Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35
वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????...
मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Maajha. Rumaal. Till mid
Maajha. Rumaal. Till mid August.
लिवा..लिवा...पटकन लिवा.
लिवा..लिवा...पटकन लिवा.
पहिल्यांदाच येणार्या
पहिल्यांदाच येणार्या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा. >> तरच पुढच्या वविला प्रवेश मिळेल.
मेधा, परदेशस्थ भारतीयांनी तर
मेधा, परदेशस्थ भारतीयांनी तर लगेच वृत्तांत लिहिला पाहिजे. येऊ द्यात .....
वृतांत आणि फोटु लवकर येऊदेत
वृतांत आणि फोटु लवकर येऊदेत वविकर्स.
मेधा ते रुमाल काय आहे?
मेधा ते रुमाल काय आहे?
मेधा ते रुमाल काय आहे? >>
मेधा ते रुमाल काय आहे? >> मेधानी जागा अडवुन ठेवलिये. वृ mid August नंतर येईल
सुनियोजित संयोजन.... ववि आणि
सुनियोजित संयोजन.... ववि आणि संबंधित समित्यांमधील संयोजकांचे आभार आणि अभिनंदन.
वविची काही ठळक वैशिष्ट्ये :
१) पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांमुळे पोहोचायला थोडा उशीर झाला तरी ठरलेले कार्यक्रम व्यवस्थित पार पडले.
२) पावसाने अधुन मधून लावलेली हजेरी.
३) माबोकरांनी सादर केलेली माबोकर लिखित नाटिका...... फुल-टू धम्माल सादरीकरण.
४) अॅडव्हेंचर स्पोर्ट्समधेही काहीजणांचा यशस्वी सहभाग.
५) वविच्या दिवशीच पहाटे भारतात येऊनही, जेटलॅगला न जुमानता परदेशस्थित माबोकर ’मेधा’ यांची उपस्थिती आणि उत्साही सहभाग. परदेशात स्थायिक असलेल्या माबोकरांना मायबोलीबद्दल किती आत्मीयता आहे याचं एक उत्तम उदाहरण.
मला आज सकाळी उठल्यावर
मला आज सकाळी उठल्यावर अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची आठवण आली आणि आत्ताच्या आत्ता ते अनुभवावंसं वाटत होतं. पण आता कॉन्फिडन्स आल्यामुळे पहिल्यावेळचा थरार नसेल. मी झाडावर चढले आणि मला वर एकटीला टाकून ते अॅडव्हेंचरवाले सर ललीकडे दोरावरुन सपासप गेले. तेव्हा ते झाड वार्यामुळे हलू लागलं. खालून अम्या भेवडवत होता "अश्वे झाड हलतंय". मी झाडाला दोन्ही हातानी धरुन हसत उभी होते. ते हसू त्या बर्मा ब्रीजवर ३-४ पावले टाकल्यावर जेव्हा वार्याने आणि माझ्या पावलांनी ब्रीज जोरात हलू लागला तेव्हा मावळलं आणि "इकडे या आणि मला मागे न्या" असं त्या सरांना सांगू लागले. सर म्हणत "तुम्ही व्हा पुढे मी आहे मागे". थोडी पुढे गेल्यावर मागे बघितलं तर ते सर मचाणावरच उभे. मग कोपरांपासून हात दोरांवर टेकवले आणि सपासप पुढे गेले.
पुढच्या त्या दोरावरुन चालण्याच्या प्रकारामध्ये दोन्ही हातांना रग लागल्याने हात किंवा पाय सोडून द्यावेत असं वाटलं होतं एक क्षणभर. पण खालून सुन्या, मुग्धाचा नवरा "अजून थोडं, अजून थोडं" म्हणत प्रोत्साहन देत होते. जेव्हा त्या मॅडमनी हात सोडून मागे स्वतःला झोकून द्यायला सांगितलं आणि अधांतरी लटकतं ठेवलं तेव्हा जाम मजा आली.
