..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्र. ०५/८७:

मुमताज जान आणि जान निसा अकबर - दोघांचंही एकमेकांवर खुप प्रेम. दोघांचा निकाह झाला तेव्हा सारेच खूश. लवकरच मुमताजच्या लक्षात आलं की लग्नाआधी आपण एकमेकांना ज्या नावाने हाक मारायचो तशी आता मारणं शक्य नाही. चुकूनमाकून एखाद्या बुजूर्ग व्यक्तीच्या समोर तसं घडलं तर काय वाटेल त्यांना. तिने आपली ही नाजूक अडचण एका गाण्यातून त्याला कशी सांगितली?

उत्तरः
मेरी जा, मुझे जा ना कहो मेरी जा

अदितीला बशीभरून शंकरपाळ्या Happy

कोडं क्र. ०५/८८:

रात्री हातभट्टीची दारु झोकणं हा दगडूचा नित्यक्रम. पण त्या रात्री दारूत काय गडबड झाली होती काय माहित. दगडूने डोळे उघडले तर तो चक्क कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांची लढाई चालली होती तिथे होता. सुदैवाने (म्हणजे त्याच्या, पांडवांच्या नव्हे!) तो पांडवांच्या बाजूला उभा होता.
'कोण रे तू? इथे कसा आलास?' त्याल अचानक अवतीर्ण झालेला पाहून अर्जुनाने चमकून त्याला विचारलं.
'मी....मी....' दगडूला काही सुचेना.
'कोणी का असेनास? आमच्या बाजूने आहेस का त्यांच्या?' भीमाने गदा फिरवत प्रश्न केला.
आता तर दगडू पुरता बावचळला. ततपप करायला लागला.
त्याची अवस्था पाहून युधिष्ठीराला दया आली. 'हे बघ, घाबरू नकोस. तुझं नाव काय ते सांग पाहू सगळ्यांना'

दगडूच्या जीवात जीव आला. तो कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आला. एकदा पांडवसेनेकडे बघून त्याने हात जोडले आणि नंतर कौरवसेनेकडे बघून. आणि मग खणखणीत आवाजात एक हिन्दी गाणं म्हणून त्याने सगळ्यांना आपली ओळ्ख सांगितली. सांगा बरं ते गाणं.

क्लू: गाणं गोल्डन एरामधलं नाही.

०५/८८:

दोस्तों को सलाम, दुश्मनों को सलाम
रॉकी मेरा नाम...
रॉकी मेरा नाम...
रॉकी मेरा नाम...

०५/०८६
दिनेशदा
बरोबर तेच गाण

इश लिबे डीश (जर्मन) = I love you
व्हिवीयन नावाचा कोणी गायक आहे.
चित्रपट अर्थात संगम

कोडं क्र. ०५/८८:

रात्री हातभट्टीची दारु झोकणं हा दगडूचा नित्यक्रम. पण त्या रात्री दारूत काय गडबड झाली होती काय माहित. दगडूने डोळे उघडले तर तो चक्क कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांची लढाई चालली होती तिथे होता. सुदैवाने (म्हणजे त्याच्या, पांडवांच्या नव्हे!) तो पांडवांच्या बाजूला उभा होता.
'कोण रे तू? इथे कसा आलास?' त्याल अचानक अवतीर्ण झालेला पाहून अर्जुनाने चमकून त्याला विचारलं.
'मी....मी....' दगडूला काही सुचेना.
'कोणी का असेनास? आमच्या बाजूने आहेस का त्यांच्या?' भीमाने गदा फिरवत प्रश्न केला.
आता तर दगडू पुरता बावचळला. ततपप करायला लागला.
त्याची अवस्था पाहून युधिष्ठीराला दया आली. 'हे बघ, घाबरू नकोस. तुझं नाव काय ते सांग पाहू सगळ्यांना'

दगडूच्या जीवात जीव आला. तो कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आला. एकदा पांडवसेनेकडे बघून त्याने हात जोडले आणि नंतर कौरवसेनेकडे बघून. आणि मग खणखणीत आवाजात एक हिन्दी गाणं म्हणून त्याने सगळ्यांना आपली ओळ्ख सांगितली. सांगा बरं ते गाणं.

क्लू: गाणं गोल्डन एरामधलं नाही.

उत्तरः
दोस्तों को सलाम, दुश्मनों को सलाम
रॉकी मेरा नाम...
रॉकी मेरा नाम...
रॉकी मेरा नाम...

