ववि२०१३-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35

वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????... Happy Happy

मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्‍या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि बाळ ओव्याला सांग श्यामली मावशी संयोजक मोडात होती....>>>>भरपाई म्हणून पुढच्या वेळेला तुमच्यासाठीपण काहीतरी नक्की करु हे प्रॉमिस ...>>>>> अजुन संयोजक मोड ऑनच.... Wink

धम्माल...
ववि मिसणं आणि मग जळणं हे माझं नेहमीचंच झालंय आता Sad
पुढच्या वर्षी तरी नक्की प्रयत्न करणार येण्याचा.

वरती साजिराने लिहिलेल्या पोस्टमधली मेधा म्हणजे आपली मेधी की परदेशातली मेधा?

दोन्ही मेधा होत्या.. कोणती कोण ते तूच ओळख.....

ओवी.. वृत्तांत मस्त झालाय..

श्या.. संयोजक मोडातून बाहेर पडा आता..

दोन्ही मेधा होत्या.. कोणती कोण ते तूच ओळख.... <<
ह्म्म्म आपली मेधी मैत्रेयला ठेवून झाडावर चढणे वगैरे पराक्रम करायला जाईल असं वाटत नाहीये खरं.. पण कुणाचं काय सांगता येतंय काय? मैत्रेयच म्हणाला असेल तिला 'आई माझ्या इज्जतचा फालुदा करू नकोस.. जा पटकन!' वगैरे Wink

स्कीट, दंगलगाणी, भोलानात एकदम भन्नाट कार्यक्रम.
उत्कृष्ट नियोजन सर्व वावीकरांचे आभार.

नेहमीप्रमाणे प्रवासापासूनच धम्माल अनुभव देणार्‍या अजून एका वविचा हा मुद्दे-वृत्तांत Proud

