सध्याच गणपती उत्सव झाला. साधरण श्रावण आला की सणांचा हंगाम सुरु होतो. पण सध्या प्रत्येक सणाचं मार्केटिंग झाल्या मुळे सण म्हणजे वैताग, ट्रॅफिक, गर्दी हेच डोक्यात.
साधी मंगळागौर सुध्धा प्रोफेशनल बायकांचा चमु बोलावुन " साजरी" केली जाते. त्यात मग मंगळागौर असलेली मुलगी बजुलाच रहाते, त्या बायकाच त्यांचे ठरलेले "इव्हेंट" करुन जेवुन निघुन जातात. तो "खेळ" व "मेळ" नसुन फक्त एक पर्फॉर्मन्स फक्त उरतो.
तिच गत दहिहंडी आणि गणेश उत्सवा ची.... दहिहंडी तर काही लोकांनी अगदी "साता समुद्रा "पार नेली. किती तो गोंधळ, किती आरडा ओरडा... रस्त्यात अडवणूक.... भर रस्त्यात ठिय्या.... ठाण्यात तर सुप्रसिध्ध हंडी व हंडी कर्त्यांच्या मुजोरीला तोड नाही. सतत कलकल....
दहिहंडीच्या काळात असेच टि. व्ही. वर काहीतरी पहात होते. मुलगी मैत्रिणीलाफोन करत होती. मैत्रिण बहुदा घरात नव्हती. मग दुसर्या दिवशी तिने परत फोन केला. तेंव्हा कळले की ती मैत्रिण ठाण्यातल्या "त्या" सु(?) प्रसिद्ध हंडी जिथे बांधतात त्याच इमारती मधे रहाते. ज्या दिवशी हंडी असे त्या दिवशी ते सगळं कुटूंबं मुलुंडला त्यांच्या आजीकडे निघुन जातं..... का? कारण हादरे बसतिल असं संगित आणि भयानक आवाज, घाण, गर्दी. ह्या सोसायटीने कायदेशीर रित्या लढा देण्याचा प्रयत्न केला होता. पण आर्थातच तो विरुन गेला...
गणेशौत्सव हा ह्या सगळ्या गोंधळाचा राजा !!!! ११ दिवस उत आल्या प्रमाणे लोकं वावरतात. त्यात सिव्हिक सेंन्स नावाच्या गोष्टीचं भानच नाही. आमच्या एरियात ठाणे पालिकेची एक बस येते. गणपतीचा मंडप बस स्टॉप वरच बांधल्या मुळे ह्या कालावधीत ही बस आत येत नाही. ११ दिवस गणपती चे + मंडप बांधायला लागणारे पहिले २० दिवस+ मंडप काढायला लाग्णारे पुढले २०/२५ दिवस.... बरं गणपती मंडळचे सर्वेसर्वा माजीमहापौर..... मग बोलणार कोणाला......
आज योगेशने काढलेले लालबागच्या राजाचे फोटो पाहिले आणि एक कळ मनात उठली ( जिप्सी फोटो अप्रतिम आहेत रे!!!) . ह्या काळात दादर्/परळ्/लालबाग ह्या एरियात रहाणं म्हणजे शिक्षा आहे... ( लग्न होवुन जेंव्हा परळला गेले त्या वर्षी मजा वाटली नंतर मात्र घी देखा पण बडगा नही देखा अशी अवस्था झाली). माझं हे विधान अनेकांना पटणार नाही. पण हे खरं आहे. ही गणेशौत्सवाची गर्दी पाहिली की ३ वर्षां पुर्वी चा प्रसंग लख्ख आठवतो. आमचे मामा हिंदमाता जवळ रहातात. असेच उत्सवी दिवस. त्यांना घरात अस्वस्थ वाटु लागलं म्हणुन तातडीने त्यांना टॅक्सीने के.इ.एम. ला नेण्या साठी मामी निघाल्या. गर्दी अणि गोंगाटा मुळे हिंदमाता ते के.इ.एम. ह्या एरवी चालत १० मिनिटे लागणार्या अंतराला त्या दिवशी टॅक्सीने २५ मिनिटं लागली. आणि के.इ.एम ला मामांचं प्रेत पोहोचलं..... टॅक्सीतच ते ६१ वर्षांचे मामा वारले. बायकोच्या शेजारी!!!! त्या पुढचे हाल मी लिहित नाही.
