निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.
आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
हजारी मोगरा मुबलक फुलतो,
हजारी मोगरा मुबलक फुलतो, वासही छान असतो तरी तो कायम दुर्लक्षितच राहतो.>>> अगदी. सहज कुठे मिळत पण नाही. गेल्या वर्षी एका गडाखाली सापडला तेव्हा मी हौसेने आणला. छान जगला आणि वाढला त्यामुळे मला फार मस्त वाटले.
एका वेगळ्या बीबीवर निवडक
एका वेगळ्या बीबीवर निवडक प्रचि टाकले तर छान.. सोबत लेखही हवा.>>> लेख? आत्ता फोटो टाकते. नंतर जमेल तेव्हा लिहिते (लिहायला जमले तर) नाहीतर फोटोपण राहून जातील. चालेल?
साधना, जिप्स्याचे फोटो
साधना, जिप्स्याचे फोटो यायच्या आधी तू आणि ऐशूने काढलेले फोटो पण येऊ देत..
आणि हो वाढदिवसाच्या अॅडव्हान्समधे शुभेच्छा !
सहेली तुमच्या फोटोप्रमाणे
सहेली
तुमच्या फोटोप्रमाणे होते.पण याच्या दुप्पट मोठे फूल होते.कदाचित जास्त कळ्याच असल्याने गच्च भरलेले दिसत होते.पाकळ्या जास्त किरमिजी होत्या. फार न फुलल्यामुळे तसे दिसत असेल.
दिनेश,पुरंदरे शशांक, जागू,सहेली
थँक्स! आता मी मैत्रिणीला हे सांगते.
साधना
फुलेही सगळी एकत्र फुलत नाहीत त्यामुळे गुच्छात कायम अर्धी सुकलेली फुले आणि अर्धे कळे असतात. >>>>
अगदी!
आपल्याकडे शहरात जसा बिबळ्याचा
आपल्याकडे शहरात जसा बिबळ्याचा त्रास असतो तसाच त्रास केनयात सिंहाचा असतो. वस्तीत बिनदिक्कत येऊन ते गायींचा घास घेतात. आणि गायी म्हणजे केनयातील मसाई लोकांची संपत्ती असते.
केनया एअरवेजच्या इनफ्लाईट मॅगझिनमधे एका १२ वर्षाच्या मुलाची कहाणी वाचली ( सत्यकथा ) त्याने
घरातील गायींच्या संरक्षणासाठी भंगार गाडीतून काढून घेतलेल्या हेडलाईट्सचा वापर करुन सिंहाना पळवून लावले. त्याचा हा उपाय इतका यशस्वी झाला कि केनयातील अनेक लोक त्याचा उपयोग करु लागले. त्या मुलाचा
यथोचित सत्कार तर झालाच शिवाय त्याच्या पुढील शिक्षणाची सोयही करण्यात आली आहे.
कधी कधी लहान मुलांच डोकं अस
कधी कधी लहान मुलांच डोकं अस भन्नाट चालतं की ते मोठ्यांना सुद्धा अचिबित व्हावं लागत.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
इथे फोटो टाकते लवकरच..
इथे फोटो टाकते लवकरच..
केनया एअरवेजच्या इनफ्लाईट
केनया एअरवेजच्या इनफ्लाईट मॅगझिनमधे एका १२ वर्षाच्या मुलाची कहाणी वाचली>>>>>>>>>
हं..........चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन!
आमच्या गेटपाशी दोन तीन दिवसांच्या अंतराने पाठोपाठ २ कावळे मरून पडलेले दिसले. नारळाच्या झाडाखाली. आणि तेव्हापासून रोज दिवसभर खूप कावळे सारखे ओरडत असतात.
ते दोन कावळे २/३ दिवसांच्या अंतराने का मरून पडले ....ते ही त्याच जागी ........कळत नाही.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !
मानुषी, कावळे मरायची काही कारणे म्हणजे त्या जागेवर एखादी वीजेची तार तुटलेली असेल किंवा पुर्ण वाढ न झालेली पिल्ले घरट्याच्या खाली पडली असतील.
खूप दिवसांनी आले आज इकडे ...
खूप दिवसांनी आले आज इकडे ... एकदम घरी आल्यासारखं वाटलं गप्पा वाचून.