हार्नेस लावलेलं असलं तरी प्रत्यक्ष त्या स्पोर्ट्समधे भाग घेताना त्या हार्नेसची आठवणच नसल्याने थरार अनुभवला.
ह्या प्रकारांमध्ये खरे अॅडव्हेंचरस आपले डोंबारी, ज्यांना हार्नेस वगैरे लावलेले नसते आणि नुसता बांबूने तोल सांभाळून दोरावरुन चालतात.
ठाणेकर रात्री ९ वाजता घरी
ठाणेकर रात्री ९ वाजता घरी पोहोचलो. वाटेत बस गार करण्यासाठी आणि डिझेल भरण्यासाठी १ तास थांबवावी लागली म्हणून... नाहीतर विनय आणि अम्याचा ठाणेकर्स ८-८.३० ला घरी पोहोचतील हा अंदाज परफेक्ट ठरला.
बाकीचे लोक्स किती वाजता पोहोचले? मेधा किती वाजता घरी गेली?
अश्विनी, अगदी गं! मी पण आज
अश्विनी, अगदी गं! मी पण आज सकाळी उठले तेव्हा त्या पॅरलल रोप्सवरच होते
निव्वळ अ फ ला तू न होते ते तीनही प्रकार...!
आणि ते छोट्या-छोट्या ठोकळ्यांवरून झाडावर चढणं सुध्दा!
बर्मा-ब्रिज क्रॉस करण्यापूर्वीच मला हार्नेस जरा सैल पडल्यासारखं वाटलं. म्हणून मी त्या इन्स्ट्रक्टरला तसं सांगितलं. त्यानं ते चांगलं करकचून बांधलं. बर्मा-ब्रिज ओलांडताना त्याकडे फारसं लक्षही गेलं नाही. दुसर्या मचाणावर पोचून हुश्श करताना जाणवलं की त्या आवळलेल्या हार्नेसमुळे आपल्याला ताठ उभंच राहता येत नाहीये
मग मी पुन्हा त्या इन्स्ट्रक्टरला बोलावलं.
आता कळलं, की तेव्हा आधीच्या मचाणावर अश्विनी उभी होती आणि हलत्या झाडामुळे तिची काय अवस्था झालेली होती
यायची तयारी करूनही, आमचा ववि
यायची तयारी करूनही, आमचा ववि चुकला
आता प्रतिक्रिया वाचून अजूनच वाईट वाटतंय. असो...
आमचा खाऊ खाल्ला का?
बर्मा-ब्रिज क्रॉस
बर्मा-ब्रिज क्रॉस करण्यापूर्वीच मला हार्नेस जरा सैल पडल्यासारखं वाटलं. >>> माझंही तेच झालं होतं. शिडीच्या शेवटच्या सळीवरुन वर बारक्याश्या फळकुटावर पायच टाकता येईना. पाय लॉक होत होता. मग मी सरांना विचारलं मी खाली जाऊन ते घट्ट करुन येऊ का? तर त्यांनी म्ह्टलं "जरा अश्या तिरक्या व्हा". मग त्यांनी त्या एवढ्याश्या फळीवरुन खाली वाकून माझं हार्नेस घट्ट केलं. आधी उजव्या हाताने वरची फळी घट्ट धरायला सांगितली तर मला डाव्या हातानेच सोयिस्कर पडत होतं. मग मी डाव्याने पकडली आणि उजवा अजून वर कुठेतरी पकडला आणि माझी मीच वर आले.
ते झाडाचं हलणं म्हणजे झुलता मनोराच होता. पडलं नसतंच ते! पण पडतंय असं वाटलं असतं तर ज्या बाजूला पडेल त्याचा अंदाज घेऊन आपली दिशा बदलायची आणि घट्ट पकडलेल्या फांदीवर स्वार झाल्यासारखं चिकटून, डोकं आपटू न देता पडायचं ठरवलं होतं
वार्यामुळे हलत्या ब्रिजच्या भोसक्यातून एकदा पाय सटकणार होता तेव्हा मात्रं मी मागे बघून "इकडे या इकडे या" चा घोशा लावला होता. सर येत नाही म्हटल्यावर आपोआप युक्ती सुचली आणि कोपरापासून तळहातापर्यंत एवढा भाग सपोर्टच्या दोरांवर लावल्यावर चालायच्या दोरावरही चांगली पकड आली.