एखाद्याचा जीव गमवावा लागणं ह्या पेक्षा सण साजरे करणं तेही जाहिर रित्या... गरजेचं आहे का. आपणच जर अश्या ठिकाणांना जाणं थांबवलं तर आपोआपच हे उपक्रम बंद पडतिल. हा गोंधळ, गडबड, आरोप, पैश्याची उधळण.... खरच गरज आहे का? आजच्या मंदीच्या काळात हे भान आपण नाही ठेवायचं तर कोणी? बाकी राजकारण आणि त्यातली माणसं ह्यांवर न बोलणंच बरं.....
मी स्वतः कधीच गर्दी मधे देवदर्शन करायला जात नाही. लोकांचं माहिती नाही पण आम्ही आमच्या कुटूंबा साठी अलिखित नियम बनवले आहेत.. सर्व संमतीने
१. जिथे कुठे गर्दी असेल अश्या ठिकाणी देव दर्शनाला न जाणे. उदा. सिद्धीविनायक, महालक्ष्मी, कोल्हापुर ची देवी, तुळजापुरची देवी ( आमची कुलस्वामिनी), हरिद्वार( आमचे खाजगी घाट तिकडे आहेत), तुरुपती, कोणताही सार्वजनिक गणपती जो रस्त्यात मंडप बांधुन बसवला आहे, रस्त्यांवरचा गरबा, कोणताही सार्वजनिक उत्सव. इ.इ.इ.
२. देवळात जायचेच असेल तर गावदेवी किंवा शांत अश्या एखाद्या मंदिरात जाणे.
३. आपले अध्यात्म आपल्या पुरते. आमच्या घरातल्या दिड दिवसाच्या गणपतीला साधारण ७० ते ८० माणसे येतात. त्या काळात आम्ही खुप खुश असतो. अगदी उत्सवाची मजा घेतो. मग उरलेले ४-५ दिवस रोज संध्याकाळी आम्ही खुप लोकांकडे जातो. खुप गंमत येते. ह्याकाळात या वर्षे दोन फार छान गाण्यांचे कार्येक्रम पदरी पडले. खुप मजा आली.
४. जिथे जिथे राजकिय पक्षांचा हस्तक्षेप आहे असे उपक्रम, उत्सव, स्पर्धा ( माझी मुलगी व्क्तृत्व आणि अभिनय स्पर्धां मधुन नेहेमेच भाग घेते), कार्येक्रम टाळणे.
५. शक्यतो जिकडे राजकारणी व्यक्ति आहेत अशा संस्थां ची कोणतीच कामे न करणं. ( मी स्वतः तीन चार समाजिक संस्थांचे ऑडिट विनामुल्य करते)
कदाचित माझे विचार तुम्हाला पटणार नहित. इकडे कोणा माणसावर टिका कींवा आरोप करायचे नहित. पण एकंदरच ह्या बाबतित काय विचार आहेत ते जाणुन घ्यायचे आहेत.
मो कि मी, अगदी मनातलं ! गेली
मो कि मी,
अगदी मनातलं ! गेली काही वर्षे दहिहंडीला तर आखातातील उंटाच्या शर्यतीचे स्वरूप आलेले आहे. आखाती देशात आयत्या तेलावर श्रीमंत झालेले लोक उंटाच्या शर्यती आयोजित करतात. स्वतः तंबूत बसून गरीब देशातून आणलेल्या लहान मुलांना उंटावर स्वार करतात. त्यांच्या ओरडण्याने उंट अजूनच जोरात पळतात. मज्जाच मज्जा. अगदी तसेच कुणा गॉगलधारी राजकिय नेत्याचा हौसे साठी आणी प्रसिद्धी साठी लाखालाखाच्या हंड्या फोडायला गोविंदा जिवावर उदार होतात, काही जखमी होतात, काही जातातही.
