..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुश्श! सुटलं एकदाचं Happy मयेकरांना मोठा ख्रिसमस वाला स्पेशल प्लम केक.

०५/७७:
".......तर या सगळ्या समस्यांचे उत्तर आहे मी जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेला हा किडा." विकास आपल्या हातातली काचेची हंडी उंचावून सगळ्यांना तो किडा दाखवतो. मागे पडद्यावर पण त्या किड्याचे चित्र दिसू लागते. विकास आपले भाषण पुढे चालू करतो..... "अजून मी ह्याला काही नाव दिले नाहीये पण हा किडा प्लॅस्टीक अन्न म्हणून खातो आणि तो पाण्यात ठेवला तर तो पाण्याचे रुपांतर पेट्रोल मधे करतो"
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. सगळेजण पडद्यावरच्या प्रतिमेकडे कौतुकाने बघत असतात, तेवढ्यात लाईट जातात. विकासचाच धक्का लागून ती हंडी पडते आणि फुटते. किडा उडतो.
कोन्फरन्स रुममधले सगळे जण मेणबत्त्या पेटवतात आणि किडा शोधू लागतात. शोधता शोधता गाणे पण म्हणतात. कुठले?

उत्तरः
आखों से जो उतरी है दिलमें तसवीर है एक अन्जाने की
खुद ढूंढ रही है शम्मा जिसे क्या बात है उस परवाने की

आवडत्या केकबद्दल धन्यवाद आणि माझ्या ऑल टाइम फेव्हरिट गाण्यात भलतेसलते कीटक घुसवल्याबद्दल निषेध Lol
आता हे गाणं ऐकताना मला हे कोडं न आठवो.

कोडं क्र. ०५/९३:

कृष्णाच्या खोड्यांनी वैतागलेल्या गोपींनी नंदाच्या राजवाड्याच्या दरवाजाला त्याला बांधून ठेवलं. त्याला उद्देशून त्या कोणतं गाणं म्हणाल्या असतील?

क्लू: गाणं गोल्डन एरामधलं आहे

कोडं क्र. ०५/९४:

एकमेकांपासून अनेक प्रकाशवर्षं दूर असलेले दोन ग्रह आकाशगंगेतल्या एका स्फोटामुळे एकमेकांजवळ आले. ते एकमेकांना उद्देशून कोणतं गाणं म्हणतील?

(कृपया कोड्यात खगोलशास्त्रीय अचूकता शोधू नये)

क्लू: गाणं गोल्डन एरामधलं आहे

जिप्सी, अजून २ कोडी टाकली आहेत बघ. Happy

लोक्स, मी आता एकदम सोमवारी उगवणार आहे. तोवर सार्‍या कोड्यांची उत्तरं इथे आलेली असतील अशी अपेक्षा Happy

मामी, इथे १०० झाले की नव्या बीबीसाठी एक कल्पना आहे. आत्तापर्यंत आपण गाण्याच्या मुखड्यावर आधारित कोडी टाकत होतो. पण कडव्यांवर आधारित कोडी टाकली तर??? कोडी रचायला कठिण असतील आणि सोडवायला पण तेव्हढीच मजा येईल.

व्हॉट से लोक्स?

५/९४ >>> कोड वाचल्यावर लगेच ध्यानात आलेली ही दोन गाणी -
ना जाने कहा तुम थे, ना जाने कहा हम थे, जादू ये देखो हम तुम मिले है
बेखुदी में सनम, उठ गये जो कदम आ गये पास हम

कोडं क्र. ०५/८९:

'निमा, निमा'
'आले आले आई. काय झालं?'
'अग, ही साडी बघ. मागच्या महिन्यात घेतली होती ना? सगळी खराब झालीये'
'खराब? असं कसं होईल? मागच्या आठवडयात नेसले होते की पूजेच्या वेळेस'
'तेच म्हटलं मी. हळदीचे डाग पडलेत सगळे. आता कशी धुवायची ही?'
'बघू.' असं म्हणत निमाने साडी हातात घेतली तर पदराच्या एका कोपर्‍याला छोटा हळदीचा डाग होता. बाकी साडी स्वच्छ होती.
'सासूबाईंना सवयच आहे पराचा कावळा करायची' तिच्या मनात येऊन गेलं. पण उघडपणे बोलायची सोय नव्हती. मग तिने एक हिंदी गाणं म्हणून आपलं समाधान करून घेतलं. ओळखा ते गाणं.

क्लू: गाणं गोल्डन एरातलं नाही.