पुढच्या मचाणावर हूक हार्नेसला फिक्स करताना मी घट्ट करायच्या ऐवजी उलटा फिरवत होते. खालून इंद्रा किंवा सुन्या किंवा विन्या कुणीतरी ते अचूक हेरलं आणि खालूनच ओरडलं "अगं उलटं फिरवत्येस. घट्ट करायचंय". ज्या कुणी निदर्शनास आणून दिलं त्याचे अनेक आभार. कारण वरती पुढच्या मचाणावर आपण एकटेच होतो. चुकून हूक फिक्स झालाय समजून तो न फिक्स करता नुसताच अडकवला गेला तर काही खरं नाही! ह्या मचाणावरही त्यांनी कुणालातरी ठेवायला हवं काळजी म्हणून.
कालचा वविवार मस्त,आनंदात
कालचा वविवार मस्त,आनंदात गेला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली अशी ही सहल प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी...कविन उर्फ कविता नवरे लिखित एक छोटुशी नाटुकली खूपच छान होती...स्वत: लेखिकेसह इतर सगळ्या कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आणि उस्फुर्त होता...त्यातही विशेष उल्लेखनीय असा अभिनय निलिमा देसाई(मयुरी) हिचा होता.
अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन केल्याबद्दल समस्त संयोजकांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.
आमचा खाऊ खाल्ला का?....>>>>
आमचा खाऊ खाल्ला का?....>>>> पुणेकरांनी बसमध्ये खाल्ला खाऊ गायत्री.. तुला वविला यायला जमणार नसुनही इतक्या सकाळी आमच्यासाठी खाऊ घेऊन बस थांब्यावर आलीस त्याबद्दल खरच तुला खूप खूप धन्यवाद. तू आणि तुझ्या कटुंबीयांसोबत ववि एंजॉय करत तो खाऊ खायला जास्त मजा आली असती..
ओये ललि, केश्वि!! मी होते अहो
ओये ललि, केश्वि!! मी होते अहो मध्ये. ललिचे रोप्स घट्ट करेस्तोवर मी झाडावर उभी. मग केश्विचे रोप्स घट्ट करेपर्यंत मी मचाणावर उभी!!
योगुली, मल्ली सहपरिवार आणि केदार जाधव सकु १०.३०च्या सुमारास उतरले.
उरलेले पुणेकर रात्री ११.१५-११.३०ला पोचले. मुरबाड ते कर्जत रस्त्याने जीव काढला. कर्जतनंतर सुसाट आली गाडी.
पुणेकर रात्री ११.१५-११.३०ला
पुणेकर रात्री ११.१५-११.३०ला पोचले.>>>>
अरे बाप्रे! इन दॅट केस मी नाही आले तेच बरं झालं
अरे जरा सविस्तर वृ लीहा की
अरे जरा सविस्तर वृ लीहा की
पूनम, ते सर तुझ्याकडे गेले
पूनम, ते सर तुझ्याकडे गेले होते का मला झाडावर उभी करुन "हा मी आलोच" असं मला सांगून? तोपर्यंत मी झाडावर उभी राहून खालून ये जा करणार्या वविकरांना हाका मारत "हाय!" करत होते
धम्माल आली फुल्ल टू त्या
धम्माल आली फुल्ल टू त्या अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स मधे. अजून डोळ्यासमोर दोरखंडच येतोय
डोंबारी खेळ>>>> अश्वे अगदी अगदी ग. काल चालतानाही तेच आठवत होतं
खाली उभ राहून सानुचं चिअर अप करणं आणि विवनच व्हिडिओ शुट करणं पण, वरुन बघताना खुप मस्त वाटत होतं
स्किटकर्यांचे खुप मनापासुन आभार. आधी तुला जमेल ग घे लिहायला म्हणून लिहायला लावणं, मग लिहिलय ते न फसता उभं राहिल असा आत्मविश्वास देणं आणि त्यासाठी स्वतःही इनपुट्स देत मेहनत घेणं , तुम्ही होतात म्हणून हा अनुभव घेऊ शकले - मला माझ्या ह्या मित्र मैत्रिणींच्या ऋणातच रहायला आवडेल. अशीच टिम राहुदे आपली बास इतकच म्हणेन.
