बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चालः आमच्या कातकर्‍यांच्या आदिवासी हक्क संरक्षण समितीचं एक गाणं आहे 'ये रे ये रे माझ्या जंगलच्या पाखरा!' तीच

म्हणणे बियांचे समजून घे जरा
येरे येरे माझ्या माबोच्या पाखरा||

पडलं झाडावरून एक उंबर
नका म्हणू हो यालाच अंजीर
त्याला स्टील करूनी पहा जरा
येरे येरे माझ्या माबोच्या पाखरा||

काढा हळूच अंजीराची साल
आतला गर असे हो लालेलाल
नका खाउ तो थोडा विचार करा
येरे येरे माझ्या माबोच्या पाखरा||

बघा उंबराच्या स्टीलमधे काय
बघा अंजीराच्या स्टीलमधे काय
पक्षी सोन्याचे उडले भराभरा
येरे येरे माझ्या माबोच्या पाखरा||

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

वा, वा!
'पक्षी सोनियाचे उडले भरारा' असे केल्यास जास्त गेयता येईल असे वाटते (मला) म्हणजे IMO.

नी... मैत्रीणी ....तोडलस.......... उंबराचं झाड..

-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे

मालिनी कण वाही हा वारा
या गाण्याच्या चालीत पण छान बसतेय नी तुझी कविता

शोनू,
मालिनी कण वाहे भरारा
असं आहे ना?
त्यात बसतंय? म्हणून पाह्यलं पाहिजे. पण मला त्याच्या कडव्यांची चाल नाही आठवतेय!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

माझ्याकडूनही (जरा उशीरानेच) पुष्पाला पाणी.. Happy

चालः रुणझुणत्या पाखरा... (गाण्याच्या सर्व संबंधितांची माफी मागून..)

http://www.youtube.com/watch?v=ZB79MRQm_MQ

माझ्या माबोच्या पाखरा...
जारे वैनीच्या सासरा...
अंजिर बर्फी केलीये तिथे, चव घेऊन बघ जरा......

माझ्या माबोच्या पाखरा...

घ्यावी चांगली अंजिरं...
नको मुळीच उंबरं...
त्याच्या आत असतात खूप इवलाल्या अळ्या...

माझ्या माबोच्या पाखरा...

दे रे स्टील अंजिराला..
काढ त्यातल्या गराला....
रटरट उकळून मग थाप त्याची बर्फी पाडायला..

माझ्या माबोच्या पाखरा...

(कोरस) उंबर पडू दे पडू दे... पाखरं त्यातली उडू दे...
संध्याकाळी किती दिसतात छान.. फोटो काढू दे...
उंउंउंउंउंउंउंउं.....

Rofl गाणं गाउन तुनळीवर टाकणे. तसेच मात्रा, वृत्त, छंद ह्याची माहिती दिल्यास अजाण माबोकरांना लाभ होइल.

एक विनम्र सूचना (फु स म्हणा हवे तर): श्रीमती तान्या ह्यांच्या केळवणास अथवा डोहाळजेवणास हे गाणे गावे.

शिंडे.. टण्या हाणणार तुला नक्की आता.. Proud

तू नळी वर टाकयची आयडीया चांगली आहे बाकी.. Happy

आजची ताजी गझलः- कुणाच्या ह्या फण्या वृत्तः नीधप चामार खाणार
कसल्या या खुणा
कोण येउन गेलं इथे
कुणाच्या ह्या फण्या
रूतल्यात जिथे तिथे

गेली असतिल इथून
काही तूरतूर पावले
एक पिल्लु भांगातून
अलवार ओघळले

तेलकट टाळक्यावर
जाई सुळ्ळकन आणि
आत आत कुठेतरी
लपली असेल राणी

डोके खाजवलेले
बट ही काळीशार
फिरवु किती कंगवा
चावतात आरपार

कुणी लायसील लावले
की मेडिकेअर हा चांगला
बसेन सोबती सखीच्या
हट्ट असा हा भोवला

अज्जुके, तुझ्या कवितेचे नाव वाचल्यापासून हात शिवशिवत होते. हलकेच घे बरे Light 1

आशु, हे ईssss नक्की कशामुळे ? स्वप्न की आठवण Wink

सिंडे Proud
-----------------------------------------
सह्हीच !

आठवणंच गं! तुझं स्वप्नंच राहिलं की काय??? अरेरे! Proud
----------------------
एवढंच ना!

