परंपरा

Submitted by rakhee_siji on 17 September, 2013 - 11:29

आताच एक खूप सुंदर लेख वाचला लोकसत्ता मध्ये Dr राजीव शारंगपाणी यांचा . "लोढणी टाका " आयुष्य मजेत जाईल.

http://www.loksatta.com/lokrang-news/add-to-liability-190768/

खरच आपण कळत नकळत किती ओझी वाहत असतो नाही !! गणपती, गौरी अनेक गोष्टी फक्त पूर्वापार चालत आल्यात म्हणून करतो . आजच्या जीवनात त्याचा काही एक मेळ बसतो का ?
गणपती बसवणे लोकमान्य गंगाधर टिळकांनी ज्या कारणाने सुरु केला तो हेतू आता उरला आहे का ?
मात्र आता आपण गणपती बसवून फक्त पैशाची नासाडी करतो . प्रदूषण वाढवतो . loud speaker लाऊन धिंगाणा घालतो . काहीही समाज उपयोगी काम त्यात होत नाही . अपवाद सोडून . आजारी रुग्णांना , जेष्ठ नागरिकांना , विद्यार्थ्यांना त्रास मात्र होतो . आता त्यात गोकुळ अष्टमी , नवरात्र पण सार्वजनिक सुरु झाले आहेत . किती प्रदूषण , ध्वनी प्रदूषण ,पैशाचा अपव्यय . वेळेचा , शक्तीचा अपव्यय. मला वाटते कुठे तरी हे थांबायची वेळ आली आहे .
दिवाळीचे फटाके म्हणजे प्रदूषण आणि दुर्घटनांना आमंत्रण . आणि पैशाचा चुराडा . लोक म्हणतात आपली संस्कृती जपली पाहिजे . ते खरंच आहे पण गणपती ला नाचणे दारू पिउन धांगड धिंगा हि आपली संस्कृती नाही . आपले सण आपण शांतपणे त्याच पावित्र्य राखून पण करू शकतो . हि कुठली पूजा ज्यात सर्वाना त्रास होतो ?. पूजेमुळे शांत वाटले पाहिजे . मनामध्ये एक समाधान वाटले पाहिजे ती पूजा .
आपली संस्कृती जपायची तर सगळे सण साधेपणाने साजरे व्हावेत .
परंपरा बाबत एक गोष्ट वाचलेली आठवते .
हजारो वर्षांपूर्वी एक योगी एका जंगलात राहत होता . तिथे तो एक गुरुकुल चालवत असतो . वीस एक शिष्यगण त्याच्या जवळ राहून शिक्षण घेत असतात . एके दिवशी एक मांजर गुरु शिकवत असतांना येते . आणि मध्ये मध्ये करू लागते . त्यामुळे शिष्यगण विचलित होतात . मग योगी एका शिष्याला त्या मांजरीला बांधून ठेवायला सांगतो . मग दुसऱ्या दिवशीही असेच होते . परत योगी शिष्याला ,वर्ग चालू असेपर्यंत मांजरीला बांधून ठेवायला सांगतात. मग रोज असे सुरु राहते वर्ग चालू होण्याआधी मांजरीला बांधणे . मग अनेक वर्ष जातात जुने शिष्य गुरु होतात . ते पण मग मांजरीला बांधण्याचा कार्यक्रम चालू ठेवतात . मध्ये अनेक वर्ष जातात . आता ते मांजर पण राहत नाही ते गुरु आणि शिष्य पण राहत नाहीत .पण वर्ग चालू होण्यापूर्वी नवीन गुरु नवीन मांजर आणून दारात बांधतात शिष्य विचारतात हे मांजर का बांधले आहे ? गुरु सांगतो ते माहित नाही पण हि आपली परंपरा आहे .
या प्रमाणे आपण विचार न करता परंपरा पाळत असतो. .
गौतम बुद्ध यांनी सांगितलेले वचन मला खूप छान वाटते .
"मी काही सांगितलं त्यावर केवळ मी सांगितलंय म्हणून विश्वास ठेवू नकोस. केवळ परंपरा सांगते म्हणून तू काही ऐकू नकोस . कोणी प्रसिद्ध व्यक्ती सांगते म्हणून विश्वास ठेवू नकोस . जे तुझ्या सद्विवेकबुद्धीला योग्य वाटते त्यावर तू विश्वास ठेव व त्याच आचरण कर. "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिलय.....खरच लोकांना याची गरज आहे...डोळे उघडा लोकहो अस ओरडून सांगाव वाट्त...
मी थोड्याफार गोष्टी ठरवल्यात आधीपासुनच्...मागचे ७ वर्ष मी काही गोष्टी करतेय्..घरातुन शिव्या खातेय पण मी चुकिची नाही याच मलाच समाधान आहे अणि माझी मुलगी पण तेच बघुन मोठी होइल...कर्मकांडाना पुर्णविराम दिलाय ....जेव्हा घर घेईन तेव्हा वास्तुशांत वगैरे नाही(मोठा गोंधळ होईल घरात )..आणि घरात देवघर पण करणार नाही....उपास तपास बंद झालेतच..