भोकराचे लोणचे (फोटोसह)

Submitted by सारीका on 1 May, 2013 - 03:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

७०० ग्रॅम घट्ट आंबट कैरीचा किस (मोजून घेतला आहे)
सव्वा किलो बी काढलेली भोकरं
१२५ ग्रॅम मीठ
१०० ग्रॅम लोणच्याचे तिखट (बेडगी किंवा चपाटा मिरचीचे)
५०० मिली ग्रॅम शेंगदाणा तेल (रिफाईंड तेल हवे, मी फॉर्चून कंपनीचे वापरते)

फोडणीचे साहीत्यः

५०० ग्रॅम तेलातीलच एक वाटी तेल

२ चमचे मोहरी

१ चमचे जिरं

२ चमचे तिळ

१ चमचा मिरचीचे बी

१ चमचा मेथी हळकुंडची भुकटी (खमंगपणासाठी)

खमंगपणासाठी:
एका मध्यम आकाराच्या हळकुंडाचे बारीक तुकडे करुन घ्यावेत सोबत २ चमचे मेथीदाणे घेऊन थोड्या तेलात हे दोन्ही जिन्नस तळावेत, थंड झाल्यावर बारीक पूड करावी. ( हळकुंडाच्या आकारानुसार मेथीदाणे किती घ्यायचे ते ठरते.)
हे मिश्रण कोणत्याही लोणच्यात वापरता येते त्याने खमंगपणा वाढतो.

क्रमवार पाककृती: 

१) कैरी धुवून पुसून चांगल्या कोरड्या करुन घेणे, नंतर कैरीची साले काढून किसून घेणे.
मी मोजून ७०० ग्रॅम किस घेतला आहे.

२) भोकरं पाण्यात बुडवून कोरडी करुन घेणे. पाण्यात बुडवताना भोकराच्या मागचा देठ निघणार नाही याची काळजी घ्यावी, भोकरात पाणी गेले तर ती वाया जातात.

पाण्यातून काढुन कोरडी होण्यासाठी ठेवलेली भोकरं
mail.jpegmail-1.jpeg

३)गॅसवर कढई तापत ठेऊन त्यात वरील ५०० ग्रॅम तेलातील एक वाटी तेल टाकावे, तेल चांगले तापल्यावर आच कमी करुन मोहरी टाकावी, मोहरी तडतडल्यावर जिरे, मिरची बी आणि तिळ टाकून गॅस बंद करावा.
फोडणी पुर्ण थंड करुन घ्यावी.

४) एका पातेल्यात कैरीचा किस घेऊन त्यात मीठ, तिखट, आणि एक चमचा मेथीदाणे हळकुंडाची पावडर टाकून चांगले कालवून घ्यावे.
या मिश्रणात वरील थंड झालेली फोडणी टाकून पुन्हा चांगले कालवावे.

मिश्रण असे दिसेल.
mail-8.jpeg

५) भोकरातील बिया मिठाचे बोट लाऊन काढुन घ्याव्यात.
mail-2.jpegmail-3.jpeg

बी काढलेले भोकर
mail-4.jpeg

६) बी काढलेल्या भोकरात थोडा वर बनविलेला कैरीच्या किसाचा मसाला भरणे.

भोकरात मसाला भरताना

mail-5.jpeg

मसाला भरलेलं भोकर
mail-6.jpegmail-7.jpeg

७) भोकरामधे मसाला भरुन झाल्यावर उरलेला मसाला वरुन टाकून लोणचे कालवून घ्यावे.
आता ५०० मिली मधले उरलेले कच्चे तेल टाकून लोणचे हलक्या हाताने मिक्स करणे.

मसाला आणि कच्चे तेल टाकून कालवलेले लोणचे
mail-9.jpeg

८) दोन दिवसांनी काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

१) कैरीमधे किती गर आहे त्यावरून प्रमाण कमी जास्त होते, त्यामुळे शक्य झाल्यास ७००ग्रॅम किस मोजून घ्यावा.

२) भोकरं मिठाच्या बोटाने काढल्याने मसाल्यात मीठ चव बघुन घालावे.

३) मी भोकर खलबत्त्यात ठेऊन त्याला एक ठेच दिली, साबांनी मिठाच्या बोटाने बिया काढल्या, त्यामुळे भोकर अखंड राहीले.

४) भोकराच्या लोणच्यात भोकरं पुर्णपणे बुडतील असे तेल असावे, त्यामुळे लोणचे टिकते.
एक जरी भोकर वर असेल तर लोणच्याला लवकरच बुरशी लागते.
त्यामुळे गरज वाटल्यास अजुन तेल वापरावे.
तेल कच्चेच हवे.

५) जर तेल जास्त वापरायचे नसेल तर लोणचे फ्रीज मधे ठेवावे.
फ्रिजमधे लोणचे वर्षभर किंवा त्याहुनही जास्त टिकतं. भोकराचा करकरीतपणा पण तसाच राहतो.

बरणीत भरल्यावर असे वरुन तेल दिसले पाहीजे. Happy
mail-10.jpeg

लोणचे तयार Happy

mail-11.jpeg

माहितीचा स्रोत: 
अर्थातच सासुबाई :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारीका........... सुप्पर्ब!!!!!!!!!!! काय छान रंग आलाय लोणच्याला.......

