निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोभे जाई ओळखता आली मला...लहानपणी(म्हंजे माझ्या लहानपणी Wink ) आईने लावली होती घरी...

पंजाबी पडोस असल्याने आम्ही ही सर्रास जूही च म्हणायचो..

शोभा१२३
फोटो १ पाकळ्यांच्या मागच्या बाजूस फिका लालसर रंग होता का? असेल तर ती चमेली!
फोटो२. नक्की जुई! मंद सुवास असतो.
फोटो३ सायली!.धुंद करणारा वास!कालच गजरे आणले. गजरेवाली मावशी एकदम बिझी होती तरी जाई आहे का
हो असे विचाल्यावर दुसर्‍याच एका बाईने केविलवाणी नजर टाकून नाही म्हटले .(तिथे फक्त जुई सायली व मोगरा होता) शेवटी जुई व सायली घेऊन आले.परत गेले की जाईबद्दल विचारेनच.

वा वर्षू, सक्रिय झाली का Happy

जागू, मला वाटतं फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री मधे फोटो आहेत याचे.
राणीच्या बागेतल्या एका जून्या रिकाम्या पिंजर्‍यावर आणि मंत्रालयाजवळच्या बागेतल्या मांडवावर एक याच वर्गातली खुपच अनोखी वेल आहे ( अजून असावी ) तिची फुले चक्क भिरभिर्‍यासारखी असतात. माझ्या रंगीबेरंगी पानावर असेल फोटो कदाचित.

जाई हे एक प्रकारचे सुगंधी फुल असून ते वेलवर्गीय कुळात समाविष्ट होते.
शास्त्रीय नाव: Jasminum grandiflorum L.
कुळ: Oleaceae
इतर भाषांमधील नावे: म- जाई, सं- जातिका, चंबेली, हिं- चंबाली, इं- Spanish jasmin, इतर- चमेली, जाती, प्रियंवदा, सुरभिगंधा

*वर्णन: सुगंधी पूजापुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खॊड मनगटाएवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते.
पाने संयुक्तपर्णी विषमसंख्य असून ५ ते ७ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. सर्व पर्णिका जवळजवळ सारख्याच आकाराच्या असतात.
जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिक्कट गुलाबी- जांभळट असतात.
जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे फुलांना महत्त्व प्राप्त झाले आहे. फुले अल्पायुषी असून सुकल्यानंतर लाल होतात.
*उपयोग:
अंगातील उष्णता वाढल्यावर तोंडात फोड येतात, त्यावर जाईचा पाला चावणे हा एक उत्तम उपाय आहे.
जाईच्या फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात.

यस्स...दिनेश.... पण अजून रम्मीचा लॅपटॉप जिंदाबाद है...म्हणून वापरण्ताकरता संगीत खुर्चीचा खेळ सुरुये आमच्यात Proud
या शिवाय स्विस मालिका ही पाहायची होती ना!!!!

किचन मधे तुझी रोजच आठवण काढली जातेय ... Happy

वर्षू, आता आपण सगळ्याजणांनी एक ओव्हरसीज सहल करायला हवी.

येळेकर.. गोव्याच्या जायांच्या पूजेबद्दल खुप वाचले होते. प्रत्यक्ष नाही कधी बघता आली.
त्या गावात जाईच्या बर्‍याच वेली आहेत. व्यापारी तत्वावर लागवड आहे पण पूजेच्या नियोजित दिवशी, गावातली सर्व फुले पूजेसाठी राखून ठेवली जातात. मग गावातील सर्व स्त्रिया रात्री कळ्यांचे गजरे करून त्या गजर्‍यांनी संपूर्ण देऊळ सजवतात. दुसर्‍या दिवशी ती सर्व कळ्या उमलल्या कि, संपूर्ण देऊळच नव्हे तर तो गाव सुगंधी होत असेल.

रुचिराच्या ओगले आज्जींनी गुरवळ्या हा पदार्थ लिहिलेला आहे. पुरण भरलेले गोलाकार पोकळ वडे असे त्याचे स्वरुप आहे पण त्याला भोके पाडून त्यात जाईच्या कळ्या घालायला त्यांनी सुचवले आहे. दुसर्‍या दिवशी त्या कळ्या आतच फुलतात आणि गुरवळी सुगंधी होते.. काय सुंदर कल्पना आहे ना !

आणि चिनीमाती मधे जाईच्या कळीभोवती चहाचे कोवळेपान बांधून, त्याचा चहा.. हा प्रकार लिहिलाय.

बघा, शेवटी मी खाद्यपदार्थांवरच घसरलो Happy

आणि मीठ, मिरी, मिरची आणि लसूण . असे पदार्थ. जिच्या वाढदिवसाला द्यावासे वाटले, त्या माझा सखीबद्दल काय लिहू ?

.गोव्याच्या जायांच्या पूजेबद्दल खुप वाचले होते. >>> >फक्त ऐकले होते. पण आज इतक्या तपशीलवार तुमच्याकडूनच कळले.

