व.. र् ...हाडी झटका

Submitted by satish_choudhari on 6 March, 2009 - 01:42

सकु गं सकु काय मी बकु
तुह्यामांग लागू कं स्वताले आता इकु ...

तुहया दाजीबा लई डेंजर
ट्यूब माह्या करतो पंचर
मनात माह्या होते असं कि
बुड्याले आता दाखवू चाकू...
सकु गं सकु काय मी बकु
तुह्यामांग लागू कं स्वताले आता इकु ...

तुही बुडगी अशी पाह्यते मले
जसं काई म्या लई तीर मारले
मनात माह्या होते असं कि
बूडीले आता इहिरित टाकू...
सकु गं सकु काय मी बकु
तुह्यामांग लागू कं स्वताले आता इकु

गुलमोहर: 

धन्य Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

Rofl
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

स्वताले असं इकू नकू रे बारकू.
येक काय, हज्जार मिळतिल सकू.
(अर्थ- स्वताले इकून असे मिळू मिळू किति रुपे मिळतिल भाउ? त्यापेक्षा निखिलभाउला इच्चारा. तो मिळून देईल तुम्हाला भरपूर सकू ! !)

दस नंबरि कविता केली बर का दाजिबा ! !
बूड्याले अन बूडिले म्हणजे काय तेव्ढे फक्त सांगा

रॉ भाऊ.. बूड म्हणजे पार्श्वभाग.. निदान मुंबईत तरी..
आता वरहाडात काय म्हणतात ते कवीराज सांगतीलच.

Lol बुडगी आणि बुडिले या शब्दांचे अर्थ नाही कळले.

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    ओये.. तूही बुडा आनि बुडी म्हंजे तुझा बाप आणि आई! अरे सकूचा बुडा नि बुडी बारकूले खुन्नस देते, त्याहून ते सकूले हुल देते!

    Happy

    आपल्याला तर आवडली बुवा ही कविता.. मस्त आहे की.. प्रत्येक कवितेत घनगंभीर अर्थनाद वगैरेच पाहिजे का तुम्हाला.

    आता वरहाडात काय म्हणतात >. वरहाडात नाही रे वर्‍हाडीत अस लिहाव:)

    सतिश आवडली छान आहे...!!

    <<बुडा आनि बुडी >>

    आपल्याकडे जसे आज्जी आजोबांना किंवा म्हातार्‍या आई वडीलांना नुसते म्हातारा - म्हातारी म्हणण्याची पद्धत (?) आहे, तसेच विदर्भात बुडी पक्षी बुढ्ढी (म्हातारी) आणि बुडा अर्थात बुढ्ढा (म्हातारा) हे शब्द वापरले जातात.
    सतिशजी वर्‍हाड हे vaRhaaD असे लिहा.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

    http://maagevalunpahataana.blogspot.com

    ओह अच्छा ! धन्यवाद Happy कविता आवडली मलाही.

      ***
      Entropy : It isn't what it used to be.

      Lol
      विशालभाऊ,मला तर 'व.. र् ...हाडी' एकदम चित्रदर्शी वाटले Lol
      ********************************
      द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

      बुडीला हिरीत टाकु
      बुड्याला दाखबु चाकु
      तु आन मी आन सकु
      जेलमधी डाव टाकु

      -प्रकाश
      -------------------------------------------------------
      दीवाना हुआ बादल !

      Biggrin Biggrin Biggrin ......... आगाव कुठला !

      सस्नेह...

      विशाल.
      ____________________________________________

      रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

      http://maagevalunpahataana.blogspot.com

      प्रकाश? संगतगुण लागला की काय?