१. शनिवारी रात्री १०.३० वाजता संयोजकांचा "५.२० ला नियोजित थांब्यावर हजर रहा" असा धमकीवजा, विनंतीवजा संदेश
२. त्यानुसार बरोब्बर ५.२० ला आशिष गार्डन च्या स्टॉपवर लावलेली हजेरी
३. मयुरेशने फोनवर सांगितलेले, तिथ्थेच उभे असलेले, पण मला अज्जिब्बातच न दिसलेले राम आणि श्यामली.
४. तसे ते तिथे नव्हतेच... हे एक साधारण १५-२० मिनिटातच समोरून मोठमोठ्या पिशव्या घेऊन (यातले बरेचसे खाद्यपदार्थ श्यामली जसे च्या तसे परत घरी घेऊन गेल्याची अंधुकशी कुणकुण आहे) चालत येणारे रा-श्या बघून उमजलेलं सत्य
५. पहाटे पहाटे देव-देवीचं झालेलं दर्शन
६. बरोब्बर ६ वाजता बसचे आगमन, नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या दर्शनाने भारावून गेलेले पुणेकर
७. कुठे कुठे स्टॉप घ्यायचेत यावरून दरवर्षी होणारी चर्चा Proud
८. एकेकाला उचलत बराच लांबचा पल्ला गाठायचा असल्यामुळे चहाची नितांत वाटलेली गरज आणि त्याबरोबरचा सुप्रसिद्ध चितळे बाकरवडी, मेथी मठरी, आंबा वडी, संत्रा बर्फी (बाकरवडी च्या पुढच्या पदार्थांसाठी चितळे जबाबदार नाहीत, कृनोघ्या) चा चकणा (सकाळी ७ वाजता :अओ:)
९. इतका वेळ सांभाळून ठेवलेले बसमधील अढळपद मल्ली चढल्यावर त्याच्याकडे सुपूर्द
१०. गाडीत सुरू झालेली गाणी, भेंड्या, नक्की टीम्स कुठून कुठपर्यंत यात साजिर्‍याचा झालेला घोळ (कारण थोड्या वेळाने सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलं की तो प्रत्येक टीमकडून गाणी गातोय :हाहा:)
११. मधेच 'सफेद धोतर नेसून गावाला जाणार्‍या भैय्याची सगळ्यांना झालेली आठवण... पण दरवर्षी तोच तो भैया बसमधे चढवायचा कशाला असा उपस्थित झालेला कळकळीचा सवाल
१२. बसमधे बसल्यापासून झोपलेला आणि अचानक भेंड्यांच्या उत्तरार्धात भक्तीपर गीतांनी चौफेर फटकेबाजी करणारा राम Proud
१३. दुसर्‍या संघात आघाडीच्या श्यामली व देवा ची संयत आणि यशस्वी फटकेबाजी, तत्पूर्वी कुठल्याश्या गाण्यावर (बस ड्रायव्हरने पेशन्स संपत आल्यावर लावलेल्या) आशूडीचा बसल्याजागी केलेला डान्स
१४. युकेज रिसॉर्टवरून गाडी जाताना पुणेकरांची झालेली घालमेल
१५. गाडीत कुठल्याश्या टोलनाक्यावर थोड्यावेळासाठी चढलेले नायगावकर काका आणि निखिल वागळे Lol
१६. खंड न पडलेली खादाडी आणि तरीही नाश्त्याच्या वेळेत पोचणार नसल्याने आलेली स्पष्ट नाराजी
१७. स्त्रीवर्गाचा अजिबात विचार न करता दोन-तीन ठिकाणी घेतलेले स्टॉप आणि त्यामुळे व मुळातल्या पावसाळी हवेमुळे वाढलेले प्रेशर Sad Proud
१८. अप्रतिम हिरवा निसर्ग, दमदार पाऊस
१९. हाडांचा हिशोब जुळवायला लावणारे रस्ते पण सफाईदारपणे, मनावरचा तोल अजिबात ढळू न देता (अनेक कारणं पाठीमागच्या बाजूने एकापुढे एक सतत आदळत असून) सेफ ड्रायव्हिंग करणारा आमच्या पुणे बसचा ड्रायव्हर (उल्लेख केला नाही तर वृ अर्धवट राहिल)
२०. शेवटी ६ तासांच्या प्रवासानंतर दिसलेली विसावा रिसॉर्टची पाटी आणि मुंबईकरांची बस
२१. उतरल्यावर आता दिसतील मुंबईकर, मग दिसतील मुंबईकर करत करत कितीतरी आतपर्यंत चालायला लावणारा, पण प्रवासाचा सगळा शीण घालवणारा, श्रीमंताच्या-गरिबांच्या असतील नसतील त्या सगळ्या चंगोंच्या चारोळ्यांचे कलेक्शन आपल्या उरावर बाळगून मिरवणारा हिरवागार रस्ता.
२२. मुंबईकरांकडून पुणेकरांचे स्वागत Proud
२३. अखंड चरत आल्यामुळे आणि आप्तस्वकीयांच्या भेटीमुळे तुडुंब भरलेले पोट तरीही जे जे आयतं ते ते पौष्टिक या तत्त्वावर हादडलेली मिसळ
२४. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स (सविस्तर वृ आणि प्रचि वर दिलेलीच आहेत इतरांनी) व त्याआधी नेहमीचा स्विमिंगपूलचा सीन
२५. अ‍ॅक्चुअल अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस पेक्षा खाली उभं राहून, माना वर करकरून कुचाळक्या करण्यातच आम्हाला गवसलेलं अ‍ॅडव्हेंचर Wink
२६. बरबटलेलं-झाळलेलं असं काहीतरी यमक जुळवलेली, बहुतेक गरिबांच्या चंगोच्या चारोळीची पाटी आणि त्यावरून परतीच्या प्रवासात चेकाळलेले पुपुकर्स
२७. जेवण
२८. ओळखपरेड, गेम्स, मेंदी
२९. मूक अभिनयाने म्हणी ओळखा या खेळात केळकरांनी केलेला अप्रतिम अभिनय Proud
३०. कुठून कुठून त्रेतायुगातून (:फिदी:) शोधून काढलेल्या म्हणी
३१. सर्वांगसुंदर स्कीट....... मुंबईच्या कलाकारांचा अजून एक उत्स्फूर्त अभिनयाचा नमुना
३२. श्यामलीची 'स्कीट करणार होतो पण केलं नाही' अशी पुणेकरांच्या वतीने दिलेली प्रांजळ कबूली
३३. मुंबईच्या 'छोट्या कलाकारांनी' 'हम भी कुछ कम नही' करत केलेला भोलानाथ चा डान्स (श्रीशैल चा झोपाळ्यावर बसून 'इतर वेळी घरी येतात तेव्हा बरे वागतात हे सगळे काका' असे भाव असलेला चेहरा.) Lol
३४. उशीर होईल म्हणून आपापल्या बसमधे बांधून घेतलेली कांदा-बटाटा भजी
३५. परतीच्या प्रवासात सगळे कंटाळून आता झोपी जाणार असं वाटत असतानाच चहासाठी घेतलेला ब्रेक आणि त्यानंतर त्या चहात काय घातलं होतं असा प्रश्न पाडायला लावणारे, एकाएकी चेकाळलेले पुणेकर.. (आता पुणेकर चेकाळून चेकाळून किती चेकाळणार असा प्रश्न कुणीही उपस्थित करू नये... प्रत्यक्षानुभूतीसाठी एकदा पुणे बसने प्रवास करावा. :फिदी:)
३६. परत एकदा बस मधे चढलेले नायगावकर काका, वैभव जोशी आणि निखिल वागळे Lol
३७. परत एकदा उतरण्याच्या स्टॉपवरून त्याच ठराविक चर्चा
३८. गाडीत लावलेली भयंकर रिमिक्स गाणी
३९. ११.१५ ला जड अंतःकरणाने टाटा-बायबाय
४०. ११.४५ ला गुडूप

