Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35
वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????...
मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि बाळ ओव्याला सांग श्यामली
आणि बाळ ओव्याला सांग श्यामली मावशी संयोजक मोडात होती....>>>>भरपाई म्हणून पुढच्या वेळेला तुमच्यासाठीपण काहीतरी नक्की करु हे प्रॉमिस ...>>>>> अजुन संयोजक मोड ऑनच....
धम्माल... ववि मिसणं आणि मग
धम्माल...
ववि मिसणं आणि मग जळणं हे माझं नेहमीचंच झालंय आता
पुढच्या वर्षी तरी नक्की प्रयत्न करणार येण्याचा.
वरती साजिराने लिहिलेल्या पोस्टमधली मेधा म्हणजे आपली मेधी की परदेशातली मेधा?
दोन्ही मेधा होत्या.. कोणती
दोन्ही मेधा होत्या.. कोणती कोण ते तूच ओळख.....
ओवी.. वृत्तांत मस्त झालाय..
श्या.. संयोजक मोडातून बाहेर पडा आता..
ओवी, मस्त लिहिला आहेस
ओवी, मस्त लिहिला आहेस वृत्तांत. खरंच कालचा दिवस भारलेला होता
दोन्ही मेधा होत्या.. कोणती
दोन्ही मेधा होत्या.. कोणती कोण ते तूच ओळख.... <<
ह्म्म्म आपली मेधी मैत्रेयला ठेवून झाडावर चढणे वगैरे पराक्रम करायला जाईल असं वाटत नाहीये खरं.. पण कुणाचं काय सांगता येतंय काय? मैत्रेयच म्हणाला असेल तिला 'आई माझ्या इज्जतचा फालुदा करू नकोस.. जा पटकन!' वगैरे
मेधा लेकाला घेउन नव्हती आली..
मेधा लेकाला घेउन नव्हती आली..
ओके...
ओके...
टायग्या तू पण गेलेलंस गो?
टायग्या तू पण गेलेलंस गो?
Nee, aga neel ahe to
Nee, aga neel ahe to
हा हा हा.. कामं करता करता
हा हा हा.. कामं करता करता गप्पा मारू नयेत हेच खरं..
नी पुढच्या वर्षी असं
नी पुढच्या वर्षी असं काहीतरी म्हणेल मैत्रेय..
वृत्तांत मस्त ग ओवी..
स्कीट, दंगलगाणी, भोलानात
स्कीट, दंगलगाणी, भोलानात एकदम भन्नाट कार्यक्रम.
उत्कृष्ट नियोजन सर्व वावीकरांचे आभार.
ओवी ववी चे शब्दरुप वर्णन
ओवी ववी चे शब्दरुप वर्णन आवडले.
नेहमीप्रमाणे प्रवासापासूनच
नेहमीप्रमाणे प्रवासापासूनच धम्माल अनुभव देणार्या अजून एका वविचा हा मुद्दे-वृत्तांत
१. शनिवारी रात्री १०.३० वाजता संयोजकांचा "५.२० ला नियोजित थांब्यावर हजर रहा" असा धमकीवजा, विनंतीवजा संदेश
२. त्यानुसार बरोब्बर ५.२० ला आशिष गार्डन च्या स्टॉपवर लावलेली हजेरी
३. मयुरेशने फोनवर सांगितलेले, तिथ्थेच उभे असलेले, पण मला अज्जिब्बातच न दिसलेले राम आणि श्यामली.