हजारी मोगर्याचं एक रोप आणलं होतं मी मागच्या वर्षी कोकण ट्रीपहून येतांना. पुण्याच्या हवेत कुंडीत तगलंय ते अजून तरी. फुलांचे गुच्छ मात्र तिथल्या मातीतल्या मूळ झाडाएवढे मोठे नाहीत. खूप फुलं असतात तेंव्हा याचा वास उग्र वाटतो म्हणून घरापासून फार जवळ लावत नाहीत, असं ऐकलं होतं.
या झाडाविषयी इथे बहुतेक इतक्यातच चर्चा झालीय इथे ... आई म्हणत होती शिकेकाईसारखी वाटताहेत पानं म्हणून. मी शिकेकाईचं झाड बघितलेलं नाही. काय आहे हे?
पानं लाजाळूइतकी छोटी आहेत ही, पण लाजाळूसारखं जमिनीलगत पसरलेलं नव्हतं हे. आणि ती लाल बहुतेक फुलं असावीत - दोन तीन मिटालेल्या पाकळ्या वाटल्या (का कीड आहे?) ती पानाला मधेच आलीत. पानांना वास नव्हता काही.
ओळखा पाहू
ओळखा पाहू


ही कमल काकडी आहे. कमलकंदातून
ही कमल काकडी आहे. कमलकंदातून एक पोकळ दांडा वर येतो, त्याच्या टोकाशी पाण्याच्या पृष्ठभागालगत एक अर्धवर्तुळाकार आणि बाळमुठीएवढ्या आकाराची हिरवी चकती वाढते. त्यात शेंगदाण्याएवढ्या बिया असतात. त्या काढून खायच्या. चवीला ओल्या शेंगदाण्यासारख्या किंवा ओल्या शिंगाड्यासारख्या दुधाळ लागतात. पोकळ देठाच्या आडव्या चकत्या भेंडीच्या चकत्यांप्रमाणे दिसतात. त्यांची भाजी आणि लोणचे करतात. पंजाब-कश्मीरमध्ये ती आवडीने खाल्ली जाते. मला मात्र ती थोडी चरचरीत वाटते. फोटोतली एक कमलकाकडी बियांसहित आहे तर दुसरीतल्या बिया काढून घेतल्या आहेत.
अगदी बरोबर हीरा! मी हे
अगदी बरोबर हीरा! मी हे पहिल्यांदाच छत्तीसगडमध्ये बघीतलं. ह्यापासूनच मखाणे बनवतात का ?
कमलकाकडी कमळाच्या मूळांना
कमलकाकडी कमळाच्या मूळांना म्हणतात ना ? हिंदी शब्द भेंन असा काहीतरी आहे. माती लागलेले ( लावलेले ) मूळ असते ते. या बियांपासून मखाणे करतात.
मंजू ते शिकेकाई नाही. त्याची
मंजू ते शिकेकाई नाही. त्याची पाने वेगळी असतात आणि बहुतेक काटेही असतात. फुले पांढरी असतात.
हे एक शोभेचे झाड दिसते आहे.
दिनेशदा तुम्ही मी वर
दिनेशदा तुम्ही मी वर टाकलेल्या फोटोतल्या झाडाविषयी लिहिलंय का हे? हे झाड शेताच्या बांधावर होतं. शोभेचं झाड तिथे कुणी लावायची शक्यता कमी.
सुदुपार!! बरेच दिवसांनी
सुदुपार!!
बरेच दिवसांनी लिहायला घेतले. वाचत मात्र नेहमीच होते.
एक आनंदाची बातमी. चि. मल्हारची Bombay Veterinary College, मुंबई येथे B.Vsc साठी अॅड्मिशन झाली. पशुवैद्य होण्याचे त्याचे अगदी बालपणापासून स्वप्न होते. आता ते साकार होणार.
जागू, श्रावणीची कला सुंदरच!
एक आनंदाची बातमी. चि.
एक आनंदाची बातमी. चि. मल्हारची Bombay Veterinary College, मुंबई येथे B.Vsc साठी अॅड्मिशन झाली. पशुवैद्य होण्याचे त्याचे अगदी बालपणापासून स्वप्न होते. आता ते साकार होणार.>>>>>>>>>>.व्वा! खरचं आनंदाची बातमी, आपल्या सर्व निग.करांतर्फे त्याचे अभिनंदन करा आणि शुभेच्छा द्या.
