकिर.. काहीही काय?
जोक.... जोओ ओ ओ क. जोक होता हो तो.
(इतकं कळवळून माझ्या जोकबद्दल मी ह्यापूर्वी कधीच सांगितलं नव्हतं... देवा ह्या सिरियल ने काय काय दिवस दाखवलेत...
उठा ले रे बाबा)

बेफी, "उठा ले रे बाबा" असं म्हणायची आपल्यात पद्धत नाहीये... हा सुद्धा जोकच... माझी फॅन्टसी नाही.
(सग्ळं बाई विशद करून सांगावं लागतं...)
Happy

अशोक मामा पहिलीच वेळ तुम्हाला प्रतिसाद द्यायची. मी शक्यतो वाचणे पसंत करते. प्रतिसाद देताना मला माझ्या मराठीच्या limitation ची जाणीव होते, तरी आज प्रयत्न करून पहाते......मी हि मालिका कधी पहिली नाही पण येथे येवून वाचते अधून मधून. तसेही मला या आधी सुधा तुमचे लेख आणि प्रतिक्रिया वाचावयास आवडायच्या. तुम्ही मराठी मालिकेवर लिहिता आहात म्हणून वाचावयास सुरवात केली.

तुमच्या आजच्या प्रतिक्रिये मधील हे वाक्य. अशी अजून बरीच वाक्य आहेत........ 'तू जान्हवीने केलेल्या पदार्थांचे इतके कौतुक का केलेस ? वाचताना सहज मनास असे वाटले. बायका अजूनही ह्या असल्या छोट्या छोट्या गोष्टीना महत्व देतात. अजूनही त्याचं जग हे जेवण बनवणे, खरेदी करणे आणि tittle-tattle मधेच अडकलेल आहे. माझी खूप इच्छा आहे अश्या एका तरी बाई ला प्रत्यक्ष भेटायची.

<ढवळ्या कोण आणि पवळ्या कोण ? काहीही.>

हे "काहीही" कुठून आलं? मालिकेत गुंतल्याचा परिणाम तुमच्या भाषेवर होतोय बघा अशोक Wink

''ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, गुण नाही पण वाण लागला'' अशी म्हण असावी. काल द्विरू 'वाण नाही पण गुण लागला' असे म्हणत होत्या.

@ भरत,
मी सुद्धा ही म्हण "वाण नाही पण गुण लागला" अशीच समजत होते,चला ह्या निमित्ताने बरोबर काय आहे ते कळलं Happy

वाण नाही पण गुण लागला अशीच म्ह्ण आहे.
वाण म्हणजे रंग
एकमेकांच्या संगतीत राहिल्याने वर्ण बदलत नाही, पण गुण बदलतात. असं आहे ते

भरत....

म्हण अशीच आहे...."ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला....' वर दक्षिणाने अर्थ उलगडून दाखविला आहेच. मालिकेत त्याच अर्थाने वापर केला आहे. बाकी 'काहीही' असे माझ्याकडून टंकले गेले ते कदाचित त्यातील भाषेचा परिणाम असेलही.

@ अनन्या वर्तक....

धन्यवाद ~ मागे इथेच एकदा मी लिहिले होते की घरातील स्त्रीचा अपमान त्याच घरातील स्त्री जितका करते तितका बाहेरची करत नसेल. बेबीआत्या अशा स्त्रियांचे प्रतिनिधीत्व करीत आहे की ज्याना घरी मोफतपणे सार्‍या सुखसोई सहजी उपलब्ध असतानादेखील त्याना दिवसातून काहीवेळी 'इनो' घेतल्याशिवाय खाल्लेले पचत नाही. शिवाय आपल्यापेक्षा वरचढ घरी कुणी होऊ नये याकडे कटाक्ष ठेवायचा असतो. जान्हवीचे आगमन कुणालाच पसंत नव्हते....काही प्रमाणात शरयूचा अपवाद वगळता....त्यातही बेबीआत्या अग्रेसर. तरीही आपल्या अंगभूत कलागुणांनी आणि नवर्‍याच्या प्रोत्साहनाने जान्हवी जर त्या स्त्रियांचे मन जिंकून घेत असेल तर बेबीआत्याला ते पाहवत नाही....म्हणून ज्या आईच्या आधारे तिला विरोध करत राहाण्याचे तिचे मनसुबे आहेत त्यानाच आजीच्या कौतुकाने सुरुंग लागत असेल तर तिची रात्र झोपेविना जाणारच. मग वर उल्लेख केलेल्या वाक्यांच्या फुलझड्या तिच्या मुखातून झडत राहाणार ही जनरित म्हणावी.

