चपखल!

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्‍या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?

सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.

chapakhal_0.jpg

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.

उदाहरणार्थः What's up? / Wassup?

शब्दशः काय आहे वर?

भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?

या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'

आलं लक्षात? मग करूया सुरू..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझा चहाचा कोप* नाही.
"काय राव! चेष्टा करता का गरीबाची?"

(माझ्या आज्जीचा पर्फेक्ट मराठमोळा शब्द, कपासाठीचा. Happy )

बरं असं आहे का मग घ्या नविन कोब्रा स्वागत

यावे! यावे महाशय! आगमन ठेवावे!
अरे या या काय म्हणता आज इकडे कुणीकडे? मी आत्ता बाहेरच चाललो होतो!

"आईये! आईये जनाब! तश्रीफ रखिये!">>>>>
१. या, या, महाराज, आसन ग्रहण करा.
२. येवा येवा पाव्हनं, जरा टेका वाईच.

लोकहो, तुमचा उत्साह पाहून हर्ष झाला, असाच लोभ असूद्या, पण नियमही लक्षात ठेवा Happy

दोन्ही अनुवाद करायचे आहेत.

पहिला: शब्दशः
दुसरा: भावानुवाद

एका आयडीने एकच अनुवाद करा कृपया. एकापेक्षा जास्त अनुवाद देऊ नका. तुम्हाला सर्वोत्तम वाटतो तोच प्रतिसाद पोस्ट करा.

बक्षिस हवं असेल, तर ह्या नियमांकडेही लक्ष असूद्या Happy

यावे! यावे महाशय! आगमन ठेवावे!

या, या पावणं! टेका की जरा निवांत!>> हेही बक्षिस लोलालाच!!

2013 MBD prize spice1.jpg

हा नियम नाहीये, पण शक्यतो ज्यांना एकदा बक्षिस मिळाले आहे, त्यांनी दुसर्‍यांना संधी द्या Happy

पुढचा अनुवाद घ्या:

A well-lit house drives away gloom.

एक चांगलं प्रकाषीत घर अंधाराला दुर ठेवतं!

घरो घरी उजळो दिवा, अंधाराला दुरच ठेवा!

Pages