बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या.. Lol

--
.. नाही चिरा, नाही पणती.

जबरी .. टण्या Biggrin
---------------------------------------------------------------------------
ऊन सावलीच्या परी कधी नकोसं हवंसं..

टण्या, कडी आहेस Lol
>>> सध्यातरी मी मी गाजरगवताचे 'ऍनाग्राम' शोधायचा प्रयत्न करत आहे.
Lol

  ***
  उसके दुश्मन हैं बहुत
  आदमी अच्छा होगा

  टण्याबेडेकर Lol
  आज सगळेच सुटले आहेत अगदी !
  ~~~~~~~~~~~~~~~~
  फिटे अंधाराचे जाळे .....
  ~~~~~~~~~~~~~~~~

  निर्माता एकच असला तरी तो देवच असेल असेही म्हणता येणार नाही कारण त्याने कीड आणि कपास ह्या दोन्हीची निर्मिती केली तरी त्याला/तिला सर्वच गोष्टींची माहिती आहे हे सिद्ध होत नाही.>>>> हे सही आहे! Lol
  ------------------------------------------
  Times change. Do people??

  पण ज्या अर्थी हे उदाहरण दिलेले आहे त्याअर्थी दिलेली माहिती पूर्ण आहे असे मानावे लागेल.>>>>>>
  टण्या जबरी... Rofl
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  बेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...

  सध्यातरी मी मी गाजरगवताचे 'ऍनाग्राम' शोधायचा प्रयत्न करत आहे >>

  Lol

  >>सध्यातरी मी मी गाजरगवताचे 'ऍनाग्राम' शोधायचा प्रयत्न करत आहे
  Lol
  भारी बहरलाय गुलमोहर.. Happy

  आज गडावरच्या बालकवितेवरून जन्मलेली माझी एक काळकविता.
  इथले वाचक या उत्स्फूर्त काव्यरसाला मुकू नयेत आणि कवितेचा जन्म सफल व्हावा म्हणून इथेही टाकतो.
  --

  आई मी गाऊ?
  गुलमोहरावर जाऊ?
  कविता लिहू?
  मिळेल का खाऊ?

  नको रे बाबा
  तोडलंत म्हणतील
  फोडलंत म्हणतील
  हे काय केलंत म्हणतील
  अर्थ विचारतील
  पळत्या भुईलाही
  पकडून थांबवतील
  मग काय करशील?
  कुठे कुठे भरशील?

  नाही नाही आई
  काहीच होणार नाही
  मी हरणार नाही
  काव्यसरिता वाही
  मीही करेन काहीबाही
  काव्यमंजिलीचा मी राही
  अस्सं सोडणार नाही
  पाहतच राहा तुही
  कवितेचा मी होतो की नाही
  माही माही माही!!!

  सांग आई, मी गाऊ?
  गुलमोहरावर जाऊ?

  --
  यानंतर गडावरच्या एका आईने मोठ्या प्रेमाने तूच गुलमोहरावर जा, तू गुलमोहरावरच जा, तू गुलमोहरावर जाच- असे मोठ्या प्रेमाने त्रिवार बजावले. अन पुन्हा एक चारोळी जन्मली..

  थँक्यू थँक्यू आई
  आता तू पाही
  रचतो कवितेच्या राशी
  हे पाप तुझ्या माथी..

  --
  .. नाही चिरा, नाही पणती.

  मित्रांनो, बहरचे वरील शंभरावे पुष्प गुंफून झाल्यावर मला अत्यानंद झाला आहे. या क्षणी भावना कवितेतच काय पण साध्या शब्दांतही व्यक्त करताना 'दाटून कंठ येतो' अशी अवस्था होऊन श्री स्लार्टी यांच्या भाषेत बाष्पगद्गदित अशी अवस्था झाली आहे.
  हे सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून देऊन श्री. टण्या यांनी आम्हा समस्त कवीवर्गाला उपकृत केले आहे. त्यांचे हे आमच्यावरचे कर्ज कधीही फिटणार तर नाहीच, उलट चक्रवाढव्याजाने वाढतच राहील याची खात्री आहे.
  काव्यतारणहार असेतोवर, म्हणजे २०२५ सालापर्यंत हा बहर असाच राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  --
  .. नाही चिरा, नाही पणती.