मलाही बिनगर्दीच्या देवळात किवा चर्चमध्ये जाऊन बसायला आवडतं.
उत्सवानिमीत्त आपण सगळे एकत्र
उत्सवानिमीत्त आपण सगळे एकत्र येतो हे खरे, >> हे काही कळले नाही, कोण एकत्र येते ? त्या गणपतीच्या गर्दीला 'लोकांचे एकत्र येणे' म्हणतात का? असे एकत्र येणे म्हणजे काय? त्याचा उपयोग काय ?
त्या गणपतीच्या गर्दीला
त्या गणपतीच्या गर्दीला 'लोकांचे एकत्र येणे' म्हणतात का? असे एकत्र येणे म्हणजे काय? त्याचा उपयोग काय ?<<<
अनुमोदन
नकोच .. अनुभवातुन गेल्यामुळे
नकोच .. अनुभवातुन गेल्यामुळे नकोच हे सगळे...
कालविसंगत तत्वज्ञान म्हणतात तस आहे हे... ज्या वेळी टिळकांनी सार्वजनिक गणेशउत्सवाचा विचार केला तो काळ वेगळा होता.. काळ बदलला आणि ते विचार कालविसंगत झाले...
गर्दी सगळीकडेच असते .. गणेशउत्सवात नाही तर अजुन कुठे तरी असेलच हे बरोबर असले तरी .. निदान गणेशउत्सवा सारखा छान सण त्यातुन वगळुया...
१) गणेश मुर्ती च्या उंचीला बंधन..
२) लाउड स्पीकर वर काही बंधने .. आवाज , क्षमता ई.
३) किती अन्तरावर किती मंडळे असावित .. असा काहीसा नियम ( कारण अगदी एकमेकांना चिटकुन मंडळे आहेत आणि दरवर्षी वाढतच आहेत)
४) विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी काही नियम..
५) विसर्जन फक्त आणि फक्त आर्टिफिशिअल तलावातच...
६) सगळ्यात महत्वाच की सगळ्या नियमांची अम्मल्बजवणी ..
आमच्या सोसायटीतला गणपती
आमच्या सोसायटीतला गणपती (श्रीमंत व बर्याचश्या रिकाम्या) बायकांच्या ताब्यात आहे. तरुण मुलांना हाताशी धरून तो पार पाडला जातो. ढोल ताशा सोसायटीचा नवीन सुरु केलेला उपक्रम आहे व त्याचा त्रास होउ शकतो ह्यावर त्यांचा विश्वास नाही. त्याची प्रॅक्टीस महिनाभर आधी सुरु होते. सोसायटीतले जेष्ठ नागरिक (काही कॅन्सर पेशंटस, नवजात बालके), रात्री उशीरापर्यंत अभ्यास करणारे विद्यार्थी ह्यांना होणार्या त्रासाची पर्वा केली जात नाही. आवाजाच्या त्रासाबद्दल कोणीही चकार शब्द काढल्यास त्याला गप्प बसवण्यात येते. बाहेरून ऑर्केस्ट्रा आणला जातो व त्या तालावर मोठ्या बायका, तरुण व लहान मुले मुली मनमुराद नाचकाम करतात. हे सगळे न आवडणारे बरेच लोक आहेत परंतु काही जण विरोध करायला कचरतात व काही लोक बाकीचे बघून घेतील म्हणून गप्प बसतात. विरोध करणार्यांची संख्या कमी व एकजुट नाही त्यामुळे घरातल्या घरात प्रेशर चेंबरमधे बसून आपापली सहनशक्ती वाढवतात. ह्या सगळ्यावर सुधारणेचा काही उपाय असेल का? (सुन्न )
सुमेधा, अक्षरशः प्रत्येक
सुमेधा,
अक्षरशः प्रत्येक वाक्य आमच्याही सोसायटीला लागू आहे. मुख्य म्हणजे या श्रीमंत आणि बर्याचश्या रिकाम्या बायका अत्यंत उद्धटही असतात. स्वतःला लोकमान्यांचे पूर्वज समजतात जणू!
