ववि२०१३-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35

वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????... Happy Happy

मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्‍या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनी, छान लिहिलंस. तुझी भिती स्पष्ट दिसत होती, पण झाडावर चढतानाचा निश्चयही. Happy 'फियर ऑफ अननोन' बद्दल अनुमोदन. स्वतःशीच छोटेमोठे झगडे करताना काही गोष्टी अवचित सापडतात त्या अशा..

मंजिरी चाळीसा आकडी वृत्तांत सहीच..!
(ते नायगावकर सर्वात आधी नतद्रष्ट आणि देवाला आठवले. आम्ही मग त्यावर भरपूर टीपी केला. हसून पुरेवाट)

आणि हो- त्या चारोळ्यांतल्या काही चंगोंच्या नसून तोतया वाटत होत्या (मला वाटल्या तशा परेशलाही वाटल्या) पण त्या सार्‍या चंगोंच्याच आहेत असं निंबुडाने सांगितलं. हा खुलासा दिला असे. (चंगोंचं अख्खं चारोळिसाहित्य एकेकाळी तोंडपाठ होतं. आता अशी परिस्थिती. गेले ते दिन गेले).

वृत्तांतात अजून बरंच बाकी आहे लोकहो. लिहा की. Happy

>>त्या सार्‍या चंगोंच्याच आहेत असं निंबुडाने सांगितलं

म्हणे दिव्याखाली अंधार
म्हणून आपण दिव्याखाली बसतो
तरी कसे गं आपण दोघं
तुझ्या दोन्ही भावांना दिसतो

ही चारोळी चंगोची आहे?

नाशिककर नव्हते का वविला?...>>> नाशिककरांनी पूर्णपणे भ्रमनिरास केला आमचा. Sad

गमभन यांची १३:४३ची पोस्ट पाहून ववि-संयोजक 'अब हमारा मुंह मत खुलवाओ' मोडात गेले असतील Biggrin

गमभन यांची १३:४३ची पोस्ट पाहून ववि-संयोजक 'अब हमारा मुंह मत खुलवाओ' मोडात गेले असतील....>>> अगदी अगदी... Happy
पण स्विमिंगपूलमधील पाण्यात त्याचा वचपा काढला गेलाय लले.. :). तू साक्षीदार नव्हतीस का त्या प्रसंगाची?

लले Lol मयुरेश ने संयत प्रतिक्रिया दिलेय की वर. तो यशस्वी पुढारी असल्याच दाखवून दिलय त्याने Proud

ओहो, मग मी "जन्माने नाशिककर" असल्याने नाशिककर म्हणून वविवृत्तान्त लिहू का? Wink
मला आदले रात्री बाबूचा फोन आलेला. ऐनवेळेस का होईना पण जायचेच असा जीवापाड प्रयत्न मी केला होता, बाईकची सोयही केली होती, पण अनेकानेक अडचणींमुळे अशक्य झाले, शिवाय १७० किमी अंतर (जाऊनयेऊन साडेतिनशे पेक्षा जास्त) अन माळशेजमधिल दरड भेवडवित होते, कर्जत मार्गे जाण्याचे त्राण अंगी शिल्लक नव्हते. सबब जड अंतःकरणाने जाण्याचे रहित केले Sad बेटर नेक्स्ट टाईम! याच ठिकाणी पुन्हा ठेवलेत ववि तर मला दोरावरुन चालता येईल Happy

व्यस्त नाही, व्यग्र लले.

अ‍ॅडमिनांनी वविसंदर्भात चालू केलेल्या 'नवीन कल्पना कळवा' बाफवर पहिल्या पानावर ३० पोस्टी टाकणार्‍या एकूण १८ सूचनाकारांपैकी फक्त ७ सूचनाकार वविला उपस्थित होते.
पुढील आठ पानांवरच्या पोस्टी आणि सूचनाकार मोजू की नको? Proud

मोजू की नको? <<< वेळ असेल तर मोज ना सर्व, जरा कळू दे तरी!
(बर झाल मी त्या धाग्यावर पहिल्या पानावर काही लिहीलच नाही)

१८ सूचनाकारांपैकी फक्त ७ सूचनाकार वविला उपस्थित होते.
>> मंजूडी, त्या सूचनाकारांमधे मला मोजले नाहीस तरी चालेल. माझे येणे तसेही अशक्य होतेच. नेक्स्ट टाईम मात्र नक्की येणारे. २८ जुलै सोडून दुसरी तारीख असल्यासच!!!!

मयूरेश, डिटेलवार लिवा की... >>>नाशिककरांनी यंदा पुण्याच्या होळीची बेगमी केली. ....>> लले,मिळालं का उत्तर? Proud

आशू,पुण्याच्याच नव्हे पुणे मुंबई दोन्हीच्या... Happy

कोणीच नाही का आले नाशिकचे वविला? अरेरे!! Sad

पुढच्या वर्षी इकडून बस काढा. मी नक्की येईन. Proud

(आता संयोजक धरून मारतील मला. :))

आणि मुंबईकरांचं काय?
पहिला मुंबईकर सकाळी सहा वाजता बशीत बसला होता आणि शेवटचा मुंबईकर रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचला.

हायला काय कल्ला चाललाय...... Biggrin

अरे मला वृत्तांत लिहायचाय रे अजुन् (माझा आणि माझ्या लेकाचा पण) ........सगळ तुम्हीच काय सांगताय्.......आज रात्री टायपावाच लागणारेय नैतर कुणी काही शिल्लक ठेवणार नैये माझ्यासाठी..... Proud

आज वाचतेय सर्व आणि रात्री टाकतेच...... Wink

पण फुट्टु कसे टाकले नैयेत कुणी????

हिम्स फोटॉ टाक रे........की मयुरेश ने लीस्ट दिलीच नैये तुला फोटो प्रिफरन्सची......(काडी) Proud

Pages