"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

S7E01 संपताना टिरिअन डनेरिसला विचारतोय "Shall we begin?" ... ही punchline कोणती म्हणून शोध घेतला तर, S6 मध्ये डनेरिस जेव्हा मरीन शहरात परत येते आणि masters त्या शहरावर हल्ला करतात, तेव्हा डनेरिसच्या तोंडी हे वाक्य आहे. हल्ल्यामुळे टिरिअन हबकून गेलेला असतो, पण डनेरिस शांत असते. तिच्या मनात plan तयार असतो. ती शांतपणे टिरिअनला विचारते, "Shall we begin?" Happy

भाग संपतांना, पुढच्या भागाची फास्ट फॉर्वर्ड क्लिप दाखवतांना, लिटलफिंगर चोकींग सारखं करतांना मी ओझरता पाहिला. त्यावरून पुढच्या भागात कदाचित तो मरणार असं मला वाटलं... बघुया काय होतंय...

वॉल्डर फ्रे ला परत जिवंत बघून दोन क्षण वाटलं की रिकॅप दाखवताय की काय, पण डायलॉग भारी घेतलेत... सुरुवात तडाखेबंद, बाकी काहीच घडलं नाही असं वाटलं...

रॉब, रीकन, सान्साचे डायरवुल्फ मेले. ब्रॅन चा आहे का जिवंत?
नाही. होडोर बरोबर मेला. आता आला तर 'वाईट' बनून येईल.

लिटलफिंगरला चोक करणारा जॉन असावा बहुदा. आणि जागा तळघर जिथे स्टार्क् स ना (लिआना सुद्धा) दफन केलेले आहे. बेलिश जॉनला जन्मावरुन डिवचणार आणि जॉन त्याचा गळा पकडणार असा सीन असावा. जॉनला जन्माचे रहस्य या भागात समजेल असे वाटते. जॉन - डानी भेटीचे समीकरण बदलून जाईल असे झाले तर.

ओह म्हणजे फक्त अर्ग्युमेन्ट मधे गळा पकडणार तर. तसेही तो खराच मरणार वगैरे असता तर प्रोमोत नाही दाखवणार ना स्पॉयलर क्लिप. लिटलफिंगर ला जॉन च्या जन्माचे रहस्य माहित कसे असेल? पण ते ब्रॅन सांगू शकेल ? तो केव्हाही येऊ शकतो विंटरफेल ला आता.
त्या लिटल्फिंगर ला सान्साने मारावे असे मला का कुणास ठाऊक वाटतेय.

ब्रॅन चा आहे का जिवंत? >> ब्रान चा डायर वोल्फ़ "समर" त्या गुहेत मेला होडोर बरोबर.

सारसी ला मारायला आर्या जाणार... लोकांना वाटणार की सारसी मरणार पण आर्या मरेल.. हाच तो शॉक असावा सिसन चा >>>
नको !! George RR Martin च्या बायकोचे आवडते character आर्या चे आहे, त्यामुळे तो तिला बहुतेक जिवंत ठेवेल.
आणि या सिज़न मध्ये स्टर्क भाउ बहिणिंची Reunion आहे. आर्य King's Landing ला जायचा बेत रद्द करुन ला Winterfell laa जाइल.

>>S7E01 संपताना टिरिअन डनेरिसला विचारतोय "Shall we begin?"<<
टिरियनला संपुर्ण एपिसोड एकहि वाक्य दिलेलं नाहि; वॉररुम मध्ये डॅनी हे वरचं (तिचं एक्मेव) वाक्य बोलते...

हाउंडच्या कॅरॅक्टरची गुढता वाढत चाललेली आहे. अगदि रफ-टफ, नॉन्बिलिवर असणारा हा माणुस जेंव्हा आगीच्या ज्वाळात त्याला काय दिसतं ते सांगतो हे ऐकुन खात्री पटते कि बिगर शिट इज कमिंग...

हल्ल्यामुळे टिरिअन हबकून गेलेला असतो >> मला वाटत टिरिअन हबकलेला नाही, पण तो या हल्याच जे कारण वा मिमांसा देतो ती आवडली...

हाउंडच्या कॅरॅक्टरची गुढता वाढत चाललेली आहे. >> +१
हे कॅरेक्टर केवढे बदलत गेलेय पहिल्या सीझन पासून आतापर्यन्त! आर्या आणि तो यांच्यातले बाँडिंग अनलाइकली होते. त्याने इव्हन सान्साला पण ऑफर दिलेली असते किंग्ज लँडिंग हून निघताना बरोबर नेण्याची! मूर्ख सान्सा जात नाही त्याच्यासोबत.

सान्सा आणि जॉन मध्ये वितुष्ट येण्याची पावर स्ट्रगलची मला फार भिती वाटते आहे.
सान्सामध्ये चांगल्या/वाइट दोन्ही टोकांना जाण्याचं भलतच पोटेन्शियल आहे..