आपण एकाच सो. मधे रहात असू
आपण एकाच सो. मधे रहात असू बहुतेक .:)
मागच्या एका पानावरचे "रुट कॉज
मागच्या एका पानावरचे "रुट कॉज जर नष्ट केला ( आर्थिक दरी, असंतोष) तर हेच सण / मिरवणूका खूप वेगळ्या प्रमाणात समोर येतील." हे वाक्य वाचून नवल वाटले होते. सुमेधाव्ही आणि बेफिकीर यांचे प्रतिसाद आल्यावर ते मांडावेसे वाटले.
<उत्सवानिमीत्त आपण सगळे एकत्र येतो हे खरे, >> हे काही कळले नाही, कोण एकत्र येते ? त्या गणपतीच्या गर्दीला 'लोकांचे एकत्र येणे' म्हणतात का? असे एकत्र येणे म्हणजे काय? त्याचा उपयोग काय ?> डेलिया +१
सार्वजनिक रूपात साजर्या केलेल्या सणांचे (गणपती, दहीहंडी, नवरात्र) निव्वळ कमर्शियलायझेशन झालेले आहे. त्याला धार्मिक, सांस्कृतिक उत्सव का म्हणावे?
काही वर्षांपूर्वी रस्त्याने जाता येता, अगदी बसमधूनही मंडपातल्या गणेशमूर्तीचे दर्शन घडायचे. आता मंडपाचे तोंड रस्त्याकडे नसते. असलेच तर स्टेजच्या समोर पडदा लावून मूर्ती रस्त्यावरून दिसणार नाही अशी सोय(?) केलेली असते. हे आमच्या भागातल्या जुन्या मंडळाबद्दल. त्यांचा मंडप वसाहतीच्या थोड्या आतल्या, कमी रहदारीच्या रस्त्यावर आहे. दर्शनाला रांग वगैरे लागायची शक्यता नाही.
संस्कृतीजतनमंडळे मुळात सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यानिमित्ताने येणार्या प्र-चं-ड मूर्ती, ढणढणाट, फटाके, विसर्जनाच्या मिरवणुका यांवर हवा तितका जोरदार आक्षेप घेताना दिसत नाहीत (जो अन्य वेळी दिसतो).सगळ्या गणेशोत्सव मंडळांची म्हणूनही एक संघटना आहे. गेल्या वर्षी मोदकांच्या खोक्यांवर गणपतीचे चित्र छापायला आक्षेप आल्यावर, चित्रे असलीच तर ही खोकी निर्माल्याबरोबर विसर्जित करा असा संदेश छापला होता. यावर्षी खोक्यांवर गणपतीचे चित्र नाही. म्हणजेच इच्छा असेल तर बदल घडवता येतो.
गणेशोत्सवातल्या भव्य, सुंदर गणेशमूर्ती, देखावे, आरास यांचा विचार केला तर, त्याला एक सामान्यजनांना आवडेल असे कलाप्रदर्शन म्हणायला हरकत नाही. तिथे भक्तीभाव,इ.ना किती वाव असेल याबद्दल साशंक आहे. आवाजाच्या भिंती सोडून एवढेच शिल्लक ठेवले तरी चालेल.
यावर्षी मुंबई विसर्जित करण्यात आलेल्या गणपतींची संख्या वाढल्याची बातमी वाचली. एक मंडळ उद्याच्या रविवारी आपल्या गणपतीचे विसर्जन करणार आहे.
श्रीमंत व गरीब असा भेदभाव
श्रीमंत व गरीब असा भेदभाव ह्या प्रवृत्तीशी नसावा असे मला आमच्या सो. मधल्या बायकांची मानसिकता पाहून वाटते. स्वतःची कर्तबगारी सिद्ध न करता आल्यामुळे म्हणा किंवा घरात काडीची किंमत नसलेल्या लोकांना कदाचित कुठेतरी आपल्याला किंमत मिळते आहे असे वाटत असल्यामुळेही ही मानसिकता निर्माण होत असेल काय?