खाल्लेलंय हे लोणचं.. मस्त लागतं.. करून नाही बघितलं कधी..

शेवटुन दुसरा फोटो. कातील. भोकरं शरिराला गरम असतात का? (दिनेशदांना विचारावे लागेल).
मी चुकुन अगोदर नोकराचे लोणचे असे वाचले. कामगार दिनी ...

पोरी
लै ब्येस हाय हे लोणचं. या बाबूरावचं बगुनच मन भरल बग. माज्याकडुन तुला धा पैकि नव गुन. येक गुन कमि द्याचा असतु असं मास्तर म्हनायचं.
(मास्तर म्हण्जी...फुडच्या ष्टोरित कळल नव्हं का ?)

तो पा सु ..... :)..... एक शन्का ......---- हे तयार झालेले लोणचे लगेच खाता येते का ? का त्याला मुरायला वेळ द्यावा लागतो ??????

छान आहे! मस्तच लागतं हे लोणंच. आई करायची ते आठवल..कधी२ आई एक शॉर्ट्कट पण करायची ताज्या लो. साठी. भोकरं बिया काढून तयार करायची आणि कैरीच्या फोडिंसोबत लोणचं करायंच... पण हे ताजंच चांगल लागतं; जास्त दिवस ठेवलं तर, तार सुटते...

हो नशिबच. भोकरं औषधी आहेत का? ओलिव्ह सारखीच दिसतात.
>>> किशोरदा, ते मला माहीत नाही, विचारुन सांगेन.
भोकर गरम नसावं, कारण जास्त लोणचं खाल्लं तर घसा बसतो, आणि सर्दी पण होते.

तो पा सु ..... ..... एक शन्का ......---- हे तयार झालेले लोणचे लगेच खाता येते का ? का त्याला मुरायला वेळ द्यावा लागतो ??????
>>> एक दिवसच मुरवायचं, लोणचं खायला तयार, भोकराचा करकरीतपणा मस्त लागतो या लोणच्यात.

छान आहे! मस्तच लागतं हे लोणंच. आई करायची ते आठवल..कधी२ आई एक शॉर्ट्कट पण करायची ताज्या लो. साठी. भोकरं बिया काढून तयार करायची आणि कैरीच्या फोडिंसोबत लोणचं करायंच... पण हे ताजंच चांगल लागतं; जास्त दिवस ठेवलं तर, तार सुटते...>>>>>>>>>>>

योगेश, जर तेल तापवून गार करुन घातलं किंवा जर भोकराच्या आत पाण्याचा एक जरी थेंब गेला तरी लोणच्याला तार धरते.
बरेच लोक भाजीवाल्याकडून कैर्या फोडून घरी आणून पाण्यात धूउन घेतात
यामुळे देखील लोणचे खराब होते.

बाबुराव, तुमाला लोणचं आवडलं माजं लीहीनं धन्य झालं बगा. Proud

योगेश, वर्षुताई, बाबुराव, अंजली मेधा सुहास्य, गजानन धन्यवाद. Happy

भारी फोटो आहेत. एकेका भोकरात कैरीचा कीस + मसाला भरणं म्हणजे किती पेशन्सचं काम!

भोकरू-कच्चा फणस- कैरी लोणच्याच्या आठवणीत जीव कळवळला. Proud

फोटो मस्त आहेत. रेसिपी वाचण्यासाठी उत्तम. एवढे पेशन्सचे काम जमण्यातले नाही.

हे लोणचं विकत मिळतं का?

सारीका मला तू मागे पाठवणार होतीस ना लोणचे ते आत्ता पाठव हे पाहून आत्ताच खावेसे वाटतेय.:स्मित:

धन्यवाद मैत्रीणींनो..
नंदीनी, सरावाने सहज जमते हे लोणचे. Happy

जागूडे तुच ये यवतमाळला हवी ती आणि हवी तेवढी लोणची घेऊन जा
Proud

भोकरं म्हणजे पिकल्यावर चिकट होतात तीच ना??
लोणचे चिकट होते का?

हा लोणंच्याचा प्रकार पहिल्यांदाच वाचलाय.
तसाही मी काहि डाय हार्ड लोणचे फॅन नाही.. म्हणा...
त्यामुळे मला माहितीही नसेल.
Happy

येस वर्षुताई नक्कीच, मग कधी येतेस इकडे Happy

झकासराव, लोणचं मुळीच चिकट होत नाही, पण बनविण्याची चिकाटी हवी. Happy

अरे वा सारिका, माझे आवडते लोणचे. शेजारच्या चोक्सी काकू दरवर्षी देतात ..मी वाट बघतेय लोणच्याची. मस्तच फोटो.
मी कधी स्वत: लोणचे केले नाही, तुमची क्रुती वाचून करावेसे वाटतेय. जमेल का?

धन्यवाद दिनेशदा, दिसताना जरी खुप खटपट दिसली तरी फार अवघड वैगरे नाही हे लोणचे Happy

नंदीनी हे लोणचे बाहेर विकत मिळते का ते माहीत नाही.

Pages