दुसर्‍या दिवशी ती सर्व कळ्या उमलल्या कि, संपूर्ण देऊळच नव्हे तर तो गाव सुगंधी होत असेल.>>>>खरच!
गोवन नसूनही गोव्याबद्दल मनात एक हळवा कोपरा आहे.
ओगले आज्जींची कमाल! अशा सुगरणींबद्दल आदर वाटतो.

गाव सुगंधी ...ह्म्म्म्म!!!!!!!!! किती सुरेख कल्पना ...

दिनेश... मीठ, मिरी, मिरची आणि लसूण . असे पदार्थ. जिच्या वाढदिवसाला दिलेस त्या सखीला महाभाग्यवानच म्हणायचं ... Happy और क्या!!!!

काल मी ट्रेकला गेले होते, तिथले 'हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे' तुम्हा सगळ्यांसाठी...

DSC_0520~2.jpg

सहेली - हे नक्कीच सह्याद्रीतील फोटो दिसताहेत - पण जरा सविस्तर वर्णन व अजून फोटो टाक ना ....

<<<<शेवटी प्रज्ञाच्या काकांनी दिलेली हळदच कामाला आली. (ती हळद फार जपून म्हणजे काटकसरीने वापरतो मी, आणि पदार्थात अक्षरशः चिमूटभर घातली तरी पुरते.) ती दाबून धरली आणि थोड्याच वेळात रक्त थांबले. आज तर जखम सुकायलाही लागली.
आभार मानायचा उपचार नाही पाळणार मी, प्रज्ञा.>>>>>
दिनेशदा, खरंतर हे शेवटचं वाक्य लिहिलं नसतं तर मला अधिक बरं वाटलं असत. Happy
ज्यांनी हळद दिली होती ते काका तर मध्यंतरी गेले, पण काकूची त्या अ‍ॅक्सीडेंट मधे बरगड्यांना फार मार बसलाय, त्यातून बरे व्हायला तिला फार वेळ लागणार आहे. बिचारे माझे काका-काकू Sad
दिनेशदा, तुमचे हळदीबद्द्लचे मत मी त्यांना नक्की कळवेन. त्यांना खूप बरे वाटेल.

प्रज्ञा, काकूंना लवकरच बरे वाटेल.
घरात एकटा असताना, जमिनीवर सगळीकडे रक्त पडत असताना, डोके शांत ठेवून असा उपाय करायचे बळ मला तूम्हा लोकांकडूनच तर मिळते.

रोहिडा उर्फ विचित्रगडावर गेले होते. हा गड भोरजवळ आहे. सकाळपासून थोड्या सरी, मग विविध तीव्रतेचे ऊन आणि गडावर खूप धुके असा खेळ चालला होता. त्यामुळे वेगवेगळ्या रूपात गड आणि परिसर पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.

फोटो बरेच आहेत. इथे थोडे टाकू? की फेसबुकची लिंकच इथे देऊ?

काल मैत्रिणीने एक बटमोगर्‍याचे फूल दिले.आजपर्यंत २-३ फुले असलेला बटमोगरा पाहिला होता.मैत्रिणीने दिलेल्या मोगर्‍याच्या पाकळ्या बाहेरून लालसर किरमिजी होत्या.त्यात अनेक फुले एकत्र येऊन जाड देठ होता अ‍ॅक्सोराची लहान-लहान फुले एकत्र येऊन मोठा गुच्छतयार होतो तसा या फुलाचा आकार मोठ्या गुलाबाएवढा होता.आज सगळी फुले तोडून मोजली तर कळ्या धरून ४५ होती.

येळेकर, असे होते का ते? याला हजारी मोगरा म्हणतात. >>>> Clerodendrum philippinum हाच का तो Happy आमच्याकडे होता फार्फार वर्षांपूर्वी - गोड वासामुळे प्रचंड मुंगळे असायचे त्याच्यावर...

हो आणि त्याची झाडेही खुप पसरतात बाजूला म्हणजे रोपे खुप फुटतात त्याची बाजूला.

ही आमच्या श्रावणीताईची कला. गुलाबाची पाने आणि सोनपंखीचे पान.

छान आहे गं कला बेबीची.

हजारी मोग-याचे झाड आंबोलीला माझ्या आजीच्या मांगरात होते. त्या झाडाचे रुप अजिबात देखणे नसते, पाने खुप मोठी असतात, हा मोगरा आहे हे सांगितल्याशिवाय कळणारही नाही. फुलेही सगळी एकत्र फुलत नाहीत त्यामुळे गुच्छात कायम अर्धी सुकलेली फुले आणि अर्धे कळे असतात. आणि त्यावर असलेले मुंगळे.... ते फुल तोडायला देतच नाहीत. त्यामुळेच बहुतेक हे झाड दुर्लक्षित राहिले असणार.

Pages