ववि२०१३-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35

वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????... Happy Happy

मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्‍या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्तान्त मस्त. पण फोटो (अन त्यावरून 'चर्चा') झाल्याखेरीज तो सफल संपूर्ण कसा होणार? Wink
धमाल आहे ववि म्हणजे , पुढच्या वेळी नक्की जाणार Happy

धमाल आहे ववि म्हणजे , पुढच्या वेळी नक्की जाणार...>>>लई टाईम आहे बरं का.. Happy ३० जुलै २०१४ला परत हेच वाक्य म्हणू नकोस म्हणजे झाले.. Proud

श्रीशैलचा फोटो काढला आहे का रे कुणी? सांग सांग भोलानाथ बघत असताना एवढा डोळे विस्फारुन बघत होता. > :d का नाही बघणार... एरव्ही अ‍ॅनिमेटेट गाणं पहायची सवय.. ववितला भोलानाथ त्याच्या साठी सरप्राईज होता.

मुंबईकरांनी सादर केलेले स्कीट

माझे फोटो कुठेही डकवण्याची मी परवानगी दिलेली आहे रे Proud , त्यामुळे माझे फोटो डकवण्यात कंजुषपणा करु नये, एवढंच काय उदयाच्या मटामध्ये जरी माझे फोटो आले तरी माझी काहीही हरकत नसेल Proud

श्रीशैलचा >>> अरे कसले भारी भाव होते त्याच्या चेहर्‍यावर... अक्षरशः 'काय पागल लोकं आहेत' असं तो म्हणत असेल मनात Lol

मंजू , झाक लिव्हलाय वृत्तांत,

वविची एक गोष्ट मला फार आवडली ,कोणाशीही बोलताना आधी आपण नक्कीच एकमेकांना ओळखतो आहे अस वाटूनच बरेच विषय निघायचे आणि नंतर प्रश्न यायचा तुझा आयडी काय ..... हो का ?
इथे सगळेच एकमेकांचे बालमित्र असावेत अस वाटल ,स्वीमींग टँक मध्ये तर कल्लाच होता, टँक मध्ये दही हांडी (बिन मडक्याची) आणि रिकाम्या मडकेवाल्यांची ... वा

संयोजक
फोटू टाकऊनच द्या आता,

सगळे व्रुतांत मस्त!

मन्जे, ओवी Happy

धमाल आली ववि ला! बस मध्ये चाललेल्या धम्माल गाण्यांमुळे प्रवास जाणवला नाहि
कविन चे स्कीट अप्रतीम! सादरीकरण तर खुपच मस्त ! हसुन हसुन पुरे वाट !

जामच धम्माल केलीये... त्या पाण्यातल्या दहिहंडी च्या धूडगुसाने जाम हात्पाय बोंबलतायत आता... पणखूप्मज्जाआली!!!

यंदाच्या वविमध्ये अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स हा अगदी कळसाध्याय होता. अगदी ३ फुटी टेबलवरून सुद्धा खाली उडी मारत नाही मी कधी, त्या दिवशी सकाळपर्यंत मला कुणी सांगितलं असत कि मी हे असलं काही धाडस करणार आहे तर मी त्याला वेड्यातच काढलं असतं.

लांबून पाहिलं तेव्हा नुसत्याच २-४ दोऱ्या इकडून तिकडे झाडांवर लटकताना दिसत होत्या. नक्की काय आहे त्याचा पत्ता लागेन. त्या instructor शी बोलल्यावर समजलं कि ते काय प्रकरण आहे. एकीकडे वाटत होत कि प्रयत्न करून बघावा आणि दुसरीकडे भिती पण वाटत होती. पण मेधा, मंजूडी, साजिरा, पूनम असे ३-४ जण पुढे सरसावून हर्नेस बांधायला सुरुवात केली तेव्हा मला थोडं बळ आल. म्हटलं किमान ३ पैकी एकतरी प्रकार करून बघुया. माझ्याआधी बर्माब्रिज पार करून पुढे गेलेल्या मेधाकडे बघून वाटलं कि आपल्यालाही जमेल. पण शिडी चढून वर गेले तेव्हा प्रचंड भिती वाटायला लागली. पहिलं पाऊल टाकल तेव्हा अगदी लटपटायलाच झाल. म्हटलं हे काय आपल्याला जमणार नाय, गपगुमान मागे फिरावं. एका बाजूला हे विचार सुरु असतानाच दुसरीकडे मात्र हळूहळू पाय पुढे टाकायचे, बघूया काय होतंय ते, असा एक track चालू होता. लोकांचे चिअरअप करणारे आवाज तेवढ्यात कानावर पडले आणि धीर आला. ४-५ पावलं पुढे गेल्यावर वाटलं कि हे आता सहज जमेल. बर्माब्रिज संपला तेव्हा जे काय हायसं वाटलंय त्याला तोड नाही. तिथून पुढे त्या एकाच दोरीवरून चालत ब्रिज पार करायचा होता. आत्तापर्यंत थोडास्सा कॉन्फिडन्स आला होता. एक दोरी डोक्यावर आणि एक पायाखाली, सरकत सरकत मध्यावर येईपर्यंत संपूर्ण दमछाक झाली. वरची दोरी धरलेले हात ताणले जाऊन बोटांना रग लागली होती. मग थांबून थोडा श्वास घेतला आणि पुन्हा एकदा सुरुवात केली. पण शेवटपर्यंत पोचेन असं वाटेना तेव्हा instructor ला म्हटलं कि आता बास आणि डोळे मिटून उडी मारली. आपण हवेतच आहोत ह्याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा डोळे उघडले आणि मग जमिनीवर येईपर्यंत जी काय solllid गम्मत वाटली ती वर्णन करून सांगूच शकत नाही.