  अरे देवा... हे काय आहे ..? वाचायला बराच वेळ (आणि रसग्रहण करण्यास अजुन बराच वेळ) लागणारसं दिसतंय..:)
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

  ए, मी पण लिहिणार मी पण लिहिणार....

  आज सकाळी पाहिले मी आरश्यात
  माझे मलाच..
  क्षणभर ओळखले नाही मी
  माझे मलाच...
  आज सकाळी पाहिले मी आरश्यात
  माझे मलाच..
  आणि ठरवले..
  आज तरी दाढी करायलाच हवी..:फिदी:
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

  27 डिसेंबर, 2008 दोनचार चूकार टाळकी नि शनिवारचा ओस पडलेला यस्जीरोड

  चला तर, कोण नाही ना येत आता? उणीव भासते ना?
  मग आपण खेळ खेळायचा का? उणीव उणीव????
  प्रत्येकाने सान्गायचे, की त्याची उणीव त्याच्या मते कोणाकोणाला भासेल, भासावी असे वाटते!
  किन्वा, विरुद्ध बाजुने असे की समजा साजिरा, मग त्याची उणीव कशाकशात कशी भासेल त्याचा तपशील द्यायचा
  शेवटी काय? आज उणीवेवर टीपी करायचा! व्हा तर मग सुरू

  थोड्या वेळाने....

  अरे व्वा? कुणालाच कसलीच उणीव नाही की काय? व्हेरी गुड्ड!
  मला मात्र.......
  मस्त अन्थरुण पसरून
  गुरगुट्ट गोधडीत मस्त लपेटून
  मन्द सन्गित ऐकत ऐकत
  झोप काढण्याच्या अनावर ओढीने
  या सगळ्याचीच उणीव भासत्ये!

  रिफ्रेश करुन करुन
  एखाद दुसरा चुकार
  बघितला नविन पोस्टचा
  रिमार्क ताम्बड्या अक्षरातला
  की झडप घातल्यागत त्याच्यावर
  उन्दराला किचकायला लावून
  डोळे फाडफाडून आत डोकवाव
  तर काय?
  मजला खणखणाटाची
  उणीव भासते हो
  ...;
  आपला, लिम्बुटिम्बु
  (साजिर्‍या म्हणला म्हणून इथ टाकल हो! Happy )

  आज पुण्यातले पुणेकर बाफ वर झालेली धमाल खास लोकाग्रहास्तव येथे देण्यात येत आहे.
  स्लार्टी :
  आजचा सुविचार : [...]एकीकडे संस्कृतीरक्षणाचा जगभर बोलबाला चालू असतानाच नुसत्या तोंडच्या वाफेने संस्कृतीचा र्‍हास करु पाहणार्‍यांना महाराजांनी "अस्तनीतले निखारे " समजून "ही तर श्रींची इच्छा " असे म्हणून कडेलोटाची शिक्षा फर्मावली असती तर त्यात नवल नव्हते. राजे, तुम्ही परत या!
  - आशुंडर्स्कोर्डी यांनी सोमवार, १२ जानेवारी २००९, अर्थात पौष कृ. द्वितीया, शके १९३० रोजी तळमळीने मारलेली हाक

  आशू_डी :
  स्लार्टी, आ.सु. मस्तच! पण 'आशुंडर्स्कोर्डी' हे कोण बरे? थोडी माहिती मिळाली तर जण्टा उपकॄत होईल. मला तर ते एखाद्या अवकाशयानाचे नाव वाटले. म्हणून केवळ उत्सुकतेपोटी विचारले. पण औत्सुक्याने मांजराला मारले असे तर होणार नाही ना?

  श्रध्दाके :
  पण औत्सुक्याने मांजराला मारले<<<<<<<<<
  आशू, तुझ्या प्रगतीचा आलेख केवळ थक्क करणारा आहे. पण मांजराला मारू नकोस. काशीला सोन्याचे मांजर करून द्यावे लागते; असे ऐकून आहे. गाडगीळांकडे जाऊन बघ. सोन्याचे भाव प्रचंड आहेत.