४. तसे ते तिथे नव्हतेच... हे एक साधारण १५-२० मिनिटातच समोरून मोठमोठ्या पिशव्या घेऊन (यातले बरेचसे खाद्यपदार्थ श्यामली जसे च्या तसे परत घरी घेऊन गेल्याची अंधुकशी कुणकुण आहे) चालत येणारे रा-श्या बघून उमजलेलं सत्य
५. पहाटे पहाटे देव-देवीचं झालेलं दर्शन
६. बरोब्बर ६ वाजता बसचे आगमन, नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या दर्शनाने भारावून गेलेले पुणेकर
७. कुठे कुठे स्टॉप घ्यायचेत यावरून दरवर्षी होणारी चर्चा
८. एकेकाला उचलत बराच लांबचा पल्ला गाठायचा असल्यामुळे चहाची नितांत वाटलेली गरज आणि त्याबरोबरचा सुप्रसिद्ध चितळे बाकरवडी, मेथी मठरी, आंबा वडी, संत्रा बर्फी (बाकरवडी च्या पुढच्या पदार्थांसाठी चितळे जबाबदार नाहीत, कृनोघ्या) चा चकणा (सकाळी ७ वाजता :अओ:)
९. इतका वेळ सांभाळून ठेवलेले बसमधील अढळपद मल्ली चढल्यावर त्याच्याकडे सुपूर्द
१०. गाडीत सुरू झालेली गाणी, भेंड्या, नक्की टीम्स कुठून कुठपर्यंत यात साजिर्याचा झालेला घोळ (कारण थोड्या वेळाने सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलं की तो प्रत्येक टीमकडून गाणी गातोय :हाहा:)
११. मधेच 'सफेद धोतर नेसून गावाला जाणार्या भैय्याची सगळ्यांना झालेली आठवण... पण दरवर्षी तोच तो भैया बसमधे चढवायचा कशाला असा उपस्थित झालेला कळकळीचा सवाल
१२. बसमधे बसल्यापासून झोपलेला आणि अचानक भेंड्यांच्या उत्तरार्धात भक्तीपर गीतांनी चौफेर फटकेबाजी करणारा राम
१३. दुसर्या संघात आघाडीच्या श्यामली व देवा ची संयत आणि यशस्वी फटकेबाजी, तत्पूर्वी कुठल्याश्या गाण्यावर (बस ड्रायव्हरने पेशन्स संपत आल्यावर लावलेल्या) आशूडीचा बसल्याजागी केलेला डान्स
१४. युकेज रिसॉर्टवरून गाडी जाताना पुणेकरांची झालेली घालमेल
१५. गाडीत कुठल्याश्या टोलनाक्यावर थोड्यावेळासाठी चढलेले नायगावकर काका आणि निखिल वागळे
१६. खंड न पडलेली खादाडी आणि तरीही नाश्त्याच्या वेळेत पोचणार नसल्याने आलेली स्पष्ट नाराजी
१७. स्त्रीवर्गाचा अजिबात विचार न करता दोन-तीन ठिकाणी घेतलेले स्टॉप आणि त्यामुळे व मुळातल्या पावसाळी हवेमुळे वाढलेले प्रेशर
१८. अप्रतिम हिरवा निसर्ग, दमदार पाऊस
१९. हाडांचा हिशोब जुळवायला लावणारे रस्ते पण सफाईदारपणे, मनावरचा तोल अजिबात ढळू न देता (अनेक कारणं पाठीमागच्या बाजूने एकापुढे एक सतत आदळत असून) सेफ ड्रायव्हिंग करणारा आमच्या पुणे बसचा ड्रायव्हर (उल्लेख केला नाही तर वृ अर्धवट राहिल)
२०. शेवटी ६ तासांच्या प्रवासानंतर दिसलेली विसावा रिसॉर्टची पाटी आणि मुंबईकरांची बस
२१. उतरल्यावर आता दिसतील मुंबईकर, मग दिसतील मुंबईकर करत करत कितीतरी आतपर्यंत चालायला लावणारा, पण प्रवासाचा सगळा शीण घालवणारा, श्रीमंताच्या-गरिबांच्या असतील नसतील त्या सगळ्या चंगोंच्या चारोळ्यांचे कलेक्शन आपल्या उरावर बाळगून मिरवणारा हिरवागार रस्ता.