सुमेधा, अगदी वेगळाच मुद्दा
सुमेधा, अगदी वेगळाच मुद्दा !
ते गणेशमूर्तीचे दर्शन रस्त्यावरुन होणार नाही, याची खबरदारी तर अनेक वर्षांपासून घेतली जातेय.
लालबागचा राजा, वगैरे आता ब्रँड झालेत. माझी आत्येबहीण व तिचा नवरा हे त्यांचे ऑफिशियल फोटोग्राफर
आहेत पण त्यांना विसर्जन होईपर्यंत फोटो विकायची बंदी आहे.
स्वतःची कर्तबगारी सिद्ध न
स्वतःची कर्तबगारी सिद्ध न करता आल्यामुळे म्हणा किंवा घरात काडीची किंमत नसलेल्या लोकांना कदाचित कुठेतरी आपल्याला किंमत मिळते आहे असे वाटत असल्यामुळेही ही मानसिकता निर्माण होत असेल काय?<<<
गणपती उत्सवातला किंवा बाकी
गणपती उत्सवातला किंवा बाकी तत्सम सणांमधला पैसा नष्ट झाला तर हे उत्सव बंद पडू शकेतील का?
योग, मलाही हा एकत्रित
योग,
मलाही हा एकत्रित येण्याचा मुद्दा कळला नाही.
उत्सवात होणार्या गैरप्रकाराला विरोध करण्यासाठी आपणही इथे "एकत्र" आलोच आहोत कि.
इथल्या प्रत्येकाने याला विरोध करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असे पण अरेरावी / गटबाजी करून त्यांना एकटे
पाडले असण्याचीच शक्यता आहे.
अगदी खरे सांगा, जिप्सीच्या फोटोमधल्या नरसिंहाच्या (बीभत्स म्हणू का ? ) पुतळ्याच्या खालून, मंगलमूर्तीवर
केलेली पुष्पवृष्टी तुमच्यापैकी कितीजणाना मानसिकदृष्ट्या त्रासदायक वाटली ? मूळात महापौरांनी देखील हेलिकॉप्टरमधून असे करणे योग्य आहे ?
पैसा धाकदपटशा दाखवून मिळवला
पैसा धाकदपटशा दाखवून मिळवला जातो. तो कसा बंद करणार?
>>पैसा धाकदपटशा दाखवून मिळवला
>>पैसा धाकदपटशा दाखवून मिळवला जातो. तो कसा बंद करणार?
सामान्य वर्गणीदारांनी एक नियमावली/आचारसंहिता (ज्यात डीजे बोलवणार नाही, वाहतुकीला अडथळा आणणार नाही, मिरवणुकीत असंस्कृतपणे नाचणार नाही, इत्यादी अटी असतील) करायची... वर्गणी मागायला येणार्या प्रत्येक मंडळांपुढे ती ठेवायची.... यातले सर्व नियम मान्य अस्ल्याचे लेखी देत असाल तर वर्गणी देतो.... नाहीतर माफ करा असा सरळ साधा पर्याय द्यायचा!
मोठ्या सोसायट्यांना तर हे सहज शक्य आहे.... गेटवरच असे एक पत्रक लावून ठेवायचे... याच्यावर जाहिररित्या सही करा.... आणि मगच वर्गणी मागायला आत पाऊल ठेवा!
हा पर्याय यशस्वी होईल न होईल पण बहुसंख्य लोकांना आपण जे करतोय ते पटत नाही हा संदेश तर मंडळांपर्यंत जाईल!
सोसायटीमधे ढोल वापरासाठी काही
सोसायटीमधे ढोल वापरासाठी काही नियम आहेत का?
आमच्या सोसायटीत पण हि नाटकं
आमच्या सोसायटीत पण हि नाटकं सुरु झालीत ह्याच वर्षी.