श्रध्दा, तुला थंडगार मलाई कुल्फी Happy

कोडं क्र. ०५/८९:

'निमा, निमा'
'आले आले आई. काय झालं?'
'अग, ही साडी बघ. मागच्या महिन्यात घेतली होती ना? सगळी खराब झालीये'
'खराब? असं कसं होईल? मागच्या आठवडयात नेसले होते की पूजेच्या वेळेस'
'तेच म्हटलं मी. हळदीचे डाग पडलेत सगळे. आता कशी धुवायची ही?'
'बघू.' असं म्हणत निमाने साडी हातात घेतली तर पदराच्या एका कोपर्‍याला छोटा हळदीचा डाग होता. बाकी साडी स्वच्छ होती.
'सासूबाईंना सवयच आहे पराचा कावळा करायची' तिच्या मनात येऊन गेलं. पण उघडपणे बोलायची सोय नव्हती. मग तिने एक हिंदी गाणं म्हणून आपलं समाधान करून घेतलं. ओळखा ते गाणं.

क्लू: गाणं गोल्डन एरातलं नाही.

कोडं क्र. ०५/९०:

'Mulder, why are we going to Idaho?' Agent Scully had to finally ask because Mulder had been silent since they had started driving about 2 hours back.
'To investigate a man who had suddenly lost 20 years of his life'
'What?' Scully had her usual skeptical look when Mulder handed over the case file to her.
'Mulder, you know there can be a perfectly reasonable medical explanation for this and....'
'Scully, take a look at the file before you start with that' Mulder chuckled.
Scully opened the file, slightly irritated.
'Nisar Ahmad. Age 35. A teacher by profession. Nothing remarkable in his life so far. No medical history to speak of. And suddenly last week he turns into his teenage self overnight. Has the town people in a perfect uproar alright. What do the doctors say?'
'Nothing' said Mulder, smiling 'they are simply speechless, after running a battery of tests, if I might add for your benefit'
Scully pursed her lips but said nothing as they drove on.
The sheriff of the small town was of no help, as he clearly seemed to be out of his wits. 'To be honest with you, I am used to dealing with petty thieves, an occassional drunken brawl and domestic dispute. Hell, if it comes to that, I can deal with a murder, if it at all happens in this peaceful place. But this is way beyond my pay grade. The gentleman who was in his mid 30s till the beginning of the month isn't a day over 15 now if you ask me.'

'Have you witnessed any strange activity in the town lately?' Mulder asked.
'Define strange' the Sheriff said, puzzled.
'I don't know. Any changes in animal behaviour, strange weather, sudden disappearances...'
'Now wait a minute....speaking of disappearances.....a soldier has come to stay in town for a few days. In fact, he came last week. And caused quite a furore in the community'
'Why is that?' Scully asked, intrigued.
'Well, he and a young lady in town, I forget her name, she is of Iranian origin....well....they have been quite an item. But I can't see how that has anything to do with this case.'
'Thanks Sheriff for your input. We will take it from here' Mulder said as they walked back to their car.

एजंट Mulder ला हिंदी येत असतं तर काय गाणं म्हणून त्याने ह्या केसची उकल केली असती?

क्लू: हे गाणं गोल्डन एरातलं नाही.

कोडं क्र. ०५/९१:

'पोचलो एकदाचे मुंबईला. आता घरी जाऊन मस्त आंघोळ केली की प्रवासाचा सगळा शीण निघून जाईल' पराग म्हणाला.
'अहो, इथून कुठे निघालात?' क्षमा म्हणाली.
'कुठे म्हणजे? रस्ता नको क्रॉस करायला?'
'ट्रेफिक बघताय ना केव्हढा आहे ते. इंदूला घेऊन ह्या गाड्या ओलांडायच्या?'
'अग इथे सिग्नल नाहीये. ह्या गाडया थांबणार नाहीत. इथेच उभं रहावं लागेल अर्धा तास.'
'मग स्कायवॉकने जाऊ यात'
'बाप रे! एव्हढं अंतर चालायचं?'
'आपण दोघंच असतो तर हरकत नव्हती. पण इंदू असताना मी हा रस्ता क्रॉस करायची रिस्क घेणार नाही. तुम्ही येताय की नाही?' क्षमाने निक्षून सांगितल्यामुळे परागचा नाईलाज झाला.
स्कायवॉकवर गेल्यावर क्षमाने इंदूला कडेवरून खाली उतरवलं. तिचा हात दुखायला लागला होता. लांबच लांब मोकळा रस्ता समोर बघितल्यावर गेले २४ तास ट्रेनच्या डब्यात कोंडल्यासारखी झालेली इंदू जाम खुश झाली. कानात वारं गेलेल्या वासरासारखी धूम धावत सुटली.
'अग, इंदू, थांब, पुढे जाऊ नकोस.' असं म्हणत हातातल्या पिशव्या सावरत क्षमाने तिला हाताला धरून मागे खेचलं. पण इंदू तिच्या हाताला हिसडा मारून पळाली.
'अहो, बघताय काय? धरा ना तिला जाऊन.'
'आता का? तुलाच हौस होती ना स्कायवॉकने जायची? तूच आवर आपल्या लेकीला'
'एव्हढ्या पिशव्या हातात घेऊन?'
'गाणं म्हण मग.'
'गाणं?'

