आपले सण - बदलाची गरज

Submitted by मोहन की मीरा on 19 September, 2013 - 00:33

सध्याच गणपती उत्सव झाला. साधरण श्रावण आला की सणांचा हंगाम सुरु होतो. पण सध्या प्रत्येक सणाचं मार्केटिंग झाल्या मुळे सण म्हणजे वैताग, ट्रॅफिक, गर्दी हेच डोक्यात.

साधी मंगळागौर सुध्धा प्रोफेशनल बायकांचा चमु बोलावुन " साजरी" केली जाते. त्यात मग मंगळागौर असलेली मुलगी बजुलाच रहाते, त्या बायकाच त्यांचे ठरलेले "इव्हेंट" करुन जेवुन निघुन जातात. तो "खेळ" व "मेळ" नसुन फक्त एक पर्फॉर्मन्स फक्त उरतो.

तिच गत दहिहंडी आणि गणेश उत्सवा ची.... दहिहंडी तर काही लोकांनी अगदी "साता समुद्रा "पार नेली. किती तो गोंधळ, किती आरडा ओरडा... रस्त्यात अडवणूक.... भर रस्त्यात ठिय्या.... ठाण्यात तर सुप्रसिध्ध हंडी व हंडी कर्त्यांच्या मुजोरीला तोड नाही. सतत कलकल....

दहिहंडीच्या काळात असेच टि. व्ही. वर काहीतरी पहात होते. मुलगी मैत्रिणीलाफोन करत होती. मैत्रिण बहुदा घरात नव्हती. मग दुसर्‍या दिवशी तिने परत फोन केला. तेंव्हा कळले की ती मैत्रिण ठाण्यातल्या "त्या" सु(?) प्रसिद्ध हंडी जिथे बांधतात त्याच इमारती मधे रहाते. ज्या दिवशी हंडी असे त्या दिवशी ते सगळं कुटूंबं मुलुंडला त्यांच्या आजीकडे निघुन जातं..... का? कारण हादरे बसतिल असं संगित आणि भयानक आवाज, घाण, गर्दी. ह्या सोसायटीने कायदेशीर रित्या लढा देण्याचा प्रयत्न केला होता. पण आर्थातच तो विरुन गेला...

गणेशौत्सव हा ह्या सगळ्या गोंधळाचा राजा !!!! ११ दिवस उत आल्या प्रमाणे लोकं वावरतात. त्यात सिव्हिक सेंन्स नावाच्या गोष्टीचं भानच नाही. आमच्या एरियात ठाणे पालिकेची एक बस येते. गणपतीचा मंडप बस स्टॉप वरच बांधल्या मुळे ह्या कालावधीत ही बस आत येत नाही. ११ दिवस गणपती चे + मंडप बांधायला लागणारे पहिले २० दिवस+ मंडप काढायला लाग्णारे पुढले २०/२५ दिवस.... बरं गणपती मंडळचे सर्वेसर्वा माजीमहापौर..... मग बोलणार कोणाला......

आज योगेशने काढलेले लालबागच्या राजाचे फोटो पाहिले आणि एक कळ मनात उठली ( जिप्सी फोटो अप्रतिम आहेत रे!!!) . ह्या काळात दादर्/परळ्/लालबाग ह्या एरियात रहाणं म्हणजे शिक्षा आहे... ( लग्न होवुन जेंव्हा परळला गेले त्या वर्षी मजा वाटली नंतर मात्र घी देखा पण बडगा नही देखा अशी अवस्था झाली). माझं हे विधान अनेकांना पटणार नाही. पण हे खरं आहे. ही गणेशौत्सवाची गर्दी पाहिली की ३ वर्षां पुर्वी चा प्रसंग लख्ख आठवतो. आमचे मामा हिंदमाता जवळ रहातात. असेच उत्सवी दिवस. त्यांना घरात अस्वस्थ वाटु लागलं म्हणुन तातडीने त्यांना टॅक्सीने के.इ.एम. ला नेण्या साठी मामी निघाल्या. गर्दी अणि गोंगाटा मुळे हिंदमाता ते के.इ.एम. ह्या एरवी चालत १० मिनिटे लागणार्‍या अंतराला त्या दिवशी टॅक्सीने २५ मिनिटं लागली. आणि के.इ.एम ला मामांचं प्रेत पोहोचलं..... टॅक्सीतच ते ६१ वर्षांचे मामा वारले. बायकोच्या शेजारी!!!! त्या पुढचे हाल मी लिहित नाही.