सुरु करणारे मुलं हि मॅनेगर, ट्रेझरी वगैरेची. वैताग आहे. एकदम टवाळ आहेत. बिल्डींग ह्यांच्या बा** असे वागतात.
हा पर्याय यशस्वी होईल न होईल
हा पर्याय यशस्वी होईल न होईल पण बहुसंख्य लोकांना आपण जे करतोय ते पटत नाही हा संदेश तर मंडळांपर्यंत जाईल!<<<
हा संदेश तरी जाईल हे पटत आहे.
तर "अमके करा, ते योग्य, तमके
तर "अमके करा, ते योग्य, तमके करु नका, ते अयोग्य" असे सान्गू शकणारी / समुहाला दिशा देऊ शकणारी आदर्शवादी माणसे (अनेकविध कारणांनी) आपापल्या कोषात जाऊन बसली/त्यांना तसे बसावे लागले >> परत +१
<<
विचारवंतांना 'विचारजंत' म्हणून हिणवणे.
झुंडशाहीला खतपाणी घालणे.
अतिरेकी राजकारण राबवणे,
या सर्वांची सुरुवात व आजही प्रामुख्याने तेच कोण करतो?
***
रोजगार हा मुद्दा फसवा आहे असे साजिराचे म्हणने वाचले. मला नाही पटत. सणांचे अर्थकारण बघितले तर डोळे फिरतील इतका पैसा असतो. आणि गणपती म्हणजे दहा दिवस असे नसते तर ते पूर्ण दोन महिन्यांच्यावरचे अर्थकारण आहे. त्यापुढे लगेच दसरा आणि दिवाळीचे महिने जोडले तर जुलै ते नोव्हेंबर लाखो माणसांना रोजगार मिळतो. हा फसवा आहे हे वाक्यच मला फसवे वाटते साजिरा. पण ते तुझे मत असू शकते हे मान्य.
इब्लिसांचे रोजगारावरील पोस्ट - सिरियसली इब्लिस?
<<
मोअर दॅन सिरियसली.
(मूळ पोस्टीत यामित्ताने चालणारे पालथे धंदे बंद करावे असे म्हटले होते. तेच तुम्ही विचारताहात असे समजून लिहितोय.)
मुद्दा अर्थकारणाचा.
तो एकाच वाक्यात सुरू होतो व संपतो.
"सार्वजनिक गणेशोत्सव हे राजकीय हेतूने सुरू केलेले व चालू असलेले, आजकालच्या काळातले अनावश्यक प्रकार आहेत."
टिळकांनी सुरु केला तेव्हा ब्रिटीशांच्या नियमांत बसवून देवा-धर्माच्या नावाखाली लोकांनी एकत्र येणे, हे उद्दिष्ट होते. त्यात प्रबोधनपर भाषणे होत. जनजागृती होई.
आजही हा उत्सव राजकारणी लोकांचा व त्यांच्याच साठीचा आहे. नुसता हाच नाही, अनेक नवे धार्मिक उद्योग फॅब्रिकेट केले जातात. गल्लीतल्या घरटी शे पन्नास रुपयांच्या वर्गणीतून एक दिवसाचे डीजेचे भाडे देखिल निघत नाही.
पैसे येतात, ते 'नेत्यां'कडून. त्यांची नेतेगिरी 'तोलून' धरणारी जी १२-१५ रिकामटेकड्या पैलवानांची फौज असते, तिला 'पोसण्या'साठी ह्या अशा निमित्तांतून पैसे दिले जातात. व तो मुख्य खर्च असतो.
मांडव, आरास, यांच्या पोटापाण्याचा 'सणा'शी संबंध नस्तोच. सभ्यपणे मांडवाचा धंदा करून पहा, अन या असल्या गल्ली दादाच्या मंडळाला मांडव लावून त्याचे भाडे वसूल करून दाखवा. जितके वसूल केलेत, तितके मी देईन वरतून. अन ही परिस्थिती ९९.९९% मंडळांची असते. स्वतःच गुंड असाल तर मात्र, मांडवाच्या नावाखाली नॉर्मलच्या १५-२० पट भाडे 'वर्गणी'तून खिशात घालता येते.