  आशू_डी :
  मांजराला मारू नकोस. काशीला सोन्याचे मांजर करून द्यावे लागते; असे ऐकून आहे>>
  श्रध्दामाते, ती अंधश्रद्धा मी ही जाणून आहे. विश्वास-अविश्वासाच्या भलत्या फंदात न पडता उगाच कशाला विषाची परीक्षा आपणच घ्या?(त्यासाठी निवडक नमुने आहेत) म्हणून खात्री करुन घेण्याकरिताच केवळ मी माझ्या जिज्ञासेपोटी उद्भवलेला प्रश्न लिहित असतानाच या उपप्रश्नाची पृच्छा केली. महामहोपाध्याय, बिरबल असे अतिशय निपुण, चाणाक्ष चतुर बुध्दीप्रामाण्यवादी विचारवंतांचा येथे लीलया वावर होत असतानाही माझ्या सारख्या पामरांना हे असे उपप्रश्न पडावेत आणि तीच शंका तुझ्याही मनात निर्माण व्हावी यापरते दुसरे दुर्दैव ते कोणते? याचा परिणाम म्हणून इथे येणारे इतरेजनही या संभ्रमाचे बळी पडून गंभीर विचारांच्या बुचकळ्यात पडण्याचा दाट संभव आहे. त्यामुळे बिरबला , त्या कूट्प्रश्नाचे निरसन तू सत्वर करावेस आणि वाड्याला या अंधश्रद्धेच्या सावटातून सोडवावेस हेच उत्तम!

  स्लार्टी :
  ऐका मांजरदेवाची कहाणी (मांढरदेव यांच्याशी काही संबंध नाही). आटपाट नगरी होती. तिथे एक ब्राह्मणी वसत होती. तिचे नाव कोरडाई. तिच्या स्वभावात आवेश फार. जे काही करी ते आवेशाने करी (साधी करीसुद्धा आवेशानेच करी). असा तिच्या आवेशाचा मोठा बोलबाला होता. त्यालाच घाबरून दारी याचक फिरकायचा नाही, घरी वाचक नाही. त्यामुळे तिचा आवेश वाढतच गेला.
  एके दिवशी तिच्या घरी एक मांजर आले. कोरडाईला म्हणाले, बायो, आशुंडाची भाकरी रांध, गोठ्यातल्या कामधेनूचे थोडे दूध घे. त्यात ती भाकरी कालव आणि मला दे. तुझे भले होईल. कोरडाई आवेशाने उठली आणि तिने त्या मांजराच्या पेकाटात लाथ घातली अन् काय आश्चर्य ! लाथ घालताच मांजरदेव प्रकट झाले. कोरडाईने त्यांचे पाय धरले. म्हणाली, देवा, क्षमा करा. मी तुम्हाला ओळखले नाही. देव म्हणाले, बायो, आता तुला पश्चात्ताप होतोय, पण त्याचा काय उपयोग ? तुला शिक्षा भोगावीच लागेल. मी सांगतो ते व्रत तुला करावेच लागेल. तर ऐक... दररोज सकाळी लवकर उठावे, शुचीर्भूत व्हावे, सोवळ्याने पूजा करावी, सोवळ्याचा स्वयंपाक करावा. सोवळ्यानेच आशुंड वनस्पतीचा थोडा रस काढावा आणि त्या रसाने घरच्या औताला मनोभावे स्नान घालावे. मग त्या औताला व्यवस्थित पुसून कोरडे करावे. दारी मांजर आले की त्याच्या पेकाटात ते सुके औत घालावे. असे ९ वेळा करावे. मग एका ब्राह्मणाकडील मांजराला बोलावून त्याला आशुंडरसाचा नैवेध्य दाखवावा, पोटभर जेवण घालावे आणि व्रताचे उद्यापन करावे. हे जर मनोभावे करशील तर तू नवजन्माच्या पापांतून मुक्त होशील. असे बोलून मांजरदेव अंतर्धान पावले.
  कोरडाईने देवाचे म्हणणे ऐकले. तिने मनोभावे व्रत पाळले आणि मनोभावे उद्यापन केले. तिची नवजन्माच्या पापांतून मुक्तता झाली. औत-सुक्याने मांजर मारणारी म्हणून तिची प्रसिद्धी झाली. आशुंडरस-कोरडाई नावाने तिजला लोक ओळखू लागले... आज आशुंडर्स्कोर्डीचा महिमा म्हणून हा चमत्कार ओळखला जातो.
  जसा तो मांजरदेव कोरडाईला प्रसन्न झाला तसा तो तुम्हाआम्हालाही होवो. अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