Eron Cerceiसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यावर Jaime चा चेहरा बघायचा..
परत एकदा ती म्हणते कि तू तुझ्या भावाला मारलयं तेव्हा Euron You should try it feels good..म्हणतो तेव्हासुद्धा Jaime ला बघायचा Proud

>>Cerceiसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यावर Jaime चा चेहरा बघायचा..<<
याच बरोबर युरानचा दुसरा डाय्लॉग हि मजेशीर होता - आय वाँटेड टु ग्रोअप अँड मॅरी दि मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड, सो हियर आय अ‍ॅम; विथ ए थाउझंड शिप्स, अँड टु गुड हँड्स (जेमीच्या चेहर्‍यावर जळ्फळाट)... Lol

युरान ग्रेजॉय हे दुसरं रॅम्झी बोल्टन सारखं सायको कॅरेक्टर होणार आहे बहुतेक...

युरान ग्रेजॉय हे दुसरं रॅम्झी बोल्टन सारखं सायको कॅरेक्टर होणार आहे बहुतेक. >>>> पुस्तकात तर तसेच आहे. तो अशायला जाउन काळी जादु शिकुन आलाय, त्याशिवाय त्याच्याकडे ड्रगन बाईन्ड़र होर्न पण आहे. आता शो मध्ये ते दाखवतात की नाही माहित नाही.

Whoa!! जबरदस्त एपिसोड होता कालचा! बरंच काही एकदम झटपट घडलं, बरेच महारथी सस्त्यात गेले की !! मी अजून डायजेस्ट करते आहे Happy
इथे कुणीतरी म्हटले तसा युरॉन ग्रेजॉय च्या "प्राइसलेस गिफ्ट " चा अंदाज खरा ठरला. या युरॉन चा इतका रोल असेल असेल असे वाटले नव्हते आधी.
थिऑन ! Uhoh
पुढच्या भागात बहुचर्चित पैकी कोणी बिछडे हुए नातेवाईक भेटण्याचे सीन्स बघायला मिळणार का ? आर्या- सान्सा - ब्रॅन, आर्या - जॉन, जॉन -डेनेरिस वगैरे !!
त्या लिटलफिंगर चा रोल काही संपेना! Sad

लिटलफिंगर चे मरण जवळ आले आहे. आर्या आणि सान्सा मिळुन त्याला मरतील या सिज़न मध्ये.

थिऑन कडे बघुन राग आला आणि वाईट पण वाटले.

खरच जबरदस्त एपिसोड होता!

जोराह्चा पू काढतानाच्या सीन मधुन आर्या चा सुप खाताना चा सीन यक्क होता!
मिसांडे आणि ग्रे वर्म चा एवढ्या लांब सीन ची पण गरज नव्हती.

असो.

रविवार संध्याकाळची एवढ्या आतुरतेने कधी वाट पहिली नव्हती !

हो ना, ते जोराह वरचे उपचार आणि मिसान्डे- ग्रे वर्म चे सीन्स उगीच इतके डीटेल मधे घातले होते. काही फरक नसता पडला.
डॉर्न ला कुणी वालीच नाही का आता ? एलारियाच्या त्या ३ डेडली मुलींना युरॉन इतक्या फटकन संपवतो तेही एकहाती , सिंपल कॉम्बॅट मधे ? इतकं सोपं होतं डॉर्न ला संपवणं ? त्या युरॉन कडे कसल्या पावर्स वगैरे आहेत असे दाखवयाचेय का त्यांना ?!

काही फरक नसता पडला.
<<
ते आम्रविकेबाहेर सेन्सॉर करून शिरेल खपवायला सोपं जावं असे बनवलेले सीन आहेत, असे आमच्या समाजवादी मित्राचे मत आहे. Wink
*स्पॉयलर*
अनसलिड स्टराईल असले तरी इम्पोटंट नसतात असे दिसते. स्टराईल बद्दलही शंकाच आहे. विदाऊट टेस्टोस्टेरॉन फायटिंग स्पिरिट कसे काय बनू शकते याचा संशय होता..

बादवे, ते हॉटपाय येडं आर्याला अरीच का म्हणतंय अजून?

>>एलारियाच्या त्या ३ डेडली मुलींना युरॉन इतक्या फटकन संपवतो तेही एकहाती<<
मला वाटतं एलेरिया, यारा आणि टाइन सँड यांना युरान ने कैद केलेलं आहे; अजुन ठार मारलेलं नाहि. चुभुधाघ्या...

>>मला डॅनी आणि टकलूचा सीन आवडला<<
मस्त सीन. लॉर्ड वेरसला डॅनीने हॉट सीट्वर ठेवलेलं पाहुन आणि त्याहि पेक्षा त्याने खुबीने त्यातुन केलेली सुटका - इन्क्रेडिबल!

>>बादवे, ते हॉटपाय येडं आर्याला अरीच का म्हणतंय अजून?<<
आर्याच्या प्रेमात पडलाय तो बहुदा... Proud

आर्या विंटरफेल ला निघाली हे पाहून बरं वाटलं (त्यात, खत्रूड स्वभाव अचानक हळवा झाला हे पाहून तर अजुनच Lol )
नायमेरीया मात्र तिच्यासोबत जायला नकार देते हे पाहून वाईटही वाटलं...