एखाद्याचा जीव गमवावा लागणं ह्या पेक्षा सण साजरे करणं तेही जाहिर रित्या... गरजेचं आहे का. आपणच जर अश्या ठिकाणांना जाणं थांबवलं तर आपोआपच हे उपक्रम बंद पडतिल. हा गोंधळ, गडबड, आरोप, पैश्याची उधळण.... खरच गरज आहे का? आजच्या मंदीच्या काळात हे भान आपण नाही ठेवायचं तर कोणी? बाकी राजकारण आणि त्यातली माणसं ह्यांवर न बोलणंच बरं.....

मी स्वतः कधीच गर्दी मधे देवदर्शन करायला जात नाही. लोकांचं माहिती नाही पण आम्ही आमच्या कुटूंबा साठी अलिखित नियम बनवले आहेत.. सर्व संमतीने
१. जिथे कुठे गर्दी असेल अश्या ठिकाणी देव दर्शनाला न जाणे. उदा. सिद्धीविनायक, महालक्ष्मी, कोल्हापुर ची देवी, तुळजापुरची देवी ( आमची कुलस्वामिनी), हरिद्वार( आमचे खाजगी घाट तिकडे आहेत), तुरुपती, कोणताही सार्वजनिक गणपती जो रस्त्यात मंडप बांधुन बसवला आहे, रस्त्यांवरचा गरबा, कोणताही सार्वजनिक उत्सव. इ.इ.इ.

२. देवळात जायचेच असेल तर गावदेवी किंवा शांत अश्या एखाद्या मंदिरात जाणे.

३. आपले अध्यात्म आपल्या पुरते. आमच्या घरातल्या दिड दिवसाच्या गणपतीला साधारण ७० ते ८० माणसे येतात. त्या काळात आम्ही खुप खुश असतो. अगदी उत्सवाची मजा घेतो. मग उरलेले ४-५ दिवस रोज संध्याकाळी आम्ही खुप लोकांकडे जातो. खुप गंमत येते. ह्याकाळात या वर्षे दोन फार छान गाण्यांचे कार्येक्रम पदरी पडले. खुप मजा आली.

४. जिथे जिथे राजकिय पक्षांचा हस्तक्षेप आहे असे उपक्रम, उत्सव, स्पर्धा ( माझी मुलगी व्क्तृत्व आणि अभिनय स्पर्धां मधुन नेहेमेच भाग घेते), कार्येक्रम टाळणे.

५. शक्यतो जिकडे राजकारणी व्यक्ति आहेत अशा संस्थां ची कोणतीच कामे न करणं. ( मी स्वतः तीन चार समाजिक संस्थांचे ऑडिट विनामुल्य करते)

कदाचित माझे विचार तुम्हाला पटणार नहित. इकडे कोणा माणसावर टिका कींवा आरोप करायचे नहित. पण एकंदरच ह्या बाबतित काय विचार आहेत ते जाणुन घ्यायचे आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमेधाजीनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या ही सोसायटीला लागु आहेत .. गेले १० दिवस रोज संध्याकाळी ६ ते रात्री ९ लुंगी डान्स नि बद्तमीज दिल अगदी जोरात चालु होतं .. नाचायला येणारी मुलं वय वर्ष ३-१२ !! त्यानंतर ९ पासुन १०:३० पर्यंत विविध कलागुण (त्यात परत असल्याच गाण्यांवर नाच नि किंचाळ्या ) , नाहीतर हिंदी अंताक्षरी ..गणपतीचा काहीही , कुठेही संबंध नाही!

सामान्य वर्गणीदारांनी एक नियमावली/आचारसंहिता (ज्यात डीजे बोलवणार नाही, वाहतुकीला अडथळा आणणार नाही, मिरवणुकीत असंस्कृतपणे नाचणार नाही, इत्यादी अटी असतील) करायची... वर्गणी मागायला येणार्‍या प्रत्येक मंडळांपुढे ती ठेवायची.... यातले सर्व नियम मान्य अस्ल्याचे लेखी देत असाल तर वर्गणी देतो.... नाहीतर माफ करा असा सरळ साधा पर्याय द्यायचा! >>

हे करुन झालयं माझं .. सोसायटी मंडळाच उत्तर - १२ वर्षाचा अध्यक्ष - पब्लिक येतं नाही गाणी लावली नाहीत तर... २५१ द्याच नाहीतर नको तुमची वर्गणी .. मुळ उद्देश सांगितला गणेशोत्सवाचा तर तोंड वाकड केलं ..
कोणीही पालक माझ्या बाजुला आले नाहीत किंवा एकदाही आवाज कमी करा असं म्हणाले नाहीत .. उलटं तेही यातच सामील .. मला कळालचं नाही आजकाल मुलं आईवडीलांच ऐकतात कि आईवडील त्यांच!