रस्त्यावरचे फेरीवाले, १२ महिने तोच धंदा करत असतात. त्याला काय स्पेशल फरक पडत नाही. उलट 'कार्यकर्त्यांना' फुकट खाऊ घालावे लागते ते वेगळे नुकसान असते.
या अशाच 'पोसण्यासाठी' शिर्डीची पदयात्रा, गडाची पदयात्रा, कावड, असे अनेक नव्या फॅब्रिकेटेड स्पॉन्सर्ड इव्हेंट्स असतात. यांतून काय अन कसे 'कार्यकर्ता संवर्धन' होते, ते वेसांनल. याला रोजगार म्हणायचे, तर मी खंडणी रोजगार हमी योजनेबद्दल म्हटलं आहेच.
>>
त्यापुढे लगेच दसरा आणि दिवाळीचे महिने जोडले तर जुलै ते नोव्हेंबर लाखो माणसांना रोजगार मिळतो.
<<
हा 'लाखो रोजगार' आकडा कसा आला?
उदा. दिवाळी दसर्याला डीजे, मांडव अन आरास कशाची करतात?
उदा. एका मांडववाल्याकडे खड्डे खणून बांबू बांधणार्या "क्ष"नामक बिगार्याला, जुलै ते नोव्हेंबर ५ महिने, रोज, रोजगार मिळतो, व असे लाखो लोक असतात, असे तुम्हाला म्हणायचे आहे का????
सर्वात महत्वाचे, चर्चा 'सार्वजनिक' गणेशोत्सवासंबंधी सुरू आहे. त्या व तितक्याच कारणाने निर्माण होणार्या रोजगारांबद्दल, अन त्याच काळातील 'वाईट' खर्चांबद्दल (पालथे धंदे) तुलनात्मकरित्या पाहिले जावे, अशी अपेक्षा.
सुमेधाव्ही | 21 September,
सुमेधाव्ही | 21 September, 2013 - 13:06 नवीन
सोसायटीमधे ढोल वापरासाठी काही नियम आहेत का?
<<
सार्वजनिक शांततेचा भंग असे एक कलम कायद्यात आहे.
पोलिसात आपण तक्रार नोंदवू शकता.
सोसायटीमधे ढोल वापरासाठी काही
सोसायटीमधे ढोल वापरासाठी काही नियम आहेत का?<<< होय
सार्वजनिक शांततेचा भंग असे एक कलम कायद्यात आहे.
पोलिसात आपण तक्रार नोंदवू शकता<<< इब्लिसांशी सहमत!
मला वाटते वेळेची मर्यादाही आहे.
रोजगाराच्या मुद्द्यावर
रोजगाराच्या मुद्द्यावर लिहिण्याचे कष्ट वाचवल्याबद्दल धन्यवाद इब्लिस.
ऑदर वे राऊंड विचार करून बघा. रोजगार मिळावा म्हणून (अशा विकृतप्रकारे) उत्सव चालत आहेत (किंवा चालू द्या) असा विचार न करता; या 'अशा' प्रकारे चाललेल्या उत्सवांनी हे इतके (शेकडो, लाखो / करोडो- कितीही. आकड्याने फरक पडत नाही) रोजगार जन्माला घातलेत- असा विचार करून बघा.
कुठचाही धंदा हा त्याची वाट (बरी / वाईट) वाट शोधून काढतोच. 'अनफिलिंग' जिथे असेल, तिथेच कुठचाही (बरा / वाईट, नैतिक / अनैतिक, योग्य / अयोग्य) धंदा 'डेव्हलप' होतो. उत्सव नसते, तरी या सार्या धद्यांनी वेगळ्या स्ट्रीम्स, वेगळे मार्केट सेगमेंट शोधलेच असते. उत्सव बंद झाले, किंवा स्वरूप बदलते झाले, तर हे 'रोजगार' बंद होतील- हे कितीही आणि कसाही विचार करून बघितला तरी हास्यास्पद वाटते.