उत्तरादाखल परागने एका गाण्याची पहिली ओळ म्हणून दाखवली. आणि दोघं नवराबायको हसत सुटले. सांगा बरं ते गाणं.

५/९० कोडं लै भारी...

जवानी जानेमन हसीन दिलरुबा
मिले दो दिल जवाँ निसार हो गया

पहिल्या जवानी शब्दाची फोड जवान + इ + जानेमन वगैरे. त्यामुळे तो सोल्जर.
आणि दुसर्‍या वाक्यात मूळ गाण्यातलं जवाँ हे दिलाचं विशेषण निसारसाठी.

कोडं क्र. ०५/९०:

'Mulder, why are we going to Idaho?' Agent Scully had to finally ask because Mulder had been silent since they had started driving about 2 hours back.
'To investigate a man who had suddenly lost 20 years of his life'
'What?' Scully had her usual skeptical look when Mulder handed over the case file to her.
'Mulder, you know there can be a perfectly reasonable medical explanation for this and....'
'Scully, take a look at the file before you start with that' Mulder chuckled.
Scully opened the file, slightly irritated.
'Nisar Ahmad. Age 35. A teacher by profession. Nothing remarkable in his life so far. No medical history to speak of. And suddenly last week he turns into his teenage self overnight. Has the town people in a perfect uproar alright. What do the doctors say?'
'Nothing' said Mulder, smiling 'they are simply speechless, after running a battery of tests, if I might add for your benefit'
Scully pursed her lips but said nothing as they drove on.
The sheriff of the small town was of no help, as he clearly seemed to be out of his wits. 'To be honest with you, I am used to dealing with petty thieves, an occassional drunken brawl and domestic dispute. Hell, if it comes to that, I can deal with a murder, if it at all happens in this peaceful place. But this is way beyond my pay grade. The gentleman who was in his mid 30s till the beginning of the month isn't a day over 15 now if you ask me.'

'Have you witnessed any strange activity in the town lately?' Mulder asked.
'Define strange' the Sheriff said, puzzled.
'I don't know. Any changes in animal behaviour, strange weather, sudden disappearances...'
'Now wait a minute....speaking of disappearances.....a soldier has come to stay in town for a few days. In fact, he came last week. And caused quite a furore in the community'
'Why is that?' Scully asked, intrigued.
'Well, he and a young lady in town, I forget her name, she is of Iranian origin....well....they have been quite an item. But I can't see how that has anything to do with this case.'
'Thanks Sheriff for your input. We will take it from here' Mulder said as they walked back to their car.

एजंट Mulder ला हिंदी येत असतं तर काय गाणं म्हणून त्याने ह्या केसची उकल केली असती?

क्लू: हे गाणं गोल्डन एरातलं नाही.

उत्तरः
जवानी जानेमन हसीन दिलरुबा
मिले दो दिल जवाँ निसार हो गया

हे नक्की 'जवानी जानेमन' आहे का 'जवान जानेमन' आहे ह्याबद्दल मला शंका होती. कारण इंटरनेटवर दोन्ही उल्लेख आहेत. श्रध्दा धन्स आणि तुला डबाभरून चिरोट्या - त्या पण पाकातल्या Happy

कोडं क्र. ०५/९२:

रुसलेल्या राम कपूरची समजूत काढायला बायको गौतमीने कुठलं गाणं म्हटलं असेल?

ओ, माझे कोडे पण ओळखा. शेवटचा घसघशीत क्लू देतोय.

०५/७७:
".......तर या सगळ्या समस्यांचे उत्तर आहे मी जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेला हा किडा." विकास आपल्या हातातली काचेची हंडी उंचावून सगळ्यांना तो किडा दाखवतो. मागे पडद्यावर पण त्या किड्याचे चित्र दिसू लागते. विकास आपले भाषण पुढे चालू करतो..... "अजून मी ह्याला काही नाव दिले नाहीये पण हा किडा प्लॅस्टीक अन्न म्हणून खातो आणि तो पाण्यात ठेवला तर तो पाण्याचे रुपांतर पेट्रोल मधे करतो"
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. सगळेजण पडद्यावरच्या प्रतिमेकडे कौतुकाने बघत असतात, तेवढ्यात लाईट जातात. विकासचाच धक्का लागून ती हंडी पडते आणि फुटते. किडा उडतो.
कोन्फरन्स रुममधले सगळे जण मेणबत्त्या पेटवतात आणि किडा शोधू लागतात. शोधता शोधता गाणे पण म्हणतात. कुठले?

क्लू १: तो किडा अगदीच लहान असतो....चिलटच म्हणा ना
क्लू २: किड्याचे चित्र बघत असतानाच लाईट जातात आणि सर्व जण मेणबत्त्या घेऊन शोधू लागतात त्या किड्याला
क्लू ३: आशा, ओपी

आँखों से जो उतरी है दिलमें तसवीर है इक अन्जाने की
खुद ढूंढ रही है शम्मा जिसे क्या बात है उस परवाने की

Pages