उत्तरः

थोडीसी जो पी ली है
चोरी तो नही की है

पी ली -> पिली -> पिवळी

कोडं क्र. ०५/९१:

'पोचलो एकदाचे मुंबईला. आता घरी जाऊन मस्त आंघोळ केली की प्रवासाचा सगळा शीण निघून जाईल' पराग म्हणाला.
'अहो, इथून कुठे निघालात?' क्षमा म्हणाली.
'कुठे म्हणजे? रस्ता नको क्रॉस करायला?'
'ट्रेफिक बघताय ना केव्हढा आहे ते. इंदूला घेऊन ह्या गाड्या ओलांडायच्या?'
'अग इथे सिग्नल नाहीये. ह्या गाडया थांबणार नाहीत. इथेच उभं रहावं लागेल अर्धा तास.'
'मग स्कायवॉकने जाऊ यात'
'बाप रे! एव्हढं अंतर चालायचं?'
'आपण दोघंच असतो तर हरकत नव्हती. पण इंदू असताना मी हा रस्ता क्रॉस करायची रिस्क घेणार नाही. तुम्ही येताय की नाही?' क्षमाने निक्षून सांगितल्यामुळे परागचा नाईलाज झाला.
स्कायवॉकवर गेल्यावर क्षमाने इंदूला कडेवरून खाली उतरवलं. तिचा हात दुखायला लागला होता. लांबच लांब मोकळा रस्ता समोर बघितल्यावर गेले २४ तास ट्रेनच्या डब्यात कोंडल्यासारखी झालेली इंदू जाम खुश झाली. कानात वारं गेलेल्या वासरासारखी धूम धावत सुटली.
'अग, इंदू, थांब, पुढे जाऊ नकोस.' असं म्हणत हातातल्या पिशव्या सावरत क्षमाने तिला हाताला धरून मागे खेचलं. पण इंदू तिच्या हाताला हिसडा मारून पळाली.
'अहो, बघताय काय? धरा ना तिला जाऊन.'
'आता का? तुलाच हौस होती ना स्कायवॉकने जायची? तूच आवर आपल्या लेकीला'
'एव्हढ्या पिशव्या हातात घेऊन?'
'गाणं म्हण मग.'
'गाणं?'

उत्तरादाखल परागने एका गाण्याची पहिली ओळ म्हणून दाखवली. आणि दोघं नवराबायको हसत सुटले. सांगा बरं ते गाणं.

उत्तरः
धीरे धीरे चल चांद गगन मे

कोडं क्र. ०५/९२:

रुसलेल्या राम कपूरची समजूत काढायला बायको गौतमीने कुठलं गाणं म्हटलं असेल?

उत्तरः
सुन सुन कसमसे

कोडं क्र. ०५/९३:

कृष्णाच्या खोड्यांनी वैतागलेल्या गोपींनी नंदाच्या राजवाड्याच्या दरवाजाला त्याला बांधून ठेवलं. त्याला उद्देशून त्या कोणतं गाणं म्हणाल्या असतील?

क्लू: गाणं गोल्डन एरामधलं आहे

उत्तरः
तुम्हे जीवनकी डोरसे बांध लिया है
तेरे जुल्म-और-सितम सर आंखोपर

जीवन -> जी + वन -> नंद गोकुळचा राजा म्हणून त्याच्या घराचा नंबर १. जी फॉर गोकुळ Happy
डोर = door
पण तरीही कृष्ण गोपींचा लाडका म्हणून "तेरे जुल्म-और-सितम सर आंखोपर"

कोडं क्र. ०५/९४:

एकमेकांपासून अनेक प्रकाशवर्षं दूर असलेले दोन ग्रह आकाशगंगेतल्या एका स्फोटामुळे एकमेकांजवळ आले. ते एकमेकांना उद्देशून कोणतं गाणं म्हणतील?

(कृपया कोड्यात खगोलशास्त्रीय अचूकता शोधू नये)

क्लू: गाणं गोल्डन एरामधलं आहे

उत्तरः
कभी रात दिन हम दूर थे दिन रात का अब साथ है
वो भी इत्तेफाककी बात थी ये भी इत्तेफाककी बात है

०५/९५:
छोट्या मोहितला घेऊन त्याची आई डॉक्टरांकडे आली होती. गेले काही दिवस मोहित रात्री धड झोपत नव्हता. दर तासा दोन तासांनी रडत उठायचा. रात्रीची झोप नीट नाही म्हणून दिवसभर किरकिरत रहायचा. डॉ. जिग्नेश पटेल एक नावाजलेले बालरोगतज्ञ होते. त्यांनी मोहितला तपासले पण त्यांना त्याच्या न झोपण्याचे कारण काही कळत नव्हते. त्याचे वजन बरोबर होते, त्याची आई देत असलेला आहार पण अगदी बरोबर होत, सर्दी / कफ नावालाही नव्हता. मग हा मुलगा झोपत का नाही? मोहितच्या रेशमी काळ्याभोर केसातून हात फिरवता फिरवता डोक्टरांना त्याचे रहस्य उलगडले. मोहितच्या डोक्यात उवा झाल्या होत्या. त्यांनी हसून मोहितच्या आईला त्याच्या न झोपण्याचे रहस्य सांगितले - एका गाण्यातून.

