चपखल!

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्‍या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?

सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.

chapakhal_0.jpg

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.

उदाहरणार्थः What's up? / Wassup?

शब्दशः काय आहे वर?

भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?

या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'

आलं लक्षात? मग करूया सुरू..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

A well-lit house drives away gloom.
१) चांगले उजळलेले घर अंधाराला दुर नेते.
२) ज्ञानाचा दिवा घरोघरी, समाजातला अंधार दुर करी.

हा माझा प्रयत्न.

A well-lit house drives away gloom.

१) प्रकाशीत एक घर अंधार करी दूर
२)ज्ञानाने उजळलेले एक घर प्रकाश देईल समाजभर

लोकहो, भावानुवाद बर्‍यापैकी जवळ आहेत. पण शब्दशः अनुवादात थोडे काम करा अजून.

यमक जुळलेच पाहिजे असे नाही Happy साधे सोपे, पण चपखल शब्द वापरा.

१)चांगलं प्रकाशीत घर दूर नेईल अंधार

२)प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा

१)चांगलं प्रकाशमान घर दूर नेईल अंधार

२)घरोघरी ज्ञानदिप उजळती, तिमिर बघ लोप पावती

A well-lit house drives away gloom.
प्रकाशीत घर काळोखाला दूर सारत.
तिमिराचा नाश करा. तेजाचा स्विकार करा.

१) विहीरीत दिवा लावलेलं घर अंधाराला दूर पळवतं/(गाडीत घालून) दूर नेतं Proud
२) ज्ञानज्योती तेवत्या ठेवा, जिथे अंधार आहे
उजळू द्या अंधारलेली, वाट ही वैरीण आहे
( हे कुठे ऐकलंय देव जाणे :अओ:)

A well-lit house drives away gloom

उजळलेले घर चालवत घेऊन जाते निराशेला

प्रकाशाने उजळलेल्या घरात नाही निराशेला थारा......

१) एक शेंदरी चुटकुला सांगायला किती किंमत मोजावी लागते, हे तुम्हाला काय कळणार रमेशबाबू?
२) अरे, बत्थड भेजा, रेम्या डोक्याच्या रम्या, सौभाग्य काय असतं हे कळायला स्त्रीचं हृदय कळावं लागतं...

एक चिमूट्भर कुंकवाची किंमत तुला काय समजणार रमेशराव?

कुकवाची किमत लगीन झालेल्या बाईला ईचारा की रमेशभाऊ.........

एक चिमुटभर कुंकुवाची किंमत तुम्हाला काय कळणार रमेशबाबू?
ओ रमेसबाबु, एक चिमुटभर कुकु भांगात भराय तुझ्या बापाचं काय जातं म्हणते म्या

एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे रमेशबाबू?

एक चिमूट कुंकवाची किम्मत तुला काय समजणार रमेशभाऊ?
या काळ्या काचेच्या मण्यांशी जोडलेल्या भावना तुमच्यासारख्या पुरुषांना काय समजणार हो?

एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे रमेशबाबू?
एका चिमुटभर कुंकवाची किंमत तुम्हाला काय समजणार रमेशसाहेब?
कुंकू चिमुट्भर वाटल तरी, त्याची किंमत तुमाला नाय कळायची, त्यासाठी एक बाईच हवी.

एका चिमूटभर कुंकवाची किंमत तुम्हाला काय कळणार रमेशराव ?

१) मेल्या रमेश !! तुला काय ठावं एका चिटुकभर कुकवाची किंमत ?
२) एका चिमुट्भर कुकवात काय ताकद असतिये ते तुम्हासनी नाय उमगणार, रमेश राव....

Pages