Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी.
प्रमोद महाजन यांच्यानंतर आता मुंढे. भाजपची, महाराष्ट्राची आणि देशाची न भरून येणारी हानी.
श्री मुंढे यांना भावपुर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन!
शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने अनेकदा त्यांच्यासोबत संंबंध आलेत. कधी ते आंदोलकांच्या बाजूने असायचे तर कधी महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री म्हणू्न आंदोलकांशी चर्चा अथवा वाटाघाटी करायला आंदोलकांसमोर यायचे.
एक खंबीर आणि धडाडीचा नेता म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व विलोभनिय होते.
गोपिनाथ मुंडे यांना
गोपिनाथ मुंडे यांना श्रध्दांजली..
सर्व्हायकल स्पाईन फ्रॅक्चर
सर्व्हायकल स्पाईन फ्रॅक्चर आहे असे बहुतेक बुलेटीनात आहे. बातमी चेकायला हवी. बघतो नंतर.
रीयर एंडेड आहे कि टी बोन्ड?
रीयर एंडेड आहे कि टी बोन्ड? टी बोन्ड मधे विक्टीम दगावण्याची शक्यता जास्त असते.
टी बोन्ड @ रिअर एण्ड. मागच्या
टी बोन्ड @ रिअर एण्ड. मागच्या दाराला. Both cars are so undamaged...
मुंडे समोरच्या सीट वर
मुंडे समोरच्या सीट वर ड्रायव्हर जवळ बसले होते ना??
राम पटवर्धन यांना
राम पटवर्धन यांना श्रद्धांजली.
आजच्या लोकसत्तामध्ये त्यांच्या ओपन दृष्टी वर लेख आहे. लेखाच्या शेवटचा किस्सा मजेदार आहे.
http://www.loksatta.com/vishesh-news/feature-article-on-ram-patwardhan-5...
भाजपने सीबीआय चौकशी करण्याची
भाजपने सीबीआय चौकशी करण्याची जाहीर मागणी केलेली आहे. त्यामुळे मी काहीही जगावेगळे खळबळजनक विधान केलेले नाही.
>>
ह्या बातमीत ल्या दुव्यात तरी अशा मागणीचा कुठे उल्लेख दिसत नाही..कुठे आहे कळेल काय. ड्रायव्हरच्या वर्तनावरून तरी हा केवळ अपघात दिसतो आहे. त्याने थांबून पोलीसाना फोन केलेला होता आणि पोलीस येई पर्यन्त तो तिथेच थाम्ब ला होता . त्याच्यावर ची कलमे पाहता कल्पेबल होमिसाईडच दिसत आहे. ड्रायव्हरला जामीनही मिळाला आहे.
सीबीआय चौकशीची मागणी माझ्या माहिती नुसार महाराष्ट्रातील अवधूत वाघ नावाच्या भाजपच्या प्रवक्त्याने केली आहे. कुठल्याही ज्येष्ठ आणि जबाबदार नेत्याने अशी मागणी केलेली अजून तरी दिसत नाही.
या बीबी वर तरी वादंग होऊ नयेत . त्यासाठी उर्वरित मायबोली उपलब्ध आहे ::राग:
मुंडेसाहेब नेहमीच ड्रावव्हर
मुंडेसाहेब नेहमीच ड्रावव्हर शेजारी बसत.
अमित, धन्यवाद! खूप मस्त लिंक
अमित, धन्यवाद! खूप मस्त लिंक आहे ती. लेखाच्या शेवटचा किस्साही मस्त आहे.
(रच्याकने, तू विपू, व्हॉट्सअॅप वगैरे बघत नाहीस का?)
या बीबी वर तरी वादंग होऊ नयेत
या बीबी वर तरी वादंग होऊ नयेत . त्यासाठी उर्वरित मायबोली उपलब्ध आहे>>> +१.
अमितव, चांगला लेख.
कालच्याच पेपरमधे मौजचे
कालच्याच पेपरमधे मौजचे पूर्वीचे संपादक राम पटवर्धन यांच्याही दु:खद निधनाची बातमी आहे. आणि अगदी प्रत्येक पेपरमधे त्यांच्यावरचे लेख अगदी वाचनीय आहेत.
मला हे नाव माहिती असण्याचे कारण म्हणजे शाळा/कॉलेजात असतानाच्या संस्कारक्षम वयात जेव्हा वाचनाची प्रचंड आवड होती आणि हातात पडलेल्या प्रत्येक छापील तुकड्यावरचं वाचायची सवय होती त्या वयात राम पटवर्धन यांनी अनुवादित केलेलं "पाडस" नगरवाचनालयात मिळालं. आणि पाडसाने वेड लावलं होतं! किती पारायणं केली.
किती जणांला वाचायला दिलं.
या सर्व लेखांमधून या ("द यर्लिंग" या मूळ पुस्तकाचं भाषांतर) पुस्तकाचा उल्लेख अगदी न विसरता केलाय.....आदर्श भाषांतराचा वस्तुपाठ म्हणून.
आणि सर्व पेपरमधे खूप कव्हरेज दिलंय बातमीला.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.
