चपखल!

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 06:18

इंग्रजी, मराठी, हिंदी अशा स्वतंत्र भाषांमधून आता आपण मिंग्रजी, हिंग्लिश वगैरे भाषांपर्यंत येऊन पोचलोय. भाषेची सर्रास मिसळ करताना मात्र एक जाणवतं, की एका भाषेतला तोच अचूक भाव दुसर्‍या भाषेत मात्र मांडता येत नाही. का, येईल? करायचा का प्रयत्न?

सादर करतोय एक गंमत खेळ 'चपखल'.

chapakhal_0.jpg

ह्यात दिल्या गेलेल्या इंग्रजी अथवा हिंदी वाक्यांचे दोन अनुवाद करायचे आहेत. एक शब्दश: आणि एक भावानुवाद. शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे. भावानुवादात, वाक्याच्या आशयानुसार शब्द बदलले तरी चालतील.

उदाहरणार्थः What's up? / Wassup?

शब्दशः काय आहे वर?

भावानुवाद: काय मग, कसं काय चाललंय?

या ऐवजी, एखादा अस्सल कोल्हापुरी असेल, तर म्हणेल, 'काय काय आनि?'

आलं लक्षात? मग करूया सुरू..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयनः अजूनही भाग घेऊ शकता.

या वर दिलेल्या वाक्याचे दोन्ही चपखल अनुवाद लिहा आणि आकर्षक बक्षिस मिळवा.
त्वरा करा! बक्षिसं मर्यादित आहेत! Proud

कुत्र्या, नीचा मी तुझं रक्त पिऊन जाईन.

लाळघोट्या, नालायका तुला कच्चा कापून खाईन.

( अरेरे, काय वेळ आली माझ्यावर Proud )

कुत्र्या , हलकटा , मी तुझ रक्त पिऊन टाकीन
सुक्काळीच्या , न्हाई तुला गाडला हित तर नाव सांगाणार नाही ... म्हनून

कुत्र्या , हलकटा , मी तुझ रक्त पिऊन टाकीन
सुक्काळीच्या , न्हाई तुला गाडला हित तर नाव सांगाणार नाही ... म्हनून>>

केदार जाधवः हार्दिक अभिनंदन!! हे तुमचं बक्षिस!

2013 prize 1.jpg

शब्दशः अर्थातच शब्दश: अनुवाद करायचा आहे >>> संयोजक शब्दशः अनुवाद करायचा आहे ना ? मग 'जाऊंगा' चं शब्दशः भाषांतर 'जाईन' असं होतं Happy

हा धागा जरा उशीराने बघितला. बक्षिस दिलं गेलंय पण तरी:
"कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा.."
"कुत्र्या हलकटा मी तुझं रक्त पिऊन जाइन"
"हलकटा तुझं नरडं फोडून घोट घेइन मेल्या" किंवा "मढं बशिवलं मेल्या तुझं"

मी पण आत्ताच पाहिला हा खेळ.
आरं कुत्र्या, तुज्या नरडीचा घोटच घेत्ये का नाय बग.

आता जरा सात्विक वाक्य देणारात का? पापक्षालन करायला?

इतका वेळ हा धागा कुठे होता???? मी देखिल आत्ता पाहिला. माझी एंट्री :

"कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा.." --> आता आपली सटकली ....

" तुम किस खेत की मूली हो? " >>> शब्दशः --> तू कोणत्या शेतातला मुळा हैस रं?
>>>> तुला कोणी हिंग लावूनही विचारत नाय रे... गमज्या करतोय!

Pages