  आशू_डी :
  बिरबला इतक्या त्वरेने ही कहाणी तुझ्या मुखातून ऐकताना आम्हाला साक्षात नारदमुनीच आशुंडर्स्कोर्डीचा महिमा गात आहेत असे भासले! ही आख्यायिका ऐकून आज आम्ही धन्य जाहलो! तर मंडळी, आता या व्रताचे उद्यापन वाड्यावर करण्याचे आदेश आम्ही जारी करत आहोत. पूजेसाठी श्र-फ व पूनम्-मिल्या या दोन्ही मेहुणांना चौरंगाच्या चारी बाजूंना बसवण्यात येईल. कार्याची संपूर्ण जबाबदारी काडीरा-साजिरा यांचेवर सोपवण्यात येईल.जेणेकरुन इतर लोक सद्भावाने करत असलेल्या कामात ते काड्या घालू शकणार नाहीत. संध्याकाळी तीर्थप्रसाद व हळदी कुंकू समारंभास वरील दोन्ही मेहूण प्रेषक असून मायबोलीवरील सर्व अविवाहित युवक्-युवतींना निमंत्रण असेल. तसेच स्वागतोत्सुक म्हणून वाड्यावरील होतकरु तरुण चिनूक्स, स्लार्टी, टण्या व त्यांची मित्रमंडळी कार्यभार वाहतील.स्वागतोत्सुकांनी नक्की काय करावे हे ते जाणून आहेत. हुक्म की तामील हो........

  ----------------------
  I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

  'आपण एकटेच इथे होतो तेव्हा बरं होतं' यावरून बर्का मला येशूपुराणातील ऍडमाची गोष्ट आठवली. ती मी आता तुम्हांला सांगते.

  येशूपुराणात ऍडम या आदिम मनुष्याची कथा सांगितली आहे. जेव्हा की पृथ्वीवर सर्वत्र सोन्याची झाडे व त्यांस गडद लाल रंगाची फळे (ज्यांस आपण नंतर सफरचंदे म्हणावयास लागलो) जी चवीस गोड असावी असे वाटायचे ती लगडलेली असत. तसेच झुळझुळ झरे कायम वहात असत. ऍडमाची उंची तशी बेताचीच असल्याने त्याचा हात त्या लाल फळांपर्यंत पोचत नसे.
  तेव्हा जगाची लोकसंख्या १ इतकीच असल्याने देवासही विशेष काम नव्हते आणि तो कंटाळला होता. तेव्हा त्याने ऍडमास कुस्ती करायला पाचारण केले. ते वेळेला देवाचा एक ठोसा लागून ऍडमाची बरगडी मोडली. त्यावेळी अस्थिरोगतज्ज्ञ न मिळाल्याने ती जोडली जाऊ शकत नव्हती. देवाने आपली क्रीएटीव्हिटी वापरून त्यापासून एक बाई बनवली. ऍडम बरगडी बरी होत असताना नंदनवनात ऍडमिट होऊन उपचार घेत होता. (ऍडम हा हॉस्पिटलात जाणारा पहिला पेशंट. त्यामुळेच हॉस्पिटलात जाण्याला 'ऍडमि'ट होणे असा शब्द आला.) तेवेळी नवीन निर्माण झालेली बाई त्यास भेटावयास गेली. जाताना तिने झाडावरील लाल फळे काढून नेली. तेव्हापासून आपण कुणालाही हॉस्पिटलात भेटायला जाताना सफरचंदे नेतो.
  तिजला येताना पाहून ऍडमाला आनंद झाला. ती त्यास संध्याकाळी भेटल्याने तिचे नाव त्याने 'इव्हनिंग' ठेवले. आणि त्याचे लघुरुप म्हणून लाडाने तो तीस 'इव्ह' म्हणू लागला. इव्ह आणि ऍडम ह्यांना सफरचंदाचे गुणधर्म माहीत नव्हते. 'अनोळखी पदार्थ खाऊ नयेत' असे सांगायला दोघांनाही पालक नसल्याने आणि देवशयनी एकादशी झाल्याने देव झोपला होता, तेव्हा त्या दोघांच्या मनात धाडस उत्पन्न झाल्याने त्यांनी ते फळ खाऊन बघितले. सफरचंदात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटामिन अ, ब, क, ड, इ, फ, ग असल्याने ऍडम दोन सेकंदात खडखडीत बरा झाला. त्यामुळे लगेचच त्याला हॉस्पिटल (जे की नंदनवनच होते) त्यातून डिस्चार्ज देण्यात आला. इव्हेचा नर्सिंगचा वगैरे कसलाच कोर्स झालेला नसल्याने तिचीही नंदनवनातून ऍडमासोबत हकालपट्टी करण्यात आली व ते दोघे पृथ्वीवर येऊन जॉब सर्च करू लागले.
  ऍडम रोज इव्हेला भेटण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी येताच (तेव्हा घर ही संकल्पना निर्माण व्हायचीच होती) ती त्यास 'आज तरी मिळाला का जॉब?' असे विचारून पिडू लागली तेव्हा त्याने वरील अजरामर उद्गार काढले आहेत.