>> 'उत्सव बंद करायला हवेत' असं मी म्हटलंय असं मला वाटत नाही. पोलिसांचा / कायद्याचा धाक, नियम, बंधने- या मलमपट्टीच्या गोष्टी आहेत.
ठीक.

>>मानसिकता ही रूट कॉज आहे. आणि इथे तर 'झुंडीच्या मानसिकतेचा' ही विचार आहे.

येस! मिही हेच म्हणतोय... केदार, लिंबू, व बेफिकीर देखिल तेच म्हणताहेत. पण ईथे एकंदरीत 'त्रासलेले' सूर असल्याने एकंदरीत ऊत्सवच का नको याचीच बरीच कारणे दिली जात आहेत. जेव्हा त्या त्राग्यातून आपण बाहेर येऊ तेव्हा कदाचित 'संतुलित' विचारांच्या देवाण घेवाणीस पोषक वातावरण असेल.. तोपर्यंत मि रोमात. Happy

आमच्या सोसायटीत याच वर्षी ढोलपथक चालू झाले. त्यात बायकांचा पुढाकार.ढोलताशाच्या सरावामुळे महिनाभर अगोदर रोजच विसर्जन मिरवणूकीचा फील यायला लागला. पुण्यात सगळ्याच गणेश मंडळांनी जर स्वतःचे ढोलापथक चालू केले तर शहरात कीती ध्वनी प्रदूषण होईल याचा विचार कुणी केलेला दिसत नाही. सोसायटीच्या चेअरमन ला पत्र लिहिले. परिणामी त्रास विभागुन व्हायला लागला. एकाच भागाऐवजी सराव वेगवेगळ्या भागात व्हायला लागला.
खरतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुठलेही धार्मिक उत्सव रस्त्यावर नकोत. समुहउन्माद व गुन्हेगारी याचा जवळचा संबंध आहे. लोकांना या धार्मिक उत्सवांच्या नशेत गुंग करायचे म्हणजे लोक आपले प्रश्न विसरतात व राज्य करणे सोपे जाते. दारुड्याला भूक लागली की दारु ऐवजी दारुच द्यायची मग त्याचे शरीर देखील भुकेच्या वेळी अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. कुणी अन्न दिले तरी त्याला दारु देणारा अधिक जवळचा वाटतो.
वरच्या माझ्या एका प्रतिक्रियेत दाभोलकरांचे उधृत दिले होते. कुणी त्यावर भाष्य केलेले दिसत नाही. असो...

सुमेधाव्ही, माझा अनुभव. काहीही फरक पडत नाही. तक्रार करणाऱ्यांना एकजात सगळे नंतर त्रास देतात. जे फक्त म्हणतात की त्रास होतो वगैरे ते पोलीस आले की .... घालून बसतात. आपण एकटेच पडतो आणि लोक म्हणतात की काय फक्त ह्यांनाच तेवढा त्रास होतो. आपल्या मुलांना वेगळे पडणे, वा त्यांना खेळताना मुद्दाम छळणे असे उद्योग शिक्षित, उच्चशिक्षित आणि अशिक्षित मंडळी एकत्र येवून करतात. मिरवणे आणि आपण कोणीतरी महान आहोत असे ह्या सर्व मंडळींना सतत वाटत असते. मानसिकताच तशी झाली आहे.

>>हे करुन झालयं माझं ..

कुणा एकट्याच्या वर्गणी देण्या न देण्याने फारसा फरक पडणार नाही हे माहित आहे मला!

ते मी सोसायटीबाहेरच्या मंडळांबद्दल लिहले होते... सोसायटीची एकजूट असेल तर तुमचा त्रागा/नापसंती तुम्ही मंडळांपर्यंत अश्या रितीने पोहोचवू शकता असे मला म्हणायचे होते!

उदाहरणादाखल आमच्या सोसायटीच्या ३ विंग्ज मिळून १८० फ्लॅट्स आहेत.... प्रत्येकी २५०/- जरी पकडले तरी ४५०००/- हा अगदी हसतहसत सोडून देण्यासारखा आकडा नाहिये मंडळांच्या दृष्टीने... आणि असे जर आजुबाजुच्या ३-४ सोसायट्यांनी मिळुन ठरवले तर फरक नक्कीच पडू शकेल!