आता तिसरा टप्पा पूर्ण करायचाच असं ठरवलं. मध्ये जेवढा वेळ गेला तेवढा संपूर्ण काळ मी ते झाडाला ठोकलेले लाकडी ठोकळे चढून वर कसं पोचायचं हाच विचार करत होते. सुरुवात केली आणि लगेच समजलं की वाटलं तेवढ सोप्प नाही हे. घारू आणि इतर लोक ज्या सूचना देत होते त्याप्रमाणे हळूहळू वर चढत होते. पण वर एका अरुंद उभ्या ठोकळ्यावरून सटकन पाय घसरला आणि एकदम भिती वाटली. हाताला grip मिळेना आणि पायाखाली ठोकळा सापडेना. उगाच काही गरज नसताना हा मूर्खपणा करतेय मी असं वाटून गेलं. पण लगेचच तो विचार झटकून टाकला आणि काहीही करून हे पूर्ण करायचंच असं मनात म्हटलं. चिअरअप करणारे आवाज पुन्हा कानावर पडले आणि परत चढायला सुरुवात केली. फायनली वरती पोचले तेव्हा स्वर्गाला हात लागल्याचा feel आला होता. Wink

हा सगळा खेळ आटपला तेव्हा काहीतरी वेगळ हाती लागल्यासारखं वाटत होतं. ते नक्की काय आहे? हे सगळं करून मी काय साधलं? मला असं वाटतं की, माझ्यातल्या fear of unknown ला भिडायची संधी मिळाली मला. हा fear of unknown आपल्या प्रत्येकाच्याच मनात असतो, आणि आणीबाणीच्या वेळी दुबळं बनवत असतो. त्या भीतीला आमनेसामने तोंड दिल्यामुळे आत्मविश्वास वाढलाय माझा हे नक्की. face the devils ह्या माझ्यातल्या वृत्तीची मला पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली. वैयक्तिक आयुष्यातल्या कठिण काळाला नव्या जोमाने भिडायची उभारी मिळाली. स्वत:च्या आतल्या devils चा सामना करून झाल्यानंतर आता बाहरेच्या devils ना तोंड देणं सोप्प जाईल कदचित.

स्किटमधल्या कलाकारांची नावे पण तिथे लिहायला हवी होती. म्हणजे जनरल नावे न लिहिता कोणती कामे कोणी केली असं. सगळ्यांचीच कामं भारी झाली आहेत.

ओवी,मंजिरी,मनी,,,मस्त लिहिला आहे वृत्तांत!!! सगळी दृष्यं उभी केलीत की डोळ्यासमोर आणी ववि मिसल्याचं
वाईट् वाटलं,पुन्हा एकदा!!!!
स्किट ची तारीफ वाचूनप्,स्किट पाहावासा वाटतोय...कैसे???कब????
कोण देणारे लिंक?????

अरे कसलं भारी स्कीट सादर केलतं Rofl सगळ्यांची काम अप्रतिम झालीत , तो जोरात लागलेली वाला कोण Proud
वर्षु ती इंद्रधनुष्यची पोस्ट बघ , त्यात शेवटच्या शब्दात लिंक आहे. अरे पुढचा भाग द्या की रे .
http://www.youtube.com/watch?v=uCsPjBTtkHU&feature=youtu.be

स्कीट एक नंबर Lol
लि़खाण, सादरीकरण सगळंच अफलातून......ववि ला येऊ न शकल्याचं परत एकदा वाईट वाटलं.

Pages