  धन्य श्रद्धे! हसून हसून खुर्चीतून पडायची वेळ आलीये...

  श्रद्धा, धन्य आहेस Rofl

  आजची, वाड्यावरची मुक्ताफळे. विषय- खर्‍यांच्या कविता

  श्रध्दा -
  खरे आहे, खरे नाही.
  असे वागणे बरे नाही.
  खरे-छत्रे सोयरिकीची शक्यता,
  कुजके पोस्ट टाकणे बरे नाही.

  कविता असे वैनींना सगळ्यांत आवडती गोष्ट.
  खर्‍यांबद्दल असे टाकू नका ना हो पोष्ट.
  नाहीतर आपल्या लाडक्या वैनी होतील रुष्ट.
  (खर्‍यांवर जोक करतात मेले; स्लार्टी, साजिरा दुष्ट.)

  साजिरा: खरे म्हणजे खरे आहेत.
  कवी म्हणून बरे आहेत.
  वैनी(उच्च म्हणजे त्यांच्या नेहमीच्या स्वरात): बरे??????? कवी म्हणून फक्त बरे?
  तुला एक चारोळी तरी करता येईल का रे?

  साजिरा गप्प बसतो; बोलत नाही एक अक्षर.
  (वैनी: खर्‍यांची कविता जाणतील कसे? हे तर अगदी निरक्षर.)

  साजिर्‍याची बघता गत, गप्प राहती बाकी सारे.
  कशी करावी बरे कोणी अशा 'मौनांची भाषांतरे'?

  साजिरा -

  गपा रे, गपा रे सारे;
  कसली तुमची मौनाची भाषांतरे?
  सोयरिक असो की प्रेम,
  पाहिजेत फक्त जुळलेली अंतरे!

  खर्‍यांचे काही खरे नाही;
  कविता नाही तर जाहिराती सही;
  असला कसला कवी हा,
  मला तर काही समजतच नाही..

  आजकाल मीही कविता करतो,
  खर्‍यांची पुस्तके माळ्यावर टाकतो..
  एवढंच ना, अन कधी तेवढंच ना--
  शब्दांवर शब्द, मजले चढवीत जातो!

  खरे तर, खर्‍यांपेक्षा आम्हीच बरे,
  जीव लावण्यासाठी भाषांतरे करीत नाही.
  सफरचंद खाऊन प्रेम करण्याऐवजी
  त्यावर कविता करीत (बसत) नाही!!

  --
  पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
  आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

  स्टफ्ड किंगाळा बनान्ना- one very very chaviShTha paakaKrutee came on motherly talking today. but some groupbaaj motherly takingkar said to get it in MaraaThee. so here I am typing the same paakakRutee in MaraaThee. Sorry for the prastaavanaa in Engrajee.
  (कै बै मराठी मराठी...केळी पोटात गेल्यावर मराठी काय नी विंग्रजी काय...ह्म घ्या मराठीत कृती this I am saying is in my mind mind, also written in paa.nDaree shaai kRupayaa do not read)
  १. कटकट न करता ५-६ केळी चंकु (चंकी पांडे किंवा कुणी चंद्रशेखर कुलकर्णी) ला द्या. चंकुला उभे आडवे चिरा. त्याच्या तोंडात भेंडी भरा. मग त्याला खाली ठेवुन थंड करा.

  २. मायक्रोवेवला सांगा तीन मिनिट कट कट करु नकोस. बनाआन्नाच्या कोकराला टेकु द्या. (म्हंजे भेलकंडणार नै)

  ३. मधल्यामधी कोथिंबीर गुल होइल तिला कटकट न करता मिरच्यासंगत साठवुन ठेवा.

  ४. बनान्नाला मायक्रोवेव मधे कोंबा.

  ५. बनान्नाचा बारकान्ना होउस्तोवर त्याला गरम करा आणि मग हाणा.

  हा का ना का !!!

  http://www.maayboli.com/node/5716 ही माझ्यासाठी प्रेरणादाई कविता.