||इति एकादश-वविची कहाणी चाळीस मुद्यांनी सुफळ संपूर्ण|| Proud

ज्जे बात मंसो Happy

युकेज रिसॉर्टवरून गाडी जाताना पुणेकरांची झालेली घालमेल>>>अगदी अगदी Wink परतीच्या च्या च्या हॉटेलात ववि का केला नाही हा तमाम पुणेकरांना पडलेला प्रश्न राहिलाच आहे Lol

लले, तुझ्याघरी कसे राजसरूपी निखिल वागळे आले होते तसे हे साजिर्‍यारुपी नायगावकर काका आणि आशूडीरुपी निखिल वागळे Lol

श्रीशैलचा फोटो काढला आहे का रे कुणी? सांग सांग भोलानाथ बघत असताना एवढा डोळे विस्फारुन बघत होता. मी नाच बघायचा सोडून त्याचे एक्सप्रेशन्सच बघत बसले होते.

फोटो टाका की लोकांनो

कार्याध्यक्ष, हिम्या , संयोजक मोडातन बाहेर यायला वेळ लागायचाच Proud

मंजात्या, एकदम मुद्देसूद वृत्तांत... :).

हाडांचा हिशोब जुळवायला लावणारे रस्ते पण सफाईदारपणे, मनावरचा तोल अजिबात ढळू न देता (अनेक कारणं पाठीमागच्या बाजूने एकापुढे एक सतत आदळत असून) सेफ ड्रायव्हिंग करणारा आमच्या पुणे बसचा ड्रायव्हर (उल्लेख केला नाही तर वृ अर्धवट राहिल).....>>>>> पूर्ण अनुमोदन... आपल्या ड्रायव्हरने गाडी चालवताना इतकी काळजी घेतली की आपली हाडं इतक्या खड्ड्यांतून प्रवास करूनसुध्दा शाबूत रहिली... :). त्याचे आभार मानायलाच हवेत.

आत्या, हा खरा 'मुद्दसूद' वृ!! Happy
वृ आवडला म्हणून मस्त वाटले लोक्स! काल वेळ मिळेल तसे लिहून इथे घाईत सलग पोस्ट केले. आत्ता जरा शु.ले. सुधारून सचित्र करावे म्हटले, तर फोटो टाकणे जमत नाहिये.
बाकी कोणी कां टाकत नाहिये फोटो??

वा वा. मस्त वृत्तांत ओवी आणि मंजात्या.

मेधा म्हणजे शोनूने धाडस दाखवले आणि अ‍ॅड्व्हेन्चर स्पोर्ट्स केलेच पाहिजे असं सांगितलं म्हणून ते केले गेले. बरेच वर्षांनी तिला भेटले, मजा आली. तिने भरपूर खाऊ आणला होता तो ग्रेटच.

नाटकाने मजा आली. वैभवआयरे१२३४५ ने बेअरिंग सोडले नाही अजिबात Lol नील.चा बिल्डरही भारी. सांग सांग भोलानाथचा अ‍ॅन्टी क्लायमॅक्स वरकडी होता Lol

रच्याकने, दिवे पाजळलेत की नाही घरी? Happy

ग्रूप फोटो येऊदे आता.

सगळ्यांचे वृत्तांत मस्तच .....
ओवी छान लिहिलेस ग! अद्वैत ने ही मस्तच वृत्तांत लिहिलाय..
ग्रूप फोटो ची वाट पहातेय...

Pages