क्लू १: एका नावात थोडेसे काही आहे

कोडं क्र. ०५/९६:

मुंबईतल्या कबाबसाठी प्रसिध्द असलेल्या हॉटेलात 'ती' शिरली तेव्हा ते नेहमीप्रमाणेच लोकांनी गजबजून गेलं होतं. तरी तिच्या नशिबाने तिला एक टेबल रिकामं मिळालं. ती बसते ना बसते तोच वेटरही आला. त्याने दिलेला मेन्यू तिने निरखून पाहिला पण तिला इंग्लिश अजिबात येत नसल्याने तिला काही अर्थबोध होईना. तिने इथे तिथे मदतीसाठी पाहिलं पण जो तो आपला खाण्यात गर्क. एव्हाना वेटर तिच्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला होता. 'नो इंग्लिश' अशी प्रस्तावना करत तिने आपल्या मातृभाषेत बोलायला सुरूवात करताच वेटरच्या चेहेर्यावर प्रश्नचिन्ह आलं. पाचेक मिनिटं खाणाखुणांची भाषा झाल्यावर दोघांनाही आपलं म्हणणं एकमेकांना समजणं अशक्य आहे हे कळून चुकलं. आतापर्यत आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या ध्यानात ही बाब आली होती. त्यातल्या दोघाचौघांनी पुढे सरसावत फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश अश्या भाषांचा मारा करून पाहिला. पण तिची भाषा आशियाई आहे ह्या पलीकडे कोणालाच काही अर्थबोध होईना. ही गडबड बघून दुकानाचा मालक स्वत: तिथे आला. साठी पार केलेल्या त्याच्या तोंडून जॅपनीज भाषा ऐकून समस्त मंडळी अवाक झाली. पण 'ति'च्यावर काही परिणाम नाही. आता मात्र मालक वैतागला. त्याने एका वेटरला कोंबडी, बोकड, मासे अशी चित्रं काढायला सांगितलं. ते बघून तर 'ती' आणखी गोंधळात पडली.

दूर बसलेला एक तरुण ही गम्मत पहात होता. तो शांतपणे उठला. आणि त्या तरुणीकडे जाऊन कोरियन मध्ये बोलू लागला. लगेच तिची कळी खुलली. ती भराभर बोलत सुटली. बघणारे अवाक होऊन दोघांकडे बघत बसले. एव्हाना तिचं काय म्हणणं आहे हे त्या तरुणाला कळलं होतं. तीच गोष्ट हॉटेल मालकाला गाणं म्हणून त्याने कशी सांगितली असेल?

कोडं क्र. ०५/९७:

'काय अमित? आता लग्नाचे लाडू कधी देतो आहेस?'
'काय काका? आत्ताच तर माझं शिक्षण होऊन नोकरी लागलेय. अजून पाच वर्ष तरी माझा लग्नाचा विचार नाही. मस्त लाईफ जगायचं आहे'

अमितला वाटत होतं तशी १-२ वर्ष मजेत गेली. हवा तसा जॉब, मध्ये मध्ये होणार्या परदेशवाऱ्या, झक्कास मित्रमंडळ, सिनेमा, नाटकं ह्यात वेळ कसा जात होता त्याला कळत देखील नव्हतं. त्याच्या संगीताच्या छंदाला सुध्दा जोपासायला विकेंडला वेळ मिळत होता.

आणि मग एका प्रोजेक्टच्या निमित्ताने त्याला मीनल भेटली. भेटीचं रुपांतर ओळखीत, मग मैत्रीत, तिथून प्रेमात झालं. सहा महिन्यात दोघांनी लग्न केलं. सुरुवातीचे काही महिने मजेत गेले. मग अमितला जाणवू लागलं की त्याचा सगळा वेळ ऑफीस आणि घर ह्यातच जातोय. मित्रांना भेटून महिने उलटून गेले. मीनलला नाटकांची आवड नसल्याने त्याचं नाटकं बघणं जवळपास बंद झालं. त्याची आवडती गिटार माळ्यावर धूळ खात पडली. किती नाही म्हटलं तरी लग्नाआधीचे फुलपंखी दिवस आठवून 'गेले ते दिवस' अशी हळहळ वाटायला लागली.