  हॉटेलचा सुगंध...

  नाकात घुसतोय सुवास घेऊ द्या,
  सख्या मला आता हॉटेली जाऊ द्या

  कँडललाईटमधे मेनु वाचत बसा;
  किती ढोसाल माझाही सुकलाय ना घसा
  शांतपणे एकटीला बुथमधे पीऊ द्या;
  सख्या मला आता हॉटेली जाऊ द्या

  किती घट्ट धरलाय रंपाचा पेला
  असॉर्टेड कबाबाचे घास भरवा मला;
  पोट भरलं नाही, तेव्हा बिर्याणी येऊ द्या;
  सख्या मला आता हॉटेली जाऊ द्या

  मुर्गमसल्लम हाणु उभा नि आडवा;
  न का वाढो आपल्या प्रेमाचा गोडवा
  तुडुंब पोटाने ढेकर देऊ द्या;
  सख्या मला आता हॉटेली जाऊ द्या

  गरम गुलाबजांबुवर आईस्क्रीमचा गारवा;
  जीभेवर घोळवत खाऊ या बरवा
  नाजुक बांध्याच्या आठवणीचं राहु द्या;
  सख्या मला आता हॉटेली जाऊ द्या

  मृ, Rofl

  बनाआन्ना ... सिंडे , मॄ Lol
  -----------------------------------------
  सह्हीच !

  शिंडी, मृ.. Lol

  --
  पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
  आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

  सिंड्रेला Rofl

  मृ, खलास!! Lol 'सख्या' वरून- सख्या चला बागामंदी रंग खेळू चला- ही बसेल का चाल? Wink
  -----------------------------------
  Excitement. Routine. Boring.

  "तू मेरा या उसका या किसी औरका?"

  माया, दिया आणि सिया या तीन मैत्रिणींचं आता मुंबईत मस्त बस्तान बसलं होतं. पटेल आजींच्या बंगल्यात वरच्या मजल्यावर त्या रहायचा- पेईंग गेस्ट म्हणून. कॉलेजमध्ये सकाळी टीपी करायचा, काँप्यूटरचा कोर्स म्हणून संध्याकाळी नटूनथटून जायचे.. असे चांगले चालू होते. शेजारच्या बंगल्यामध्ये संतोष रहायचा.. तो सो-सोच होता, पण त्याचे मित्र बाईकवाले, पैसेवाले होते.. फावला वेळ त्यात बरा जायचा.. अश्यातच, एका संध्याकाळी संतोषने मायाला हाक मारली...

  "माया, अंजीर बर्फी खायला येणार का?" माया लाजून लाल झाली. ते पाहून सियाच्या मनात जेलसीचा ज्वालामुखी उसळला. 'मला फक्त दहा रुपयांची मलाई कुल्फी आणि मायाला अंजीर बर्फी????????????" तिचे मन पेटले. मागे काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून ती गर्रकन मागे वळली. दिया बेशुद्ध पडली होती. तिच्या हातात लाल रेघा असलेले तिचे प्रगतीपुस्तक दिसत होते. ती नापास झाली होती.

  'दिया, कशी आहेस आता? अगं घाबरू नकोस, मोठ्या शहरांमध्ये आलं की अश्या नापास वगैरे होण्यासारख्या छोट्या गोष्टी होणारच. संतोश त्या अंजीर बर्फीत दूध घालून अंजीर शेक आण दियासाठी' रियाने ऑर्डर सोडली. मायाला देतो काय बर्फी? थांब चांगली अद्दल घडवते..
  पण दिया मात्र धाय मोकलून रडायला लागली, 'मला नापास झाल्याचं दु:ख नाही, मी होणारच होते नापास. पण अजूनच काहीतरी घडलंय........'

  दियाचे वाक्य ऐकून बाकीच्य दोघी एकमेकींकडे पहातच राहिल्या..
  आणि मायानी तिला प्रश्नच विचारायला सुरुवात केली...
  काय झालं नक्की? कोणी केलं? का केलं तुझ्याबरोबर असं? आता कसं होणार तुझं? घरच्यांना काय सांगणार आहेस आता?