आजच्या लोकसत्तामध्ये त्यांच्या ओपन दृष्टी वर लेख आहे. लेखाच्या शेवटचा किस्सा मजेदार आहे.>>>>>>>>>>>>
अमितव +१००
शिवसेना उपनेते माजी म्हाडा
शिवसेना उपनेते माजी म्हाडा अध्यक्ष विलास अवचट यांचे काल रात्री उशीरा निधन. (माझे चुलत सासरे). ते गेले ८-१० महिने ब्लड कँसर ने त्रस्त होते.
श्रद्धांजली विलास अवचट
श्रद्धांजली विलास अवचट ह्यांना
विलास अवचट ह्यांना
विलास अवचट ह्यांना श्रद्धांजली
बुजुर्ग अभिनेत्री जोहरा सहगल
बुजुर्ग अभिनेत्री जोहरा सहगल यांचे १०२ व्या वर्षी निधन.
त्यांना आदरपूर्वक श्रध्दांजली.
ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल
ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांना विनम्र श्रद्धांजली. http://www.lokmat.com/storypage.php?catid=247&newsid=1295950
जोहरा सहगल यांना आदरपूर्वक
जोहरा सहगल यांना आदरपूर्वक श्रध्दांजली.
i loved this lady... ही बाई
i loved this lady...
ही बाई उत्साहाचा अखंडीत झरा असणार हे तिच्या चेह-यावर ठळकपणे लिहिले होते. तिला श्रद्धांजली वगैरे काही लिहवणार नाही मला कारण असे झरे कधीही आटत नाहीत. आपण त्यांच्यापासुन स्फुर्ती घेऊन आपल्यातही असा एक झरा जागवावा.
अगदी खर आहे साधना.
अगदी खर आहे साधना.
ही बाई उत्साहाचा अखंडीत झरा
ही बाई उत्साहाचा अखंडीत झरा असणार हे तिच्या चेह-यावर ठळकपणे लिहिले होते. तिला श्रद्धांजली वगैरे काही लिहवणार नाही मला कारण असे झरे कधीही आटत नाहीत. आपण त्यांच्यापासुन स्फुर्ती घेऊन आपल्यातही असा एक झरा जागवावा.>>>+१
साधना अनुमोदन..! आयुष्य कसं
साधना अनुमोदन..! आयुष्य कसं भरभरून आनंदाने जगावं हे घेण्यासारखं आहे त्यांच्याकडून.
मला त्यांची एक मालिका आठवतेय, पण मालिकेचं नाव नाही. सईद जाफरी आणि त्या होत्या, ब्रिटिश कुटुंब असतं आणि ते हॉटेलिअर असतात. दूरदर्शनवर यायची बहुतेक. आठवतेय का कुणाला? मस्त भुमिका होती जोहरा सेहगलांची त्यात.
साधना, अनुमोदन. हम दिल दे
साधना, अनुमोदन.
हम दिल दे चुके सनम मध्ये त्या बहुतेक एकाच प्रसंगात होत्या. पण आपल्या रसरशीत जीवंतपणाने किती उठावदार केला होता त्यांनी तो प्रसंग! 'समीर - एक ठंडी हवा का झोका' हा त्यांचा संवाद अजूनही कानात आणि मनात आहे.
<मला त्यांची एक मालिका
<मला त्यांची एक मालिका आठवतेय, पण मालिकेचं नाव नाही. सईद जाफरी आणि त्या होत्या, ब्रिटिश कुटुंब असतं आणि ते हॉटेलिअर असतात. दूरदर्शनवर यायची बहुतेक. आठवतेय का कुणाला? मस्त भुमिका होती जोहरा सेहगलांची त्यात.>
तंदुरी नाईट्स्
येस्स, तंदुरी नाईट्स!
येस्स, तंदुरी नाईट्स!
हो माधव.. हम दिल दे चुके
हो माधव.. हम दिल दे चुके मधल्या दादीमा.. नजर गेलेली असतानाही केवळ स्पर्शावरुन नात प्रेमात पडलीय हे ओळखुन तिला स्वतःच्या प्रेमाचे किस्से सुनावणारी गोड आज्जी.. तिची टीवीवरची सिरीयलही मी आवडीने पाहायचे. खुप सुंदर व्यक्तीमत्व..
मलेशियन ऐअरलाईन्सचे
मलेशियन ऐअरलाईन्सचे अॅम्सस्टरडॅम - क्वालालम्पुर, बोइन्ग ७७७, युक्रेन जवळ कोसळले. विमानात २९० प्रवासी होते
http://www.cnn.com/2014/07/17/world/europe/ukraine-malaysia-airlines-cra...
गायिका, अभिनेत्री, लेखिका डॉ.
गायिका, अभिनेत्री, लेखिका डॉ. सुशीलारानी बाबुराव पटेल यांचं निधन.
माळीण दुर्घटना
माळीण दुर्घटना
माळीण दुर्घटनेतील दुर्दैवी
माळीण दुर्घटनेतील दुर्दैवी जीवांना श्रध्दांजली !
Pages