आता सोसायटीच्या आत चालणार्‍या उत्सवाचाच जर त्रास होत असेल तर समविचारी लोक गोळा करणे आणि धुरा स्वताकडे घेणे हाच पर्याय आहे .... आदर्श संयोजन करुन लोकांना दाखवून देता येईल की उत्सव असाही साजरा करता येतो (अर्थात आता यावर आमच्याकडे कुठला इतका रिकामा वेळ? टाइप्स कारणे असतील तर मग चरफडत बसण्याचा पर्याय आहे)

सिस्टीम को बदलना है तो सिस्टीम मे घुसना तो पडेगाही Wink

हा गणपतीउत्सव झाल्यावर तरी किमान पुढील वर्षभरात विरोध करणार्‍यांची एकजूट करु शकतो का बघायल हवे. जर का १०० लोकांचा जरी दबाव गट निर्माण झाला, तरी ढोल्-पथकाला/जास्तीच्या आवाजाला विरोध करण्यासाठी अश्या वेळेस विरोधात १०० लोक उभे राहिले तर काहीतरी होईल असा आपला भाबडा आशावाद.

स्वरुप .. हो पटतयं पण काही घरगुती दु:खद कारणामुळे काहीच करता नाही आले ..

गेल्या वर्षी वर्गणी बद्द्ल विचारलं सोसायटी चेअरमन यांना पण तेव्हा म्हणाले हा सोसायटीचा नाही .. एक काका मुलांपुरते म्हणुन त्यांचा गणपती खाली आणुन बसवतात .. पण या वर्षी तर सोसायटीच्या नावानेच पावती फाडत होते

मी भाड्याने राहते सोसायटीत नि कामाची वेळ पण सकाळी ८ - रात्री ८ .. समविचारी लोक सोसायटीत आहेत की नाही माहित नाही .. काही ठराविक बायका-पोरं नेहमी हजर असतात फक्त !

सिस्टीम को बदलना है तो सिस्टीम मे घुसना तो पडेगाही >> येस्स जेव्हा वाटतं तेव्हा भाग घेतेच मग कोणीही असो.. ऐकावयला नि ऐकुन घ्यायला तय्यार Happy

सॉरी.. विषयांतर नको

सर्वोच्च( की उच्च) न्यायालयाच्या रात्री दहाच्या डेडलाइनला पारंपारिक वाद्यांची हुलकावणी मिळाली होती म्हणून आता आता ढोल ताशांचे पेव फुटणार का? आमच्याकडेही कित्येक दिवस डोलाचे आवाज कानावर पडत होते. पण त्रास होणार नाही इतके आम्ही त्यापासून लांब होतो, सुदैवाने. त्याचे रहस्य आता कळले.

खालचा मजकुर लिहिताना अशीच एखादी पोस्त असेल असे वाटले नव्हते, पण वाचल्यानन्तर मात्र इथेच "प्रतिसाद" म्हणुन नोन्दवले.

नुकताच गणेशोत्सव पार पडला , आमच्या सोसायटीत सुद्धा झाला ,पण आता बदललेले त्याचे रूप पाहुन आश्चर्य ही वाटले आणि खेद ही वाटला . लहान मुलांच्या group dance किंवा solo dance मध्ये सगळी हिंदी चित्रविचित्र गाणी आणि धांगड धिंगा नाच …. त्या गणरायाने कानावर आणि डोळ्यावर ही हात ठेवले असतिल. आणि इथे आल्याचा त्याला खूप पश्चाताप ही झाला असेल. अगदी खरे कि सांस्कृतिक कार्यक्रम आहे, मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळायला हवा, पण म्हणून कशालाही तुम्ही कला गुण समजाल का?
७ /८ वर्षाची असो नाहीतर १ / २ वर्षाची ,सगळी मुले फक्त "lungidance " किंवा battamij dil " असल्याच गाण्यांवर नाचत होती , आणि गाण्यांच्या स्पर्धामध्ये ही काही वेगळे दृश्य नव्हते. का हे असे?
इतर भाषिकांना ही सामाऊन घेत काही चांगले वेगळे उपक्रम ठरवता येत नाहीत का?
खरेतर ही एक छान संधी आहे, त्यांना ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी संस्कृती आणि तिचे वेगळेपण दाखवण्याची . मग तरी आपण इतका संकुचित आणि झापड लावलेला उत्सव का साजरा करायचा?
त्याचे काही तरी स्वरूप बदलायला नको? नाही म्हणायला, "आपले सण , आपला उत्सव " असा एकच वेगळा कार्यक्रम झाला आणि तो छान ही होता . पण हे म्हणजे फारच अपवादात्मक झाले . असो .
पुण्यात काही गणपती मंडळे खुपच सुंदर आयोजन करतात आणि ते ह्याही वेळेस होतेच. काहीतरी वेगळे आणि काहीतरी चांगले ह्या निमित्ताने सगळ्यांना सुचो आणि ते त्यांनी "share " ही करावे , म्हणून हा लेखनाचा घाट घातला.
आमच्या सोसायटीत ही देवबाप्पा सुबुद्धी देवो ही सदिच्छा !
पुन्हा भेटू .....

