चपखल!

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्‍या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?

सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.

chapakhal_0.jpg

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.

उदाहरणार्थः What's up? / Wassup?

शब्दशः काय आहे वर?

भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?

या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'

आलं लक्षात? मग करूया सुरू..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. >>> दोन्ही अनुवाद लिहायचे आहेत. तेवढ्यासाठी बक्षीस घालवू नका लोकहो Happy

मला वाटलं की तोही अर्थ बरोबर नाही. ठीक आहे टाकते Happy

तू कुठल्या शेतातला मुळा आहेस ?

तू कोण टिकोजीराव लागून गेलास रे मोठा ?

अरे शिव्या देणं चाललय व्हय..
(जरा चांगली वाक्यं नाहीत का?)

(समोर कोणाला बसवून/आठवून वाक्य अनुवाद करायची ?)

" तुम किस खेत की मूली हो? "

१. तू कुठल्या शेतातला मुळा आहेस ?

२. कुठल्या गावचा शाना रे तू ?

तू कुठल्या शेतातला मुळा आहेस ?

"आलाय मोठा शाणा! थोबाड बघ आरशात!" >>

प्राजक्ता, हार्दिक अभिनंदन!! हे तुमचं खास बक्षिस..

2013 prize 6.jpg

"This is not my cup of tea"

हा चहाचा कप माझा नाही

_हे माझ्या आवडीचं काम नाही
_हे माझ्या नशिबातच नाही

"This is not my cup of tea"
>> हा चहाचा कप माझा नाही.
हे आपल्या बापाच्यानं व्हायचं नाय.

"This is not my cup of tea"
>> हा चहाचा कप माझा नाही.
मला नाही बाई जमणार हे काम
------------
"This is not my cup of tea"
>> हा चहाचा कप माझा नाही.
जमणाSSSSर नाही.

----------------
"This is not my cup of tea"
>> हा चहाचा कप माझा नाही.
हे मला जमणं जरा अवघड आहे..
--------------------
"This is not my cup of tea"
>> हा चहाचा कप माझा नाही.
माझ्या अडसट्यातली गोष्ट नाही ही!
--------------------

"This is not my cup of tea"
>> हा चहाचा कप माझा नाही.
प्रयत्न केला तरी 'करायला गेलो मारुती .. आणि झाला गणपती' असलं काहीतरी व्हायचं.. नाही जमणार..

हा माझा चहाचा कप नाही
ह्या असल्या फंदात आपण पडत नाही!

हा माझा चहाचा कप नाही
हिथं आपल काम नाही बा!

हा माझा चहाचा कप नाही
हि लय शेण्याची कामं हाईत, आपली न्हवं!

Pages