२२. मुंबईकरांकडून पुणेकरांचे स्वागत
२३. अखंड चरत आल्यामुळे आणि आप्तस्वकीयांच्या भेटीमुळे तुडुंब भरलेले पोट तरीही जे जे आयतं ते ते पौष्टिक या तत्त्वावर हादडलेली मिसळ
२४. अॅडव्हेंचर स्पोर्ट्स (सविस्तर वृ आणि प्रचि वर दिलेलीच आहेत इतरांनी) व त्याआधी नेहमीचा स्विमिंगपूलचा सीन
२५. अॅक्चुअल अॅडव्हेंचर स्पोर्टस पेक्षा खाली उभं राहून, माना वर करकरून कुचाळक्या करण्यातच आम्हाला गवसलेलं अॅडव्हेंचर
२६. बरबटलेलं-झाळलेलं असं काहीतरी यमक जुळवलेली, बहुतेक गरिबांच्या चंगोच्या चारोळीची पाटी आणि त्यावरून परतीच्या प्रवासात चेकाळलेले पुपुकर्स
२७. जेवण
२८. ओळखपरेड, गेम्स, मेंदी
२९. मूक अभिनयाने म्हणी ओळखा या खेळात केळकरांनी केलेला अप्रतिम अभिनय
३०. कुठून कुठून त्रेतायुगातून (:फिदी:) शोधून काढलेल्या म्हणी
३१. सर्वांगसुंदर स्कीट....... मुंबईच्या कलाकारांचा अजून एक उत्स्फूर्त अभिनयाचा नमुना
३२. श्यामलीची 'स्कीट करणार होतो पण केलं नाही' अशी पुणेकरांच्या वतीने दिलेली प्रांजळ कबूली
३३. मुंबईच्या 'छोट्या कलाकारांनी' 'हम भी कुछ कम नही' करत केलेला भोलानाथ चा डान्स (श्रीशैल चा झोपाळ्यावर बसून 'इतर वेळी घरी येतात तेव्हा बरे वागतात हे सगळे काका' असे भाव असलेला चेहरा.)
३४. उशीर होईल म्हणून आपापल्या बसमधे बांधून घेतलेली कांदा-बटाटा भजी
३५. परतीच्या प्रवासात सगळे कंटाळून आता झोपी जाणार असं वाटत असतानाच चहासाठी घेतलेला ब्रेक आणि त्यानंतर त्या चहात काय घातलं होतं असा प्रश्न पाडायला लावणारे, एकाएकी चेकाळलेले पुणेकर.. (आता पुणेकर चेकाळून चेकाळून किती चेकाळणार असा प्रश्न कुणीही उपस्थित करू नये... प्रत्यक्षानुभूतीसाठी एकदा पुणे बसने प्रवास करावा. :फिदी:)
३६. परत एकदा बस मधे चढलेले नायगावकर काका, वैभव जोशी आणि निखिल वागळे
३७. परत एकदा उतरण्याच्या स्टॉपवरून त्याच ठराविक चर्चा
३८. गाडीत लावलेली भयंकर रिमिक्स गाणी
३९. ११.१५ ला जड अंतःकरणाने टाटा-बायबाय
४०. ११.४५ ला गुडूप
||इति एकादश-वविची कहाणी चाळीस मुद्यांनी सुफळ संपूर्ण||
ज्जे बात मंसो युकेज
ज्जे बात मंसो
युकेज रिसॉर्टवरून गाडी जाताना पुणेकरांची झालेली घालमेल>>>अगदी अगदी परतीच्या च्या च्या हॉटेलात ववि का केला नाही हा तमाम पुणेकरांना पडलेला प्रश्न राहिलाच आहे
नायगावकर काका आणि निखिल वागळे
नायगावकर काका आणि निखिल वागळे >>> खरंच का?
@मंजिरी सोमण.... व्रुत्तांत
@मंजिरी सोमण....