केळकर, मैत्री, नील, वैभ्या, नीलिमा, अश्वीनी, मुग्धा, योगेश कुलकर्णी तुम्ही रॉक स्टार आहात
माझ्या सांस टिम वाल्यांचे मनापासुन आभार. एकतर मी त्यांच्या गाडीला मधल्या कुठल्या तरी स्टेशनात जोडला गेलेला डबा होते पण तरी हि जोडणी त्यांनी अशी सामावुन घेतली की मी जणू सुरुवाती पासुनच त्यांच्या सोबत होते.
सगळ्यांची चिल्ली पिल्ली खुप
सगळ्यांची चिल्ली पिल्ली खुप गोड आहेत. वविला त्यांनी फारसा त्रास दिला नाही आई बाबांना
ओवी, तुझ्या लेकाला गोष्टी ऐकायला आवडतात वाटतं. त्याची सानुशी चांगली मैत्री झाली वविला. बस मधे गोष्ट सांगण्याचा कार्यक्रम पण झाला आमचा येताना. गोष्ट ऐकताना कसले बोलतात त्याचे डोळे, खुप गोड मुलगा आहे तुझा
तर असा पार पडला ववि २०१३...
तर असा पार पडला ववि २०१३...
धन्यवाद मयूरेश.
धन्यवाद मयूरेश.
गायत्री तू दिलेला खाऊ आम्ही
गायत्री तू दिलेला खाऊ आम्ही सगळ्यांनी लगेचच खाल्ला.
यायला जमत नसताना तो खाऊ द्यायला आलीस त्यासाठी तुझं फारच कौतुक . तू आली असतीस तर अजून मजा आली असती. पुढचय वविला नक्की सकुसप ये. 
कविता बास का?
कविता बास का?
'अॅडव्हेंचर स्पोर्ट्स' ही
'अॅडव्हेंचर स्पोर्ट्स' ही यावेळचा नेहमीपेक्षा वेगळी विशेष झालेली अॅक्टिव्हिटी. इथे फारच मजा आली. पोटात होणारं पाकपुक सांभाळत प्रत्येकाने जे काय केलं ते केलंच. विशेष म्हणजे पुरुषांइतक्याच (किंवा जास्त) संख्येने बायकांनी त्यात भाग घेतला. प्रत्येकाची वेगळी स्टोरी. पण एकेकाच वाक्यात आधी लिहावं. त्याचं एकेका मोठ्या पोष्टीत रूपांतर नंतर ज्याला जमेल तसं करा.
जरा जास्त वेळ लागला, पण तिने पार पाडलं शेवटी.
१) मी पहिलाच बकरा असल्याने पाकपुकचा वर्ग झालेला. वर गेल्यावर 'अरे हे फारच जास्त अंतर आहे. परत येतो' असं सांगून पाहिलं पण काही उपेग झाला नाही.
२) बकरा नंबर २- राम. लंकेवर चढाई केल्याच्या स्टायलीत त्याने सुरू केलं. पण शेवटी वानरसेनेसोबत लढल्याने 'वाण नाही पण गुण लागला' असं बिचार्याला ऐकून घ्यावं लागलं.
३) केश्वि दोरीवरून चालताना स्तोत्र पुटपुटत होती.