सिंडे... हसून हसून मेले!!
सगळ्या पोरींची ही आठवणच असणार. इयत्ता पहिली दुसरी मधली...
स्वप्न म्हणणारे खोटं बोलतायत... ही ही ही!!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नी, आडम, सिंडे.. एक लंबर.. Happy
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

नीरजा, सिंड्रेला, आदमा Lol

~~~~~~~~~~~~
हल्ली मांजरापेक्षाही माणसेच जास्ती आडवी जातात. Happy
~~~~~~~~~~~~

सिंडे सुटलीयेसच जोरात!!! Lol
डोकं खाजतय उगीचच आता Wink

सर्वांना धन्यवाद. पुढल्या वेळी वृत्त मी सांगणार नाही. तुम्ही ओळखायचं. फार झाले लाड.

टः इ. राजवाडे न आठवता स. राजवाडे आठवावेत >>> विकांनंतर हे स. राजवाडे कोण? ह्यांनी कुठले पुस्तक लिहिले आहे? मला पुस्तके वाचायला आवडतात. पुस्तके वाचताना झोपून वाचू नयेत असे योगात लिहिले आहे. योगामध्ये रोज सकाळी उठुन एक लिटर पाणी प्राशन करणे चांगले असे देखील लिहिले आहे. मी खाल्ल्यावर जर पचले नाही तर खूप पाणी पिउन वमन करतो. वमन केल्याने पित्त कमी होते. पण हळुवार प्रकृती असेल तर पित्त वाढूच देउ नये.

स्ला: हळुवार प्रकृती असेल तर पित्त वाढूच देउ नये असं लोक म्हणतात, त्यात किती तथ्य आहे ? माझी प्रकृती हळुवार आहे, कोणी फुल तोडत असलेले पाहिले तरी मला वेदना होतात. वेदनांची सवयच झाली आहे. काही सवयी कित्ती वाईट नै ? माझ्या शेजार्‍याला जिन्यावरून आवाज करत जायची सवय आहे. आवाज करत यायचीसुद्धा सवय आहे. जिन्याला कित्ती वैट वाटत असेल नै ? त्याचे वेटसुद्धा जास्त आहे. मी त्याला वेट कमी करायला सांगितले. पण मी जिन्याला वेट कमी करायला सांगितले हे माझ्या शेजार्‍याला आवडले नाही. शेजारी म्हणजे असून अडचण आणि नसून मुराम्बा असतात.

टः मुराम्बा हा आवळ्याचा असतो का? आमच्या लहानपणी भोपळ्याएव्हडा आवळा यायचा. त्याला आमच्या इथे कोहळा म्हणत. इकडे मात्र आवळ्याच्याच आकाराचे आवळे बघितले. पण सगळे आवळे कसे एकाच सारखे, एकसंध. मी बरीच सायकलपीट करुन आवळे जमा केले मुराम्बा करण्यासाठी. पण त्यांना मुंगळे लागले. मुराम्बा करायचा तर लागलेल्या मुगळ्यांना मारायला पाहिजे. ते शक्य नाही. तर मी मुंगळे लागलेल्या आवळ्याच्याच आकाराच्या आवळ्यांचा मुरांबा कसा करु?

स्ला: मी मुंगळे लागलेल्या आवळ्याच्याच आकाराच्या आवळ्यांचा मुरांबा कसा करु ? असा प्रश्न आल्यावर मी चमकलो. आवळ्यांचा मुराम्बा ? मला मुंगळ्यांचा मुराम्बा पाहिजे होता. आवळे असले की मुंगळे येतात, म्हणून आवळे आणायला सांगितले होते. आता मुंगळे मारले तर एकाला वाईट वाटणार आणि आवळे ठेचले की दुसर्‍याला... अशा कात्रीत मी सापडलो. लहानपणी निर्लेपची छान कात्री मिळायची. पाच घरांत मिळून एकच निर्लेपची कात्री असायची... छान चकचकीत... निरमाच्या प्रेशर कूकरसारखी. निरमा प्रेशर कुकरच्या जाहिरातीत नीना गुप्ता गोल फिरायची ते बघायला मला फार आवडायचे.