थिऑन रामसे बोल्टनच्या ट्रॉमामधून अजूनही बाहेर आलेला नाही, हे त्याने छान दाखवलं (पण आधी चांगला कापत होता की शत्रूला, मग कसं काय गंडला?? असं पण वाटलं...)

ऑलेना टायरेल चा सल्ला आवडला, हुशार माणसांचा सल्ला इग्नोर केला म्हणूनच ती त्यांच्यापेक्षा जास्त जगली म्हणते... आणि खरंच पहिली स्ट्रॅटेजीच फेल ठरली त्यांची (टिरीअन आणि डिनेरीसची)... आता कॅस्टर्ली रॉक करतात का काबीज, बघूया...

सान्साला खरंच क्वीन व्हायचंय हे दिसून येतं, पण जॉन जेव्हा तिला विंटरफेल/नॉर्थ तुझ्या हातात सेफ आहे असं म्हणतो, तेव्हा थोडा आत्मा शांत झाल्यासारखं करते ती... मलाही असं वाटतंय की ती लिटलफिंगर ला खेळवेल आणि ठार मारेल... किंवा आर्या तिला वाचवेल त्याच्यापासून...

मस्त कालचा एपिसोड . माझ्या मते बॅलेन्सिंग अ‍ॅक्ट होता Happy परवापर्येंत डिनेरीस अतिच फेव्हरिट होती . पण युरॉन आणी ते ड्रॅगन मारू शकणार शस्त्र यामुळे बराच बॅलन्स आला आहे , तरी डेनेरीस हॅज अ‍ॅन एज Happy

आर्या -नो वन झालीये... त्यामुळे तिच्या वागण्यात फरक पडलाय. तिच्या प्रत्येक सीन मध्ये ते दिसून येतय... कदाचित त्यामुळे नायमेरीया तिच्या सोबत जात नाही का?

मला नो-वन ची भानगड नीट कळली नाहीये. ती त्या आधी कैदेत असताना वाचवलेल्या नोवन ला मारून नोवन होते का? नोवन बहुतेक professional assasins असतात का ज्यांना वेशांतर करता येतं.

बरेच महारथी सस्त्यात गेले की >> बेसिकली थ्रोन्सच्या लेखकांनी डोर्नच्या रूपाने स्वतःलाच खोडा घातला होता. तो त्यांनी इथे मोकळा केला. पुस्तकामध्ये डोर्नमध्ये अनेक घटना घडतात, त्यातल्या त्यांनी इकडे काहीच न दाखवल्याने तिथली कॅरॅक्टर्स सगळी युनिडिमेन्शनल झाली होती. काही फार प्लॉटशी संबंध नाही, कॅरॅक्टर डेव्हलपमेंट नाही. अ‍ॅज रायटर्स त्यांना त्रासच होता तो. त्यांनी ६व्या सीझनमध्ये तिथले तिघेही पुरूष मारले, एवढंच घडलं, आणि आता ह्या सीझनमध्ये ह्यांना एका फटक्यात उडवून टाकून कटकट संपवली.

ओह असं आहे का. पोटेन्शियल होतं डॉर्न मधे आणि त्या कॅरेक्टर्स मधे असं वाटलं. त्यांच्या एन्ट्री तर धडाक्यात झाली होती ३र्या की ४थ्या सीझन मधे. ओबेरॉन पण भारी कॅरेक्टर वाटलं पण तोही फार लवकर मेला!! जेमी मार्सेला ला आणायला तिथे जातो तेही इन्टरेस्टिण्ग सिक्वेन्सेस होते. तो ब्रॉन जवळपास मरणार असतो त्यांच्य तुरुंगात. त्या स्नेक मुलींशी डील करुन सुटका करून घेतो वगैरे इन्टरेस्टिंग ट्विस्ट्स होते. असो. गेले बिचारे सगळे स्नेक्स, एलारिआ जिवंत आहे अजून पण काहीतरी व्हॉयलन्ट सीन करून मारण्यापुरती ठेवली आहे.

चौथ्य सिझनमध्ये एंट्री होती, तेव्हा ओबेरीनला एक सिझन ठेवून मारून टाकलं. तिथेही काही डेव्हलपमेंटला स्कोप नव्हता. मग पाचव्या सिझनमध्ये ह्या बाया आल्या. पाचव्या सिझनच्या शेवटी डोर्नवाल्या अ‍ॅक्टर्सनी मुलाखतींमध्ये म्हटलंही होतं, की इट गेट्स इंटरेस्टिंग वगैरे वगैरे. पण बहुधा पुस्तकांएवढा फापटपसारा इथे घालता येणार नाही हे लेखकांना तेव्हा जाणवलं असेल. सहाव्यामध्ये तर फक्त त्या तिघांना मारणे आणि शेवटच्या एपिसोडमध्ये ओलेनाबरोबर वार्तालाप, इतकाच त्यांचा रोल मर्यादित राहिला.

Pages