४) पूनम जाताना 'मिल्यासाठी निरोप' ठेऊन गेली. ती वर गेल्यावर बराच कुचकुचाट झाला, तो इथं नको. पण 'पूनमला लटकलेलं बघून कस्लं सॉलिड वाटतंय' अशी जोरदार कॉमेंट विनयने टाकलीच.
५) इंद्राने लईच तुफानी सुरूवात केली. मध्यभागी आल्यावर त्याने स्वतःचे एकदा ह्या तर एकदा त्या अशा दोन्ही बाजूंनी काटकोन करून घेतले. खालच्यांच्या पोटांत दोन क्षण गोळे पण निर्माण केले त्याने.
६) घारूअण्णाने वरती जाऊन रजनीकांतासारखी ओठात सिगरेट ठेऊन आणि दोन्ही हात मोकळे सोडून सारं काही करायचं ठरवलं होतं. पण स्पोर्ट्स मास्तरांनी तसं काही करू दिलं नाही ते सोडा.
७) मंजूडीने हार्नेस बांधले, पण केश्विची गंमत बघून ती मागे सरली. शेवटी हो नाही करता करता गेली. लँड होताना तिला लागलं थोडं पायाला.
९) मेधाने बायकांत सर्वात आधी आणि आत्मविश्वासपूर्वक सुरूवात केली. नंतरही ती हार्नेस बांधून लढव्यासारखी मैदानात फिरत होती, आणि इतरांना धीर देत होती.
कविता, ललिताप्रिती, आनंदमैत्री, मिसेस योरॉक्स, मिसेस मॅगी आणि आणखी ४-५ जणांनी केलं. आठवल्यावर लिहितो, किंवा आठवेल त्याने लिहा..
यातलं काही न करता टवाळक्या करण्यात, पोष्टी टाकण्यात आणि लोकांची खेचण्यात विनयभिडे, बागुलबुवा, लिमये, नील, आनंद इ. लोक आघाडीवर होते.
अॅडव्हेंचर स्पोर्ट्सचे फोटो टाका ज्यांनी काढले असतील त्यांनी.
इंद्रा दमदार सुरवात.
इंद्रा दमदार सुरवात.
हॉय्लॉ! बराच कल्ला केलेला
हॉय्लॉ! बराच कल्ला केलेला दिसतोय!

अॅडव्हेंचर स्पोर्टस.... मी मिसलं!
मस्त ववि होता वर्षाविहार या
मस्त ववि होता
वर्षाविहार या ऊपक्रमाबद्द्ल खुप काही ऐकले होते
मागच्या वेळी काही कारणाने जान झाल नाही
ती कसर यावेली भरुन काढावी या हेतूने नावानोंदनी केली
एकदाचा वविचा दिवस ऊजाड़ाला
खर सांगायच तर एकाच वेळी ऊत्सुकता आणि भीती याच मिश्रण मनात होत
ऊत्सुकाता यासाठी की नक्की काय प्रकार असेल याची
आणि भीती यासाठी की वेळेवर बससाठी पोचेन का याची
सकाली सर्व तयारी करूनही रिक्षावाला नामक कृपेमुले बससाठी ऊशीर झाला
फ़क्त पाच मिनीटेच
तरीही ही बातमी वैभव नामक प्राण्यामुले बोरीवली दहीसर पर्यत पोचली
बसमधे चढल्यावर कोमल तिची मुलगी ; मनी ; या वविसाठी डायरेक्ट एअरपोर्ट वरुण बसमधे असलेल्या मेधा ऊर्फ शोनु यांची भेट झाली
इन्द्रा आणि वैभव बसचे दिशादर्शकाचे काम पार पाडत होते
त्यानंतर मालाड बोरीवलीला अनुक्रमे प्रमोद देव ; थंड ; भिडेकाका सावंत चढले
दहिसर ला श्री व् सौ विनय भिड़े आणि ज्युनिअर भिड़े यांची एंट्री झाली
आणि सामी आणि तिची बहीनीची सुधा