टः
१: निरमाच्या प्रेशर कुकरच्या जाहीरातीत नीना गुप्ता कुठे होती? ती तर रुपा गांगुली होती.
२: ईईई, रुपा गांगुली.. काय भयानक दिसायची नाही ती द्रौपदी म्हणुन. काय तो भडक मेक-अप असायचा.
३. निरमाच्या जाहीरातीत नीना गुप्ताच होती. आणि रुपा गांगुली नाही काय द्रौपदी, ती सीता. आमच्या लहानपणी मी ही जाहिरात अनेक वेळा बघितली आहे. आम्ही उत्तर-पुर्वेकडचे म्हणुन आम्हाला काहिही बोलतात.
४. नाही नाही, हीच द्रौपदी. सीता वेगली. मी तर सकाळी सकाळी उठुन महाभारत बघायचे. त्यानंतर मोगली, मग ही-मॅन, मग छायागीत. मग अगदीच टुकार पिक्चर लागायचे उगीचच मद्रासी भाषेतले. पण सकाळी रंगोलीमध्ये हेमा मालिनी काय भारी भारी साड्या नेसायची नाही.
५. हेमा मालिनीच्या कांजीवरम साड्या काय छान असायच्या नाहीत. मला बाइ पैठणीच आवडते. पण लग्नात माझ्या सासरच्यांनी काय तो हिरवा रंग निवडला होता
६. महाभारत आणि रामायण ह्या मालिकांनी भारतीय संस्कृतीच्या र्‍हासाचा होणारा वेग रोखला असेच माझे मत हे. पण माझ्या (अल्पसंख्य) मताचा काय उपयोग. आता तर लग्नात सुद्धा पैठणीच्या जागी पॅन्टशर्ट देतील नवरीला. मी काय करणार हे? माझच मला काही कळत नाही तर उद्याची मुलं माझी काय ठेवणार हेत?

स्ला:
७. हे मत अत्यंत अतार्किक आहे. 'उद्याच्या मुलांनी काही ठेवावं' हे त्यामागचं गृहितक अतिशय चुकीचे आहे. उद्या मुलं असतीलच हे तरी कशावरून ? अशी सबगोलंकार विधाने केल्याने सत्याचा अपलाप होत नाही.
८. तुझ्या लग्नाचे फोटो मी पाहिले आहेत. त्या हिरव्या रंगाला मायबोलीवर पाकीस्तानी हिरवा म्हणतात.
९. अपलाप म्हणजे काय ?
१०. तू असे अस्थानिक प्रश्न विचारू नकोस.
११. आमच्या लग्नात हिने जो घातला होता त्याला रशियन लाल म्हनतात असे मला नंतर कळले. तेव्हा आर्थिक मंदी असल्या कारनाने मी काही बोललो नाही. आर्थिक मंदी हा शब्द सतत वापरून त्याच्यातला प्रान निघून गेला आहे.
१२. लाल हा शब्द रशियन 'लाल्चाव्लेलॉव्ह' या शब्दावरून आला आहे. 'लाल्चाव्लेलॉव्ह' हा शब्द श्रीमद्भागवतातून घेतला आहे.
१३. अस्थानिक नाही, अस्थानी.
१३. नाही, लाल्चाव्लेलॉव्ह हा शब्द अरामेक भाषेतून आला आहे. त्याचा आणि श्रीमद्भागवताचा काहीच संबंध नाही. अरामेक भाषेतून तो पुढे संस्कृतात आला. ऋग्वेदातल्या निरुद्योगसूक्तात हा शब्द दिसून येतो.
१४. पण मी नातिचरामि मध्येसुद्धा लाल्चावलेला अपलाप असा शब्द वाचला आहे. त्यात तो शब्द वपुंना फार आवडतो असाही उल्लेख आहे.
१५. वपुंना काय सोने लागले आहे ? दुर्दैवाने मराठीत नेहमीच सामान्य वकूबाच्या लेखकांचा बोलबाला झाला.
१६. भारतातल्या रंगांना परदेशी नावे का ? परदेशातली नावे दिल्याशिवाय भारतीयांना चैनच पडत नाही. आता आमच्या इथे बघा, आमच्या राष्ट्राध्यक्षाने त्याच्या शपथविधीत स्वतःचे पूर्ण नाव घेतले, जे आहे ते. लाजला नाही. पण तसे भारतीयांना नको. बाहेरचे म्हटले की वा वा ! मग त्याचा आदरसत्कार करतील. काही विशिष्ट शहरात तर काहीही म्हटले तरी आदरसत्कार होत नाही. एकंदरीत भारतीय हरामखोरच.
१७. लाल हे चुकीचे रूप आहे. लाल्चाव्लेलॉव्ह हा शब्द व्हबन्त आहे, असे शब्द जेव्हा मराठीत येतात तेव्हा ते ल्यबन्त शब्दांसारखे अविकारी नसतात (=विकारी असतात) पण तुबन्तांसारखे विकारीसुद्धा नसतात (=अविकारी असतात). तेव्हा त्यांच्या प्रथमा विभक्तीच्या रुपाला 'आ' हा प्रत्यय लागतो. उदा. रशियन लाला. त्याची इतर सर्व विभक्तींची रुपे मात्र गंडीवल्य किंवा कायतु या शब्दांसारखी चालतात.

लोकहो, वरल्या बेबंद-धुंद-निबंधास शीर्षक द्यायचे राहून गेले असून ते "मला आलेले भांगेचे अनुभव" असे आहे, याची नोंद घ्यावी. कृपया.
Proud

--
पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

:):-)

    ***
    "If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away." - हेन्री डेव्हिड थोरो

    Pages