इब्लिस+१
ढोल-ताशा पथकं तर नको तितकी झालीएत आजकाल. प्रत्येक मंडळाचं स्वत:चं पथक. अगदी सोसायटीच्या गणपतीचं सुद्धा. मग त्यांच्या महिना-दोन महिने प्रॅक्टिसेस. नुसता आवाज.
यावर्षी मला १० दिवसात, दिवसातनं कुठल्याही वेळी एकही ऑफिशियल कॉल फोनवर घेता आला नाही, इतका आवाज होता. शिवाय महिनाभर आधीपासूनच संध्याकाळी ढोलवाल्यांच्या सरावामुळे तोच प्रॉब्लेम.

पुन्हा रोज विविध गुणदर्शन कार्यक्रम म्हणे. "विविध" म्हणजे नुसती नाचगाणी, अन माइंडलेस स्पर्धा (उदा. "फॅशन शो" अन बॉलिवुडीय नाच). ४-१४ वर्षाच्या पोरांना "प्रॉपर" स्टेप्स शिकवून *लुंगी डान्स अन पिंकी है पैसेवालोंकी सारखे नाच! हे भगवान! गणपतीलाही लाज वाटत असेल ही दुर्दशा बघून.

विसर्जनादिवशी डिजे.. मला डिजे प्रकरण आवडतं खरं म्हणजे, पण उघड्यावर डिजे?? लोकांनी काय घरं साउंडप्रुफ करायची का? डिजे साउंडप्रुफ हॉलच्या आत हवा ना? हार्ट फेल व्हायचं एखाद्याचं..
मला कळत नाही, गुंड-मंत्री-नेते यांची म्ंडळं तर जाउचदे, पण हे आमच्या सोसायटीतल्यासारख्या लोकांना काय कामधंदे नसतात का? मुलांना अभ्यास असतात, (अनेक) नोकरीवाल्यांना घरी येऊन पण फोनवर महत्वाचे क्लायंट कॉल्स असतात, अनेक लोकांना आपल्या घरच्या गणपतीसमोर शांत बसायचं असतं. पण हे सगळं काही शक्य नाही. जाऊदे, पुढच्या वर्षी वर्गणी द्यायची नाही, हे पक्कं ठरवलंय. खरं म्हणजे मी मंडळवाल्यांना कधीच देत नाही, पण यावर्षी म्हणलं जरा चांगले सुशिक्षीत लोकं आहेत आपले सोसायटीवाले. पण निराशा!! असो.

* मला लुंगी डान्स गाणं अतिशय आवडलंय. तो प्रश्न नाही. प्रश्न आहे त्यावर ४-५ वर्षाच्या मुलांनी उटपटांग डान्स करण्याचा अन त्यांच्याकडून करवून घेणार्‍या अन स्वत:ही सोबत नाचणार्‍या महान पालकांचा. अन तसा डान्स करायचा तर गणपतीसमोर कशाला? जा ना डिस्क मध्ये. पण डिस्क/पब म्हणजे संस्कृती बुडते यांची. Lol हिपोक्राईट साले!

>>"आपले सण , आपला उत्सव " असा एकच वेगळा कार्यक्रम झाला

आमच्या सोसायटीत पण हा कार्यक्रम झाला.... आपण एकाच सोसायटीत राहतो की काय्? Uhoh

नताशा.. +१
मी पण हेच लिहील होतं... आपण सेम सोसायटीत राह्तो का बहुधा सगळ्याच ठिकाणी हेच चित्र आहे ..

सगळ्याच सोसायट्यांमधे सध्या हेच चित्र आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम आता आपल्या सोसायटीचाच झाला आहे. ह्यावर काहीतरी उपाय करायला हवाच आहे. पण कसा? गहन प्रश्न आहे.

हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीवर कोणता उपाय करणार? ज्याला त्याला आतून हे पटले पाहिजे.तिथेच तर सर्व वानवा आहे. सांगणारा जादा शहाणा ठरतो.

>>सोसायटीचे नाव सांगा आधी,,, मग बघू
हो फक्त नाव वगळून बाकीची चर्चा करत राहिल्यावर काय होते ते बघतोयच आपण "होणार सून... " मध्ये Wink

Pages