काशिमिराला यो रोक्स स्मि रोक्स तसेच सुन्या आणि त्याची बायको चढले
ठाणे पॉइंट येताच बस भरली केश्वे ललिता प्रीटी कविन श्री व सौ बाबू ( ज्युनिअर्सकत) पियापेटी आनंदमैत्री
मुग्धांनंद मेधा ( ही वेगळी) घारुअन्ना आनन्द सुजो व् इतर चढले
त्यांची नाव आता पटकन आठवत नाही
क्षमस्व
बसमधे मग धमाल चालु झाली
एकेका गाण्याच मस्तपैकी विडंबन चालू होत
नेहमीच्या गाण्याचे शब्द बदलून ऐकायला मजा येत होती
शेवटी एकदाची बस पोचली रिसोर्ट ला
तिथे चारोळ्याचा पाट्या वाचुन कविता विभागाची आठवण झाली
नाश्ता होईस्तोवर पुण्याची बस आली
नाश्ता संपल्यावर बहुतांश मंडली पुलमध्ये डुन्बणे या कार्यक्रमासाठी रवाना झाली
बाकीचे लोक adventure sports साठी गेले
हां एक थारारक प्रकार होता
थ्रिलीग एकदम
ज्यांनी केला त्यांचे खरच कौतुक
लास्ट मिनिटाला आधारासाठी धारलेले हात सोडून अधांतरी लटकत खाली येण म्हणजे खरच ग्रेट
रोमांचकारी
नंतर पोटात कावळै ओरडू लागल्याने जेवणाचा समाचार घेतला
त्यांनंतर गेम्स सुरु झाले
damsheraaj वेगळ्या प्राकाराचे होते
मजा आली खेलूंन
कविता मुग्धा निलीमा वैभव आनन्दमैत्री केलकर आणि अजुन एक होता त्याचे नाव आठवत नाही
या लोकांनी मिलुन स्किट सादर केल
धामाल आली
विशेषत केलकर आणि नीलिमा hatts off
नंतर बाल कलाकारानी dance कार्यक्रम केला
शेवटी ग्रुपफोटो होऊन परत back to मुंबई
हुश
इथेचथांन्बते
खरतर सगली मजा इथे लिहीने शक्य नाही
पण पर्त्येक माबोकराने एकदा तरी ववी करावाच
सर्वात महाव्ताचे म्हणजे ववि संयोजकांचे आभार
उत्कृष्ट नियोजन आणि त्यासाठी लागानारी मेहनत करून सर्वाना एक छान अनुभव् दिला
त्याबद्दल _/\_
साजिर्या, अरे मंजूडीने
साजिर्या, अरे मंजूडीने माझ्या आधीच ट्राय मारला होता. तीचा कॉन्फिडन्स गेल्यामुळे ती न करताच खाली परत आलेली बघून माझं अवसान गळलं होतं आधी. पण नंतर वर जाऊन तर बघू! असं म्हणून मी गेले. बर्माब्रीज म्हणजे "लटपट लटपट तुझं चालणं गं..." प्रकार होता. मंजूडीला बहुतेक ते सपोर्टचे दोर तिच्या उंचीमुळे बुटके पडत होते म्हणून ते तिला कन्विनियंट पडत नव्हतं. तिने तो ३रा प्रकार पार पाडला.
एवढे उपद्व्याप केल्यामुळे मला जोरदार भूक लागली होती आणि तो ३रा प्रकार करायला सगळ्यांचं झाल्याशिवाय सुरुवात होणार नव्हती म्हणून मी हार्नेस काढून शेवटचा प्रकार न करता जेवायला निघून गेले.
खाली उभे असलेल्या लोक्सनी "रामरक्षा" म्हणत्येस काय असं विचारलं. पण रामरक्षा म्हणावी असं सुचण्याची अवस्था नसल्याने मी साधासाच जप करत होते
नेक्स्ट टाईम भरभर चालेन हा!
Pages