अश्यात लग्नाचा पहिला वाढदिवस आला. पार्टीत मित्रांकडून मीनलला उद्धेशून एखादं गाणं म्हणायचा आग्रह झाला. अमितच्या मनात कुठलं गाणं आलं असेल?

कोडं क्र. ०५/९८:

"Doctor, please. Please tell me how Kavita is doing."
"She is doing fine for the moment Mr. Kumar. But I am afraid her condition is very critical."
"What's wrong with her, doctor?"
"I will explain to you in detail. A heart valve normally allows blood flow in only one direction through the heart. The four valves commonly represented in a mammalian heart determine the pathway of blood flow through the heart.The two atrioventricular (AV) valves, which are between the atria and the ventricles, are the mitral valve and the tricuspid valve. A form of heart disease occurs when a valve malfunctions and allows some blood to flow in the wrong direction. In Kavita's case the mitral valve seems to have stopped working."

त्याच्या पुढे डॉक्टर काय बोलले ते कुमारला ऐकूच आलं नाही. बेडवर शांतपणे पडून असलेल्या कविताकडे पाहत असताना दिवसरात्र बडबड करणारी हीच आपली मैत्रिण का असा प्रश्न त्याला पडला. हिला काय झालं तर आपण कसे जगणार?

हा सीन एखाद्या हिन्दी चित्रपटात असता तर बॅकग्राउन्डला कोणतं गाणं वाजलं असतं?

कोडं क्र. ०५/९९:

केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पाणीपटी रद्द करून आणि वीजबिलात ५०% कपात करून दिल्लीकरांना सुखद धक्का दिला. आतापर्यंत महागाईच्या वजनाखाली दबलेले दिल्लीकर त्या ओझ्याखालून बाहेर येऊन पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ लागले, केजरीवालांचे फोटो सतत समोर ठेऊन त्यांना भजू लागले आणि गाऊ लागले ......

माधव बरोबर Happy

कोडं क्र. ०५/९६:

मुंबईतल्या कबाबसाठी प्रसिध्द असलेल्या हॉटेलात 'ती' शिरली तेव्हा ते नेहमीप्रमाणेच लोकांनी गजबजून गेलं होतं. तरी तिच्या नशिबाने तिला एक टेबल रिकामं मिळालं. ती बसते ना बसते तोच वेटरही आला. त्याने दिलेला मेन्यू तिने निरखून पाहिला पण तिला इंग्लिश अजिबात येत नसल्याने तिला काही अर्थबोध होईना. तिने इथे तिथे मदतीसाठी पाहिलं पण जो तो आपला खाण्यात गर्क. एव्हाना वेटर तिच्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला होता. 'नो इंग्लिश' अशी प्रस्तावना करत तिने आपल्या मातृभाषेत बोलायला सुरूवात करताच वेटरच्या चेहेर्यावर प्रश्नचिन्ह आलं. पाचेक मिनिटं खाणाखुणांची भाषा झाल्यावर दोघांनाही आपलं म्हणणं एकमेकांना समजणं अशक्य आहे हे कळून चुकलं. आतापर्यत आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या ध्यानात ही बाब आली होती. त्यातल्या दोघाचौघांनी पुढे सरसावत फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश अश्या भाषांचा मारा करून पाहिला. पण तिची भाषा आशियाई आहे ह्या पलीकडे कोणालाच काही अर्थबोध होईना. ही गडबड बघून दुकानाचा मालक स्वत: तिथे आला. साठी पार केलेल्या त्याच्या तोंडून जॅपनीज भाषा ऐकून समस्त मंडळी अवाक झाली. पण 'ति'च्यावर काही परिणाम नाही. आता मात्र मालक वैतागला. त्याने एका वेटरला कोंबडी, बोकड, मासे अशी चित्रं काढायला सांगितलं. ते बघून तर 'ती' आणखी गोंधळात पडली.

दूर बसलेला एक तरुण ही गम्मत पहात होता. तो शांतपणे उठला. आणि त्या तरुणीकडे जाऊन कोरियन मध्ये बोलू लागला. लगेच तिची कळी खुलली. ती भराभर बोलत सुटली. बघणारे अवाक होऊन दोघांकडे बघत बसले. एव्हाना तिचं काय म्हणणं आहे हे त्या तरुणाला कळलं होतं. तीच गोष्ट हॉटेल मालकाला गाणं म्हणून त्याने कशी सांगितली असेल?

उत्तरः
बडे मियॉ दिवाने ऐसे ना बनो
हसीना क्या चाहे हमसे सुनो

Pages