चि. मल्हारचे मनापासून
चि. मल्हारचे मनापासून अभिनंदन. खर्या अर्थाने मूक जीवांबद्दल सहानुभूति बाळगणारा एक तरुण त्यांना डॉक्टर म्हणून लाभणार आहे.
मधु-मकरंद, मल्हारचे हार्दिक
मधु-मकरंद, मल्हारचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !
मल्हारचे मन:पूर्वक अभिनंदन!!
मल्हारचे मन:पूर्वक अभिनंदन!!
जागेवर एखादी वीजेची तार
जागेवर एखादी वीजेची तार तुटलेली असेल किंवा पुर्ण वाढ न झालेली पिल्ले घरट्याच्या खाली पडली असतील.>>>>>>>> HMMM shkya aahe.
madhu makarand.....hearty congrats to Malhar!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मल्हारला नक्की सांगेन.
दिनेशदा, "खर्या अर्थाने मूक जीवांबद्दल सहानुभूति बाळगणारा ...." खरोखरच मल्हार लहानपणापासून असाच आहे.
खर्या अर्थाने मूक जीवांबद्दल
खर्या अर्थाने मूक जीवांबद्दल सहानुभूति बाळगणारा ...." खरोखरच मल्हार लहानपणापासून असाच आहे.>>>>>>>>>>>> madhu M..........My son is also the same!
पुण्याच्या घरात (८ व्या मजल्यावर) बाल्कनीत 1 शोभेचे झाड उंच आणि दाट फ़ांद्या पानं असलेलं आहे. त्यात एका जोडीने घरटं केलं आहे
त्याचा एन्ट्रंस खालून आहे. घरट्यातलं काहीही दिसत नाही. फक्त आई बाबा येता जाता दिसतात. आणि बारीक आवाजातला किलबिलाट 2/3 वेळा ऐकू येतो. जेव्हा त्यांचे आई बाबा त्यांना भरवायला येतात .
काल दुपारी मी वाचत पडले होते . खोलीला बालकनीकडे फ़्रेन्च विंडो आहे. संपूर्ण काच. ती बंदच होती. पण स्वयंपाकघराचा दरवाजा उघडा होता. दुपारी अचानक आईबाबांची जोडी बाल्कनीतून किचन, किचनातून माझ्या खोलीत झेपावली आणि बाहेर जाण्यासाठी म्हनून कित्येक वेळा फ़्रेन्च विन्डोवर धडकली. हे सगळं काय चाललंय हे माझ्या लक्षात यायच्या आत २/३ वेळा झालं. बंद काच त्यांना कळलंच नाही. मग मी माझ्या मुलाला बोलावलं. त्याने फ़्रेन्च विंडोचं एक दार उघडलं पण ते दोघं माणसाच्या अधिक्षेपाने आणखीन बावरले. गरागरा खोलीत फ़िरत काचेच्या एका बंद भागावर धडका मारायला लागले. सगळा गोंधळ सुरू होता. मुलगा उरलेली काच उघडण्याच्या प्रयत्नात (मधूनच माझ्या किंकाळ्या....कारण ते दोघे खूपच फ़डफ़ड करत खोलीत फ़िरत होते.) शेवटी संपूर्ण दार उघडलं आणि दोघे बाहेर गेले. बिचारे जखमी झाले असतील का असं वाटलं. पण आत्ता ते दोघेही आलेले आहेत. बाळांना भरवायला. चिमणीएवढेच पोटाकडे पिवळसर असलेले गोडुले पक्षी आहेत ते.
लेक म्हणाला ते "फ़िन्च" आहेत.
घरट्याचे प्र.चि दाखवा मानुषी.
घरट्याचे प्र.चि दाखवा मानुषी. जमल्यास बाळांचेही ..
घरट्याचे प्र.चि दाखवा मानुषी.
घरट्याचे प्र.चि दाखवा मानुषी. जमल्यास बाळांचेही .>>>>>>>>>>> आईबाबांचे सुद्धा.
Shimpi paxee asaNaar te.
Shimpi paxee asaNaar te.
prayatna karate. baaLa
prayatna karate. baaLa disaNa avaghaDa. paNa aaee baba distat.
Pages