'अशा' पद्धतीने 'रोजगार' 'निर्माण' होणे- हे सुसंस्कृत आणि प्रगतीकडे वाटाचाल करणार्या कुठच्याही कम्युनिटीसाठी 'योग्य' आहे का- हा वेगळा मुद्दा. त्याचा तर इथे विषयच नाही.
***
केदार / योग, थोड्या उद्वेगातून किंवा नकारात्मक भावनेतून ती पोस्ट आली आहे, हे मान्य. मात्र 'मूळ' कारणे शोधण्याचा विचार करून बघितला- हे पुन्हा एकदा नमूद करतो. 'उत्सव बंद करायला हवेत' असं मी म्हटलंय असं मला वाटत नाही. पोलिसांचा / कायद्याचा धाक, नियम, बंधने- या मलमपट्टीच्या गोष्टी आहेत. मानसिकता ही रूट कॉज आहे. आणि इथे तर 'झुंडीच्या मानसिकतेचा' ही विचार आहे.
कालपासून वाचत आहे, पण
कालपासून वाचत आहे, पण रोजगाराच्या मुद्याबाबत साजिरा आणि इब्लिस ह्या दोघांचे काय म्हणणे आहे हे लक्षातच येत नाही आहे. समजून घेण्यात स्वारस्य वाटत आहे. कोणाला वेळ असल्यास कृपया सांगावे.
असं आहे की १. समजा हे उत्सव
असं आहे की
१. समजा हे उत्सव बंद पडले तर या लोकांचे रोजगार बंद होणार आहेत का?.
२. एवढ्य विकृत समारंभाना चालविण्यासाठी म्हणून असे रोजगार आवश्यक आहेत का?
२. एवढ्य विकृत समारंभाना
२. एवढ्य विकृत समारंभाना चालविण्यासाठी म्हणून असे रोजगार आवश्यक आहेत का?<<<
ओह! माझी समजूत अशी होती की रोजगार चालावेत म्हणून हे समारंभ आवश्यक आहेत का यावर चर्चा असावी.
धन्यवाद!
आयदर वेज.
आयदर वेज.
उत्सवानिमीत्त आपण एकत्र येतो
उत्सवानिमीत्त आपण एकत्र येतो या माझ्या विधानाचा एकमेकाला प्लस मायनस करुन हवा तो अर्थ काढलेला दिसतोय. एकत्र येतो म्हणजे काय मोठी मंडळेच एकत्र येतात का? नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळ एकत्र जमु शकत नाही का? आमच्यात आमचे नातेवाईक सगळे एकत्र येतात, सर्व प्रकारची मदत करतात. पण याचा अर्थ मी विकृतीला प्रोत्साहन देतेय असा लावलेला दिसतोय.
वर मीरा उर्फ मोकिमीने पण लिहीले आहेच ना की ते सर्व पण एकमेकांकडे जमुन सणाचा आनंद घेतात. दुसर्याचे पोस्ट नीट वाचायचे नाही, टायपायला आणी प्लस मायनस द्यायला आघाडीवर.
इब्लिस यांची पोस्ट परफेक्ट.
इब्लिस यांची पोस्ट परफेक्ट. हे गुंडो पुंडोबा हातावर पोट असणार्या भाजीविक्रेत्याला पण सोडत नाही.
इब्लीस,पोलीसांनकडे तक्रार
इब्लीस,पोलीसांनकडे तक्रार नोंदवून काही मदत होऊ शकते का आवाज कमी करण्यासंदर्भात?
मोकीमी: आवडला लेख आणि पटला
मोकीमी: आवडला लेख आणि पटला १००%
यावर्षी घरच्याच बाल्कनीतून गर्दी पाहून घेतली.. ती अचकट
विचकट गाण्याच्या तालावर हुडदंग करणारी मंडळी पाहून गणपती बाप्पा ला सुद्धा लौकरात लौकर त्याच्या गावी परतून सुखी व्हावसं वाटत असेल ...
Pages