  "अगं एSSSS, माझ्याबरोबर काही नाही केलंय कुणी... दूध नासलंय घरात. त्याबद्दल घरच्यांना काय सांगायचंय? आता मिल्कशेक कसला होतोय?" तिने रडायला सुरुवात केली पुन्हा.
  संतोषाला एकीकडे आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. प्रत्येक पुरुषाप्रमाणे त्यालाही मुली राहतात त्या जागेविषयी कुतुहल होते. तो इकडेतिकडे नजर फिरवत होता. तेव्हा अचानक एका ठिकाणी त्याची नजर गेली, आणि तिथे होती................
  गुलाबी.......
  केप्री.....

  हो तीच ती गुलाबी केप्री, जी त्याने आणि त्याच्या मित्राने एकदा चोरुन स्त्रीयांच्या हॉस्टेल्मधुन पोबारा करताना चुकुन त्यंच्या हातात आली होती. म्हणजे त्या रूम मधली ती मुलगी दिया सिया का रिया? अरे देवा म्हणजे कुल्फी, अन्जीर बर्फी, मिल्क्शेक सगळे फुकट का गेले. त्याला ती संध्याकाळ आठवली... तो आणि त्याचा मित्र सावधपणे गर्ल्स हॉस्टेलमधे शिरले होते...

  तेवढ्यात त्याच्या पायाखाली चूकून एक पाल मेली .. त्याच्या मनात अनेक शंका कुशंका येउ लागल्या
  आता काय होणार ..

  त्यांनी ठरवलंच होतं की काय वाट्टेल ते झालं तरी ऐश करायचीच आज! त्यात त्यांची ऍश झाली तरी बेहत्तर! शिवाय, त्यांना असेही कळले होते की या खोलीतल्या मुली रात्रीच्या बाहेर हिंडायला जातात अन त्या प्रेमाच्या, पैशाच्या व अजून कशाकशाच्या पासून फार वंचित आहेत. म्हणून त्यांनी खिसे भरभरुन अंजीर बर्फी आणि पैसे आणले होते. खिडकीतून त्यांनी त्या खोलीत आत उडी टाकली. आत अंधार होता...

  तसे तो दोघेही मांजराला मागे टाकतील इतके अंधाराला सरावलेले होते. संतोषाने सराईतपणे दिव्याचे बटन शोधून झीरो पॉवरचा बल्ब लावला. रूम रिकामी होती. समोर भिंतीवर त्याची नजर गेली तो काय??????????? तिथे जॉन अब्राहमचे दोस्तानामधले बीचवरचे, उघडे, पोस्टर.... संतोषाच्या डबल स्टँडर्ड मनाला हे काही पटेना. हा भारतीय संस्कृतीचा र्‍हास आहे, असे तो मित्राकडे दु:खी स्वरात बोलला.

  पण मित्राने त्याला, एश करायची आठवण केली त्यामुळे संतोष लगेच ते दु:ख विसरला.त्यांना अतिउत्साहाच्या भरात काय करावे तेच सुचेना! त्यांना मुलींचे वास्तव्य असलेल्या ठिकाणाबद्दल खूप म्हणजे खूपच कुतूहल होते. म्हणून त्यांनी चार वेळा स्वतःभोवती गिरक्या घेऊन रुम न्याहाळायला लागले.
  त्या गिरक्यांमध्ये त्यांच्या खिशातल्या अंजीर बर्फ्या इतस्ततः विखुरल्या. नेहमीप्रमाणेच आपण स्वतः काय करतो आहोत याचे त्यांना भान नव्हते. त्यांना कुणी सावधानतेचा इशाराही दिला नव्हता.त्यामुळे त्यांनी मुलींच्या वह्या वाचायला घेतल्या आणि..
  षला मुलींच्या वह्या वाचायला मिळाल्याने संतोष जाहला होता. पण मित्राला ऍश करण्यावाचुन पर्याय नव्हता. त्याने दुधामधे अंजीरबर्फी घालुन मिल्कशेक बनवायचे ठरवले. 'युरेका!!!!" अचानक त्याच्या मनात एक आयडीया चमकली. त्याने तिथेच पडलेले पेन, पेन्सिल उचलले आणी त्याचे हात भराभर जॉनच्या पोस्टरवर काम करु लागले. संतोष वहीतील रामसेना व गुलाबी कॅप्रीचा चॅप्टर वाचत असतानाच मित्र त्याला म्हणाला 'झाली ऍश'. जॉनच्या पोस्टरवर दिमाखात झळकत असलेली ऍश बघुन संतोष वेडा झाला
  ----------------------
  एवढंच ना!

  Pages