व्रुत्तांत छान लिहिला आहे
लले, तुझ्याघरी कसे राजसरूपी
लले, तुझ्याघरी कसे राजसरूपी निखिल वागळे आले होते तसे हे साजिर्यारुपी नायगावकर काका आणि आशूडीरुपी निखिल वागळे
श्रीशैलचा फोटो काढला आहे का
श्रीशैलचा फोटो काढला आहे का रे कुणी? सांग सांग भोलानाथ बघत असताना एवढा डोळे विस्फारुन बघत होता. मी नाच बघायचा सोडून त्याचे एक्सप्रेशन्सच बघत बसले होते.
फोटो टाका की लोकांनो
कार्याध्यक्ष, हिम्या , संयोजक मोडातन बाहेर यायला वेळ लागायचाच
ओह, बरं, बरं !!
ओह, बरं, बरं !!
मी नाच बघायचा सोडून त्याचे
मी नाच बघायचा सोडून त्याचे एक्सप्रेशन्सच बघत बसले होते. >>> श्यामले, मी पण !!
मंसो मस्त वृत्तांत!
मंसो मस्त वृत्तांत!
मंजात्या, एकदम मुद्देसूद
मंजात्या, एकदम मुद्देसूद वृत्तांत... :).
हाडांचा हिशोब जुळवायला लावणारे रस्ते पण सफाईदारपणे, मनावरचा तोल अजिबात ढळू न देता (अनेक कारणं पाठीमागच्या बाजूने एकापुढे एक सतत आदळत असून) सेफ ड्रायव्हिंग करणारा आमच्या पुणे बसचा ड्रायव्हर (उल्लेख केला नाही तर वृ अर्धवट राहिल).....>>>>> पूर्ण अनुमोदन... आपल्या ड्रायव्हरने गाडी चालवताना इतकी काळजी घेतली की आपली हाडं इतक्या खड्ड्यांतून प्रवास करूनसुध्दा शाबूत रहिली... :). त्याचे आभार मानायलाच हवेत.
आत्या, हा खरा 'मुद्दसूद'
आत्या, हा खरा 'मुद्दसूद' वृ!!
वृ आवडला म्हणून मस्त वाटले लोक्स! काल वेळ मिळेल तसे लिहून इथे घाईत सलग पोस्ट केले. आत्ता जरा शु.ले. सुधारून सचित्र करावे म्हटले, तर फोटो टाकणे जमत नाहिये.
बाकी कोणी कां टाकत नाहिये फोटो??
वा वा. मस्त वृत्तांत ओवी आणि
वा वा. मस्त वृत्तांत ओवी आणि मंजात्या.
मेधा म्हणजे शोनूने धाडस दाखवले आणि अॅड्व्हेन्चर स्पोर्ट्स केलेच पाहिजे असं सांगितलं म्हणून ते केले गेले. बरेच वर्षांनी तिला भेटले, मजा आली. तिने भरपूर खाऊ आणला होता तो ग्रेटच.
नाटकाने मजा आली. वैभवआयरे१२३४५ ने बेअरिंग सोडले नाही अजिबात नील.चा बिल्डरही भारी. सांग सांग भोलानाथचा अॅन्टी क्लायमॅक्स वरकडी होता
रच्याकने, दिवे पाजळलेत की नाही घरी?
ग्रूप फोटो येऊदे आता.
मंजे, मस्त वृत्तांत.
मंजे, मस्त वृत्तांत.
हिम्या, ग्रूप फोटो टाक की आता.
अप्रतिम वृत्तांत्स्
अप्रतिम वृत्तांत्स्
मस्त वृत्तांत
मस्त वृत्तांत
मस्त वृत्तांत!!
मस्त वृत्तांत!!
सगळ्यांचे वृत्तांत मस्तच
सगळ्यांचे वृत्तांत मस्तच .....
ओवी छान लिहिलेस ग! अद्वैत ने ही मस्तच वृत्तांत लिहिलाय..
ग्रूप फोटो ची वाट पहातेय...
Pages