मागे इथेच एकदा मी लिहिले होते की घरातील स्त्रीचा अपमान त्याच घरातील स्त्री जितका करते तितका बाहेरची करत नसेल>>>> प्रचंड अनुमोदन मामा

जनरीत वगैरे काही नाही ती बेबी फ्रस्ट्रेटेड आहे. स्वतःचा संसार नाही आणि इतरांचा बघवत नाही.
इतके रूल्स वगैरे करायचे असतील आणि शिस्त लावाय ची असेल तर ती आपल्या घरी. इथे काम नाही. गप राहा. असे तिला कोणी का सांगत नाही? फुकट लोकांच्या गोड संसारात विस्तव लावणार्‍या पण स्त्रिया अस्तात असल्या. बर शरयू सारखा निर्मल स्व भाव ही नाही.

जनरीत वगैरे काही नाही ती बेबी फ्रस्ट्रेटेड आहे. स्वतःचा संसार नाही आणि इतरांचा बघवत नाही.
इतके रूल्स वगैरे करायचे असतील आणि शिस्त लावाय ची असेल तर ती आपल्या घरी. इथे काम नाही. गप राहा. असे तिला कोणी का सांगत नाही? फुकट लोकांच्या गोड संसारात विस्तव लावणार्‍या पण स्त्रिया अस्तात असल्या. <<< व्वा. अतिशय आवडला हा उतारा मला.

किंबहुना मी तर म्हणेन त्या बेबी आत्याचा उल्लेख आता ह्या धाग्यावर सर्वांकडूनच 'फ्रस्ट्रेटेड बेबी' असा व्हावा. हे मला प्रामाणिकपणे वाटत आहे. त्या मालिका निर्मात्यांना व दिग्दर्शकांना हे कश्यामुळे समजत नसेल की ही असली पात्रे हल्ली घरात अधिक काळ टिकू शकत नाहीत?

'फ्रस्ट्रेटेड" ती असेल... पण तिच्या टापटिपीवरून, अन्यांशी बोलण्यावरून तिचे असे आत्यंतिक रुप नजरेसमोर येत नाही. ती 'जान्हवी वा आणि सहस्त्रबुद्धे कुटुंब आपल्या बरोबरीचे नाहीत' हा मुद्दा पक्का धरून आहे... कित्येक प्रसंगी तिने ते उच्चारूनही दाखविले आहे. तिच्या दृष्टीने सायली ही मुलगी श्री साठी योग्य होती....ती गोखले बनून आली असती तर मग बेबी फ्रस्ट्रेटेड राहिली नसती असेच म्हणावे लागेल.

बाकी माझा पुढील अंदाज असा आहे कथानकाबाबत.... एकदा का आजीनी जान्हवीला पूर्णपणे स्वीकारले आणि तिला मोकळीक दिली की ती १. शरयू आणि २. बेबीआत्या....यांचे मोडलेले संसार आपल्या कौशल्याने उभे करण्याचा प्रयत्न करणार. कदाचित बेबी त्यामुळे गोखल्यांच्या घरातून कायमची गेली असे चित्र दिग्दर्शक तयार करू शकेल.

तुमच्या कीबोर्डवर साखर पडो. हे असे पात्र दिसणे हे मालिका न आवडण्याच्या कित्येक कारणांपैकी एक कारण असू शकते.

पण कोणी दुसर्‍याच्या नव्या उभ्या राहू पाहणार्‍या संसाराला नजर कसे लावू शकते. आपण त्यांना एकत्र येण्याची सुखी होण्याची संधी द्यायची का ती नववधू पटकन घरातून कशी जाईल हे बघायचे.
नॉट डन. सर्व बायकी फालतू पणा वाटतो मला. श्रीपण रडू बाईच आहे. त्या बायका ज्या नक्की पस्तीशी पुढच्या आहेत त्यांना इतके इतके इतके फुलासारखे का जपावे लागावे. परिस्थीती आहे ही अशी आहे. टेक इट ऑर माइंड युअर ओन बिझनेस. असे बोलू शकत नाही का?

आईआज्जी मेंटल हॉस्पिटलची रेक्टर वाटते. जान्हवी हे पात्रच फेक वाटते. एवढे चांगले तरीही स्वाभिमानी कोणी असू शकत नाही. आठ ते साडेआठ कुठे काही चांगले आहे का?

Pages